केस पटकन सुकवण्यापासून ते अगदी विविध स्टाईल करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो. सध्या कोरोनामुळे फक्त स्टायलिंगसाठी पार्लर अथवा स्पामध्ये जाणं नक्कीच सुरक्षित नाही. यासाठी अनेकांनी घरातच ब्युटी टुल्स खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय ऑनलाईन शॉपिंग, फेस्टिव्ह सेलमुळेअनेक ब्युटी ब्रॅंडचे हेअर ड्रायर एका क्लिकवर तुमच्या मोबाईलवर दिसतात. पण यापैकी कोणता हेअर ड्रायर खरेदी करावा अथवा त्यामध्ये कोणकोणते फंक्शन्स असणं आवश्यक आहे हे सर्वांना माहीत असतंच असं नाही. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत हेअर ड्रायर खरेदी करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या हे शेअर करत आहोत.
हेअर ड्रायरचे कितीही ऑप्शन बाजारात असले तरी कोणते हेअर ड्रायर तुमच्यासाठी योग्य जाणून घेण्यासाठी या टिप्स वाचा
तुम्ही हेअर ड्रायर का खरेदी करत आहात –
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हेअर ड्रायर खरेदी करण्याची गरज का आहे हे ओळखा. कारण हेअर ड्रायरने तुमचे केस मऊदेखील होऊ शकतात किेंवा कोरडेदेखील. जर तुम्हाला केस मऊ करायचे असतील तर असा ड्रायर निवडा ज्यामध्ये सेरामिक, टूरमलाईन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असेल. कारण सेरामिक टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या ड्रायरमधून निर्माण होणारी हीट कंट्रोल केली जाते. टूरमलाईन टेक्नॉलॉजीमुळे तुमचे केस मऊ आणि सिल्की होतात. अशा तुमच्या केसांमधील मॉइस्चर लॉक होते ज्यामुळे तुमच्या केसांना शाईन मिळते.
Shutterstock
हेअर ड्रायरमधले फंक्शन्स नीट पाहा –
ऑनलाईन खरेदी करताना त्या प्रॉडक्टविषयी सर्व माहिती देण्यात आलेली असते. बऱ्याचदा डेमोचे व्हिडिओदेखील जोडलेले असतात. शिवाय आजकाल नेटवर कोणत्याही प्रॉडक्टची माहिती आणि ते कसं वापरावे याचे व्हिडिओज उपलब्ध असतात. त्यामुळे ड्रायर खरेदी करण्यापूर्वी त्याचे सर्व फंक्शन तपासून पाहा. जर तुम्हाला स्टायलिंगसाठी हेअर ड्रायर हवा असेल तर त्यामध्ये कुल शॉट बटण आहे का ते पाहा. कारण त्यामुळे तुमचे केस छान सेट होतात. केसांना बाऊंसी लुक देण्यासाठी राऊंड ब्रशने अशा सेटिंगचा वापर करा.
ड्रायरमध्ये असलेल्या अटॅचमेंट –
आजकाल नव्या आधूनिक ड्रायरमध्ये नोझल अटॅचमेंट दिलेले असतात. नोझल मुळे केसांवर ज्या भागावर तुम्हाला स्टाई करायची आहे त्याच भागावर परिणाम होतो. अशा अटॅचमेंट जोडून आणि हिट कंट्रोल करून तुम्ही केसांना ब्लो ड्राय करू शकता. निरनिराळ्या हेअर स्टाईल करण्यासाठी अशा प्रकारचे ड्रायर तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतात. त्यामुळे ड्रायर खरेदी करताना त्यात हे फंक्शन असेल याची खात्री करून मगच ते विकत घ्या.
ड्रायरची किंमत –
कोणतेही उत्पादन खरेदी करताना तुमच्या बजेटनुसारच ते निवडा. कारण जास्त महाग ड्रायर असेल तर तो जास्त परिणामकारक असं मुळीच नसतं. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला हवा तसा ड्रायर मिळू शकतो. यासाठी आधी बजेट ठरवा आणि त्यानुसार ड्रायर निवडा. कारण विनाकारण महागडे ड्रायर घेऊन ते घरात पडून राहिले तर तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.
हेअर ड्रायरचा उपयोग –
हेअर ड्रायरचा वापर फक्त स्टाईलच नाही तर केस सुकवण्यााठीपण करणे सुरक्षित आहे. असं मानलं जातं की केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नये. मात्र 2017 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणे फायदेशीर आहे. कारण त्यामुळे केस लवकर सुकतात. याउलट हवेवर केस सुकवण्यामुळे ते लवकर सुकत नाहीत आणि केसात पाणी मुरून तोंडावर सूज येण्याची शक्यता असते. मात्र याबाबत स्वतः सदविवेक बुद्धीचा वापर करून योग्य तो निर्णय घ्यावा हाच आम्ही सल्ला देऊ.
Shutterstock
मस्त हेअर स्टाईल केल्यावर तुमचा लुक कम्पीट करण्यासाठी मायग्लॅमची लिपस्टिक लावायला मुळीच विसरू नका. यासाठी तुम्हाला मायग्लॅमच्या #TheGreatGlammSurvey मध्ये सहभागी व्हावं लागेल. मायग्लॅमचा सर्व्हे पूर्ण केल्यावर तुम्हाला @MyGlgamm मिळेल 1000 रू. पर्यंत ब्युटी बेनिफिट्स आणि लिट लिक्विड मॅट कलेक्शनमधील एक लिपस्टिक चक्क मोफत
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
सतत विंचरत असाल केस तर आताच थांबवा ही सवय
ओले केस पुसण्यासाठी मायक्रो फायबर टॉवेल वापरण्याचे हे आहेत फायदे