काम करता करता तयार होण्यासाठी हेअर रोलर्स हा एक उत्तम पर्याय आहे कारण तुम्ही ते केसांना लावून इतर महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. तुमचे काम फक्त ते व्यवस्थितपणे केसांना लावणे आहे. एकदा ते केसांना लावले की मग त्यांना त्यांची जादू करू द्या आणि तुम्ही तुमची इतर कामे करा. बाजारात अनेक प्रकारचे रोलर्स मिळतात. जसे की असे रोलर्स जे तुम्ही झोपेच्या वेळी तुमच्या ओल्या केसांना लावू शकता, जे तुमचे केस सुकल्यावर कुरळे करतात किंवा तुम्ही हॉट रोलर्स निवडू शकता जे तुम्ही 10 ते 15 मिनिटे केसांना लावले की उष्णतेने तुमच्या केसांच्या बटा कुरळ्या होतात.
तुम्हाला बीच कर्ल्स किंवा कॉइल्स हवे असतील तर रोलर्स हा एक उत्तम पर्याय आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हीट स्टायलिंगपेक्षा हा एक सुरक्षित पर्याय आहे आणि रोलर्स सर्व प्रकारच्या केसांवर काम करतात. त्यामुळे तुम्हाला उष्णतेमुळे होणारे केसांचे नुकसान टाळायचे असेल तर आणि बाऊन्सी कर्ल्स हवे असतील किंवा तुम्ही लांब केस झटपट कर्ल करू इच्छित असाल तर तुमच्या इच्छित हेअरस्टाइलसाठी रोलर्सचा पर्याय अगदी योग्य आहे. परंतु रोलर्स लावताना काळजी घ्या म्हणजे केसांचे नुकसान होणार नाही आणि तुम्हाला सुंदर हेअरस्टाईल मिळेल. हेअर रोलर्स हा कोणत्याही हिटशिवाय नैसर्गिकरित्या केसांना कर्ल करण्याचा एक उत्तम पर्याय आहे.
हेअर रोलर्सचे प्रकार
हॉट रोलर्स, फोम कर्लर्स, वेल्क्रो रोलर्स, स्टीम हेअर रोलर्स, फ्लेक्सी-रॉड्स, हीटेड रोलर्स, मॅग्नेटिक रोलर्स, ब्रश हेअर रोलर्स आणि स्पंज रोलर्स हे हेअर रोलर्सचे काही प्रकार आहेत. हॉट रोलर्स हे सुपर क्विक कर्लसाठी वापरले जातात. हे रोलर्स मस्त आहेत कारण कारण तुम्ही रोलर्सच्या आकारावर आणि तुमचे केस कसे फिरवता यावर केसांना वेगवेगळ्या प्रकारचा लूक देऊ शकता. फोम रोलर्स किंवा स्पंज हेअर रोलर्स ही थोडी जुनी टेक्नॉलॉजी वाटू शकते परंतु ते खूप उपयुक्त आहेत. जर तुम्हाला हीट स्टायलिंग न करता कर्ल्स हवे असतील तर हा एकमेव मार्ग आहे.फ्लेक्सी-रॉड्स (किंवा बेंडी रोलर्स) लावायला खूप सोपे असतात. कारण ते लावण्यासाठी पिन किंवा क्लिपची गरज नाही. हे सर्व रोलर्स लावताना पुढील काळजी घ्या.
हेअर रोलर्स वापरण्यासाठी टिप्स
- कर्लिंग करण्यापूर्वी कंडिशनर वापरू नका. कंडिशनरमुळे तुमचे केस अतिशय चमकदार आणि मऊ होतील आणि त्यामुळे तुमचे केस रोलर्समध्ये बसणे कठीण होईल. तुम्हाला जेव्हाही रोलर्स वापरायचे असतील तेव्हा केस धुताना कंडिशनर वापरू नका.
- वेल्क्रो मऊ गुळगुळीत केसांसाठी उत्तम आहे. तुमचे केस अगदी सरळ असल्यास, वेल्क्रो रोलर्स हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
- तुम्ही तुमच्या केसांमध्ये जितके अधिक रोलर्स लावाल तितके अधिक कर्ल्स मिळतील. केसांचे छोटे छोटे सेक्शन्स तयार करा आणि प्रत्येकाला कर्ल करण्यासाठी रोलर वापरा. जर तुमचे केस जाड असतील, तर तुम्हाला पातळ केसांपेक्षा जास्त रोलर्सची आवश्यकता असेल.
- रोलर्स काळजीपूर्वक निवडा. रोलर्स लहान ते मोठ्या आकारात येतात. जर तुमचे केस लांब असतील तर नैसर्गिक लुकसाठी विविध आकारांचा वापर करा. तुमचे केस लहान असल्यास, तुम्हाला लहान रोलर्सची आवश्यकता असते.
- झोपताना केसांना स्कार्फ किंवा रुमाल बांधून झोपा. जेणेकरून तुम्ही झोपत असताना तुम्हाला अधिक आरामात झोपता येईल. आणि रोलर्स पडणार नाहीत.
Photo credit- unsplash, istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक