दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण… दिवाळीला नवीन कपडे आणि नटून थटून सण साजरा केला जातो, घराची सजावट, रोशनाई आणि फराळाचा उत्साह या दिवशी न्याराच असतो. अनेक ठिकाणी दिवाळीच्या दिवसांमध्ये दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दिवाळी पहाटच्या निमित्ताने दिवाळीतील प्रत्येक सकाळ उत्साह आणि आनंदाने उजाडते. यंदा जर तुम्ही अशा एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणार नसाल तर घरीच ऐका ही मराठी दिवाळीची गाणी…. ज्यामुळे घर बसल्या तुम्हाला दिवाळीचा आनंद नक्कीच घेता येईल. यासोबतच सर्वांना द्या दिवाळीच्या शुभेच्छा, धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या शुभेच्छा.
आली माझ्या घरी ही दिवाळी
गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकजण दिवाळीचा सण तितक्याच उत्साहाने साजरा करतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरी दिवाळी साजरी होणार याचा एक निराळा आनंद असतो. अशा वेळी आली माझ्या घरी दिवाळी हे गाणं तुमच्या मनाला अधिकच प्रसन्न करू शकते. अष्टविनायक या मराठी चित्रपटातील गाणं दिवाळीत प्रत्येक कार्यक्रमात अथवा घरोघरी ऐकलं जातं. अष्टविनायक हा चित्रपट राजदत्त यांनी दिग्दर्शित केला होता. यातील आली माझ्या घरी ही दिवाळी हे गाणं अभिनेता सचिन पिळगांवकर आणि वंदना पंडित यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.
चित्रपट – अष्टविनायक
गीतकार – मधुसूदन कालेलकर
संगीतकार – अनिल- अरूण
गायिका – अनुराधा पौडवाल
आली दिवाळी आली दिवाळी
आई पाहिजे या आशा काळे यांच्या चित्रपटातही एक दिवाळीचे गाणे आहे. या चित्रपटात आशा काळे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ज्यामध्ये भूतकाळाची आठवण येताना दिवाळीवर आधारित एक गाणे दाखवण्यात आले होते. या गाण्यातून घरोघरी साजरी होणाऱ्या दिवाळीच्या सणाचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. यातील सुंदर बोल ऐकून घरातील दिवाळीचे वातावरण आधिकच प्रसन्न होऊ शकते.
गायिका – उषा मंगेशकर
चित्रपट – आई पाहिजे
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
दिवाळीच्या दिवसांमध्ये बहिणीला सर्वात जास्त ओढ असते ती म्हणजे भाऊबीजेची. कारण त्या निमित्ताने भाऊराया खास बहिणीच्या घरी ओवाळणीसाठी येतो. या दिवशी भावाकडून छानसं गिफ्ट उकळण्यात एक मजा असते. त्यामुळे अशा सुंदर क्षणासाठी भाऊबीज चित्रपटातील ओवाळिते भाऊराया हे गाणं नक्कीच छान वाटेल
गीतकार – संजीव
गायक – आशा भोसले
संगीतकार – वसंत मोहिते
चित्रपट – भाऊबीज
आली दिवाळी आली दिवाळी
प्रसिद्ध मराठी चित्रपट बायकोचा भाऊ या चित्रपटातील हे दिवाळीसाठी चित्रित करण्यात आलेलं गाणंही दिवाळसणाला नक्की ऐकायला हवं असं आहे. दिवाळीच्या दिवसात घरात असलेले मंगलमय वातावरण, भाऊबीजेच्या दिवशी भावाच्या ओवाळणीसाठी असलेली ओढ यात दाखवण्यात आलेली आहे. चित्रपट – बायकोचा भाऊ
गायिका- आशा भोसले
संगीतकार – वंसत प्रभू
गीतकार – बाळ कोल्हटकर
आम्ही शेअर केलेली ही दिवाळी गाणी मराठीतून तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही दिवाळी कशी साजरी केली हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.