ADVERTISEMENT
home / Handbags
सेलमध्ये बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदी करा हे प्रकार

सेलमध्ये बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदी करा हे प्रकार

वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग खरेदी करायला आणि त्या कॅरी करायला तुम्हाला आवडत असतील तर आजचा विषय तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आपण लेटेस्ट ट्रेंड्सच्या खास बॅग्जविषयी माहिती घेणार आहोत. सध्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी सेल आणि डिस्काऊंट सुरु आहे. मार्च महिन्यापासून राहिलेले बॅग्जचे कलेक्शन बाजारात तसेच पडून आहे. त्यामुळे अगदी महागड्या ब्रँडच्या बॅगाही तुम्हाला आता स्वस्त दरात मिळत आहे. तुम्ही या संधीचे सोने करण्याचा विचार करत असाल आणि काही चांगल्या बॅग घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासोबत आम्ही काही खास बॅग्जच्या डिझाइन शेअर करणार आहोत ज्या तुम्ही घेऊ शकता.

तान्ह्या बाळाला मालिश करण्याचे फायदे आणि पद्धत

टोट बॅग

टोट बॅग हा अनेक ब्रँडमध्ये तुम्हाला अगदी सहज मिळू शकतो. लांब दोऱ्या आणि एकच कप्पा असणारी ही बॅग अनेकांच्या आवडीची आहे. कारण जर तुम्हाला खूप कप्पे असलेल्या बॅग आवडत नसतील तर या बॅग तुम्हाला आवडण्यासारख्या आहेत. तुमची पाण्याची बाटली, फोन, चार्जर केस असे कोणतेही सामान राहण्यासाठी ही बॅग एकदम चांगली आहे. या बॅग्जमध्येही आता तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात. जर तुम्हाला बॅगवर खूप काही डिझाईन्स आवडत नसतील तर तुम्ही प्लेन रंगाच्या बॅगा निवडा. त्याचे पट्टेही लेदर असू द्या. म्हणजे तुम्हाला अगदी इतर वेळी फिरायला जातानाही ही बॅग नेता येईल. या बॅग साधारण 1500  रुपयांपासून पुढे मिळतात. 

स्लिंग बॅग

अगदी मोकळे हात आणि जास्त वजन न घेता फिरायचे असेल तर अशावेळी तुम्हाला स्लिंग बॅग अत्यंत फायदेशीर असते. अगदी मोजके सामान घेऊन तुम्ही ही बॅग कॅरी करु शकता ही एका खांद्यावर घेण्यासारखी बॅग असल्यामुळे तुम्हाला अगदी कोणत्याही कपड्यांवर घेता येते. साडी असो वा वेस्टर्न ड्रेस कशावरही खुलून दिसण्यासाठी या बॅग एकदम चांगल्या असतात. अशा बॅग्जमध्ये तुम्हाला वेगवेगळे आकार मिळतात. एक छोटी पाण्याची बाटली राहण्यापासून ते तुम्हाला बऱ्यापैकी सामान ठेवता येईल अशा बॅगही यामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळतात. या बॅग लहान वाटत असल्या तरी त्यांच्या किंमतीही मोठ्या बॅग्ज इतक्याच महाग असतात. 

ADVERTISEMENT

कोविडच्या काळात लग्न करताय, मग मेकअप आर्टिस्ट ठरवताना अशी घ्या काळजी

सॅचेल बॅग

अगदी फॉर्मल आणि एलिगंट वाटणारा असा बॅगचा प्रकार म्हणजे सॅचेल बॅग यांचा आकार एखाद्या सॉफ्ट बॉक्स प्रमाणे असतो यामध्ये तुम्हाला एक चैन आणि त्यामध्ये असलेले अनेक कप्पे असा पर्याय असतो. या बॅगांची फॅशन तरी बऱ्यापैकी फॅशनमध्ये असते. या बॅग अगदी कोणत्याही प्रसंगी तुम्ही कॅरी करु शकता. फक्त या बॅगांचे हँडल लहान असल्यामुळे त्या तुम्हाला काखेत घेता येत नाही तर तुम्हाला ती विशिष्ट पद्धतीने घ्यावी लागते. जरी तुम्हाला अशा बॅग आवडत नसल्या तरी एखादी अशी बॅग तुमच्याकडे असू द्या. तुमच्या वेस्टर्न आणि इंडो-वेस्टर्न अशा सगळ्या कपड्यांवर या बॅग उठून दिसतात. या बॅग 2000रुपयांच्या पुढेच असतात. 


आता सेलमध्ये बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्की अशा पद्धतीच्या बॅग घ्या.

बॅगसोबत स्वच्छताही आहे तितकीच महत्वाची त्यामुळे तुमच्यासोबत आमचे खास प्रोडक्टही असायला हवेत जे तुम्हाला प्रवासात तुम्हाला ठेवतील सुरक्षित. यासाठी या पौष्टिक क्रीमचा प्रयत्न करा स्वच्छताविषयक हाताची काळजी

ADVERTISEMENT

वॅक्सिंगच्या कटकटीपासून वाचायचे असेल तर फुलबॉडी लेझर आहे उत्तम

 
15 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT