ADVERTISEMENT
home / सौंदर्य
Valentines  Day: व्हॅलेंटाईन डेला आकर्षक दिसण्यासाठी ट्राय करा हे ‘रोमॅंटिक ड्रेस’ (Dress For Valentines Day In Marathi)

Valentines  Day: व्हॅलेंटाईन डेला आकर्षक दिसण्यासाठी ट्राय करा हे ‘रोमॅंटिक ड्रेस’ (Dress For Valentines Day In Marathi)

व्हॅलेंटाईन डे हा प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अगदी खास असतो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला खूश करण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी स्पेशल करण्याची ईच्छा असते. व्हलेंटाईन डे खास करण्यासाठी काहीजणी अगदी महिनाभर आधीपासून तयारी करत असतात. कधीकधी तर पार्लर आणि स्पामध्ये अगदी तासनतास घालवतात. तुम्हीही या दिवसाची अगदी आतूरतेने वाट पाहत असाल आणि नेहमीपेक्षा हटके आणि आकर्षक दिसण्याचा विचार करत असाल. तर तुम्हाला आम्ही दिलेली ही आकर्षक ड्रेसविषयी माहिती नक्कीच आवडेल. लाल आणि गुलाबी रंगांच्या या ड्रेस कलेक्शनमधून तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार एखादा हटके ड्रेस निवडू शकता. या आकर्षक आणि ग्लॅमरस लुकच्या ड्रेसमुळे तुमची रोमॅंटिक डेट नक्कीच खास होईल.

व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असल्याने आज तुम्ही नेहमीपेक्षा थोडं ‘हॉट आणि सेक्सी’ दिसणं तितकच मस्ट आहे. तुमचा व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय करण्यासाठी हे काही हटके आणि सेक्सी ड्रेस अवश्य ट्राय करा. आम्ही तुमच्यासाठी खास डिझाईन केले गेलेले काही स्टायलिश ड्रेस निवडले आहेत. बारनॉट नेकलाईनपासून ते अगदी प्रिटी फ्लॉवर डिझाईन पर्यंतच्या या विविध ड्रेसच्या पर्यायांमधून एखादा स्पेशल ड्रेस निवडणं तुम्हाला नक्कीच सोपं जाईल.

रेड बारडॉट बॉडीकॉन ड्रेस (Red Bardot Bodycon Dress)

1. Dress For Valentines Day In Marathi

रेड बॉडीकॉन ड्रेस नेकलाईनचा तुम्हाला एक सॉफिस्टिकेटेड लुक मिळू शकतो. शिवाय या ड्रेसच्या परफेक्ट शेपमुळे तुम्हाला एक एलिंगटही लुक मिळेल. या स्टाईलचे ड्रेस सध्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे या व्हॅलेंटाईनला हा ड्रेस नक्की ट्राय करा. यासोबत स्टायलिश क्लच कॅरी केल्यामुळे तुमचा डिनर लुक अगदी मस्त दिसेल. NEXT या ब्रॅंडच्या या ड्रेसची किंमत कमीतकमी साडेपाच हजारांपर्यंत आहे.

ADVERTISEMENT

वाचा : व्हॅलेंटाईन डे योजना

रफर हॉल्टर नेक ड्रेस (Ruffer Holter Neck Dress)

2. Dress For Valentines Day In Marathi

हा रेड कलरचा रफर हॉल्टर नेक ड्रेस तुम्ही या व्हॅलेंटाईन डेला नक्कीच ट्राय करु शकता. हाल्टर नेकमुळे हा ड्रेस फारच आकर्षक दिसत आहे.या लुकमुळे तुम्ही हॉट आणि सेक्सी दिसाल. Koovs ब्रॅंडचा हा ड्रेस तुम्हाला बाराशे पर्यंत विकत मिळू शकेल.

वाचा : व्हॅलेंटाईन डे साठी प्रेम कविता

ADVERTISEMENT

रफल मिनी ड्रेस (Ruffle Mini Dress)

3. Dress For Valentines Day In Marathi

जर तुम्हाला एखादा फॉर्मल लुक हवा असेल तर हा फ्लोरल प्रिंटचा रेड ड्रेस नक्कीच परफेक्ट ठरेल. शिवाय नेहमीपेक्षा या ड्रेसच्या जरा वेगळ्या लुकमुळे तुम्ही इतर मुलींपेक्षा हटके दिसाल. लाल आणि पांढऱ्या रंगाचा वापर करुनही हा ड्रेस फार भपकेदार वाटत नाही. त्यामुळे दिवसभर फिरण्यासाठी तुम्ही हा नक्की ट्राय करू शकता. Forever 21 या ब्रॅंडचा हा ड्रेस तुम्हाला एक ते दिड हजारापर्यंत मिळू शकतो.

Also Read Honeymoon Dresses In Marathi

ADVERTISEMENT

फॅमिनाइन कट रेड ड्रेस (Feminine Cut Red Dress)

4. Dress For Valentines Day In Marathi

व्हॅलेंटाईन डेला रात्री रोमॅंटिक डिनर डेटवर जाण्यासाठी हा ड्रेस नक्कीच योग्य आहे. या ड्रेसच्या स्टायलिश कट्स आणि ट्रीममुळे तो खूपच आकर्षक दिसत आहे. शिवाय हा ड्रेस घातल्यावर तुम्ही नेहमीपेक्षा जरा जास्त ग्लॅमरस आणि हॉट दिसाल. हा Ribbed Bodycon midi dress तुम्हाला दोन ते अडीच हजारांमध्ये मिळु शकतो.

Also Read How To Decorate Home On Valentines Day In Marathi

रेड स्ट्रेपी ड्रेस (Red Strappy Dress)

5. Dress For Valentines Day In Marathi

ADVERTISEMENT

हा लाल रंगाचा स्ट्रेपी ड्रेस तुम्हाला कोणत्याही क्षणी अगदी स्टाईलिश लुक देऊ शकेल. या ड्रेसवरील ही अगदी छोटी-छोटी प्रिंट डिझाईन या ड्रेसला आणखी सुंदर करत आहे.जर तुम्ही या व्हॅलेंटाईन डेला सर्वांपासून दुर एकांतात समुद्रकिनारी फिरायला जाणार असाल तर हा ड्रेस जरुर ट्राय करा. मात्र समुद्रकिनारी फिरताना तुमच्या मोकळ्या केसांची जरा काळजी घ्या ज्यामुळे तुम्ही आणखी सुंदर दिसाल.

वुनिकच्या स्टायलिस्ट भाव्या चावला यांनी डिझाईन केलेले हे काही आणखी युनिक ड्रेस आम्ही तुम्हाला या व्हॅलेंटाईनसाठी सूचवत आहोत

वाचा : व्हॅलेंटाईन डे साठी टिपा

जंपसूट आणि प्लेसूट (Jumpsuit And Playsuit)

एकदम सोफिस्टिकेटेड लुक हवा असेल तर गडद लाल रंगाच्या छटेचा जंपसूट नक्की निवडा. तुमचा हा लुक कंप्लिट करण्यासाठी एक स्लिक क्लच अथवा  स्लिंग बॅग आणि हाय हिल्स त्यावर कॅरी करायला मुळीच विसरू नका. जर तुम्हाला कॅज्युअल अथवा पबलूक हवा असेल तर मात्र या सूटचं शॉर्ट व्हर्जन वापरा म्हणजे ते  अधिक आकर्षक वाटेल. खरंतर तुम्ही या व्हॅलेंटाईन डे कुठे जाणार आहात ते आधीच ठरवा आणि मग त्यानुसार या सुटवर शूज घाला. कारण जर तुम्ही एखाद्या पार्टीसाठी जाणार असाल तर हाय हिल्स त्यावर छान वाटतील मात्र तुम्ही एखाद्या समुद्रकिनारी फिरायला जाणार असाल तर यावर  फ्लॅट घाला ज्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल.

ADVERTISEMENT

 6. Dress For Valentines Day In Marathi

7. Dress For Valentines Day In Marathi

बटरफ्लाय स्लीव्ज असलेला कॅज्युअल ड्रेस (Casual Dress With Butterfly Sleeves) 

समजा या व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला अगदी भपकेदार लुक नको असेल तर हा ड्रेस अगदी उत्तम ठरेल. कारण एखाद्या कॅज्युअल लंचसाठी अथवा आऊटिंगसाठी हा पर्याय अगदी छान आहे. रफल्ड बटरफ्लाय स्लीव्ह्जमुळे या ड्रेला एक नाजूक लूक मिळतोय. पण असं असूनही लाल रंगामुळे तो तितकाच आकर्षकही वाटतो.

8. Dress For Valentines Day In Marathi

ADVERTISEMENT

फॉर्मल मॅक्सि ड्रेस (Formal Maxi Dress)

जर तुम्ही एखाद्या व्हॅलेंटाईन डे थीम पार्टीला जाणार असाल आणि त्या पार्टीत तुम्हाला सर्वात उठून दिसायचं असेल तर हा ड्रेस नक्की परिधान करा. या ड्रेसमुळे तुमचं सौंदर्य अधिकच खुलून दिसेल. तुमच्या या मोहक सौदर्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीची तुमच्यावरून नजरच हटणार आहे. एखादं नाजूक ब्रेसलेट आणि हाय हिल्स कॅरी करुन तुम्ही हा लुक कंप्लिट करू शकता.

9. Dress For Valentines Day In Marathi

पिंक लेस ड्रेस (Pink Lace Dress)

सध्या ब्लश टोन्सचा ट्रेंड लेटेस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला देखील असा लुक हवा असेल तर या पिंक ड्रेसची निवड करा. एखाद्या हाय टी किंवा एलिगंट लंच डेटसाठी हा ड्रेस अगदी योग्य ठरेल. शिवाय या व्हॅलेंटाईन डेला एखाद्या पार्टीला जाणार असाल तर या ड्रेसवर सोनेरी किंवा चंदेरी रंगाचा नाजूक बेल्ट आणि मॅचिंग क्लच वापरायला काहिच हरकत नाही.

10. Dress For Valentines Day In Marathi

ADVERTISEMENT

जर रेड आणि पिंक ड्रेस थिमचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर इतर ड्रेसचे पर्याय आहेतच. या खास दिवसांसाठी तुमच्या मनात एखादा क्युट लूक करायचा विचार असेल तर हार्ट प्रिंट्स किंवा स्लोगन्स असलेलं एखादं टीज किंवा टॉप निवडा. जर तुम्हाला आणखी सुंदर दिसायचं असेल तर एखाद्यं रोमँटिक टॉप ट्राय करा मात्र त्यावर एखादं क्लासी फुटवेअर कॅरी करायला मात्र अजिबात विसरू नका. 

आम्ही तुम्हाला रेड आणि पिंक थीममधील काही ड्रेस सुचवले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामधील ड्रेस निवडू शकता. तुम्हाला या ड्रेसमुळे खास रोमॅंटिक लुक मिळेल हे मात्र नक्की.

You Mgiht Like These:

Valentines Day: रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा ‘रोमँटिक’ ठिकाणी

ADVERTISEMENT

Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट

Valentines Day: खास दिवशी करायचं आहे प्रपोज…तर या खास टीप्स

प्रेमास रंग यावे! 20 हटके पद्धतींनी सेलिब्रेट करा व्हॅलेंटाईन डे

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक        

ADVERTISEMENT
08 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT