हल्ली खूप जणांना जीन्स घालायला मुळीच आवडत नाहीत. जाडजूड जीन्स घालणे हे अनेकांसाठी फारच कंटाळवाणे असते. कारण जीन्स या अनेकांना खूप जाड वाटतात. बसता- उठता खूपच त्रास होतो. जीन्स न आवडण्यांचे अनेकांचे आणखी एक कारण म्हणजे ते मांड्या, कंबर या भागांकडे जीन्स या सतत लागत राहतात. यातून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण स्कर्ट किंवा जेगिंग्स घालणे पसंत करतात. पण अंगाला एकदम चिकटून असणाऱ्या या कपड्यांना पर्याय म्हणून पलाझो किंवा अशा पँट्स घातल्या जातात. पण असे कपडे वेस्टर्न लुक देतील असे मुळीच सांगता येत नाही. तुम्ही ही वेस्टर्न लुकच्या शोधात असाल तर सध्या जॉगर्स पँट हा सध्या फॅशनमधील एक नवा ट्रेंड आहे. जो तुम्ही नक्की ट्राय करायला हवा.
ऑफिसमध्ये घालण्यासाठी परफेक्ट आऊटफिट्स
जॉगर्स पँट म्हणजे काय?
जॉगर्स पँट या जीन्स मटेरिअलमध्ये सुद्धा मिळतात. पण आम्ही ज्या पँट्सचा विचार करत आहोत. या पँटस होजिअरी किंवा पातळ कपड्यांमध्ये असतात याचा उपयोग तुम्हाला अगदी कोणत्याही टिशर्टवर करता येतो. या पँट सैल असल्या तरी तुम्हाला एक वेगळा लुक देतात. त्यामुळेच या पँट्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये तुम्हाला फार रंग मिळत नसेल तरी देखील काही खास रंग यामध्ये मिळतात. मिलेटरी ग्रीन यामधील असा रंग आहे जो अनेकांना खूप आवडतो. अशा पँटस तुम्हीही बाजारात नक्कीच पाहिल्या असतील.याचा उपयोग करुन नेमकी कशा पद्धतीने स्टायलिंग करायची ते आता जाणून घेऊया.
अशी करा Palazzo सोबत हटके स्टाईल How To Style Palazzo In Marathi
अशी करा जॉगर्स पँटची फॅशन
आता जर तुम्ही जॉगर्स पँट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोड्या टिप्स जाणून घेऊया.
- जॉगर्स पँट या लिनन किंवा कॉटन मटेरिअलमध्ये घेतली असेल तर तुम्ही त्यावर अगदी कोणातही टॉप घालू शकता. टिशर्ट किंवा कॉट्नचे शॉर्ट टॉप त्यावर खूपच चांगले उठून दिसतात.
- जॉगर्स पँटमध्ये स्ट्रेट फिट आणि बलुन पँट्स असे प्रकारही मिळतात. या पँटस तुम्हाला एक वेगळाच लुक देतात. या पँटस पिकनिक किंवा आऊटिंगसाठी खूप चांगल्या दिसतात.
- जर तुम्ही ऑफिससाठी या पँटस घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्ट्रेट फिट पँट घ्या. कारण त्या चांगल्या दिसतात. त्यावर तुम्हाला एखादा छान शर्टही घालता येतो.
- जर तुम्ही पातळ कपड्याची निवड करत असाल तर तुम्ही त्याच्या आतमध्ये थाँग पँटीज घाला. कारण त्याच्यामुळे मागे कोणताही आकार दिसत नाही.
- जर तुम्ही या टॉपवर स्पगेटी टॉप्स किंवा शॉर्ट टॉप्स घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गळ्यात एखादी पातळ चेन किंवा फॅन्सी पण लहानसा नेकपीस घालायला मुळीच विसरु नका. त्यामुळे तुमचा लुक अधिक चांगला उठून दिसतो.
आता जर तुम्ही जॉगर्स पँट वापरायचा विचार केला असेल तर तुम्ही या काही पाँईट्सचा नक्की विचार करा.
कोणता पॅटर्न शिवू असा पडलाय प्रश्न,तुमच्यासाठी 10 ट्रेंडी पंजाबी ड्रेस पॅटर्न