ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Variyali Sharbat Recipe and benefits

उन्हाळ्यात यासाठी प्यायला हवं बडिशेपचं सरबत (Fennel Seeds Sharbat)

उन्हाळा सुरू झाला की उकाडा कमी करण्यासाठी, थंडावा वाटण्यासाठी अनेक पदार्थ घरी बनवले जातात. भारतीय संस्कृतीत प्रत्येक ऋतूमानानुसार खाद्यसंस्कृतीत काही बदल केले जातात. ज्यामुळे त्या ऋतूत होणारे बदल शरीराला सुसह्य होतात. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं प्रमाण घामावाटे कमी होत असतं. यासाठी हायड्रेट राहण्यासाठी पेय पिण्याचं प्रमाण वाढतं. यासाठीच आपण या सीझनमध्ये कोकम सरबत, पन्हं, सोलकढी, ताक, पियुष, आवळ्याचं सरबत, करंवदाचे सरबत असे विविध पेयांचे प्रकार घरी बनवतो. या काळात वरियाली शरबत म्हणजेच बडिशेपचं सरबतही (Fennel Seeds Sharbat ) मोठ्या प्रमाणावर केलं जातं. यासाठी जाणून घेऊ या या सरबताचे फायदे आणि रेसिपी

Variyali Sharbat Recipe and benefits

वरियाली शरबताचे फायदे

बडिशेपचा वापर आपण नेहमी जेवणानंतर मुखशुद्धीसाठी करतो. मात्र आयुर्वेदामध्ये बडिशेपला एक औषधी वनस्पती मानन्यात आलं आहे. कारण या वनस्पतीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशियम, मॅगनीज असे अनेक पोषक घटक आहेत. आरोग्यासाठी हे सर्व घटक शरीराला उपयोगी ठरतात. विशेष म्हणजे बडिशेप खाण्यामुळे तोंडाला सुगंध मिळतो आणि शरीराला थंडावा मिळतो. बडिशेप खाण्यामुळे पचनशक्ती सुधारते. बडीशेप खाण्याचे फायदे आणि तोटे (Fennel Seeds In Marathi) तुम्हाला माहीत असायला हवे. उन्हाळ्यात होणारी पोटफुगी, अॅसिडिटी, अपचन बडिशेपचं सरबत पिण्यामुळे कमी होतं. वजन कमी करण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी, त्वचेचा रंग उजळण्यासाठी, शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी, उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचण्यासाठी, उन्हाळी लागल्यावर उपचार म्हणून, उंगावर उठलेले घामोळे कमी करण्यासाठी बडिशेपचं सरबत उपयोगी ठरतं. सेलिब्रेटी आहारतज्ञ्ज रूजूता दिवेकर देखील तिच्या पोस्टमध्ये अनेकदा या सरबताचे महत्त्व पटवताना दिसून येते.

कसे तयार करावे वरियाली शरबत

राजस्थान अथवा गुजरात अशा शहरांमध्ये जिथे खूप कडक उन्हाळा असतो. तिथे शरीराला थंडावा मिळण्यासाठी वरियाली शरबत बनवलं जातं. यासाठी जाणून घ्या हे सरबत बनवण्याची पद्धत

Variyali Sharbat Recipe and benefits

साहित्य –

ADVERTISEMENT
  • अर्धा कप बडिशेप
  • खडीसाखर स्वादानुसार
  • लिंबाचा रस एक चमचा 
  • सैंधव एक चिमूट

वरियाली शरबत बनवण्याची पद्धत –

बडिशेप रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी भिजलेली बडिशेप पाण्यातून काढून ती पाट्या वरवंट्यावर वाटा. बडिशेप वाटण्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता. मात्र जर तुम्ही ती दगडी पाट्यावर वाटली तर तिच्यामधील पोषक घटक तुम्हाला जसेच्या तसे मिळतील. बडिशेप वाटताना तिच्यामध्ये आयुर्वेदिक महत्त्व असलेली खडीसाखरदेखील वाटा. ज्यामुळे बडिशेपच्या मिश्रणाला पाणी सुटू लागेल. एका गाळणीने मिश्रण गाळून घ्या. या मिश्रणात थोडा लिंबाचा रस आणि सैंधव मिसळा आणि गरजेनुसार पाणी टाकून सरबत तयार करा.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

10 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT