तुम्ही कधी ऐकलं आहे का सेक्सटींग (Sexting in Marathi) बद्दल. सेक्सटींग किंवा असं म्हणूया की, सेक्स टेक्सटींग ज्याचा अर्थ आहे की, सेक्स किंवा तशा आशयाचे मेसेजेस आपल्या मोबाईलवरून दुसऱ्या व्यक्तीला पाठवणे. आजकालच्या डिजीटल युगात सगळं शक्य आहे. अगदी आपल्या पार्टनरसोबत डिजीटल उपकरणांच्या मदतीने सेक्शुअल गप्पा मारणेही. सेक्सटींगला खरंतर व्हर्च्युअल सेक्सक्रीडा असं म्हणण्यास हरकत नाही. अगदी कामातून वेळ काढूनही लोक सेक्सटींग करायला विसरत नाहीत. आजकालच्या युवापिढीत सेक्सटींगच चलन वाढतंय. या लेखात आम्ही तुम्हाला सेक्सटींग म्हणजे काय, सेक्सटींग कसे करावे, सेक्सटींगचे फायदे आणि तोटे याबाबत सांगणार आहोत.
Table of Contents
सेक्सटींग म्हणजे काय ? – What is sexting in Marathi
मोबाईल फोन, कॉम्प्युटर, टॅबलेट किंवा अन्य कोणत्याही डिजीटल डिव्हाईसने आपल्या पार्टनरशी केलेला सेक्स मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओ पाठवणे किंवा मिळवण्याला सेक्सटींग असं म्हणतात. जसं याच्या नावावरून स्पष्ट होतं की, सेक्सटींग हा दोन शब्द म्हणजे सेक्स आणि टेक्स्ट मिळून तयार झालेला आहे. ज्याचा अर्थ सेक्सशी निगडीत मेसेजेस पाठवणे. आजकाल लोकांमध्ये सेक्सटींग हा शब्द खूपच वेगाने लोकप्रिय होत आहे. ज्याप्रमाणे लोक आता सेक्सबाबत मोकळेपणाने बोलू लागले आहेत. त्याप्रमाणेच सेक्सटींगच्या माध्यमातून लोक विना संकोच आपल्या सेक्सबाबतच्या इच्छाही जाहीर करत आहेत.सेक्सटींगच्या माध्यमातून अधिकतर लोक नॉनव्हेज जोक्स किंवा सेक्सशी निगडीत जोक्स करून समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतात.
सेक्सटींग कसं करतात – How to do Sexting in Marathi
साधारणतः चॅटींग आणि मेसेजेसच्या माध्यमातून सेक्सटींग केलं जातं. फक्त यात फरक इतकाच आहे की, सेक्सटींगमध्ये दोन व्यक्ती सेक्सबाबतच्या गोष्टी करतात. सेक्सटींगमध्ये जास्तकरून विचारल्या जाणाऱ्या गोष्टीमध्ये –
– जसं पार्टनर सेक्सटींगमार्फत विचारू शकतात की, त्यांच्या पार्टनरने कोणत्या रंगाचे अंडरगार्मेंट घातलं आहे.
– काही मुलांना आपल्या गर्लफ्रेंडचे लिपस्टीक लावलेले ओठ फारच आवडतात. जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड ओठ मिस करत असाल तर तुम्ही तिचा फोटो मागू शकता.
– जास्तकरून सेक्सटींगमध्ये मुली आपल्या बॉयफ्रेंडचे जिम किंवा शर्टलेस फोटोजची मागणी करतात. तसंच इतरही अनेक खाजगी गोष्टींबाबत यात एकमेंकांना विचारणा केली जाते.
– जर तुमचा बॉयफ्रेंड शिक्षणासाठी किंवा नवरा कामाच्या निमित्ताने तुमच्यापासून लांब राहत असेल तर एकमेंकांना बरेचदा सेक्सटींंग केलं जातं. आपल्या पार्टनरचा मूड रोमँटीक करण्यासाठी सेक्सटींग केलं जातं. उदा. आता मी आंघोळ करायला जात आहे.
– जास्तकरून मुल सेक्सटींगमध्ये आपल्या गर्लफ्रेंडकडे न्यूड फोटोजचीही मागणी करतात.
सेक्सटींग कोणासाठी फायदेशीर आहे – Benefits of sexting in Marathi
एका अभ्यासानुसार असं आढळलं आहे की, सेक्सटींग हे व्यक्तीच्या मेंदूवर मानसिक प्रभाव पाडतं. चला जाणून घेऊया सेक्सटींगमुळे नक्की काय फायदा होतो.
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये सेक्सटींगचा फायदा
जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल तर सेक्सटींगचा तुमच्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर आहे. कारण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये एकमेकांसोबत फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे सेक्सटींगच्या माध्यमातून एकमेंकांशी खाजगी आणि सेक्सबाबत बोलता येतं. तसंच एकमेकांकडे सेक्सबाबतच्या इच्छाही शेअर करता येतात.
तणाव कमी करण्यासाठी सेक्सटींग
असं मानलं जातं की, पार्टनरसोबत सेक्सटींग केल्याने तुमचा तणाव कमी होतो. एका अभ्यासानुसार असं आढळलं आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत किंवा गर्लफ्रेंडसोबत सेक्सबाबत हेल्दी गोष्टी करते तेव्हा तिच्या मेंदूतील स्ट्रेस हार्मोनचा स्त्राव कमी होतो ज्यामुळे तणाव वाटत नाही. जर तुम्ही अति तणाव, चिंता किंवा डिप्रेशनमध्ये असाल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत सेक्सटींग केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.
सेक्सबाबतचं अवघडलेपण कमी करण्यासाठी सेक्सटींग
जास्तकरून जेव्हा एखादं रिलेशनशिप नवीन असतं किंवा नवीन नवीन लग्न झाल्यावर आपल्या पार्टनरशी अशा गोष्टींबाबत बोलणं थोडं अवघड जातं आणि ओपन अप व्हायला वेळ लागतो. लाजऱ्या स्वभावाच्या व्यक्तींना याबाबत थोडं बोलणं अनकंफर्टेबल वाटतं आणि त्यांना आपल्या शारीरिक इच्छाही व्यक्त करता येत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही सेक्सटींगच्या मदतीने आपल्या पार्टनरशी बोलू शकता. मन मोकळं करू शकता. यामुळे एकमेंकासमोर आल्यावर ही अवघडल्यासारख वाटत नाही.
नातं सुधारण्यासाठी सेक्सटींग
जर तुम्ही विवाहीत असाल आणि आपल्या बायकोजवळ नसाल तर सेक्सटींगच्या माध्यमातून तुमचं वैवाहीक जीवन चांगलं राहू शकतं. कारण अनेक महिलांची तक्रार असते की, लग्नानंतर नवरे थोडे अनरोमँटीक होतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आपल्या पत्नीसोबत सेक्सटींग केलं तर तिलाही वाटेल की, तुम्ही तिच्यावर अजूनही पहिल्यासारखंच प्रेम करता आणि तुमचं सेक्शुअल लाईफसुद्धा तेवढंच हॉट राहील. तुमच्या बायकोसोबतचं तुमचं सेक्सलाईफही चांगल राहील.
आनंदासाठी सेक्सटींग
ज्याप्रकारे आपल्याला मित्रांशी चॅटींग करण्यात मजा येते तसंच पार्टनरसोबतही सेक्सटींग केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. लोक दिवसभर सेक्सटींगच्या माध्यमातून आपल्या पार्टनरसोबत सेक्शुअल गोष्टी करण्याचा आनंद घेऊ शकतात आणि एकमेंकाच्या जवळ असल्याचं फिलींगही अनुभवू शकतात. लग्नानंतर किंवा प्रेमात पडल्यावर बरेचजण पार्टनरसोबत सेक्सटींगला सुरूवात करतात.
पार्टनरबाबत जाणून घेण्यासाठी सेक्सटींग
जास्तकरून पुरूषांचं असं मानणं असतं की, महिला कधीच सेक्ससाठी पुढाकार घेत नाहीत आणि आपल्या सेक्सबाबतच्या इच्छाही जाहीर करत नाहीत. अशा परिस्थितीत पुरूषांचीही धारणा मोडीत काढण्यासाठी सेक्सटींग फारच फायदेशीर आहे. असं मानलं जातं की, महिला याबाबतीत पुढाकार घेत नाहीत कारण त्यांना अशी भीती असते की, त्यांनी सेक्सबाबत पुढाकार घेतल्यास त्यांच्या पार्टनरला त्यांच्यावर संशय तर येणार नाही ना. पण सेक्सटींग हा असा प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून महिला आपल्या या इच्छा सांगू शकतात. ज्यामुळे पुरूषांनाही त्यांना समजून घेण्याची संधी मिळते.
सेक्सटींगचे तोटे – Sexting side effects in Marathi
प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट असे दोन पैलू असतातच. तसंच काहीसं सेक्सटींगबाबतही आहे.
– आजकाल मुलामुलींमध्ये सेक्सटींगची सवय वाढली आहे. ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि करिअरवर परिणाम होत आहे. एका सर्वेक्षणानुसार, शाळा-कॉलेजेसना जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सेक्सटींगच प्रमाण वाढलंय. ज्यामुळे त्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे.
– सेक्सटींग हा एक सेक्शुअल मेसेजेसचा प्रकार असल्यामुळे जर चुकून तुमचा फोन कोणाच्या हाती लागला तर तुम्हाला लाजिरवाणं वाटू शकतं.
– असाही एक विचार आहे की, सेक्सटींगऐवजी तुमच्या पार्टनरला जाणण्यासाठी तुम्ही एकमेंकाना भेटून जाणून घेतलं पाहिजे. सेक्सटींगने फक्त उत्तेजना वाढते पण तुमची सेक्सची इच्छा पूर्ण होत नाही.
– काहीवेळा सेक्सटींगच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला खोटं सांगून अंधारातही ठेवलं जातं.
– सेक्सटींग हे एखाद्या व्यसनासारखं आहे. जे कधी कधी तुमच्याबाबत तुमच्या पार्टनरच्या मनात गैरसमजही निर्माण करू शकतं.
– जर तुमच्या घरच्यांना सेक्सटींगबाबत कळल्यास त्याचे गंभीर परिणामही तुम्हाला भोगावे लागू शकतात.
– सेक्सटींगच्या माध्यमातून जर तुम्ही कोणाला तुमचे खाजगी फोटो पाठवले असल्यास ती समोरची व्यक्ती तुम्हाला ते फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलही करू शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहा. कोणावरही लगेच विश्वास ठेऊ नका. तसंच स्वतःचे खासगी फोटो शेअर करू नका.
हेही वाचा –
सेक्स लाईफला स्पाईसअप करणाऱ्या ’10’ सेक्स स्टाईल्स
आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)