ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Manicure At Home In Marathi

पैसे वाचवायचे असतील तर घरीच करा मेनिक्युअर – Manicure At Home In Marathi

 

सुंदर नखं कोणाला आवडत नाहीत. नखांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून मेनिक्युअर केले जाते. मेनिक्युअर केल्यानंतर नखं आणि हात सुंदर दिसतात. हातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मेनिक्युअर केले जाते. केवळ एक सौंदर्याचे रिच्युअल म्हणून मेनिक्युअर केले जात नाही. मेनिक्युअर करण्याचा खर्च हा प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. अगदी 500 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत मेनिक्युअर केले जातात. दर महिन्याला मेनिक्युअर करणे हे चांगले असले तरी प्रत्येकाच्याच बजेटमध्ये ते बसेल असे सांगता येत नाही. अशावेळी घरीच मेनिक्युअर करायचा विचार करत असाल तर तुम्ही अगदी सोप्याच पद्धतीने मेनिक्युअर करा. मेनिक्युअर करणे फार कठीण नाही. आम्ही दाखवलेल्या सोप्या स्टेप्स तुम्ही केल्या तर तुम्हाला अगदी कधीही मेनिक्युअर करता येईल.

मेनिक्युअर’ म्हणजे काय ? (What Is Manicure In Marathi)

मेनिक्युअर’ म्हणजे काय?

Instagram

‘मेनिक्युअर’ ही एक कॉस्मेटिक ब्युटी ट्रिटमेंट असून ती फक्त नखांवर केली जाते. मेनिक्युअरमध्ये नख स्वच्छ करणे, नखांना आकार देणे, नखांना पुशिंग आणि क्लिपिंग करणे असे सगळे केले जाते. मेनिक्युअर करण्याची ही पद्धत पाश्चात्य देशातून आली असून नखं स्वच्छ असणे आणि नखांची योग्य काळजी घेतली जाणे हा या मागचा हेतू असतो.नख आणि पाय स्वच्छ आणि सुंदर दिसले की इतर कोणत्याही सौंदर्याकडे फारसे लक्ष जात नाही. महिन्यातून एकदा मेनिक्युअर करताना नखांना मालिश करणे, रिलॅक्स करणे अशा गोष्टी यामध्ये येतात. त्यामुळे फक्त हातांचे सौंदर्य वाढवणारी अशी ही ब्युटी ट्रिटमेंट आहे जी अगदी कोणीही करु शकता. महिला आणि पुरुष या दोघांसाठी ही  ट्रिटमेंट असते.

ADVERTISEMENT

घरीच करा असे मेनिक्युअर (Steps To Follow For Manicure In Marathi)

घरी मेनिक्युअर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने मेनिक्युअर करु शकता. मेनिक्युअर करण्याची ही पद्धत फार कठीण नाही. तुम्ही आरामात करु शकता. मेनिक्युअर कसे करायचे ते आता जाणून घेऊया.

नखं भिजवा

नखं भिजवा

Instagram

मेनिक्युअर करण्याची पहिली पायरी असते ती म्हणजे नखं भिजवण्याची. यालाच soaking असे म्हणतात. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यामध्ये हँड शॅम्पू घालून हात भिजत ठेवायचा असतो. या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ किंवा लिंबूही पिळता येतो. त्यामुळे नखांना चमक मिळते आणि नख टणक होण्यास मदत मिळते. त्यामुळे हाताला सहन होईल इतके गरम पाणी घेऊन त्यामध्ये हात बुडवून ठेवा. साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी हात पाण्यात भिजत ठेवा. 

ADVERTISEMENT

नखं करा फाईल

पाण्यात हात ठेवल्यामुळे नखं नरम होतात.अशी नखं फाईल करणे फारच सोपे जाते. नखांना आकार देण्यासाठी तुम्ही वापरत असलेले फायलर चांगल्या दर्जाचे घ्या. जर फायलर चांगले असेल तर तुम्हाला नखं फाईल करताना फार अडचण येत नाही. अगदी दोन ते चार स्ट्रोकमध्ये तुमची नखं चांगली फाईल होतात. नखांना चांगला आकार येतो. पाण्यातून काढल्यानंतर हे लगेचच करायचे असते कारण नखं नरम असताना ही कामं पटकन होतात. जर तुम्हाला नखं फाईल करायची नसतील तर नेलकटरच्या मदतीने नखं कापून टाका. सुंदर लांब नखं अधिक सुंदर दिसतात.

नखं करा स्वच्छ

मेनिक्युअरचे पहिले काम असते ते म्हणजे नखांची स्वच्छता. आता पाण्यात हात ठेवल्यामुळे नखांमध्ये असलेली घाण ही फुगते आणि नखांना सोडून ती नखांच्या बाहेर पटकन येते. आता मेनिक्युअर किटमधील क्लिनर वापरुन तुम्ही नखांच्या कडांमध्ये अडकलेली घाण, मृत त्वचा असे काढू शकता. मृत त्वचा काढल्यानंतर नखं खूप चांगली दिसू लागतात. नखं स्वच्छ करताना एक काळजी घेणे फार महत्वाचे आहे ते म्हणजे नखांखाली असलेल्या त्वचेला अजिबात जखम होऊ देऊ नका. अगदी सहजगत्या जी घाण निघत असेल ती काढा. जर तुम्हाला असे करताना दुखत असेल तर तुम्ही ती स्टेप्स तिथेच थांबवा कारण त्यामुळे नखांखाली सूज येण्याची शक्यता असते. नखांवरील क्युटीकल अर्थात मृत त्वचा काढून टाकताना हा त्रास होऊ शकतो. नखांवरील क्युटीकल काढले ही नखं सुंदर दिसतात

स्क्रब

नखांना करा स्क्रब

Instagram

ADVERTISEMENT

हातांवरही मृत त्वचा साचून राहते. ही मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब करणे हे फारच महत्वाचे आहे. जर तुम्ही त्वचा योग्य पद्धतीने स्क्रब केली तर तुमच्या हातांवरील मृत त्वचा निघून जाते आणि हात अधिक मऊ आणि मुलायम लागतात. कोणत्याही चांगल्या माईल्ड स्क्रबचा उपयोग करुन तुम्ही हातांची बोटं आणि बोटांमधील जागा यांवर स्क्रब करुन घ्या. स्क्रब हा फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी करायचा आहे. त्यासाठी तुम्ही खूप वेळ घेऊ नका. कारण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडण्याची आणि त्वचा नाजूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी हलक्या हाताने स्क्रब करा. थंड पाण्याच्या मदतीने हात स्वच्छ करुन घ्या.

वाचा – आरोग्यासाठी कॉफी स्क्रब वापरणं चांगलं आहे का ?

मसाज

मसाज

Instagram

ADVERTISEMENT

स्क्रब केल्यानंतर आणि हातांची स्वच्छता केल्यानंतर आता वेळ आहे ती म्हणजे मसाज करण्याची. मसाज करण्यासाठी मेनिक्युअर किटमध्ये चांगले मसाज क्रिम मिळते. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही अगदी कोणतेही मॉश्चरायझर घेऊन छान मसाज करु शकता. मसाज केल्यामुळे हातांच्या नसा मोकळ्या होतात. त्यामुळे आरा मिळतो. या शिवाय रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे हातांवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. मसाज हा रक्त पुरवठा सुरळीत करुन चमकदार त्वचा मिळवून देण्यासाठीच असतो. त्यामुळे छान 5 ते 7 मिनिटं हातांना मसाज करा.

वाचा – केसांच्या वाढीसाठी मसाजचे फायदे मराठीत

मास्क

मास्क

Instagram

ADVERTISEMENT

ज्या प्रमाणे फेशिअल केल्यानंतर मास्क किंवा फेसपॅक लावला जातो. तसाच मेनिक्युअर केल्यानंतर हाताला मास्क किंवा फेसपॅक लावल्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसते. त्यामुळे एखादा चांगला हँड मास्क किंवा फेसपॅक लावा. त्यामुळे त्वचा अधिक खुलून येते. फेस पॅक लावणं किंवा न लावणे हे पूर्णत: तुमच्यावर अवलंबून आहे. पण मास्क लावले तर तुम्ही थोडे रिलॅक्स होऊ शकता. त्यामुळे तुम्ही हमखास मास्क लावा.

मेनिक्युअरसाठी घरीच तयार करा स्क्रब (Homemade Scrub For Manicure In Marathi)

मेनिक्युअरसाठी घरीच तयार करा स्क्रब

Instagram

 

जर तुम्हाला मेनिक्युअर थोडे आणखी बजेटमध्ये करायचे असेल तर तुम्ही स्क्रबही घरात बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक घटक आणि बजेट दोन्हीही कंट्रोलमध्ये राहील.

ADVERTISEMENT

मध- साखर स्क्रब

 

मध आणि साखर हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्वचेवरील मृत त्वचा काढून त्वचेला नैसर्गिक तजेला देण्याचे काम हे स्क्रब फारच उत्तम पद्धतीने करते. मध- आणि साखरेचा स्क्रब करणे फारच सोपे असते.

असा तयार करा स्क्रब: 

  • 1 चमचा दरदरीत वाटलेली साखर आणि 1 चमचा मध घेऊन एकत्र करा. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून तयार स्क्रब हातांना चोळा.
  • हात स्वच्छ धुवून हातांना मॉश्चरायझर लावा. आठवड्यातून एकदा हा असा स्क्रब लावायला काहीच हरकत नाही.

कॉफी स्क्रब

कॉफी स्क्रब

Instagram

ADVERTISEMENT

 

कॉफी ही देखील त्वचेवर उत्तम काम करते. कॉफीच्या उपयोगाने त्वचेचा पोत चांगला होतोच शिवाय त्वचेचा रंगही खुलतो. कॉफीचे अनेक स्किनकेअर प्रॉडक्ट मिळतात. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हातांसाठी ही असा स्क्रब निवडू शकता.

असा तयार करा स्क्रब:

एका भांड्यात कॉफी आणि पाणी एकत्र करा. त्यामध्ये लिंबाचा रस घालून हा स्क्रब हलक्या हाताने नखांना, बोटांना, तळव्याला आणि हाताच्या कोपरांपर्यंत चोळून घ्या. त्यानंतर हात स्वच्छ करा.

स्ट्रॉबेरीज स्क्रब

स्ट्रॉबेरीज स्क्रब

ADVERTISEMENT

Instagram

 

 स्क्रबसाठी फळांचा उपयोग करण्याचा विचार करत असाल तर स्ट्रॉबेरीजचा अर्क असलेला स्क्रब वापरायला काहीच हरकत नाही. या स्क्रबच्या वापरामुळे त्वचेचा रंग खुलतो. त्वचा अधिक चांगली दिसू लागते.

असा तयार करा स्क्रब:

  • स्ट्रॉबेरीज, मध आणि साखर असे एकत्र करुन एक जाड स्क्रब तयार करुन घ्या.
  • हा स्क्रब हातांना फार कणी सारखा लागला नाही.तरी हा माईल्ड स्क्रब फारच कमालीचे काम करतो.
  • त्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसते. (स्ट्रॉबेरीज व्यतिरिक्त तुम्ही अन्य काही फळांचा उपयोग करुनही स्क्रबही तयार करु शकता)

मेनिक्युरसाठी घरीच बनवा हॅन्ड मास्क (Homemade Hand Mask After Manicure In Marathi)

 

जर तुम्ही थोडा रॉयल टच हवा असेल तर तुम्ही घरीच स्पा प्रमाणे मास्क लावू शकता. हे मास्कही तुम्हाला घरी बनवता येतात. घरी असलेल्या साध्या सोप्या घटकांपासून असे रॉयल मास्क तुम्हाला बनवता येतात.

ADVERTISEMENT

बेसन- मुलतानी मास्क

बेसन- मुलतानी मास्क

Instagram

 

मुलतानी माती आणि बेसन हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. कोणत्याही प्रकारची त्वचेसाठी हा एकदम बेस्ट असा मुलतानी मास्क आहे. याच्या वापरामुळे त्वचेला तजेला मिळतो.

असा तयार करा पॅक:

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात 1 एक चमचा बेसन आणि मुलतानी माती घेऊन त्याचा फेसमास्क तयार करा.
  • थोडा थपथपीत असा हा मास्क असू द्या. हा मास्क साधारण 10 मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर हात कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

दही-हळद पॅक

 

तुमचे हात टॅन झाले असतील आणि हात कोरडे वाटत असतील तर तुम्ही हा पॅक वापरु शकता. हा पॅकही सोपा आणि बजेटमध्ये बसणारा आहे.

असा तयार करा पॅक:

  • एका वाटीत एक चमचा हळद आणि दोन मोठे चमचे दही घ्या. ते छान एकजीव करा.
  • तयार मास्क हाताला लावून तो वाळेपर्यंत ठेवा आणि कोमट पाण्याने धुवून टाका.

बेकिंग सोडा- लिंबू स्किन लाईटिंग पॅक

 

बेकिंग सोड्याचे अनेक फायदे आहेत. बेकिंग सोडा हे त्वचा लाईट करण्याचे काम करते. त्याच्या वापरामुळे त्वचा अधिक खुलून येते. बेकिंग सोडा आणि लिंबू त्वचेवरील टॅन कमी करण्यास मदत करते.

असा तयार करा पॅक:

ADVERTISEMENT
  • बेकिंग सोडा- लिंबू पिळून घ्या. हा तयार आणि पातळ पॅक हाताला लावून घ्या.
  • पॅक चांगला वाळू द्या. त्यानंतर हात छान सुकवून घ्या. हात स्वच्छ धुवून घ्या.

वाचा – बेकिंग सोड्याचे हे 8 फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’S)

1. हातांसाठी मेनिक्युअर करणे गरजेचे असते का ?

जर तुम्ही सौंदर्याच्या बाबतीत फारच सजग असाल आणि तुम्हाला तुमची काळजी घ्यायला आवडत असेल तर तुम्ही मेनिक्युअर करायला हवे. त्यामुळे तुमच्या हातांना आराम मिळतो. यामध्ये स्क्रब आणि मसाज अशा गोष्टी असल्यामुळे हातांवर आलेला ताण कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्ही सतत काम करत असाल तर तुम्हाला मेनिक्युअर करणे हे फारच गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या हातांचे मॉईश्चर टिकून राहण्यास मदत मिळते.

2. मेनिक्युअर तुमची त्वचा कोरडी करते का ?

एखादी गोष्ट सतत करणे हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. जर तुम्ही सतत मेनिक्युअर करत असाल तर ही सवयही तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली नाही.सतत गरम पाण्यात हात घालणे, हातांना स्क्रब वापरणे यामुळे त्वचेला आवश्यक असलेले मॉईश्चर कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही शक्यतो महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एक मेनिक्युअर करा. त्यामुळे तुमच्या हाताची त्वचा कोरडी पडणार नाही.

3. मेनिक्युअर कधी करावे ?

अनेकांना हा प्रश्न पडतो की, मेनिक्युअर कधी करावे. तर महिन्यातून एकदा किंवा ज्यावेळी तुमचे हात तुम्हाला अस्वच्छ वाटत असतील. त्यांना चांगल्या मसाजची आणि स्वच्छतेची गरज असेल अशावेळी तुम्ही आवर्जून मेनिक्युअर करा. हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे मेनिक्युअर असतात. एक्सपर्टचा सल्ला घेऊन तुम्ही मेनिक्युअर करा.

18 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT