तुम्ही ऑफिससाठी किंवा पार्टीसाठी तयार होत असाल किंवा मैत्रिणींबरोबर एन्जॉय करायला बाहेर जात असाल तर मिडी स्कर्ट हा कोणत्याही प्रसंगासाठी एक व्हर्सटाइल आणि क्युट पर्याय आहे. मिडी स्कर्ट कॅरी करणे खूप सोपे आहे आणि वर्षाच्या प्रत्येक सीझनमध्ये मिडी स्कर्ट चालतो. खास करून उन्हाळ्यात तर कुल कॅज्युअल लूकसाठी मिडी स्कर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात आपल्याला आरामदायक, हवेशीर आणि थोडेसे सैलसर कपडे घालावेसे वाटतात. आता 8 मार्च रोजी येणारा जागतिक महिला दिन म्हणजे प्रत्येक महिलेसाठी खास दिवस असतो. मग या दिवशी तर छान तयार होऊन मैत्रिणींबरोबर एन्जॉय करायचा मौका कशाला सोडायचा? जागतिक महिला दिनानिमित्त स्वतःला काहीतरी खास गिफ्ट द्या, मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा पाठवा आणि जागतिक महिला दिन एन्जॉय करा. हा खास दिवस साजरा करण्यासाठी पुढे सुचवलेल्या मिडी स्कर्टच्या स्टाईल आयडीयाजमधून तुम्ही तुमच्यासाठी एखादा पर्याय निवडू शकता.
टॉप आणि स्कर्टचा बॅलन्स करा
मिडी स्कर्ट आणि मॅचिंग टॉपमध्ये संतुलन साधणे खूप महत्वाचे आहे. मिडी स्कर्ट कंबरेभोवती घट्ट बसतात, परंतु ते तुमच्या मागच्या बाजूला आणि पायांच्या सभोवताली सैल असतात. तुमच्या ड्रेसचे फिटिंग चोख असेल याची खात्री करा जेणेकरून तुमचे नैसर्गिक कर्व्ह्ज उठून दिसतील. मिडी स्कर्टबरोबर टाईट फिटिंगचे क्रॉप टॉप किंवा इन केलेले थोडे सैलसर टॉप किंवा शर्ट घातला तर त्याने शरीर बांधेसूद दिसण्यास मदत होते. तुमच्या मिडी स्कर्टसाठी टॉप निवडताना हे लक्षात ठेवा.
योग्य शूज निवडा
तुमच्या मिडी स्कर्टच्या हेमच्या लांबीनुसार तुमचे शूज लक्ष वेधून घेतील याची काळजी घ्या. मिडी स्कर्ट बरोबर कधीही फ्लिप-फ्लॉप, बेसिक फ्लॅट्स किंवा अगदी साधे सँडल्स किंवा चप्पल घालू नका. त्याने तुमचा लूक छान दिसणार नाही. स्ट्रॅप असलेले सँडल्स, पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स, ब्लॉक हिल सँडल्स, पॉईंटेड टो -किटन हिल्स , वेजेस ,फ्लॅट सँडल्स किंवा नी हाय बूट्स या प्रकारची पादत्राणे मिडी स्कर्ट बरोबर उठून दिसतात.
मॅचिंग मिडी सेट
सध्या मॅचिंग मिडी सेट खूप ट्रेंडिंग आहे. तुम्ही बघितले असेल तर अनेक सेलिब्रिटीज सुद्धा कॅज्युअल लूकसाठी मॅचिंग मिडी सेटची निवड करत आहेत. मॅचिंग मिडी सेट एकाच प्रकारच्या फॅब्रिकचा असो किंवा प्रिंटेड असो किंवा एकाच पॅटर्नचा असो, तुम्ही प्रसंगाला अनुरूप असा ड्रेस निवडू शकता. मिडी स्कर्टसाठी पिवळा किंवा ऑलिव्ह ग्रीन सारख्या चमकदार टोनची निवड करा आणि त्यावर पांढरा टॉप किंवा शर्ट घालून तुमचा कॅज्युअल लूक पूर्ण करा. मिडी स्कर्ट बरोबर तुम्ही गडद रंगाची लिपस्टिक शेड आणि विंग्ड आयलायनर अशी स्टाईल करू शकता. मायग्लॅमचे LIT SATIN MATTE LIPSTICK या लूकसाठी परफेक्ट आहे.
वेगवेगळे टेक्श्चर ट्राय करा
मिडी स्कर्ट विविध प्रकारच्या स्टाईल आणि टेक्श्चरमध्ये उपलब्ध आहेत. या ट्रेंडमध्ये एक अनोखा ट्विस्ट तयार करण्यासाठी असा एखादा मिडी स्कर्ट निवडा जो खास असेल. डेनिम मिडी स्कर्ट तुम्हाला कदाचित जुनी फॅशन वाटू शकेल, परंतु त्यांचा ट्रेंड परत आला आहे. सैल क्रॉप टॉप व फिट डेनिम स्कर्ट असे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करू शकता. व्हेल्वेट स्कर्ट, बटन-डाउन स्कर्ट किंवा फ्रिली स्कर्ट यांसारखे इतर टेक्श्चर देखील वापरून पहा. फक्त या मिडी स्कर्टबरोबर तुमचा टॉप प्लेन आणि सिम्पल ठेवा. या लूक बरोबर तुम्ही आयमेकअपवर फोकस करू शकता. न्यूड शेडची लिपस्टिक आणि MYGLAMM SUPERFOODS KAJAL – RAVEN हे आयलायनर वापरून एक सिम्पल कॅज्युअल लूक मिळवा.
या प्रकारे तुम्ही मिडी स्कर्टची स्टाईल करू शकता.
Photo credit- pinterest
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक