साडी कितीही साधी असली तरी डिझाइनर ब्लाऊजमुळे त्या साडीची शोभा अधिक वाढू शकते. त्यामुळे आजकल डिझायनर ब्लाऊजचा ट्रेंड वाढत आहे. विशेष म्हणजे हे ब्लाऊज तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. ज्यामुळे साडीवर मॅचिंग ब्लाऊज पिस शोधणे, टेलरकडून तो शिवून घेणे हा व्याप नक्कीच कमी होतो. तुम्ही तुमच्या साईजनुसार एखाद्या फॅशन अॅपवरून मस्त तुमच्या आवडीचा ब्लाऊज खरेदी करू शकता. एकाच ब्लाऊजवर निरनिराळ्या साड्या तुम्ही मिक्समॅच करून नेसू शकता. पण ऑनलाईन ब्लाऊज ऑर्डर करण्यापूर्वी या काही शॉपिंग टिप्स जरूर लक्षात ठेवा.
ऑनलाईन ब्लाऊज खरेदी करण्यासाठी सोप्या टिप्स
साडीवर परफेक्ट ब्लाऊज पेअर केलं तर कोणतीही साडी सुंदर दिसू शकते. यासाठीच असं छान डिझायनर ब्लाऊज ऑनलाईन खरेदी करण्यासाठी काही सोप्या टिप्स
ब्लाऊजचं कापड पाहा
रेडीमेड ब्लाऊज अनेक प्रकारच्या कापडामध्ये तयार केलेलं असतं. त्यामुळे ऑनलाईन ब्लाऊज खरेदी करताना ते कितीही सुंदर आणि आकर्षक असलं तरी त्याचं कापड काय आहे हे जरूर वाचा. प्रत्येक प्रॉडक्ट खाली त्याची माहिती दिलेली असते. ज्यामध्ये ब्लाऊज कोणत्या कापड अथवा फॅब्रिकमध्ये तयार केलेलं आहे हे दिलेलं असतं. कारण तुमची साडी ज्या कापडाची आहे त्यानुसार तुम्हाला ब्लाऊजच्या कापडाची निवड करावी लागते. सिल्कच्या साडीवर कॉटनचं ब्लाऊज फार चांगलं दिसत नाही. यासाठी कापड पाहून ब्लाऊज खरेदी करा.
साईज पाहून ऑर्डर बूक करा
प्रॉडक्टखाली दिलेल्या माहितीमध्ये तुम्ही बूक करत असलेल्या ब्लाऊजची साईजपण दिलेली असते. तुमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी साईज चार्ट दिलेला असतो. स्मॉल, मिडिअम, लार्ज, एक्स्ट्रा लार्जचे त्या त्या ब्रॅंडनुसार माप दिलेले असते. तुमच्या ब्राच्या साईजनुसार तुम्हाला ब्लाऊजची साईज निवडावी लागते. कारण जर ब्लाऊज मापात नसेल तर तुमचा लुक खराब दिसू शकतो.
बॉडी टाईपनुसार अशी निवडा ब्लाऊज अथवा ड्रेसच्या हाताची लांबी
रिव्ह्यू वाचा
कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्या प्रॉडक्टखाली दिलेला रिव्ह्यू नेहमी वाचायला हवा. कारण ते प्रॉडक्ट आधी ज्यांनी खरेदी केलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया त्यात नोंदवलेली असते. तुम्ही ब्लाऊजच्या खाली दिलेले हे फिडबॅक वाचून ठरवू शकता की तुम्ही हे ब्लाऊज खरेदी करायला हवे की नाही. कारण त्यामुळे तुमचा ब्लाऊज विकत घेण्याचा निर्णय चुकणार नाही.
साडी नेसत नसाल तरीही तुमच्याकडे हवेत या हे पॅटर्नचे ब्लाऊज
रिर्टन पॉलिसी जाणून घ्या
ऑनलाईन वस्तू खरेदी करताना नेहमी त्या ब्रॅंडची रिर्टन पॉलिसी काय आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं. कदाचित तुमचा अंदाज चुकू शकतो आणि तुमचा ब्लाऊज साईज,रंग अथवा मटेरिअलमध्ये तुम्हाला हवा तसा नसू शकतो. अशा वेळी रिर्टन पॉलिसी आधीच माहीत असेल तर तुमचे नुकसान होणे टळू शकते. आजकाल बऱ्याच प्रॉडक्टसाठी रिर्टन पॉलिसी देण्यात येते ज्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत नाही आणि वस्तूंच्या खरेदीवर परिणाम होत नाही.