ADVERTISEMENT
home / Care
litchi hair mask in marathi

केसांसाठी बेस्ट आहे लिचीचा हेअर पॅक,जाणून घ्या फायदे

उन्हाळ्यात काही खास फळं खायला मिळतात. आंबे, ताडगोळे, जांभळं याप्रमाणे या काळात लिचीचा सीझनही सुरु असतो. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, ई, डी, प्रोटीन्स, अॅंटि ऑक्सिडंट्स भरपूर असतातच. पण लिचीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात लिची खाण्याचा फायदाच होतो. शरीर हायड्रेट राहण्यासाठी उन्हाळ्यात लिची मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. मात्र फक्त आरोग्यासाठीच नाही तर लिची तुमच्या केसांसाठीही फायदेशीर ठरते. कारण लिचीमधील पोषक घटक तुमचा स्काल्प हायड्रेट ठेवतात आणि केस मऊ आणि चमकदार करतात. यासाठी जाणून घ्या लिचीचे केसांवर होणारे फायदे आणि लिचीचा घरच्या घरी करता येणारा हेअर मास्क

लिचीचे केसांवर होणारे फायदे

लिची पाणीदार फळ असल्यामुळे तुमची त्वचा आणि स्काल्प लिचीमुळे हायड्रेट राहतो. ज्यामुळे त्वचा आणि केस कोरडे पडत नाहीत. 

  • लिचीमधील व्हिटॅमिन सी, ई, डी केसांच्या वाढीसाठी फायद्याचे ठरतात. केस मजबूत आणि लांबसडक होण्यासाठी लिची खाणं आणि केसांसाठी वापरणं उपयुक्त ठरू शकतं. 
  • केस निस्तेज होण्याचं प्रमुख कारण धुळ, माती, प्रदूषण असू शकतं. कारण त्यामुळे तुमच्या केसांमध्ये चिकटपणा निर्माण होतो आणि केस खराब होतात. पण जर तुम्ही लिचीचा हेअर मास्क लावला तर केसांचे नुकसान न होता केस स्वच्छ आणि चमकदार होतात.
  • लिचीमध्ये असेलेले पोषक घटक केसांच्या मुळांमध्ये खोलवर जातात आणि केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ लवकर होते.
  • व्हिटॅमिन्समुळे केसांचे चांगले पोषण होते आणि केसांचा निस्तेजपणा कमी होवून केसांना नैसर्गिक ग्लो येतो. कारण लिचीचा हेअर मास्क एका उत्तम हेअर कंडिशनर प्रमाणे कार्य करतो.

लिचीचा हेअर मास्क कसा बनवाल

लिचीचा हेअर मास्क घरी बनवणं अतिशय सोपं आहे.

साहित्य –

ADVERTISEMENT
  • आठ ते दहा लिची
  • दोन चमचे कोरफडाचा गर

हेअर मास्क असा करा तयार 

  • लिची सोलून बिया बाजूला करा आणि त्याचा गर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • लिचीच्या पल्पमध्ये कोरफडाचा गर मिसळा आणि पुन्हा मिक्सरमध्ये एकजीव करा. 
  • तयार झालेले मिश्रण केसांच्या मुळांना लावा.
  • अर्धा तास हा मास्क केसांमध्ये असू द्या.
  • केस स्वच्छ करा आणि सॉफ्ट टॉवेलने टिपून कोरडे करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

26 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT