ADVERTISEMENT
home / Diet
Side Effects Of Eating Bread Everyday

रोज रोज ब्रेड खाणे आरोग्यासाठी हानिकारक,  होतात या समस्या 

ब्रेड हे जगभरात लोकप्रिय खाद्य आहे. ब्रेड बनवायला सोपा तर आहेच पण चविष्ट असून त्याने पोटही भरते. ब्रेडचा वापर गोड आणि चवदार दोन्ही पदार्थ तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हा खाण्याचा एक सोपा पर्याय असू शकतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की रोज रोज ब्रेड खाल्ल्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.  ब्रेड हा मैदा आणि साखरेपासून बनवला जातो म्हणजेच ब्रेडमध्ये कर्बोदके आणि साखर भरपूर असते. ब्रेडमध्ये पौष्टिक पदार्थ नगण्य असतात आणि त्यात फक्त कॅलरीज असतात. म्हणजेच ब्रेड तुमचे वजन वाढवण्याचे काम करतो. तुम्हाला ब्रेड खाणे कितीही आवडत असले तरी तो तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवतो. अनेकांना सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात ब्रेड खायला आवडतो. लोकांना टोस्ट किंवा सँडविच आवडते किंवा बटरसोबत ब्रेड खायलाही अनेकांना आवडते. पण जास्त ब्रेड खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते हे जाणून  घेणे आवश्यक आहे. 

रोज ब्रेड खाऊन हे नुकसान होते

Side Effects Of Eating Bread Everyday
Side Effects Of Eating Bread Everyday

ब्रेड हा मैद्यापासून बनवलेला असो किंवा कणकेपासून, त्यात ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. ग्लूटेन हे प्रथिन आहे जे ब्रेडच्या संरचनेत मदत करते. बर्‍याच लोकांना याची ऍलर्जी असते, कारण ग्लूटेन पचण्यास सोपे नसते, ज्यामुळे पोट फुगणे, अतिसार आणि ओटीपोटात दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.  ब्रेड मैद्यापासून बनवला जातो, ज्यामुळे शरीराला ब्रेड पचवायला खूप वेळ लागतो आणि त्यात भरपूर प्रमाणात असलेल्या कार्बोहायड्रेट्समुळे यकृत खराब होण्याचा धोका असतो. 

रक्तातील साखर वाढते 

रोज ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोकाही वाढतो. ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी ब्रेड खाणे फायदेशीर नाही. मधुमेही व्यक्तीचा आहार योग्य प्रमाणात व संतुलित असायला हवा. कारण कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखर वाढवण्याचे काम करतात. मधुमेह आपल्यासोबत इतर अनेक आजार घेऊन येतो. तसेच जे लोक रोज ब्रेड खातात त्यांना आव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शरीर कमकुवत तर होतेच तसेच पचनसंस्थाही कमजोर होते. ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाणही खूप जास्त असते, जे हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉलची समस्या वाढवण्याचे काम करते. ब्रेडचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. रोज ब्रेड खाल्ल्याने शरीरातील सूज वाढू शकते आणि हार्मोन्स असंतुलित होतात.

ब्रेडने पोट भरते पण पोषण मिळत नाही

Side Effects Of Eating Bread Everyday
Side Effects Of Eating Bread Everyday

कधी कधी असे होते की भूक लागल्यावर आपण ब्रेड खातो. त्याने आपले पोट तर भरते पण पोषणाच्या नावाखाली शरीराला काहीच मिळत नाही. जर तुमचे मूल रोज भूक लागल्यावर ब्रेड खात असेल तर त्याचे कुपोषण होऊ शकते. जर तुम्ही ब्रेडचे  जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमचे वजन वाढण्याची खात्री आहे. त्यात असलेले मीठ, साखर आणि प्रिझर्वेटिव्ह हे वजन वाढवणारे घटक आहेत. जर तुम्ही या गोष्टींचे जास्त सेवन केले तर तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असाल तर ब्रेडचे सेवन अजिबात करू नका. 

ADVERTISEMENT

कोणत्या प्रकारचा ब्रेड खाणे चांगले आहे 

जर तुम्हाला ब्रेड फारच आवडत असेल तर तुम्ही ब्राउन ब्रेड,होलग्रेन ब्रेड, होलव्‍हीट ब्रेड, Bread with flax seeds आणि इतर त्यातल्या त्यात हेल्दी ब्रेड खाऊ शकता. पण रोज ब्रेड खाण्याऐवजी काही पौष्टिक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

02 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT