ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘सारेगामापा’ यंदाच्या सीझनची विजेती ठरली नीलांजना रे, प्रेक्षकांकडून होतंय कौतुक

‘सारेगामापा’ यंदाच्या सीझनची विजेती ठरली नीलांजना रे, प्रेक्षकांकडून होतंय कौतुक

सारेगामापा म्युजिकल रिअॅलिटी शोचे चाहते अनेक आहेत. त्यामुळे या शोचा प्रत्येक सीझन प्रेक्षक आवर्जून पाहतात. या शोचा 27 वा सीझन नुकताच पार पडला. या शोमध्ये देशभरातील अनेक राज्यांमधून स्पर्धकांनी भाग घेतला होता. गेले तीन महिने सुरू असलेला हा सुरेल शो नुकताच संपला असून या शोचं विजेतेपद पश्चिम बंगालच्या नीलांजना रेने पटकावलं आहे. नीलांजनाला सर्वात जास्त वोट मिळाल्यामुळे तिला हे विजेतेपद मिळालं. नीलांजनाला विनर ठरल्यावर सारेगामापाची मानाची ट्रॉफी आणि दहा लाखांचा चेक बक्षीस स्वरूपात देण्यात आला. या शोची पहिली उपविजेती ठरली राजश्री बाग आणि दुसरं उपविजेते पद शरद शर्माला मिळालं. 

कसा रंगला महा अंतीम सोहळा

सारेगामाचे प्रत्येक सीझन पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी त्या सीझनचा महाअंतीम सोहळा खूप महत्त्वाचा असतो. सहा मार्चला हा महा अंतीमसोहळा प्रसारित करण्यात आला. या शोमध्ये नीलांजना रे, राजश्री बाग, शरद शर्मा, अनन्या चक्रवर्ती, स्निग्धजीत भौमिक असे सहा फायनलिस्ट स्पर्धक होते. शोमध्ये महाअंतीम सोहळ्यात स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी शोचे परिक्षक शंकर महादेवन, हिमेश रेशमिया, विशाल डडलानी यांच्यासह उदीत नारायण आणि शिल्पा राव हे दिग्गज सेलिब्रेटीही उपस्थित होते.  सर्वच स्पर्धकांनी शोमध्ये उत्तम परफॉर्मन्स देत चाहत्यांची आणि परिक्षकांची मने जिंकून घेतली मात्र जास्त मते मिळाल्यामुळे नीलांजना रे, राजश्री बाग आणि शरद शर्मा शेवटचे फायनलीस्ट ठरले. ज्यामध्ये नीलांजना रे विजेती आणि बाकीचे दोघे उपविजेते ठरले. नीलांजना रे ला ट्ऱॉफीसह दहा लाख तर राजश्री बागला पाच लाख आणि शरदला तीन लाखाचे बक्षीस मिळाले. 

काय आहेत नीलांजनाच्या भावना

नीलांजनाने शोच्या प्रत्येक भागात बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला होता. खूप मेहनत घेत तिने या शोमध्ये महाअंतीम सोहळ्यापर्यंत स्वतःला टिकवून ठेवलं. प्रत्येक शोमध्ये तिचं परिक्षकांसह येणारे पाहुणेही तोंडभरून कौतुक करत होते. महाअंतीम सोहळ्यातील तिचा परफॉर्मन्स आणि प्रेक्षकांनी मतांच्या स्वरूपात केलेलं भरभरून प्रेम यामुळे ती या शोची विजेती ठरली. विजेतेपद मिळाल्यावर नीलांजनाने सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय या शोमधून तिला बरंच काही शिकायला मिळालं असंही ती म्हणाली. विजेती ठरल्याचा तिला नक्कीच आनंद झाला मात्र आता शो संपल्यामुळे तिला शोमध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीची आणि सर्व लोकांची सतत आठवत येत राहील असंही ती म्हणाली. सेटवर सगळे एखाद्या कुटुंबाप्रमाणे वागत असल्यामुळे शो संपल्यानंतरही तिला सतत सर्वांची नक्कीच आठवत येत राहील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT