ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
Style Hacks To Glam Up Your Plain Saree in Marathi

प्लेन साडी स्टायलिश अंदाजमध्ये कॅरी करण्यासाठी सोप्या टिप्स

साडी नेसणं म्हणजे अनेकींचा जीव की प्राण असू शकतो. कारण अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी साडी एक परफेक्ट आऊटफिट ठरू शकतो. लग्नसमारंभापासून ते अगदी ऑफिस मीटिंगपर्यंत तुम्ही साडी सहज कॅरी करू शकता. वास्तविक आजकाल साड्यांचे विविध प्रकार, रंग आणि पॅटर्न बाजारात मिळू शकतात. डिझायनर साड्या तर प्रत्येकीचं लक्ष वेधून घेत असतात. अशा साड्यांवरील प्रिंट आणि डिझाइनमुळे त्यांची किंमत वाढते. पण जर तुमच्याकडे एखादी प्लेन साडी असेल तर तुम्ही ती देखील हटके पद्धतीने नेसून आकर्षक दिसू शकता. यासाठीच फॉलो करा या काही स्टायलिंग टिप्स आणि त्यासोबतच जाणून घ्या साडी कशी नेसावी

प्लेन साडीसाठी स्टाईल टिप्स

तुमच्या वॉर्डरोबमधील एखादी प्लेन साडीदेखील या टिप्समुळे आकर्षक दिसेल.

ब्लाऊज नाही शर्ट

जर तुम्ही एखादी प्लेन साडी स्टायलिश पद्धतीने नेसणार असाल तर तिच्यासोबत साधं ब्लाऊज कॅरी करू नका. त्याऐवजी शर्ट जास्त शोभून दिसेल. लक्षात ठेवा प्लेन साडीवर शर्ट निवडताना कॉन्ट्रास्ट रंगसंगती निवडा ज्यामुळे तुमचा लुक सर्वांपेक्षा हटके दिसेल. अशी साडी तुम्ही एखादी पार्टी अथवा ऑफिस मिटींगसाठी नक्कीच परिधान करू शकता. 

सीक्वेन्ससोबत करा कॅरी

जर तुमच्याकडे एखाद्या हलक्या रंगाची प्लेन साडी असेल तर तुम्ही ती सीक्वेन्ससोबत कॅरी करू शकता. अशा साडीसोबत सीक्वेन्सचा ब्लाऊज, सीक्वेन्स पर्स आणि आकर्षक ज्वैलरी कॅरी केली तर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधू शकता. सीक्वेन्समुळे तुमच्या साडीला एथनिक आणि आकर्षक रूप मिळेल, तुम्ही कॉलेजला जाणारी मुलगी असा वा वयोवृद्ध महिला हा साधा आणि क्लास लुक कोणावरही शोभून दिसेल.

ADVERTISEMENT

डिझायनर ब्लाऊज दिसेल परफेक्ट

तुमच्या वॉर्डरोबमधील एका प्लेन साडीला हटके अंदाजमध्ये कॅरी करायचं असेल तर हा एक छान पर्याय आहे. तुम्ही अशा साडीसोबत एखादं डिझायनर ब्लाऊज पेअर करू शकता. जर तुम्ही अशा साडीसोबत जॅकेट ब्लाऊज कॅरी केलं तर तुमचा लुक इतरांना घायाळ करणारा ठरेल. हिवाळ्यात अशा प्रकारे साडी नेसून तुम्ही एखाद्या कार्यक्रमाची शोभा वाढवू शकता.

हटके लुकसाठी स्टेटमेंट नेकलेस

प्लेन साडीवर कोणते दागिने वापरावे अथवा काय स्टाईल करावी असा प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय अतिशय उत्तम आहे. आजकाल बाजारात स्टेटमेंट नेसलेसचा ट्रेंड आहे. असे नेकलेस तुमच्या कोणत्याही अटायरला आकर्षक बनवतात. त्यामुळे तुमच्या प्लेन साडीवर तुम्ही बोल्ड सिल्व्हर, ब्रास अथवा सोनेरी रंगाचा एखादा स्टेटमेंट नेकलेस नक्कीच परिधान करू शकता. खणाच्या साड्या आणि बरंच काही खास तुमच्यासाठी (Khanachi Saree Look In Marathi)

साडीपिनने करा सुशोभित

साडीपिन अथवा Broochनेही तुम्ही तुमचा प्लेन साडीचा लुक परफेक्ट करू शकता. तुमची साडी जर सुळसुळीत असेल तर तिला पदर पिनअप करता मॅनेज करणं थोडं कठीण असू शकतं. अशा वेळी तुम्ही तुमच्या प्लेन साडीचा मस्त पदर काढा तो ब्रोच अथवा एखाद्या आकर्षक पिनने पिनअप करा.

Kathachya Sadiche Blouse Designs | काठाच्या साडीचे विविध ब्लाऊज डिझाईन

ADVERTISEMENT
20 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT