ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Benefits Of Coffee In Marathi

चेहऱ्यापासून वजनापर्यंत आहेत कॉफीचे फायदे (Coffee Che Fayde In Marathi)

काही वर्षांपर्यंत कॉफी म्हणजे एक हायक्लास ड्रिंक असं म्हटलं जायचं. पण आता याची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन तुम्हाला घराघरामध्ये कॉफी पोहचलेली दिसून येत आहे. तुमच्या मूडनुसार बाजारामध्ये कॉफी उपलब्ध असल्याचं तुम्हाला दिसून येतं. पण कॉफी पिण्याचे नक्की काय फायदे आहेत आणि याचा तुम्हाला कुठे कुठे उपयोग करता येतो याची तुम्हाला कल्पना आहे का? कॉफीने तुमच्या शरीराला आणि तुमच्या आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. या लेखातून आपण कॉफी चे फायदे (coffee che fayde in marathi) आणि त्याचबरोबर त्याचा कसा उपोयग करून घेता येऊ शकतो आणि त्याचं आपल्यासाठी नक्की नुकसान काय आहे हे पाहणार आहोत. 

कॉफीचं पोषण तत्व (Nutritional Value Of Coffee In Marathi)

Nutritional Value Of Coffee

Coffee Che Fayde In Marathi

बऱ्याचदा रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कॉफी पिण्याचे बरेच फायदे आहेत. कॉफी ही कॅफेनयुक्त असो अथवा कॅफेनरहित याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतात. कॉफी प्यायल्याने अनेक रोगांपासून आपल्याला दूर राहाता येतं. पण असं असलं तरीही कॉफी तुम्ही अतिशय मर्यादेत प्यायला हवी. याचं अतिरिक्त सेवन करणं योग्य नाही. कॉफी मुळात आफ्रिकेतील इथिओपिया आणि सुडान इथे निर्माण केली जाते. पण आता मादागास्कर आणि मॉरिशससारख्या देशातही याचं उत्पादन होतं. तर भारतातील केरळ, कर्नाटक यासारख्या ठिकाणीदेखील तुम्हाला कॉफीचं उत्पादन झालेलं पाहायला मिळतं. कॉफी जितकी स्वादिष्ट असते त्याचे फायदेही तितकेच. आपल्याला आलेला थकवा आणि आळस काढून टाकण्यासाठी याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग होतो कारण यामधील अँटिऑक्सिडंट्स यासाठी महत्त्वाचं पोषण असतात.वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते ब्लॅक कॉफी (Black Coffee Benefits in Marathi)

ADVERTISEMENT

कॉफी हे अगदी वेगळंच मिश्रण आहे. सकाळच्या वेळी कॉफी हे एक परफेक्ट एनर्जी ड्रिंक आहे तर याव्यतिरिक्त तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही हे नैसर्गिक साहित्य आहे. कॉफीचा एक कप तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी याची मदत होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम चांगलं राखण्यासाठीही कॉफीची मदत होते. नियमित स्वरूपात कॉफीचं सेवन केल्यास, डोकं, लिव्हर आणि डागविरहित त्वचा तुम्हाला मिळते. शिवाय तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही अडचणी असतील तर त्यादेखील दूर होतात. जाणून घेऊया कॉफीचे नक्की काय काय फायदे आहेत.

सौंदर्यासाठी कॉफीचे फायदे (Beauty Benefits Of Coffee In Marathi)

कॉफी ही तुमची त्वचा आणि केसांसाठी एका जादूपेक्षा नक्कीच कमी नाही. ब्लॅक कॉफी तर आपल्याला माहीत आहेच. पण बाजारात आता ग्रीन कॉफीही (Green Coffee) उपलब्ध आहेत. त्वचा आणि केस या दोन्ही गोष्टींना कॉफी योग्य पोषण देते. कॉफी चे फायदे अनेक आहेत. तुम्हाला नेहमी सुंदर आणि निरोगी दिसायचं असेल तर कॉफी तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. कशाप्रकारे ते आपण जाणून घेऊया.

1. वाढत्या वयानुसार आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी (Anti-Aging Benefits)

Beauty Benefits Of Coffee

कॉफी पिण्याचे फायदे व तोटे

ADVERTISEMENT

कोणालाही आपल्या त्वचेवर सुरकुत्या आलेल्या नक्कीच आवडत नाहीत. कॉफीमध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. कॅफेन आणि अँटिऑक्सिडंट्स हे महत्त्वाचे घटक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील तजेलदारपणा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच हे दोन्ही पोषक तत्व तुमचं आरोग्य आणि अँटिएजिंगसाठी फायदेशीर ठरतात.

2. त्वचेच्या कॅन्सरसाठी उपयुक्त (Vitamin B-3 For Skin Cancer)

कॉफीमध्ये अंतर्भूत असणाऱ्या विटामिन बी 3 मुळे कॉफी त्वचेच्या कर्करोगापासून तुम्हाला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असते. एका रिसर्चमध्ये सिद्ध झाल्याप्रमाणे कॉफी पित असल्याने साधारण 20 टक्के पुरुष आणि 25 टक्के महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका टळला आहे. ज्या महिला दिवसातून 3 कप कॉफी पितात त्यांना त्वचेच्या कर्करोगाची भीती राहात नाही असंही सिद्ध झालं आहे.

3. थकलेल्या डोळ्यांखालील सूज घालवण्यासाठी (To Remove Puffiness Under Eyes)

Remove Puffiness Under Eyes

कॉफीचे फायदे – Coffee Pinyache Fayde

ADVERTISEMENT

तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अधिकतम आयपॅक्समध्ये कॅफेनचं प्रमाण आढळतं. कारण यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी (anti-inflammatory) गुण असतात. त्यामुळे डोळ्यांच्याखाली आलेली सूज, सुरकुत्या कमी होण्यासाठी कॉफीचा उपयोग होतो. कॉफी पावडर, त्यामध्ये वाटलेले डार्क चॉकलेट आणि पाणी घालून पेस्ट करून घ्या आणि हे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला लावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि तुम्ही तरूण दिसू लागता. 5-10 मिनिट्स चेहऱ्याला हे लावून थंड पाण्याने धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात बदल दिसेल. डोळेही तजेलदार दिसतील. 

4. अॅक्ने उपचार (Acne Treatment)

Acne Treatment

Benefits Of Coffee In Marathi

कॉफीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स, स्टिम्युलंट्स आणि क्लोरिजिनिक अॅसिड्स हे अॅक्नेशी लढण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॉफीच्या स्क्रबने यावर योग्य उपचार करता येतात. तुमच्या त्वचेवरील अॅक्ने आणि डेड स्किन सेल्स काढण्यासाठी कॉफीच्या बियांचा स्क्रब अतिशय उपयुक्त ठरतो. तसंच यातील क्लोरिजिनिक अॅसिड हे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेले बॅक्टेरिया संपुष्टात आणण्यास मदत करतात. 

ADVERTISEMENT

5. काळी वर्तुळं (Dark Circles)

Dark Circles

Coffee Che Fayde In Marathi

डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठीही कॉफीचा चांगला उपयोग होतो. कॉफी हे एक उत्तम स्क्रब आहे. त्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे काळी वर्तुळं निघण्यास मदत होते. कॉफी हे चेहऱ्याला एक तजेलदारपणा आणून देते. 

6. सूर्यकिरणांपासून करते बचाव (It Protects Against Harsh Sun Rays)

Protects Against Harsh Sun Rays

ADVERTISEMENT

Coffee Pinyache Fayde

सूर्यकिरणांचा डायरेक्ट प्रभाव हा आपली त्वचा आणि मुळात चेहरा खराब करतो. पण कॉफीमधील अँटिऑक्सिडंट्स याच्याशी लढा देण्यास अधिक प्रभावी असतात. एका रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी याची मदत होते. तसंच कॉफी प्यायल्यानेदेखील तुम्हाला चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यास मदत होते. 

7. केसांचा रंग गडद करण्यासाठी (To Darker The Hair Color)

Darker The Hair Color

Coffee Che Fayde In Marathi

ADVERTISEMENT

तुमचे केस जर कोरडे आणि खराब असतील तर कॉफी तुमच्या केसांमध्ये प्राण घेऊन येते. यामध्ये असणारं प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स हे केसांना व्यवस्थित दुरुस्त करतं आणि केसांमधील फॉलिकल्सच्या आतपर्यंत जाऊन पोषण देतं. पण हे लावण्याची एक पद्धत असते तशीच ती वापरावी. कंडिशनरबरोबर तुम्ही कॉफी पावडर मिक्स करून केसांना लावा आणि साधारण 20-30 मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. असं केल्याने तुमचे केस अधिक मुलायम (smooth) आणि चमकदार (shiny) होतील. तसंच तुमचे केस जर नैसर्गिक ब्राऊन असतील तर तुम्ही फिल्टर कॉफीचा वापर करू शकता. यामध्ये अॅसिड आणि केमिकल्स असतात जे तुमचे क्युटिकल्स मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या केसांना यामुळे अधिक चमक मिळते. कॉफी पिण्याच्या पाण्यात मिसळा आणि शँपू केलेल्या केसांना ही पेस्ट लावा. साधारण 10-15 मिनिट्सनंतर कोमट पाण्याने केस धुवा. टॉवेलने केस सुकवल्यावर तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल. 

यासाठी घरीच तयार करा हे फेस पॅक त्वचेची काळजी घ्या त्वचेची काळजी घ्या

कॉफीचा वापर कसा करता येईल (Uses Of Coffee In Marathi)

Uses Of Coffee

Coffee Che Fayde In Marathi

ADVERTISEMENT

कॉफीचा वापर पिण्याशिवाय इतर गोष्टींसाठीही करता येतो. नेमका हा वापर कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीदेखील याप्रमाणे वापर करून पाहा

1. कॉफी फेस स्क्रब (Coffee Face Scrub)

Coffee Face Scrub

Benefits Of Coffee In Marathi

कॉफीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे तुमची त्वचा तरूण दिसण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या सुंदर चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी स्क्रब म्हणून तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. जेणेकरून तुमच्या त्वचेवरील पोअर्स साफ होण्यास मदत होते. तसंच कॉफी तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. बॅक्टेरिया आणि फंगस आपल्या चेहऱ्यापासून लांब ठेवण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्याचं रक्षण करण्यासाठी याचा उपयोग होते. 

ADVERTISEMENT

स्क्रब कसे बनवाल (How to make Scrub)

 • कॉफी पावडरमध्ये पाण्याचे काही थेंब घाला
 • व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करा
 • ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा
 • साधारण 20 मिनिट्सने चेहरा थंड पाण्याने धुवा

2. कॉफी फेस पॅक (Coffee Face Pack)

Coffee Face Pack

Coffee Pinyache Fayde

नेहमी चमकदार आणि तरूण त्वचा हवी असल्यास, तुम्ही कॉफी फेसपॅकचा वापर नक्की करावा. त्यासाठी तुम्हाला सतत पार्लरमध्ये जाऊन फेशियल अथवा बॉडी स्क्रब करून घ्यायची गरज भासणार नाही. कॉफीला तुम्ही तुमचं ब्युटी घटक बनवल्यानंतर तुम्ही घरच्याघरी ही गोष्ट करू शकता. यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे बॅक्टेरिया दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. डेड स्किन सेल्सवर कॉफी चांगलं काम करते. तर कॉफी टॅन झालेली त्वचा उजळवण्याचंही काम करते. तुमचे पोअर्स टाईट करण्यासाठीही कॉफीचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

फेसपॅक कसे बनवाल (How to make coffee face pack)

 • एक वाटी दह्यामध्ये कॉफी पावडर आणि थोडंसं पाणी मिसळा
 • ही तयार झालेली घट्ट ब्राऊन पेस्ट चेहऱ्यावर लावा
 • साधारण 10-15 मिनिट्सने चेहऱ्यावर पेस्ट सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा

3. कॉफी फूट स्क्रब (Coffee Foot Scrub)

Coffee Foot Scrub

कॉफीचे फायदे – Coffee Che Fayde In Marathi

तुमच्या पायावरील त्वचा ही डेड आणि कोरडी झाली आहे का? असं असेल तर कॉफी तुम्हाला यातून सुटका मिळवून देऊ शकते. कॉफी फूट स्क्रब केवळ डेड स्किन सेल्सच घालवत नाही तर तुमच्या पायांना योग्य पोषण आणि मुलायमदेखील बनवतं. हे स्क्रब घरी बनवणं अतिशय सोपं आहे. तसंच तुम्हाला यासाठी लागणारं साहित्य हे तुमच्या स्वयंपाकघरातच मिळेल. 

ADVERTISEMENT

फूट स्क्रब कसे बनवाल (How to make Foot Scrub)

 • 2 चमचे नारळाच्या तेलात अर्धा चमचा कॉफी पावडर आणि 2 चमचे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट मिसळा
 • हे मिश्रण तुम्ही पायावर लावा
 • साधारण 10-15 मिनिट्सने कोमट पाण्याने पाय धुवा आणि तुम्हाला मऊ मुलायम पाय मिळतील

त्वचेसाठी बदामाच्या तेलाचे फायदे (Benefits of Almond Oil for Skin)

4. कॉफी बॉडी स्क्रब (Coffee Body Scrub)

Coffee Body Scrub

Coffee Che Fayde In Marathi

ADVERTISEMENT

शरीरावर काही ठिकाणी डेड स्किन सेल्स होतात. त्यासाठी तुम्हाला कॉफी बॉडी स्क्रबचा चांगला उपयोग होतो. तुम्ही तुमच्या शरीराला हा स्क्रब लावून तुमचं शरीर तजेलदार आणि चमकदार ठेऊ शकता. घरच्या घरी असे स्क्रब करणं सोपं असतं. त्यासाठी अधिक पैसे खर्च करून पार्लरला जायची गरज भासत नाही. 

बॉडी स्क्रब कसे बनवाल (How to make Body Scrub)

 • अर्धा कप कॉफी बियांच्या अर्धा कप कोकोनट पाम शुगर आणि पाव कप तेल घाला आणि एक चमचा दालचिनी पावडर घाला
 • हे मिश्रण नीट मिक्स करून आंघोळीच्या वेळी हे तुमच्या शरीराला लावा
 • थोडा वेळ तसंच ठेवून कोमट पाण्याने आंघोळ करा

आरोग्यासाठी कॉफीचे फायदे (Health Benefits Of Coffee In Marathi)

आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन चांगलं नाही. पण कॉफीचे फायदे (coffee che fayde in marathi) आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. नक्की कशासाठी याचा उपयोग होतो पाहूया 

1. कॅन्सरपासून बचाव (Protect Cancer)

कॅन्सर हा सध्या सर्वात जास्त भयावह आजार आहे. पण तुम्हाला कॅन्सरपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही कॉफीची मदत घेऊ शकता. दिवसातून तुम्ही साधारण तीन कप कॉफी (साखरेशिवाय असल्यास उत्तम) प्यायल्यास, कॅन्सरपासून दूर राहू शकता. यामधील अँटिऑक्सिडंट्स कॅन्सरपासून तुम्हाला दूर राहण्यास मदत करतात. तसंच ब्लॅक कॉफी पिण्याचा प्रयत्न करा. पण कॉफीचं अतिसेवन करणंही योग्य नाही. त्यामुळे यापेक्षा जास्त कॉफी पिणं टाळा.

ADVERTISEMENT

2. लिव्हरसंबंधित आजारासाठी उपयुक्त (For Lever)

कॉफी पिणं लिव्हरसंबंधित आजारासाठी लाभदायक आहे. एका रिसर्चमध्ये सिद्ध झालं आहे की, नियमित स्वरुपात कॉफीचं सेवन केल्यामुळे लिव्हरसंबंधित आजार कमी होतात. तुम्हाला कॉफी साखरेशिवाय दिवसातून साधारण दोन ते तीन ग्लास प्यायची आहे. यामुळे तुमचे आजार दूर राहण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉफी थंडगार करून पिऊ नका. ब्लॅक कॉफी गरम पिण्यानेच तुमचा अधिक फायदा होतो.

3 . एनर्जी ड्रिंक स्वरूपात कॉफी (As Energy Drink)

As Energy Drink

Benefits Of Coffee In Marathi

तुम्हाला थकवा अथवा आळस आला असल्यास, एनर्जी ड्रिंक म्हणून कॉफी काम करते. वास्तविक कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे तुमच्या रक्तात फॅटी अॅसिड निर्माण होतं आणि त्यामुळे तुम्हाला उत्साह येतो. मेहनत करणाऱ्या व्यक्तींना स्टॅमिना वाढवण्यासाठी कॉफीची मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दिवसातून दोन कप अथवा एक कप कॉफी दुधासह अथवा ब्लॅक जशी आवडेल तशी प्यावी. पण यामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असू नये. कॉफीचा फ्लेवर जास्त राहू द्यावा.

ADVERTISEMENT

4. मधुमेही व्यक्तीसाठी फायदेशीर (For Diabetic Patients)

एक्स्पर्ट्सच्या सांगण्यानुसार तुम्ही जर रोज 2 ते 3 कप साखरेशिवाय कॉफी चालू केली तर मधुमेह होण्याचा धोका साधारण 50 टक्के कमी होतो. तसंच कॉफीमुळे टाईप 2 मधुमेहाचा धोकाही टळतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या नियमित जीवनशैलीत कॉफीचा समावेश करून घ्यायला हवा. जेणेकरून मधुमेहापासून तुम्हाला दूर राहाता येईल.

5. दम्यासाठीही कॉफी लाभदायक (For Asthma)

दम्यासारख्या आजारावरही कॉफी लाभदायक आहे. यामध्ये असणारी कॅफेन आणि थियोफायलीन या दोन्ही पोषक द्रव्यामुळे दम्याच्या रूग्णांना व्यवस्थित श्वास घेता यायला लागतो. यासाठी कॉफीची विशेष मदत होते. त्यामुळे दमा असलेल्या रूग्णांना साखरेशिवाय किमान दोन कप कॉफी दिवसातून प्यावी. याचा त्यांना दम्यापासून सुटका मिळण्यासाठी फायदा होतो.

6. हृदयरोगाशी लढण्यासाठी (For Heart Disease)

Benefits of coffee

Coffee Pinyache Fayde

ADVERTISEMENT

हृदयरोगाशी लढण्यासाठी कॉफीचा योग्य उपयोग होतो. नियमित स्वरूपात कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. जे लोक दिवसातून तीन वेळा कॉफीचं सेवन करतात त्यांना हृदयाशीसंबंधित आजार निर्माण होण्याचा धोका साधारण 22 टक्के कमी असतो.

7. निराशेतून बाहेर येण्यासाठी (To Avoid Depression)

कॉफीमध्ये असणारे कॅफेन हे डोक्याला एक चालना आणि उत्साह देतात. त्यामुळे निराशेच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठीही कॉफीचा उपयोग होतो. दिवसातून किमान दोन ते तीन वेळा तुम्ही कॉफी प्यायल्यानंतर तुमच्या विचारांना एक वेगळी चालना मिळते आणि त्यामुळे तुमच्या विचारांना वेग येऊन तुम्ही योग्य निर्णयापर्यंत पोहचता. यामध्ये कॉफी तुम्हाला एक वेगळा अनुभव देते. 

कॉफीने होतं वजन कमी (How To Weight Loss With Coffee In Marathi)

Weight loss with Coffee

Benefits Of Coffee In Marathi

ADVERTISEMENT

कॉफीचे एकच नाही तर अनेक फायदे (coffee che fayde in marathi) आहेत ज्यामध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. कॉफी नियमित प्यायल्याने तुमच्या शरीरामध्ये जमा झालेली चरबी विरघळण्यास मदत होते. ब्लॅक आणि ग्रीन कॉफी वजन कमी करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतात. ग्रीन कॉफी फॅट बर्न सप्लीमेंट म्हणून ओळखली जाते. ही तुम्ही नियमित प्यायल्यास, तुमचं वजन एक महिन्यात साधारण 10 ते 15 किलोपर्यंत कमी होतं. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक तत्वामुळे तुमच्या शरीराला फायदा होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नॉर्मल कॉफीच्या तुलनेत तुम्हाला ग्रीन कॉफीचा अधिक उपयोग होतो. यामुळे तुमच्या शरीराचं मेटाबॉलिजमदेखील चांगलं होतं आणि तुमच्या शरीरावर अधिक चरबी जमा होत नाही. 

असं बनवा वेट लॉस कॉफी ड्रिंक

यासाठी तुम्हाला ग्रीन नॉर्मल कॉफी पावडरमध्ये एक चमचा कोको पावडर घ्यावी लागेल. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मध आणि एक चमचा दालचिनी पावडर घालून मिक्स करा. तुम्ही कॉफी बनवताना हे वरील मिश्रण प्रत्येकवेळी घाला. नंतर हे गरम गरम प्या. तुमचं वजन कमी करण्यासाठी याचा खूपच फायदा होतो.  

कॉफीने होणारं नुकसान (Side Effects Of Coffee In Marathi)

Side Effects Of Coffee

ADVERTISEMENT

कॉफी पिण्याचे फायदे व तोटे

तुम्हाला प्रत्येकाला याची कल्पना असते की, कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन चांगलं नाही. कॉफीच्या बाबतीतही हे खरं आहे. याचं सेवन अधिक प्रमाणात घेतल्यास, त्याने नुकसानही होतं. कॉफीने नक्की काय नुकसान होतं ते जाणून घेऊया –

 • कॉफीमध्ये कॅफेन अधिक असल्याने झोप उडते
 • कॉफीचं व्यसन लागतं, जे सोडणं कठीण आहे
 • कॉफी जास्त प्यायलास कॅन्सर होण्याचीही शक्यता असते
 • कॉफी पिणारी व्यक्ती धुम्रपान आणि दारू घेत असल्यास, शरीरावर वाईट परिणाम होतो
 • अति कॉफी प्यायल्यास शरीरातील नस काम करणं बंद पडू शकता. त्यामुळे सतत घाबरणं, शरीरामध्ये कंपन येणं असे आजार सुरु होतात
 • गरोदर महिलांनी दोनपेक्षा अधिक कप कॉफी पिऊ नये त्याने गर्भपात होण्याची शक्यता असते. 

कॉफीसंबंधित प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. कॉफी स्क्रब किती वेळा वापरू शकतो ?

कॉफी स्क्रब तुम्ही साधारणपणे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा वापरू शकता. यापेक्षा जास्तवेळा वापरणं योग्य नाही. तुमची त्वचा त्यामुळे खराब होण्याचीदेखील शक्यता असते. तुमची त्वचा नक्की कोणत्या प्रकारात येते याचा विचार करून स्क्रब वापरा. 

2. कॉफी स्क्रबचा उपयोग सेल्युलाईट काढण्यासाठी होतो का ?

कॉफी स्क्रब आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं. तुमचे सेल्युलाईट कमी होण्यासाठी याचा उपयोग नक्कीच होतो. योग्य प्रकारे तुम्ही नियमित स्क्रबचा वापर केल्यास, तुमचे सेल्युलाईट्स नक्कीच कमी होतील.

ADVERTISEMENT

3. अति कॉफी प्यायलाने दातावर परिणाम होतो का ?

कॉफीमध्ये कॅफेन असल्याने अति प्यायल्यास त्याचा दातावर परिणाम होतो. तुमचे दात पिवळे पडू लागतात. त्यामुळे कॉफीचं सेवन केल्यानंतर दात घासणं अथवा किमान चूळ भरणं आवश्यक आहे. 

हेदेखील वाचा

कोथिंबीरमध्ये असतात औषधीय गुण

मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे

ADVERTISEMENT

त्वचेसाठी फायदेशीर आहे मुलतानी माती

ब्लॅक कॉफीचे आरोग्यदायी फायदे

31 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT