प्रेमात मन दुखावलं गेलं तर त्याचा त्रास हा अधिक होतो. असचं काहीसं झालं की त्याचा त्रास अधिक होऊ लागतं. त्यातचं जर लग्न जुळलं असेल आणि ते मोडलं तर त्याचं दु:ख हे अधिक होऊ लागतं. पण तुमचं तेच प्रेम जेव्हा पुन्हा एकदा तुमच्यासमोर येतं आणि पुन्हा तुम्ही प्रेमात पडता त्यावेळी होणारा आनंद हा देखील वेगळा असतो. निशाला तिच्या आयुष्यात अशी वेळ पुन्हा येईल असे कधीच वाटले नव्हते. आवडीच्या व्यक्तीशी विवाह मोडल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न तिला पडला होता. पण तिच्या आयुष्यात एक बुमरँग यावं तसा तो परत आला आणि तिला जे वाटलं नव्हतं ते पुन्हा झालं. देव स्वर्गात एखादी गाठ मारतो ती अगदी फिक्स असते असेच यावरुन दिसत.
तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी केवळ पर्याय नाही ना…ओळखा संकेत
साधारण पाच वर्षांपूर्वी निशाचा विवाह ठरला. खूप प्रयत्न करुन तिला आशिषसारखा एक परफेक्ट पार्टनर मिळाला. तिच्यासाठी अगदी काहीही करेल असा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे ती मनोमन खूपच खुश होती. घरातील सगळ्यांनाही आनंद झाला. कारण लग्न ठरले ही सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट होती. इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निशाने लग्नाला मनपसंत जोडीदारासोबत लग्न करण्याचा होकार दिला होता. पण या गोड क्षणाला नजर लागावी असा प्रसंग घडला. एकीकडे लग्नाची सगळी तयारी सुरु होती. साड्यांची खरेदी, हॉलचे बुकींग, घरातील पाहुण्यांची यादी असे सगळे काही सुरु असतानाच मुलाच्या वाढत्या अपेक्षांमुळे निशाच्या घरातल्यांना त्रास होत होता. पण निशाला आवडत्या मुलासोबतच वरायचे असे ठरवल्यामुळे त्यांनीही आशिषच्या आणि त्यांच्या घरातल्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. दिवसेंदिवस आशिषच्या मागण्या वाढत होत्या. पण याची कानोकान खबर निशाला नव्हती.
पावसाळ्यात करा अशी रोमँटिक डेट, जोडीदाराला करा आनंदी
पण अचानक घरात थोडी कुरकुर होऊ लागली.निशाच्या भावाने निशाला सगळं काही खरे सांगून टाकायचे ठरवले. कारण आता पाणी डोक्यावरुन जात होतं. आशिषचे हे वागणे त्यालाही पटले नव्हते. आशिषच्या पालकांचे आशिषवर असलेले प्रेम हे अगदी खरेखुरे असले तरी निशाच्या पालकांना निशा अजिबात जड झालेली नव्हती. त्यामुळे निशाच्या कानावर ही गोष्ट जाऊ नये आणि त्यांचे लग्न मोडू नये असेच त्यांनाही वाटत होते. पण जे व्हायचं नव्हतं तेच झालं निशाला या सगळ्या गोष्टी कळल्या आणि लग्न मोडलं. घरातील कोणालाही दुखावून तिला हे लग्न मुळीच करायचं नव्हतं. त्यामुळे तिनेही मनाविरुद्ध निर्णय घेऊन लग्न मोडलं.
पण म्हणतात ना आयुष्यात जे लिहिलेलं असतं तेच कायम होतं. अगदी तसंच झालं कारण लग्न मोडून दोन वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा निशाच्या आयुष्यात आशिष आला. मधल्या वर्षात या दोघांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. त्यांचे एकमेकांशी काहीही बोलणे झाले नव्हते. पण अचानक पुन्हा एकदा त्यांची भेट झाली ती देखील एका मॉलमध्ये. एकमेकांना समोर पाहून त्यांना रडूच कोसळले असते. पण त्यांनी एकमेकांना बघून न पाहिल्यासारखे केले. पण एकमेकांकडे न पाहता राहणेही कठीण झाले होते. शेवटी त्यांनी एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. एकमेकांशी बोलल्यानंतर त्यांना अजूनही ते प्रेम तसेच आहे याची जाणीव झाली. आशिषला आपली चूक कळली होती. इतक्या वर्षात तिला निशाशिवाय कोणीही आवडली नाही. त्यामुळे त्याने माफी मागत सगळ्यांसमोर तिला पुन्हा एकदा प्रपोझ केले. आणि मग काय पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झाली. त्यांचे लग्न अगदी सुखात पार पडले.