ADVERTISEMENT
home / Periods
Personal care products to gift yourself on Women's Day

महिला दिनानिमित्त तुम्ही द्या स्वतःला पर्सनल केअर गिफ्ट

महिला दिन हा जगातील प्रत्येकीसाठी नक्कीच खास असतो.वास्तविक स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी वर्षातील एक दिवस पुरेसा नाही. कारण वर्षातील प्रत्येक दिवस आणि दिवसाचा प्रत्येक क्षण हा महिलांसाठी खासच असतो. पण अशा एखाद्या स्पेशल दिवशी छान नटावं, आपल्या आवडीची गोष्ट करावी, छंद जोपासावे अथवा स्वतःला बरं वाटेल असं काहिही करावं असं वाटणं स्वाभाविक आहे. यासाठी वाचा यासाठी वाचा जागतिक महिला दिन माहिती (Women’s Day Information In Marathi) पण यंदा हा खास दिवस साजरा करण्यासाठी तुमच्या जोडीदार, मुलंमुली अथवा मित्रमंडळींकडून फार अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःलाच द्या हे स्पेशल गिफ्ट… यासाठी आम्ही तुम्हाला सूचवत आहोत अशा काही भेटवस्तू ज्या तुमच्या पर्सनल केअरसाठी खूप गरजेच्या आहेत. ज्या महिलांना प्रवास करायला खूप आवडतं त्यांच्यासाठी तर या ट्रॅव्हल फ्रेंडली भेटवस्तू नक्कीच फायद्याच्या ठरतील. तेव्हा या खास दिवशी या भेटवस्तूंसोबतच स्वतःला द्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Women’s Day Quotes In Marathi)

Reusable Menstrual Cup

मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखण्यासाठी आणि आरामदायक वाटण्यासाठी तुम्हाला दर चार तासांनी सॅनिटरी पॅड बदलावे लागतात. पण तुम्ही या काळात प्रवास करत असाल तर पॅड बदलण्यासाठी योग्य जागा मिळणं, ते डिस्पोज करण्यासाठी साधन असेलच याची खात्री देता येत नाही. म्हणूनच महिलांनी या काळात मेन्स्ट्रुअल कप वापरणं गरजेचं झालं आहे. प्रत्येक महिलेने स्वत:हून हा सुरक्षित पर्याय स्वत:साठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी निवडायला हवा. तेव्हा या महिला दिनाला स्वतःला हे मस्त गिफ्ट द्या आणि सुरक्षित व्हा.

Pee And Pain Relief pack

मासिक पाळीच्या काळात प्रवास करणं म्हणजे महिलांसाठी अतिशय कठीण प्रसंग असतो. कारण आपल्याकडे साधी स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहेदेखील नाहीत. अशा वेळी जर तुमच्याकडे सिरोनाचं हे पी अॅंड पेन रिलिफ पॅक असेल तर तुम्हाला चिंता काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण यामध्ये आहे सुरक्षित युरिनेशनसाठी डिस्पोजेबल युरिनेशन डिव्हाइस आणि सोबत पेन रिलिफ पॅचसुद्धा… ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मासिक पाळीच्या काळातही तुम्हाला वॉशरूमला जाण्याचा धोका वाटणार नाही आणि मासिक पाळीच्या वेदना प्रवासात कमी करण्यासाठी पेन रिलिफ पॅच.

Menstrual Cup Wash

मेन्स्ट्रुअल कप वापरणं सोपं जरी असलं तरी तो पुन्हा पुन्हा वापरावा लागत असल्यामुळे त्याची योग्य स्वच्छता नक्कीच राखता यायला हवी. यासाठी या कपसोबत मेन्स्ट्रुअल कप वॉशदेखील अवश्य घ्या. ज्यामुळे तुम्ही बाहेर प्रवासात जरी असला तरी तुमचे आरोग्य सुरक्षित राहिल.यामुळे तुम्ही तुमचा मेन्स्ट्रुअल कप कुठेही निर्जंतूक करू शकता. निरोगी राहण्यासाठी हायजीन पाळण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

ADVERTISEMENT

Toilet Sanitizer Spray

मासिक पाळीच्या काळात प्रवास करणाऱ्या महिलांकडे आणखी एक गोष्ट आवर्जून असायला हवी. ती म्हणजे टॉयलेट सॅनिटायझर स्प्रे…कारण घराबाहेर पडल्यावर या काळात तुम्हाला सार्वजनिक सौचालय सतत वापरावं लागू शकतं. अशा वेळी इतरांनी वापरल्यामुळे बऱ्याचदा टॉयलेट सीट खराब असतात शिवाय स्वच्छतागृहांमध्ये घाणेरडा वास येत असतो. नाइलाजाने का होईना असं टॉयलेट तुम्हाला वापरावं लागलं तर कमीत कमी टॉयलेट स्प्रेने तुम्ही सीट निर्जंतूक करू शकता.

Period Stain Remover

काही जणींना मासिक पाळीत अति रक्तस्त्राव होत असतो. शिवाय कधी किती प्रमाणात रक्तस्त्राव होणार हे कोणीच सांगू शकत नाही. अशा काळात जर तुम्हील बाहेर प्रवास करत असाल आणि तुमच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडले तर संकोच वाटण्याची शक्यता जास्त असते. पण आता घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण सिरोनाचं हे पिरिएड स्टेन रिमूव्हर तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या अॅंटि बॅक्टेरिअल स्टेन रिमूव्हलने तुम्ही कुठेही तुमच्या कपड्यांवरील डाग स्वच्छ करू शकता. यासाठी त्यासोबत छोटा ब्रशदेखील देण्यात आलेला आहे. शिवाय यामध्ये ब्लीचचा वापर केलेला नसल्यामुळे तुमचे कपडे यामुळे खराब होत नाहीत. 

आता स्वतःला या पर्सनल केअर प्रॉडक्ट भेट दिल्यावर मासिक पाळीच्या काळात तुम्ही घरी असा वा बाहेर कुठेही तुम्हाला चिंता काळजी करण्याची मुळीच गरज नाही. तेव्हा या काळातही आता तुम्ही बिनधास्त फिरू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT