ADVERTISEMENT
home / Mental Health
Tips for Stress Free Life in Marathi

आयुष्य स्ट्रेस फ्री करण्यासाठी दररोज करा फक्त या पाच गोष्टी

आजकाल  लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि गरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला चिंता, काळजीने वेढलेलं आहे. लहान मुलांना अभ्यासाचं टेन्शन, आईवडीलांना मुलांच्या भविष्याचं टेन्शन, नोकरी करणाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्याचं टेन्शन तर रिटायर्ड आणि सिनिअर सिटीझन्सनां आयुष्य कसं जाईल याचं टेन्शन, गरिबाला पैसे मिळवण्याचं टेन्शन तर श्रीमंतांना पैसे टिकवण्याचं टेन्शन… थोडक्यात आयु्ष्यात प्रत्येकाला काही ना काहीतरी चिंता काळजी आहेच. बाहेरून मिळणाऱ्या या चिंता काळजीला नियंत्रित ठेवायचं असेल तर तुमचं मन मजबूत आणि प्रसन्न असायला हवं. म्हणूनच तुमच्या जीवनशैलीत आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करायला हवेत ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि तणावमुक्त जीवन जगता येईल. तसंच वाचा आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi

स्ट्रेस फ्री जीवन कसं जगावं

स्ट्रेस फ्री म्हणजेच तणावमुक्त जगायचं असेल तर तुमचा जगण्याचा दृष्टीकोन आधी बदलायला हवा. विचार करण्याच्या पद्धतीत बदल करून तुम्ही तुमचा ताण नक्कीच कमी करू शकता. 

नेहमी कृतज्ञ राहा

तणावमुक्त राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे नेहमी कृतज्ञ राहणे. आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल, ज्यांच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या या बद्दल, परमेश्वराने जे जे दिल आहे त्याबद्दल सतत कृतज्ञ असाल तर तुमच्याकडे जे नाही त्याचं स्मरणच होणार नाही. एखादी गोष्ट मिळाली नाही की त्यातून निर्माण होणारा ताण जास्त त्रासदायक असतो. यासाठीच कायम तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि समाधानाच्या अधिष्ठानावर प्रयत्न करत हव्या असलेल्या गोष्टी आयुष्यात प्राप्त करा. 

योगासने आणि ध्यानधारणा करा

मन शांत आणि निवांत ठेवण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे नियमित योगासने आणि मेडिटेशन करणं. कारण योगासनांमुळे तुमच्या शरीर आणि मनाला आराम मिळतो, योगसाधना ही मन आणि आत्मा जोडणारी साधना आहे. तसंच ध्यानधारणेमुळे मन शांत आणि मजबूत होतं. सहाजिकच ज्यामुळे चिंता, काळजी नियंत्रणात ठेवण्याची कला तुम्हाला नकळत हस्तगत होते. यासाठी वाचा Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे, प्रतिकारशक्ती वाढवणारी योगासने (Yoga To Improve Immune System In Marathi ), योग निद्रा म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत | Yoga Nidra In Marathi

ADVERTISEMENT

तुलना करू नका

माणसाला सतत इतरांसोबत स्वतःची तुलना करण्याची सवय असते. कोण आपल्यापेक्षा जास्त सुंदर आहे, कोणाकडे आपल्यापेक्षा जास्त ऐश्वर्य आहे, कोण आपण अजून न गेलेल्या ठिकाणी फिरायला गेलं, कोणाच्या मुलांना जास्त यश मिळालं अशा गोष्टी मनात ठेवल्या तर तुमची चिंता काळजी वाढत जाणार. त्यामुळे असे विचार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडवण्यापेक्षा समाधानी राहून जीवनात जास्त यश मिळवा. इतरांशी तुलना केल्यामुळे तुमच्या मनात निराशा निर्माण होत असेल तर तुमच्याकडे काय काय आहे याचं चिंतन करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल काैतुक वाटू लागेल आणि इतरांशी तुलना करण्याची इच्छाच होणार नाही.

सतत प्रेमाने बोला

इतरांकडून तुम्हाला प्रेमाची अपेक्षा असेल तर आधी इतरांवर निस्वार्थ प्रेम करायला शिका. कारण प्रेमाने अनेक समस्या सहज सोडवता येतात. प्राण्यांवर, मुलांवर, कुटुंबावर, नातेवाईकांवर, मित्रमंडळींवर, राष्ट्रावर निस्वार्थ प्रेम करता येणं खूप गरजेचं आहे. कारण यातून तुमचं मन अधिक शांत होईल आणि चिंता काळजी दूर राहील.

आरोग्याची काळजी गरजेची 

आजकाल बाहेरच्या वातावरणात साथीच्या आजार पसरताना दिसतात. ज्यामुळे आरोग्याविषयी चिंता काळजी वाढत जाते. अशा परिस्थितीत माणसं आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा सतत काळजी करत बसतात. शिवाय आजारी पडल्यावर त्यांची नेहमीपेक्षा जास्त चिडचिड होते. यासाठी आधीच आरोग्याची वेळीच काळजी घ्या. शरीर सुदृढ आणि निरोगी असेल तर तुमचे मन नक्कीच शांत आणि निवांत राहील. ज्यामुळे चिंता काळजी वाढण्याचे प्रमाण कमी होईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT