संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना ‘बोरन्हाण’ घातले जाते. पण बोरन्हाण म्हणजे काय? ते का घालते जाते? हे अनेकांना माहीत नाही. तुमच्या घरी लहान मुले असतील आणि तुम्ही त्यांना बोरन्हाण घातले नसेल तर मग तुम्हाला बोरन्हाणामागची कारणे माहीतच हवी. या माध्यमातून आम्ही तुम्हाला बोरन्हण का घातले जाते आणि त्याची तयारी केली जाते हे सांगणार आहोत. म्हणजे तुम्हाला ‘बोरन्हाण’ घालणे एकदम सोपे जाईल.
का घालतात बोरन्हाण (Why Wear Barnahan)
मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रातीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. पण पारंपरिक प्रथेपेक्षाही यामध्ये शास्त्र आहे ते असं की, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात. लहान मुले इतरवेळी ती फळे दिली तर खात नाहीत. पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना बेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे सांगितले जाते.
अशी करा बोरन्हाणाची तयारी
लहान मुलांचे बोरन्हाण घालणे हा एक छोटेखानी सोहळाच असतो. घरगुती पद्धतीने हा सोहळा करता येतो. यावेळी लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. बाजारात लहान मुलींसाठी काळा फ्रॉक आणि मुलांसाठी काळा कुडता मिळतो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात.संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात बोरन्हाण घातलं जाते.
जाणून घ्या हलव्याच्या दागिन्याचे नवे ट्रेंड
जवळच्या नातेवाईकांना या छोटेखानी कार्यक्रमासाठी बोलवावे. यावेळी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येतात. लहान मुलाला अथवा मुलीला पाटावर बसवावे. पाट एका स्वच्छ कपड्यावर ठेवावा. त्यानंतर आप्तेष्टांकडून लहान मुलाला ओवाळावे.. लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे लहान मुलांना बोलावणे तर आलेत. बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन ज्याचे बोरन्हाण करत आहोत. त्याच्या डोक्यावरुन ओतावे. लहान मुले बोरे, गोड- गोड उसाचे पेर, तिळाची बोरे उचलून खातात किंवा घरी घेऊन जातात. एकूणच काय तर त्यातील आवश्यक असे पदार्थ मुलाच्या पोटात जातात. शिवाय घरी आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू लावले जाते. आणि त्यांना तिळगूळ देखील वाटले जाते. सध्या काळ बदल्यामुळे बोरन्हाण देखील थोड वेगळं झालं आहे. कारण हल्लीच्या लहान मुलांना आवडणारे पदार्थ देखील या बोरन्हाणात घालण्यात येतात. लिमलेटच्या गोळ्या, चाॅकलेट यात टाकण्यात येतात. बोरन्हाण करण्यामागे शास्त्रीय कारण असल्यामुळे ते केले जाते. बदलत्या वातावरणात लहान मुलांना लागणारी उष्णता बोर, उसाचे पेर मिळते असा या मागे विश्वास आहे. जर तुमच्या लहान मुलाचे बोरन्हाण करणे राहून गेले असेल तर मजा म्हणूनही करायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्रात बोरन्हाणाची ही प्रथा अत्यंत प्रचलित आहे.
फोटो सौजन्य- Instagram
संक्रातीच्या काळात तिळाला महत्व का
संक्रांतीचे महत्व (Importance Of Sankranti)
आपल्याकडे प्रत्येक सणाचे महत्व आहे. संक्रातीबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते. असे म्हणतात की, फार वर्षापूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना त्रास देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रुप घेतले आणि संकरासुराला ठार केले. त्याच्या जाचापासून लोकांची मुक्तता केली. या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी उत्तरायणाचा प्रारंभ होतो. या कालावधीत उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांना अर्थात भारतवासियांना अधिक प्रकाश आणि उष्णता मिळते. वर्षभरात सूर्याची बारा राशीतून चार संक्रमणे होत असतात. पण जानेवारीत होणारे हे संक्रमण जास्त महत्वाचे असते. या दोन कारणामुळे या सणाला अधिक महत्व आहे.
संक्रातीला नेसण्यासाठी काळी साडी घ्यायची आहे पाहा काळया साडीचे वेगवेगळे प्रकार
परंपरा टिकवण्याची गरज (BornhanTradition)
आज बदलत्या जीवनशैलीमुळे सण साजरे करण्यासाठी सुट्टी आहे की नाही हे पाहावे लागते हो ना? पण आपली परंपरा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. हे सण साजरे करण्यासाठी मोठा सोहळा आवश्यक नसतो. तर लोकांनी एकमेकांच्या घरी जाऊन तो सण साजरा करणे महत्वाचे असते. वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा सण ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणायला लावतो. त्यामुळे संपूर्ण वर्षभर आपल्यातील आपुलकी आणि सलोखा टिकून राहण्याची प्रेरणा वाटलेल्या साखर फुटाण्यातून मिळत असते .शिवाय आरोग्याच्या दृष्टिने महत्वाचा तिळगूळही पोटात जातो. काही ठिकाणी या सणाला दान करण्याची पदधतसुद्धा आहे.
फोटो सौजन्य-Instagram