प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये काही कॉमन रंगाचे कपडे असतातच. जसं की काळ्यापांढऱ्या रंगाची ओढणी, ब्लाऊज, शर्ट अथवा लेगिंग्स… काळी लेगिंग्स हा बॉटम विअरमधील असा एक प्रकार आहे जो तुम्ही कोणत्याही ड्रेस, कुर्ती अथवा टॉपवर परिधान करू शकता. जर तुमच्या कडे काळी लेगिंग्स असेल तर तुम्ही तिच्या मदतीने तुमचा लुक पारंपरिक, एथनिक आणि वेस्टर्न असा कोणताही करू शकता. कारण काळा रंग कोणत्याही रंगासोबत आणि स्टाईलसोबत मॅच होतो. यासाठीच या काही टिप्स फॉलो करा आणि करा तुमचा हटके लुक
काळी कुर्ती अथवा काळा ड्रेस
जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा ड्रेस अथवा कुर्ती असेल तर तुम्ही त्याच्यासोबत काळी लेगिंग्स पेअर करू शकता. या लुकसोबत तुम्ही कसा दुपट्टा अथवा स्टोल घेता यावर तुमचा लुक ठरू शकतो. जर तुम्ही यावर रंगीत पारंपरिक एथनिक स्टाईल दुपट्टा घेतला तर हा एक छान लुक तुम्हाला एखाद्या फॅमिली पार्टी, सामाजिक कार्यक्रम अथवा लग्नकार्यात करता येऊ शकतो. फक्त यासाठी एखाद्या छान सिल्कचा दुपट्टा घ्या आणि त्याला मॅचिंग कानातले आणि फूटवेअर परिधान करा. अशा पेहरावावर ऑक्सीडाईज्ड ज्वैलरी जरूर कॅरी करा आणि डोळ्यात काजळ लावायला विसरू नका.
स्टायलिश दिसायचं आहे मग वापरा या फॅशन अॅक्सेसरिज
टी शर्टसोबत कॅज्युअल लुक
पिकनिक अथवा शॉपिंगसाठी तुम्हाला साधा कॅज्युअल लुक हवा असेल तुम्ही प्रिंटेड टॉपसोबत काळी लेगिंग वापरू शकता. लूज शर्ट, जॅकेट अथवा जीमवेअरवर काळी लेगिंग्स कॅरी केली तर तुम्हाला छान स्पोर्टी लुक मिळेल. अशा पेहरावासोबत पायात स्नीकर्स अथवा कॅनव्हास शूज खुलून दिसतात. मित्रांसोबत मस्त भटकंटी करण्यासाठी अथवा नेहमीच्या पेहरावासाठी हा पर्याय अतिशय उत्तम ठरेल. मात्र त्यासाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये काळ्या रंगाच्या लेगिंग्सची व्हराईटी असायला हवी. जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)
शॉर्ट टॉप आणि प्रिंटेड लेगिंग्स
क्रॉप टॉप अथवा शॉर्ट टॉप सोबत तुम्ही जर काळी लेगिंग परिधान केली तर तुम्हाला छान आरामदायक आणि सुटसुटीत कपडे घातल्याचा आनंद मिळेल. थोडं स्टायलिश करण्यासाठी यासोबत डेनिम जॅकेट अथवा स्टायलिश शूज वापरा. ज्यामुळे तुमचा लुक स्टायलिश आणि कन्फर्टेबल असा दोन्ही होईल. मित्रमंडळींसोबत फिरायला जाताना तुम्ही हा लुक नक्कीच करू शकता. जर तुम्ही यासाठी जेगिंग्स अथवा काळी प्रिटेंड लेगिंग्स वापरली तर जास्त छान दिसेल. जर तुम्ही या पेहरावासोबत श्रग कॅरी केलं तरी तुम्हाला एक क्लासी लुक मिळू शकतो.अशी घ्या लेगिंग्सची काळजी, नाही होणार लवकर खराब