ADVERTISEMENT
home / सौंदर्य
tips-how-to-apply-colored-eyeliner-in-marathi

कलर्ड आयलाईनरचा ट्रेंड, वापरा हे रंग

मेकअप करणं प्रत्येक मुलीला आवडतं. फारच कमी मुली असतात ज्यांना मेकअप आवडत नाही. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आयमेकला अधिक महत्त्व दिलं जातं. सुंदर डोळ्यांसाठी आयलाईनरचा वापर हे अत्यंत कॉमन आहे. पण सध्या कलरफुल लायनरचा अधिक वापर करण्यात येतो. ब्लॅक आयलायनर तर प्रत्येकीकडे असतेच. पण कलरफुल असे आयलाईनर सध्या ट्रेंडमध्ये आहे. लिक्विड, मॅट आणि पेन्सिल अशा वेगवेगळ्या स्वरूपात हे लायनर वापरण्यात येतात. काळ्या लायनरच्या ऐवजी तुम्ही वेगळ्या रंगांचे लायनरही वापरू शकता. तुम्हालाही तुमच्या लुकमध्ये विविधता हवी असेल तर तुम्ही असे कलर्ड आयलाईनर नक्की वापरू शकता. मात्र या लायनर्सचा वापर करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 

गडद रंग (Dark Colour Eye Liner)

सुंदर लुकसाठी तुम्ही निऑन रंगाच्या लाईनरचा वापर करू शकता. तुम्हाला निळा अथवा गुलाबी रंग नको असेल तर तुम्ही गडद रंगाच्या लायनरचा उपयोग करून घ्या. तसंच तुम्ही निळा अथवा गुलाबी रंग या निऑन रंगासह मिक्स करूनदेखील लावून पाहू शकता. यामुळे तुम्हाला वेगळा लुक मिळतो आणि तुम्ही अधिक फॅशनेबल दिसता. तुम्हाला एखाद्या पार्टीसह लुक हवा असेल तर तुम्ही हा लुक नक्की ट्राय करू शकता. 

मस्करादेखील आहे गरजेचा (Need Mascara For The Eyes)

तुम्ही जर गुलाबी रंगाचे आयलायनर लावले तर तुम्ही डोळ्यांना मस्कारा नक्की लावा. कारण मस्कारा लावण्याने डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढते. तसंच मस्कारा लावल्यामुळे तुमचे कलर्ड आयलायनर अधिक उठावदार दिसते आणि तुमच्या पापण्याही गडद दिसतात. त्यामुळे तुम्ही आयलायनर लावल्यानंतर डोळ्यांना मस्कारा नक्की लावा. 

पापण्यांच्या जवळ आयलायनर लावा (Use Eyeliner Near Eyelid)

तुम्ही सुंदर आणि आकर्षक डोळ्यांसाठी कलर्ड आयलायनर लावत असाल तर तुम्ही या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. लायनर नेहमी तुम्ही पापण्यांच्या जवळ लावा जेणेकरून पापण्या आणि लायनरच्यामध्ये गॅप राहू देऊ नका. अशी गॅप राहिल्यास, डोळे खराब दिसतात. लायनर नेहमी तुम्हाला पापण्यांच्या अगदी जवळ लावायला हवे. यामुळे तुमच्या डोळ्यांचा आकारही अप्रतिम दिसतो.  

ADVERTISEMENT

प्रायमरचा करा वापर (Use Primer)

परफेक्ट आयमेकअप करण्यासाठी तुम्ही प्रायमरचा वापर नक्की करावा. डोळ्यांवर प्रायमर लावल्याने आयमेकअप खराब होत नाही. सुंदर आयमेकअप हवा असेल तर तुम्ही याचा वापर करायला हवा. कलरफुल आयलायनर लावण्यासाठी तुम्ही ज्या रंगाचा वापर करत आहात, तो रंग तुम्हाला आणि तुमच्या स्किन टोनला मॅच करत आहे की नाही ते तपासून पाहा. प्रायमरचा वापर केल्यानंतर तुम्ही गोल्डन पेन्सिल, हिरव्या अथवा परपल रंगाच्या आयलायनरचा वापर करू शकता. 

लाईट मेकअपसह लिक्विड लायनर (Liquid Liner with Light Make Up)

तुम्ही कलर्ड आयलायनर लावत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या की, तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप हा अत्यंत लाईट असायला हवा. लाईट मेकअप अर्थात मिनिमल मेकअप लुक असेल तर तुमच्या डोळ्यांवरील कलर्ड आयलायनर अधिक उठून दिसते. यासह तुम्ही न्यूड लिपस्टिकचाही वापर करावा. तसंच कलरफुल आयलायनर वापरण्यासाठी लिक्विड आयलायनरचा वापर केल्यास अधिक चांगला आणि स्मूथ लुक मिळतो. पेन्सिल लायनरचा वापर केल्यास, अगदी परफेक्ट लुक मिळतोच असं नाही. 

ब्लॅक लायनरसह मिक्स करा कलर्ड आयलायनर 

सध्या कलर्ड आयलायनर ट्रेंडमध्ये आहे. पण तुम्ही काळ्या अर्थात ब्लॅक आयलायनरसह हे कलरफुल आयलायनर मिक्स करून एक वेगळा लुक करू शकता अथवा आधी ब्लॅक आयलायनर लावा आणि त्यावर वेगळा लेअर हा कलरफुल आयलायनरचा लावल्यास, हा लुक अप्रतिम दिसतो. असा सुंदर लुक तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी उठावदार दिसतो. 

25 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT