ADVERTISEMENT
home / Women's Safety
रात्री झोपताना ब्रा घालणंं योग्य की अयोग्य?

रात्री झोपताना ब्रा घालणंं योग्य की अयोग्य?

जितकी तोंड तितक्या बाता, अर्थात हा एक फक्त वाक्प्रचार नाही तर यामध्ये नक्कीच सत्यता आहे. काही लोक सांगतात की, रात्री झोपताना ब्रा घातली तर काहीही नुकसान होत नाही. तर काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री झोपताना ब्रा घालणं हे योग्य नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की, रात्री झोपताना ब्रा घालणं योग्य की अयोग्य? आम्ही याबाबत तुमचं शंकानिरसन करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रा घालून झोपणं अथवा ब्रा न घालता झोपणं हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तज्ज्ञांच्या मते रात्री टाईट ब्रा घालून झोपणं योग्य नाही. यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहचू शकते. याची नक्की कारणं काय आहे ते आपण पाहू –

1- ब्लड सर्क्युलेशन

ब्रा घालून झोपण्याचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही. शरीर निरोगी राहण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन होणं ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. तुम्हालादेखील जाणवलं असेल की, जेव्हा तुम्ही ब्रा काढून झोपता तेव्हा तुम्हाला अतिशय हलकं हलकं वाटतं. कोणतंही बंधन तुम्हाला वाटत नाही. त्यामुळे ब्रा न घालता झोपण्याचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे की, तुमची ब्लड सर्क्युलेशन प्रक्रिया व्यवस्थित होते.

2 – कॅन्सर होण्याची भीती

तुम्ही रात्री झोपताना नेहमी टाईट ब्रा घालून झोपत असाल तर, तुमच्या स्तनांमध्ये कॅन्सरची गाठ होण्याची भीती वाढते. एका रिसर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे, ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे सहसा रात्री झोपताना ब्रा घालून झोपू नये. पण खूप मोठे स्तन असणाऱ्या महिलांनी अगदी सैल ब्रा घालून झोपलं तर चालेल. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

3 – रॅशेस अथवा खाजेची समस्या

दिवसभर अथवा रात्रभर ब्रा घालण्यामुळे त्याठिकाणी रॅशेस अथवा खाज वाढण्याचा धोका जास्त असतो. ब्रा चं इलॅस्टिक घट्ट असल्यामुळे या गोष्टी घडत असतात. टाईट ब्रा तुमच्या त्वचेवर चिकटते आणि त्यामुळे या जागी जळजळ आणि खाज येते. त्यामुळे रात्रभर ब्रा घालू नये. अगदीच तुम्हाला सवय असल्यास, रात्री झोपताना स्पोर्ट्स ब्रा घालून झोपावं त्यामुळे तुमची रॅशेसची समस्या कमी होईल.

ADVERTISEMENT

4 – झोप पूर्ण न होणं

तुम्हाला रात्री टाईट ब्रा घालून झोपल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. असं झालं तर अर्थातच त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. तुमची झोप मध्येमध्ये तुटते आणि झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे घट्ट ब्रा घालून झोपण्याचा प्रयत्न करू नये.

without bra

5 – कपड्याशिवाय झोपणं आहे फायदेशीर

एका सायन्स रिसर्चनुसार सांगण्यात आलं आहे की, आपल्यापैकी केवळ 30% लोक कपड्यांशिवाय झोपतात आणि बाकी लोक अंडरवेअर घालून झोपण्याला प्राधान्य देतात अथवा आरामदायी पायजमा घालतात. पण तुम्हाला माहीत आहे का? कपड्यांशिवाय झोपण्याऱ्या लोकांचा कपडे घालून झोपणाऱ्या लोकांपेक्षा जास्त फायदा बाहेर येऊ शकत नाही. यामुळे झोपण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो. पण जेव्हा तुम्ही कपड्यांशिवाय झोपता तेव्हा शरीराचं तापमान कमी होतं. यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात.

# महत्त्वाची बाब

तुम्हाला रात्री झोपताना ब्रा घालून झोपायचं असेल तर, तुम्हाला तसंही करता येईल. पण त्यासाठी तुम्ही हलकी किंवा अतिशय सैल ब्रा घाला आणि मग झोपा. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या महिलांचे स्तन मोठे असतात, त्यांची छाती सैल पडू नये यासाठी नेहमी ब्रा घालून झोपणं महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा – 

किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची

कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या

ADVERTISEMENT

स्वतःसाठी योग्य आकाराची ब्रा कशी निवडावी

How to Choose a Bra in Hindi

कौन सी लेडीज ब्रा है बेस्ट

12 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT