ADVERTISEMENT
home / Recipes
Kobichi Bhaji

विविध कोबी भाजी रेसिपी | Kobichi Bhaji Recipe | Cabbage Recipes In Marathi

शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी भाज्या हे उत्तम माध्यम आहे. चविष्ट असण्यासोबतच भाज्या आरोग्यासाठी वरदान आहेत. अशीच एक भाजी म्हणजे कोबी (patta kobichi bhaji), जी वेगवेगळ्या रंगात आणि आकारात उपलब्ध असते. कोबीची भाजी (Kobichi Bhaji) अनेकांना आवडत नाही. परंतु ही भाजी अत्यंत पौष्टिक आहे. म्हणूनच विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी जगभरात वापरली जाते. कोबी पदार्थाला चव देण्यासोबतच अनेक शारीरिक समस्या दूर करण्यास मदत करू शकते. कोबीमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे कोबी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. खरं तर, कोबीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकार जसे की गॅस्ट्र्रिटिस, पेप्टिक आणि ड्युओडेनल अल्सर, इरिटेबल बोवेल सिंड्रोमचा त्रास असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, त्याच्या वापराने किरकोळ कट आणि जखमांवर देखील आराम मिळू शकतो. कोबीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर असतात. त्यामध्ये फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे आरोग्यासोबतच ती वजन संतुलित ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे. म्हणूनच कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe) खाल्ली पाहिजे. पण कोबीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नसल्याने घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला नेहेमी प्रश्न पडतो की कोबीची भाजी कशी बनवायची (Kobichi Bhaji Kashi Banvaychi) जेणे करून घरातील लोक ती आवडीने खातील. तुमची हीच समस्या सोडवण्यासाठी आम्ही विविध प्रकारे कोबीची भाजी कशी बनवतात (Kobichi Bhaji Recipe In Marathi) याची रेसिपी आणली आहे. खालीलपैकी एखादी रेसिपी करून बघा जी तुमच्या घरच्यांना आवडेल. 

कोबीची साधी भाजी रेसिपी । Kobichi Tikhat Bhaji Recipe In Marathi

कोबीची भाजी | Kobichi Bhaji
कोबीची भाजी

कोबीची साधी तिखट भाजी करणे खूप सोपे आहे. या भाजीला फार वेळ लागत नाही. हिवाळ्यात जेव्हा कोबी छान मिळते तेव्हा त्यात इतर काही घातले नाही तरी ती फक्त कोथिंबीर व ओलं खोबरं घालून भाजी चविष्ट लागते. कोबीला वास सुटू नये म्हणून आणि त्यातील बारीक अळ्या व किडे निघून जावे म्हणून ती आधी गरम पाण्यात उकळून मग बारीक चिरावी. या पद्धतीने केल्यास कोबीच्या भाजीला (patta kobichi bhaji) वास देखील येत नाही आणि ती पटकन शिजते. बघूया कोबीची साधी तिखट भाजी कशी करावी. 

साहित्य – 150 ग्रॅम कोबी  किंवा सुमारे 1.5 कप कोबी, ब्लँच करा आणि नंतर कोबी बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या, 1 मध्यम ते मोठा कांदा बारीक चिरून, 1 मध्यम टोमॅटो चिरून , 1 हिरवी मिरची, चिरलेली, ½ इंच आले + 2 ते 3 लसूण पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घ्या किंवा 1 चमचे आले लसूण पेस्ट घ्या, ½ टीस्पून जिरे, ¼ टीस्पून हळद , ¼ टीस्पून तिखट, ½ टीस्पून धने पावडर, ½ टीस्पून गरम मसाला किंवा पावभाजी मसाला

, 1.5 ते 2 चमचे तेल, पाणी आवश्यकतेनुसार , आवश्यकतेनुसार मीठ, 2 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर किंवा पुदिन्याची पाने गार्निशसाठी

ADVERTISEMENT

कृती – कढईत तेल गरम करा. त्यात जिरे घाला आणि तडतडू द्या. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला.

कांदे हलके तपकिरी होईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर परता. मग त्यात आले-लसूण पेस्ट घाला व ढवळा. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो आणि चिरलेली हिरवी मिरची घाला. 2 मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर आणि गरम मसाला पावडर किंवा पावभाजी मसाला घाला. ढवळा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परता.नंतर त्यात चिरलेली कोबी घाला. ढवळून मिक्स करा व त्यात चवीनुसार मीठ घाला. ढवळा आणि कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घ्या.भाजी शिजली की वरून कोथिंबीर पुदिना घालून भाजी सर्व्ह करा. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात ओलं खोबरं देखील घालू शकता. 

अधिक वाचा – पौष्टीक आणि चविष्ट पालक भाजी रेसिपीज

कोबी बटाटा भाजी रेसिपी मराठी । Kobi Batata Bhaji Recipe In Marathi

कोबीची भाजी | Kobichi Bhaji
कोबीची भाजी

कोबी बटाटा भाजी ही एक सोप्या प्रकारची भाजी आहे. लहान मुलांना कोबीची भाजी आवडत नसेल तर त्यात बटाटा घालून भाजी केली तर लहान मुले आवडीने खातात. 

ADVERTISEMENT

साहित्य – कोबी – 400 ग्रॅम ,बटाटे – 250 ग्रॅम (3-4 बटाटे),तेल – 1-2 चमचे, हिंग – १ चिमूटभर,जिरे – अर्धा टीस्पून

हिरवी मिरची -आवश्यकतेनुसार, आले –  1इंच (बारीक चिरून किंवा किसलेले), हळद – अर्धा टीस्पून,धने पावडर – 1 टीस्पून, तिखट – 1/4 टीस्पून, आमचूर पावडर – अर्धा टीस्पून, गरम मसाला – 1/4 टीस्पून, मीठ – चवीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार 

कृती- बटाटे सोलून धुवून घ्या आणि कोबीची वरची २ पाने काढून टाका आणि धुवा. कोबी पाच मिनिट गरम पाण्यात ब्लांच करून घेतल्यास उत्तम.  कोबी बारीक चिरून घ्या आणि बटाट्याचे आवडीनुसार पातळ काप किंवा फोडी करून घ्या. कढईत तेल टाकून गरम करा. त्यात हिंग आणि जिरे घाला. जिरे तडतडल्यानंतर त्यात हळद, हिरवी मिरची बारीक चिरून,आले व धनेपूड घाला. हे सगळे व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्यात चिरलेला बटाटा, कोबी, तिखट आणि मीठ घाला. बटाटे आणि कोबी 1-2 मिनिटे परतून घ्या आणि भाजीत मसाले चांगले मिसळा. नंतर त्यात 2-3 टेबलस्पून पाणी घाला आणि झाकून ठेवा. 10 मिनिटे मंद आचेवर भाजी शिजवून घ्या.मधून मधून भाजी ढवळत राहा जेणे करून ती खाली लागणार नाही. भाजी चांगली शिजली की त्यात आमचूर पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. कोबी बटाटा भाजी गरमागरम सर्व्ह करा. 

कोबी मटार भाजी रेसिपी मराठी । Kobi Matar Bhaji Recipe In Marathi 

कोबीची भाजी रेसिपी मराठी | Kobichi Bhaji Recipe
कोबीची भाजी रेसिपी मराठी

हिवाळ्यात जेव्हा ताजे मटार मिळण्याचा सिझन असतो तेव्हा कोबी व मटार यांची भाजी करता येऊ शकते. मटार घातल्याने कोबीच्या भाजीची चव आणखी छान लागते. करून बघा कोबी मटार भाजी या रेसिपीच्या मदतीने!

ADVERTISEMENT

साहित्य – कोबी – 1/2 किलो, मटार –  1 कप, कोथिंबीर- 2-3 चमचे (बारीक चिरून), तेल – 2-3 चमचे,हिरवी मिरची- आवडीनुसार (बारीक चिरून), आले – 1 टीस्पून (किसलेले), जिरे – 1/2 टीस्पून, हळद – 1/2 टीस्पून,तिखट – 1/4 टीस्पून, धने पावडर – 1 टीस्पून, मीठ – 1 टीस्पून (आवडीनुसार), गरम मसाला –  1 टीस्पून

कृती – कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घालून हलके परतून घ्या. जिरे तडतडल्यानंतर त्यात किसलेले आले, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून मसाले हलके परतून घ्या. आता मसाल्यामध्ये मटार टाका आणि 2 मिनिटे परतून घ्या.मटार तळून झाल्यावर त्यात हळद, धनेपूड टाका आणि त्यात कोबी, मीठ आणि तिखट घालून मिसळा. हे सतत हलवत राहा व चांगले परतून घ्या. कढईवर झाकण ठेवून भाजी पाच मिनिटे शिजू द्या. पाच मिनिटांनी भाजी परत ढवळा. भाजी कढईला खाली लागून करपू नये म्हणून दर पाच मिनिटांनी ढवळत राहा. भाजी शिजली की गॅस बंद करून एका भांड्यात काढा. भाजीमध्ये वरून थोडी हिरवी कोथिंबीर घालून भाजी सजवा. कोबी मटार भाजी पोळी, पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करा. 

कोबीची पीठ पेरून भाजी । Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi

कोबीची भाजी रेसिपी मराठी | Kobichi Bhaji Recipe
कोबीची भाजी रेसिपी मराठी

जसा कांद्याचा झुणका खमंग लागतो तशीच कोबीची पीठ पेरून केलेली भाजी देखील खमंग लागते. एखाद्याला कोबीची भाजी आवडत नसेल तर त्याला या प्रकारे केलेली भाजी खायला घालून बघा. ही खमंग रुचकर भाजी खाल्ल्यावर तुम्हाला कोबीची भाजी नक्की आवडू लागेल. 

साहित्य – 500 ग्राम कोबी उभी चिरून, 1 कांदा  1 टीस्पून मोहरी, 1/4 चमचा हिंग, 1 टीस्पून तिखट ,1/4 चमचा हळद,2 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जीरा पावडर,1/4  कप कोथिंबीर बारीक चिरून, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून साखर, 3 टेबलस्पून बेसन , 2 टेबलस्पून तेल

ADVERTISEMENT

कृती – नॉन-स्टिक कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका. मोही तडतडल्यावर त्यात हिंग, हळद आणि कांदे घालून मध्यम आचेवर 2 मिनिटे परता. कांदे परतून झाल्यावर त्यात कोबी, मीठ, साखर घालून मिक्स करा. पाणी घालू नका. झाकण ठेवून भाजी अधूनमधून ढवळत आणखी 5 मिनिटे शिजवा. आता त्यात तिखट, जिरे पावडर आणि धने पावडर घालून मिक्स करा. कोबी 80% शिजल्यावर, चाळणीचा वापर करून कोबीवर बेसन समान रीतीने शिंपडा आणि चांगले मिसळा. बेसनचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आणि कोबी चांगली शिजेपर्यंत भाजी झाकण ठेवून शिजवा. शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करा.तुमचा कोबी झुणका – पीठ पेरुन कोबी भाजी तयार आहे. या रेसिपीमध्ये पाण्याचा वापर न करता बेसन वापरले जात असल्याने, या भाजीसाठी नॉनस्टिक भांडी वापरण्याचा सल्ला दिला जातो..

कोबी चणा डाळ भाजी रेसिपी ।  Kobichi Bhaji With Chana Dal In Marathi

कोबीची भाजी रेसिपी मराठी | Kobichi Bhaji Kashi Banvaychi
कोबीची भाजी रेसिपी मराठी

तुम्हाला कोबीची भाजी अधिक चविष्ट व पौष्टिक बनवायची असेल तर त्यात तुम्ही मूग डाळ किंवा चणा डाळ घालू शकता. याने तुमच्या पोटात फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व अँटी ऑक्सिडंट्स बरोबरच डाळीत असलेले प्रोटिन्स देखील जातील. याबरोबरच भाजी अधिक रुचकर होईल. वाचा कोबी चणा डाळ भाजी रेसिपी- 

साहित्य-  3 कप कोबी चिरलेली, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ½ कप चणा डाळ धुऊन भिजवून घेणे, कढीपत्ता, 1 टीस्पून तेल, 1/2 टीस्पून जिरे, 1/2टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून हिंग , 1 टीस्पून हळद, मीठ, चवीनुसार, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर

कृती – कोबी चणा डाळ भाजी बनवायला सुरुवात करण्यासाठी, चणा डाळ धुवून सुमारे एक तास गरम पाण्यात भिजवावी लागेल. कढईत तेल घेऊन मध्यम आचेवर गरम करा. गरम तेलात जिरे व मोहरी घाला आणि ते तडतडल्यावर नंतर त्यात कढीपत्ता, हिंग आणि भिजवलेली चणाडाळ घाला. चणाडाळीत थोडे पाणी घालून झाकून ठेवा आणि चणा डाळ शिजवून घ्या. यासाठी सुमारे 15 मिनिटे लागतील. चणा डाळ शिजली की झाकण काढून त्यात हळद, तिखट, जिरेपूड आणि गरम मसाला पावडर घाला. चांगले मिक्स करून त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेली कोबी घालून झाकून शिजवा. मीठ आणि इतर मसाले तपासा आणि चवीनुसार समायोजित करा. कोबी चणा डाळ भाजी तयार आहे.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – आजच ट्राय करा या सोयाबीन रेसिपीज

कोबीची भाजी नंतर आता वाचा कोबीपासून करता येण्यासारख्या इतर रेसिपी – 

कोबीच्या भाजीबरोबरच कोबीपासून अनेक चविष्ट पदार्थ करता येतात. त्यामुळे जर तुम्हाला कोबीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही पुढीलपैकी कुठलीही रेसिपी ट्राय करा आणि पौष्टीक कोबीचा आपल्या आहारात समावेश करा. 

कोबीची भजी रेसिपी 

साहित्य – ½ किलो कोबी (चिरलेली), ½ टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, ½ टीस्पून जिरे पावडर, ½ टीस्पून गरम मसाला, ½ टीस्पून मीठ,½ कप बेसन, ½ कप तांदळाचे पीठ, ¼ कप कॉर्नफ्लोअर, तेल (तळण्यासाठी)

कृती – प्रथम, एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेली कोबी घ्या. त्यात हळद, तिखट, जिरेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.आणि सर्व पदार्थ चांगले एकत्र मिसळून घ्या. आता त्यात बेसन,तांदळाचे पीठ आणि कॉर्नफ्लोअर घाला.हे सगळे चांगले मिसळा. यामध्ये 2 चमचे गरम तेलाचे मोहन घाला आणि चांगले मिसळा. यामुळे भजी कुरकुरीत होतात. मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्या. तळा. अतिरिक्त तेल काढण्यासाठी किचन पेपरवर भजी ठेवा. दही लसूण चटणी किंवा सॉस बरोबर गरमागरम भजी खा.  

ADVERTISEMENT

अधिक वाचा – झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास

कोबीची पचडी 

साहित्य – 2 कप किसलेली कोबी, 2-3 चमचे शेंगदाणा कूट, 1 कांदा बारीक चिरून, 2 चमचे तेल, 1/2 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून हिंग, 1/4 टीस्पून हळद, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लिंबाचा रस, 1/2 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1/4 कोथिंबीर बारीक चिरून 

साहित्य – एका भांड्यात किसलेली कोबी घ्या. त्यात कांदा घाला. लहान कढल्यात तेल गरम करा त्यात जिरे, हिंग, हळद, आवडत असल्यास कडीपत्ता आणि मिरची घाला. ही फोडणी किसलेल्या कोबीत घाला. त्यात शेंगदाणा कूट, चवीनुसार मीठ व साखर आणि लिंबाचा रस घाला व चांगले एकत्र करून घ्या. तोंडीलावणी म्हणून ही पचडी छान लागते. 

कोबी चा पराठा रेसिपी

कोबी पराठा रेसिपी मराठी - Kobi Paratha Recipe
कोबी पराठा रेसिपी मराठी

साहित्य – स्टफिंग साठी –  2 टीस्पून तेल,½ टीस्पून धणे (ठेचून), ¼ टीस्पून ओवा, 3 कप कोबी (बारीक चिरून),½ टीस्पून आले पेस्ट, ½ टीस्पून तिखट , ¼ टीस्पून हळद, ½ टीस्पून जिरे पावडर, ¼ टीस्पून गरम मसाला, ½ टीस्पून आमचूर पावडर, ½ टीस्पून मीठ, 2 चमचे धणे (बारीक चिरून)

ADVERTISEMENT


पिठासाठी: 2½ कप गव्हाचे पीठ / आटा, ½ टीस्पून मीठ, 2 चमचे तेल, मळण्यासाठी पाणी

कृती – कोबी चा पराठा स्टफिंग तयार करण्यासाठी तेल गरम करा आणि त्यात धणे आणि ओवा सुगंधित होईपर्यंत परता. त्यात बारीक चिरलेली कोबी घालून 2 मिनिटे परता. नंतर त्यात आल्याची पेस्ट, तिखट, हळद, जिरेपूड, गरम मसाला, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घाला.कोबी चांगली शिजेपर्यंत परता. त्यात कोथिंबीर घाला आणि चांगले मिसळा. तुमचे स्टफिंग तयार आहे.पीठ तयार करण्यासाठी, एका मोठ्या भांड्यात कणिक, मीठ आणि तेल घ्या व चांगले मिसळा. त्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्या. त्याला वरून तेल लावून कणिक झाकून ठेवा आणि 20 मिनिटे मुरू द्या. कणिकेचा मध्यम आकाराचा गोळा घ्या व तो 5 ते 5.5 इंच व्यासाच्या वर्तुळकारात पोळी लाटून घ्या. मध्यभागी कोबीचे स्टफिंग घाला आणि पोळीचा पुन्हा गोळा तयार करून घ्या. पोळपाटावर थोडीशी कणिक घ्या आणि मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्या.गरम तव्यावर तसेच तेल/तूप लावून पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या.गरमागरम कोबी पराठा सॉस, रायता किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा.

कोबी मंचूरियन मराठी रेसिपी

साहित्य – संपूर्ण गव्हाचे पीठ (कणिक) / मैदा 1  वाटी, कोबी बारीक चिरून 200 ग्रॅम, हिरवी मिरची पेस्ट 1  टेबलस्पून, आले-लसूण पेस्ट १ टेबलस्पून, ताजी कोथिंबीर चिरलेली 1/2 कप, सोया सॉस 2 1/2 चमचे, MSG एक चिमूटभर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल

कृती – कोबी मंचूरियन मराठी रेसिपी करताना एका मोठ्या वाडग्यात कणिक/ मैदा, कोबी, हिरवी मिरची पेस्ट, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, सोया सॉस, एमएसजी, मीठ आणि पाणी एकत्र मिक्स करून घट्ट एकसंध पीठ भिजवा. नॉन-स्टिक कढईत पुरेसे तेल गरम करा. आणि भिजवलेल्या पिठाचे छोटे गोळे करून सोनेरी किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा. 

ADVERTISEMENT

कोबी पुलाव रेसिपी

साहित्य –  2 कप भात,  2 कप कोबी, बारीक चिरलेली, 1/2 कप सोयाचे तुकडे, पाण्यात भिजवलेले

1 टीस्पून जिरे, 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 1 जावित्री, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट,

1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 कांदा, बारीक चिरून, 1 इंच आले किसलेले, 1 लसूण पाकळी बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, कोथिंबीर चिरलेली, 1 टेबलस्पून तूप, तेल आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ

कृती – कोबी पुलाव बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करा. त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी आणि जावित्री घाला.नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची, आले, लसूण घालून कांदा मऊ होईपर्यंत परता. कांदा मऊ झाल्यावर त्यात कोबी आणि सोया चंक्स घालून मिक्स करून कोबी मऊ होईपर्यंत शिजवा. आता सर्व मसाले घालून मिक्स करा.

ADVERTISEMENT

मिक्स केल्यानंतर त्यात शिजवलेला भात, कोथिंबीर, मीठ, तूप घालून दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. गरमागरम सर्व्ह करा. यता आणि पापडासोबत मसालेदार कोबी पुलाव सर्व्ह करा.

कोबी सलाड रेसिपी 

कोबीची भाजी रेसिपी मराठी | Kobichi Bhaji Recipe
कोबीची भाजी रेसिपी मराठी

साहित्य – २ कप कोबी उभी चिरलेली, १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 

ड्रेसिंग – १ १/२ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल, ३/४ टीस्पून धने पावडर, १/२ तिखट, १/४ हिंग, चवीनुसार मीठ 

कृती – कोबीचे सलाड बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात चिरलेली कोबी घ्या. एका भांड्यात ड्रेसिंगचे सर्व साहित्य एकत्र मिसळून सलाड ड्रेसिंग तयार करून घ्या आणि ते कोबीमध्ये मिसळून कोबी नीट टॉस करून घ्या. तुमचे पौष्टिक कोबी सलाड तयार आहे. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – झणझणीत ठेचा रेसिपी, खास आहेत महाराष्ट्रीयन पद्धती

कोबीच्या भाजीबद्दल पडणारे काही सामान्य प्रश्न – FAQ

प्रश्न – दररोज कोबी खाणे योग्य आहे का?

उत्तर – होय, दररोज 84 ग्रॅम कोबी खाल्ल्याने शरीराला आवश्यक कॅलरीज आणि इतर पोषक घटक मिळू शकतात. 

प्रश्न – कोबी मेंदूसाठी हानिकारक आहे का?

ADVERTISEMENT

उत्तर – कोबीमध्ये अँथोसायनिन पॉलीफेनॉल आणि अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे मेंदूच्या विकारांचा धोका कमी होतो. म्हणजेच कोबी मेंदूला हानी पोहोचवू शकत नाही उलट कोबीचे सेवन मेंदूसाठी फायदेशीरच आहे. 

प्रश्न – कोबी कच्ची खाल्लेली चांगली की शिजवून?

उत्तर- कोबी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. या कारणास्तव ती ब्लांच केली जाते आणि सॅलड म्हणून किंवा शिजवून खाल्ली जाते. तिचे पूर्णपणे कच्चे सेवन करण्याऐवजी ती ब्लांच करून खावी, जेणेकरून जंतूंचा प्रादुर्भाव टाळता येईल.

प्रश्न – कोबीमध्ये कोणते जीवनसत्व आढळते?

ADVERTISEMENT

उत्तर- कोबीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-के जास्त प्रमाणात असते. याशिवाय त्यात व्हिटॅमिन-ए, ई व व्हिटॅमिन बी6 देखील असते.

कोबी ही एक स्वादिष्ट भाजी आहे, जिचा उपयोग करून विविध पदार्थ केले जाऊ शकतात. वर दिलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ करून तुम्ही तुमच्या आहारात कोबीचा समावेश करू शकता. आपण विविध प्रकारे कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe) खाऊ शकतो. वर दिलेल्या रेसिपी वाचून तुम्हाला कोबीची भाजी कशी बनवायची (Kobichi Bhaji Kashi Banvaychi) याची आयडिया येऊ शकते. याशिवाय तुम्ही कोबीचे सूप बनवून पिऊ शकता किंवा कोबीचा वापर नूडल्स आणि मॅकरोनी बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. अशा विविध प्रकारे तुम्ही कोबीचा आहारात समावेश करू शकता. 

अधिक वाचा – तोंडली भाजी रेसिपी, स्वादिष्ट आणि रूचकर

30 May 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT