ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या  ‘टॉप 25’  भारतीय डिनर रेसिपीज

दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

दररोज स्वयंपाक काय करायचा हा सर्वच घरात पडणारा एक कॉमन प्रश्न आहे. शिवाय दिवसभर काम करुन थकून-भागून रात्री घरी गेल्यावर काहीतरी स्पेशल आणि पचायला हलकं जेवण मिळावं असंही प्रत्येकाला वाटत असतं. जर तुम्ही वर्कींग वुमन असाल तर तुम्हाला झटपट आणि पटपट होणाऱ्या रेसिपीज हव्या असतात. सुट्टीच्या दिवशी आरामात काहीतरी चमचमीत आणि रोजच्यापेक्षा वेगळं करण्याचा बेत ठरतो. पण रोज स्वयंपाकात असं वेगळं म्हणजे नेमकं काय करायचं हे मात्र काही केल्या ठरत नाही.

तुमची ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण भारतात लोकप्रिय असलेल्या तब्बल ’25’ रेसिपीज देत आहोत. या सर्व रेसिपी तयार करणं अगदी सोपं आहे. तुमचा मूड आणि आवड यानुसार यापैकी कोणत्याही रेसिपी तुम्ही निवडू शकता. रोज घरी किचनमध्ये काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर या रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

व्हेज स्पेशल डिनर रेसिपीज

1.फणसाची भाजी

ADVERTISEMENT

शुद्ध शाकाहारी जेवणाची आवड असणाऱ्यांना रोज काय नवीन करावं हा प्रश्न भेडसावत असेल तर ही स्वादिष्ट आणि चमचमीत चवीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. ही भाजी करणं अगदी सोपं आहे. याशिवाय आरोग्यासाठीही फणसाचे फायदे होतात आणि सुट्टीच्या दिवशी या भाजीने काहीतरी हटके खाल्लाचा आनंदही तुम्हाला मिळेल. ही भाजी  करण्यासाठी सर्वात आधी फणसाचे चौकोनी तुकडे करुन घ्या. या तुकड्यांवर मीठ लावून अर्धा तास तसेच ठेऊन द्या.अर्धा तासाने कढईत तेल गरम करुन फणसाचे तुकडे सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. फोडणीसाठी कढईत थोडंसं तेल घ्या त्यात हिंग, जिरं, वेलची आणि तमालपत्र टाकून फोडणी द्या. फोडणीत कांदा आणि लसणाची पेस्ट मिसळा आणि चांगली परतून घ्या. मिश्रणात थोडी हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकून काही वेळ पुन्हा परता. काही मिनीटांनी त्यात दही टाका आणि मिश्रण एकजीव करा. मसाल्यांमध्ये  फणसाचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ टाकून शिजेपर्यंत झाकून ठेवा. तयार भाजी कोथिंबीरीने सजवून गरम गरम पोळ्यांसोबत सर्व्ह करा.

Kathal Korma for marathi

2.मसाला भेंडी

भेंडीची भाजी स्वच्छ धुवून उभी चिरुन घ्या. भेंडीवर हळद, धनापावडर, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ टाका. भेंडीच्या तुकड्यांवर हे मसाले व्यवस्थित लावा. एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यात हिंग, जिरं, लसूण आणि कांद्याची फोडणी द्या. या फोडणीत मसाले लावलेले भेंडींचे तुकडे टाका आणि परतून घ्या. गरम गरम पोळ्या आणि भातासोबत भाजी सर्व्ह करा.

masala bhindi for marathi

3.मटर पनीर

ADVERTISEMENT

कढईत तेल गरम करा आणि त्यामध्ये कांदा टाकून परतून घ्या. मग त्यात आलं आणि मिरचीची पेस्ट आणि टोमॅटो प्यूरी मिसळा, आवडीनुसार मसाले टाकून थोडं गरम पाणी घाला आणि शिजू द्या. थोड्यावेळाने मटार टाकून वाफेवर चांगलं शिजू द्या. सर्वात शेवटी पनीर, थोडा गरम मसाला आणि कसूरी मेथी टाका. शिजल्यावर कोंथिबीर पेरुन पोळीसोबत सर्व्ह करा.

matar paneer for marathi

4.काळ्या वाटाण्याची उसळ

काळ्या वाटाण्याची उसळ अनेकांची आवडती डिश असते. ही स्वादिष्ट आणि चटपटीत उसळ तुम्ही भाकरी अथवा पोळीसोबत खाऊ शकता. सर्वात आधी यासाठी रात्रभर काळे चणे पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना हे चणे कुकरमध्ये शिजवून घ्या. ओलं खोबरं आणि कांदा आणि लसूण तव्यावर परतून त्याचं जाडसर वाटण तयार करा. कडईत तेलामध्ये हींग, जिरं आणि तमालपत्रांची फोडणी करुन त्यामध्ये टोमॅटोच्या बारीक फोडी आणि वाटलेला मसाला चांगला परतून घ्या. हळद,मसाला, गरम मसाला टाकून परतून घ्या. त्यावर शिजवलेले काळे वाटाणे टाकून थोडं गरम पाणी टाका आणि एक चांगली उकळ येईपर्यंत शिजवून घ्या. गरमागरम उसळ आणि पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी तुमचा दिवस मस्त करेल.

kala chana kari recipe for marathi

5.मलाई कोप्ता

ADVERTISEMENT

शाकाहारी लोकांना जर चमचमीत भाजी खायची ईच्छा झाली असेल तर ही भाजी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. शिवाय ही भाजी कोणत्याही समारंभासाठी करता येते. कारण पोळी,भाकरी अथवा पुरी, फुलका कशासोबतही ही भाजी मस्त लागते.या भाजीसाठी उकडलेल्या बटाट्यांमध्ये कॉर्नफ्लोअर, किसलेलं पनीर, मीठ, गरम मसाला, लाल तिखट, मनूका मिक्स करा. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि तळून घ्या. कढईत तेल गरम करुन त्यात जिरं, हिंग, दालचिनी, वेलची आणि लवंगाची फोडणी द्या. या फोडणीत कांदा, लसूण, आल्याची पेस्ट आणि टोमॅटो प्यूरी चांगली परतून घ्या. आवडीनुसार मसाले टाकून परतून घ्या मग त्यात बेताने पाणी टाका आणि थोडावेळ शिजू द्या. शिजलेल्या करीमध्ये कोप्ते टाकून गरमागरम वाढा.

malai kofta for marathi

6. टोमॅटो भात

टोमॅटो आणि लाल तिखट, दालचिनी, आलं नारळाचा चव, लसूण, जीरा पावडर एकत्र वाटून घ्या. कुकरमध्ये तेल गरम करा आणि जीऱ्याची फोडणी द्या. त्यात कांद्यांच्या स्लाईस आणि तमालपत्र टाका. कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. त्यात मीठ आणि तयार मसाल्यांची पेस्ट टाका. चांगलं परतल्यावर धुतलेले तांदूळ टाका आणि पुन्हा परता. गरजेनुसार कोमट पाणी मिसळुन भात शिजवून घ्या.

Tomato rice for marathi

7. वांग्याचं भरीत

ADVERTISEMENT

एक मोठया आकाराचं  वांगे गॅस अथवा शेगडीवर भाजून त्यांच्यावरील साल काढून टाका. शिजवलेलं वागं चांगलं स्मॅश करुन घ्या. एका कढईत कांदा आणि हिरवी मिरची टाकून चांगलं परतून घ्या. त्यात तुमच्या आवडीनुसार मसाले आणि मीठ टाकून पुन्हा व्यवस्थित परता. स्मॅश केललं वांगं आणि उकडेले मटार टाकून थोडा वेळ शिजू द्या.गरमगरम भरतावरती कोथिंबीर पेरा आणि भाकरीसोबत सर्व्ह करा.

काळा घेवड्याची भाजी

8. मटार बटाटा किंवा आलू मटर

आलू मटर ही भाजी तुम्ही सुखी अथवा रस्सा भाजी अशा दोन्ही प्रकारात बनवू शकता. तुम्ही ही भाजी पोळी अथवा भात कशासोबतही खाऊ शकता. आलू मटर भाजी उत्तर भारतातील एक लोकप्रिय भाजी आहे. यासाठी तेलात तमालपत्र आणि कांदा, लसूण, आल्याची पेस्ट टाकून फोडणी द्या. त्यात हळद, धणे पावडर, लाल तिखट, मीठ टाकून चांगलं परतून घ्या. या फोडणीत बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी आणि मटार टाका. गरम पाणी टाकून दहा मिनीटं शिजू द्या.गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून पुन्हा  थोडा वेळ शिजू द्या. तयार स्वादिष्ट आलू मटर खाऊन तुम्ही नक्कीच तृप्त व्हाल.

ADVERTISEMENT

9. राजस्थानी कढी

घाईच्या वेळी कढी भात करणं सोपं असतं. शिवाय अशा वेळी पटकन केलेल्या गरमागरम कढी भाताने तुमची भुखही भागू शकते. राजस्थानमधील कांद्याची कढी हा एक स्पेशल प्रकार आहे. थंडीच्या  दिवसात या कढीने तुमचे आरोग्यही उत्तम राहते. ही कढी तयार करण्यासाठी एका भांड्यात दही,बेसण, हळद, लाल तिखट घ्या आणि त्यात थोडं पाणी मिसळून एक मिश्रण तयार करा. लक्षात ठेवा यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात कांदा परतून घ्या. कांदा नरम झाल्यावर कढीच्या मिश्रण त्यात टाका. गरजेनुसार पाणी टाकून एक उकळ येऊ द्या. कढीमध्ये चवीपुरते मीठ टाका आणि दहा ते पंधरा मिनीटे शिजू द्या. शिजलेली कढी एका बाऊलमध्ये घ्या आणि  वरुन तेल, जीरं, कडीपत्ता, सुखी लाल मिरची आणि कोंथिंबीरीची फोडणी द्या. गरमागरम कढी भातासोबत वाढा.

10. लेमन राईस

पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, शेंगदाणे, हळद, मीठ, कडीपत्ता, हिरवी मिरचीची फोडणी तयार करा. तयार भात या फोडणीत व्यवस्थित मिक्स करा आणि सर्व्ह करण्यापूर्वी त्यात लिंबू पिळा.

ADVERTISEMENT
Lemon rice recipe for marathi

11. दम आलू

लहान आकाराचे बटाटे अथवा बेबी पोटॅटो धुवून सोलून घ्या. काटा चमच्याच्या सहाय्याने बटाट्यावर छेद द्या. कढईत तूप गरम करुन त्यात बटाटे मंद आचेवर तळून घ्या. कुकरमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे, आलु-लसणाची पेस्ट, कांद्याची फोडणी दया. त्यात हळद, धणे पावडर, लाल तिखट टाकून चांगलं परतून घ्या. टोमॅटोची प्यूरी टाकल्यावर तेलात मसाले चांगले मिसळल्यावर तळलेले बटाटे आमि दही मिसळा. दोन ग्लास पाणी टाकून झाकण बंद करुन दहा मिनीटं कुकर मंद आंचेवर ठेवा.  

dum aloo recipe for marathi

12.डाळ पालक

तुमच्या आवडीनुसार डाळ घ्या आणि ती धुवून वीस मिनीटं पाण्यात भिजत ठेवा. डाळीतील पाणी काढून टाका आणि त्यात स्वच्छ धुतलेल्या पालकाची पाने टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या. कुकरला कमीत कमी 3 ते 4 शिट्या काढा. डाळीत चवीनुसार मीठ मिसळा. एका कढईत तूप गरम करा. त्यात आलं, लसूणची पेस्ट आणि कांदा टाका. हळद, धणे पावडर, लाल तिखट टाकून चांगलं परतून घ्या. डाळ-पालकला चरचरीत फोडणी द्या. गरमगरम डाळ पालक भातासोबत मस्त लागेल.

ADVERTISEMENT
Palak Dal Recipe for marathi

13. जीरा राईस

जर तुम्हाला सतत पांढरा भात खायचा कंटाळा आला असेल आणि मसालेभात अथवा पुलाव तुम्हाला नको असेल तर जीरा राईस हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. जीरा राईस तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये तूप टाकून जीऱ्याची फोडणी द्या. फोडणीत मीठ टाकून शिजवलेला भात व्यवस्थित मिक्स करा. एक वाफ काढून गरमागरम सर्व्ह करा. वर दिलेल्या कोणत्याही रस्सा भाजीसोबत हा जीरा राईस अगदी मस्त लागेल.

14. दुधीचे कोप्ते

दुधीची भाजी बऱ्याचजणांना आवडत नाही.पण दुधी ही एक पौष्टिक भाजी आहे. ज्यांना दुधीची भाजी आवडत नसेल त्यांना दुधीचे कोप्ते नक्कीच आवडतील. यासाठी दुधी सोलून तो किसून घ्या. किसलेला दुधी पाण्यात टाकून पाच मिनीटे शिजवून घ्या. थंड झाल्यावर पाणी काढून टाका. पिळून घेतलेल्या दुधीमध्ये मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट आणि बेसण मिसळून कोप्ते तयार करा आणि तळून घ्या. एका कढईत जिरं, आलं-लसणाची पेस्ट, कांद्याची पेस्ट टाकून चांगलं परता. त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर, मीठ टाकून शिजवा. मिश्रणाला तेल सुटू लागल्यावर त्यात टोमॅटो प्यूरी टाकून परतून घ्या मिश्रणात दोन ग्लास पाणी टाकून आणि काही मिनीटं शिजू द्या. उकळी आल्यावर त्यात कोप्ते टाका आणि गरमागरम वाढा.

ADVERTISEMENT
lauki ke kofte for marathi

नॉनव्हेज स्पेशल डिनर रेसिपीज

15. लखनवी मटन बिर्याणी

ज्याप्रमाणे हैदराबादची दम बिर्याणी स्पेशल आहे अगदी त्याचप्रमाणे लखनऊची मटण बिर्याणीही तितकीच प्रसिद्ध आहे. अगदी रोज रोज तेच तेच जेवून कंटाळा आला असेल तर आज ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही. यासाठी आधी स्पेशल गरम मसाला तयार करावा लागेल. यासाठी जायफळ, वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी तव्यावर गरम करा आणि त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करा. बासमती तांदूळ धुवून त्याचे पाणी काढून बाजूला ठेऊन द्या. अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून त्याला लसूण पेस्ट, हळद,काजूची पेस्ट,गरम मसाला, दही आणि लाल तिखट लावून मॅरीनेट करा आणि एक तास फ्रीजमध्ये ठेवा. एक तासानंतर मटण फ्रीजमधून काढा आणि त्यात मीठ टाका. एका कढईत तेल गरम करा आणि मॅरीनेट केलेलं मटण त्यात टाका. वाफेवर मटण शिजू द्या.एक लेअर मटण आणि एक लेअर भात अशा पद्धतीने बिर्याणीचे लेअर लावा. वरचा लेअर  केसर आणि तळलेल्या कांद्याने सजवा. भांडे वरुन घट्ट बंद करा मंद आंचेवर अर्धा तास बिर्याणी शिजू द्या.

lucknowi mutton biryani for marathi

16. बंगालची दोई माछ 

ADVERTISEMENT

बंगालमध्ये दोई माछ ही डीश प्रसिद्ध आहे. आज जर तुम्हाला बंगाली डीश खाण्याची ईच्छा असेल तर तुम्ही ही डीश घरीच करु शकता. बंगालमध्ये दह्याला दोई आणि माशांना माछ असे म्हणतात. यासाठी एका वाटीत दही घ्या आणि ते फेटून त्यात तळलेले मासे त्यात बुडवून दोन तास झाकुन ठेवा. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात तमाल पत्र, कुटलेले गरम मसाले टाका. फोडणीमध्ये कांद्यांची पेस्ट टाकून चांगले परतून घ्या. त्यावर आल्याची पेस्ट आणि टोमॅटो प्यूरी टाकून परता. हळद टाकून त्यात दही लावलेले मासे अगदी हलक्या हाताने टाका. पाणी टाकून पंधरा मिनीटं मंद आंचेवर शिजू द्या. तयार डीश कोथिंबीरीने सजवा.

17. मेथी मुर्ग

कढईत तेल घ्या आणि त्यात कांदा, हिरवी मिरची आणि लहसून परतून घ्या. टोमॅटो प्यूरी, जीरा पावडर, धणे पावडर, लाल तिखट टाका. तेल सुटू लागल्यावर त्यात चिकन टाकून पाच ते दहा मिनीटं परतून घ्या. चिकन शिजल्यावर त्यात कसूर मेथी, गरम मसाला, मीठ टाकून दहा मिनीटे झाकण लावून शिजवा.

18. गलौटी कबाब

ADVERTISEMENT

संपूर्ण भारतात ही डीश लोकप्रिय आहे.कधी कधी अशा वेगळ्या प्रांतातील भाज्या खाण्यात एक वेगळीच मौज असते. ही भाजी तयार करण्यासाठी तुम्ही एका पॅनमध्ये चणाडाळ भाजून घ्या. थंड झाल्यावर या डाळीत जावित्री, दालचिनी, काळी मिरी, लाल तिखट आणि वेलची टाकून मिस्करमध्ये बारीक दळून घ्या. कच्चा पपईचा गर, लसूण आणि आलं टाकून वाटून घ्या. मटणाच्या खिमा  आणि ही पेस्ट चांगल्या पद्धतीने मिक्स करा. आता हा खिमा, मस्का, मीठ आणि डाळीचे वाटण एकत्र मिस्क करा. पॅनमध्ये तेल टाकून या मिश्रणाचे कबाब बनून तळून घ्या. चटणी, कांदा आणि पोळीसोबत हे कबाब मस्तच लागतात.

galouti kabab recipe for marathi

19. मटन स्ट्यू

मटणाचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. एका खोलगट कढईत तेल गरम करा. त्यात तमाल पत्र आणि काश्मिरी मसाला  तळून घ्या. त्यात कांदा, लहसूण आणि आलं टाकून परतून घ्या. त्यात मटण, धणा पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ टाकून पंधरा मिनीटं वाफेवर शिजवा. मटण शिजल्यावर दही आणि पाणी टाकून आणखी काही वेळ शिजवा. मटण स्ट्यू तयार आहे तुम्ही ही डीश भातासोबत गरमगरम सर्व्ह करा.

20. बटर चिकन

ADVERTISEMENT

नॉनव्हेज आवडणाऱ्या लोकांसाठी बटर चिकन ही डिश फारच आवडीची आहे. ही डीश स्वादिष्ट तर आहेच शिवाय पौष्टिकही आहे. यासाठी चिकन स्वच्छ धुवून घ्या. एका  मोठ्या बाऊलमध्ये चिकन, कॉर्न फ्लोअर, मैदा, हळद, धणा पावडर, मीठ आणि लाल तिखट टाकून मिक्स करा.पाच मिनीटे हे मिश्रण झाकुन ठेवा. एका पॅनमध्ये तेल घ्या त्यात जीरं, लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून चांगलं परतून घ्या. काजू आणि टोमॅटोची पेस्ट टाकून थोडंसं परतून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर वाटून घ्या. एका पॅनमध्ये चिकन फ्राय करुन घ्या. तेलात हळद, लाल तिखट, धणा पावडर परतून घ्या. टोमॅटो परतून घेऊन त्यात तळलेलं चिकन टाका मसाला लावून दहा मिनीटं शिजवा. वरतून कसूरी मेथी बटर आणि फ्रेश क्रीम टाकून गरमागरम वाढा.

रात्रीच्या वेळी खाण्यासाठी पचायला हलक्या डिनर रेसिपीज

21. व्हेजीटेबल दलिया पुलाव

हा पुलाव चविष्ट आणि पौष्टिक दोन्हीही आहे. यासाठी दलिया धुवून पाच ते दहा मिनीटे भिजत ठेवा.कुकरमध्ये तेल अथवा तूप गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात ओवा टाका आणि तुमच्या आवडीनुसार भाज्या( कांदा, मटर, कोबी, सिमला मिरची, फ्लॉवर, टोमॅटो) टाका. हळद, कोंथिंबीरी, मीठ टाकून चांगलं मिक्स करा. दलिया टाकून अंदाजाने कोमट पाणी टाका. दोन ते तीन शिट्या झाल्यावर कुकर बंद करा.

ADVERTISEMENT
vegetable dalia pulao recipe for marathi

22. पालक खिचडी

खिचडीला राष्ट्रीय खाद्यपदार्थाचा दर्जा मिळाला आहे. खिचडीमुळे चांगले पोषण तर होते शिवाय घाईच्या वेळी करण्यासाठी खिचडी हा एक उत्तम पर्याय असतो. खिचडी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. पालक खिचडी तयार करण्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करुन त्यात जिऱ्याची फोडणी द्या. जिरं तडतडू लागल्यावर त्यात हींग, हिरवी मिरची आणि हळद टाका. तीस सेकंद मंद आंचेवर परतून घ्या. मग त्यात चिरलेला पालक आणि बटाटा टाका आणि चांगले परतून घ्या. या फोडणीत धुतलेले तांदूळ, मसूर डाळ आणि मीठ टाकून तीन कप पाणी मिसळा. दोन शिट्या झाल्यावर गॅस बंद करा.गरमागरम पालक खिचडी तुम्ही दही आणि पापडासोबत नक्कीच खाऊ शकता.

23. तांदळाची  उकड

रात्रीच्या वेळी झटपट होणारा आणि पोटाला बरा असा हा पदार्थ आहे. एक वाटी आंबट ताकामध्ये अर्धी वाटी तांदळांचे पीठ टाका त्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून टाका. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि  थोडावेळ ठेऊन द्या. लक्षात ठेवा पीठाची गुठळी राहता कामा नये. कढईत तेल गरम करा आणि मोहरी, जिरं ,हिंग आणि कडीपत्ताची फोडणी द्या. तांदळांचं मिश्रण पाच मिनीटं वाफेवर शिजू द्या. गरमागरम सर्व्ह करा आणि खाताना त्यात थोडे कच्चे तेल सोडा.

ADVERTISEMENT

24. कुळीथाची पिठी

रात्रीच्या वेळी खाण्यासाठी सोईचं आणि करण्यासाठी सोपा पदार्थ म्हणजे कुळीथाची पिठी हा एक उत्तम पर्याय आहे. कुळीथाची पिठी तुम्हाला बाजारात तयार मिळते शिवाय वेळ असल्यास कुळीथ दळून तुम्ही ती घरीही तयार करु शकता. दोन ते तीन चमचे पिठी घेऊन त्यात एक वाटी पाणी मिसळा. यामध्येदेखील गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. कढईत तेल गरम करा त्यात तुमच्या आवडीनुसार लाल अथवा मिरची आणि कांद्याची फोडणी द्या. त्यात तयार कुळीथाचं मिश्रण टाकून गरम करा. मिश्रण पातळच ठेवा कारण गरम होताना ते आपोआप जाडसर होऊ लागेल. गरमागरम पिठी तुम्ही भातासोबत अथवा भाकरीसोबत खाऊ शकता. मात्र गरमागरम पिठी खाण्याआधी जाणून घ्या हे कुळीथ (हुलगे) चे फायदे

25. कोबीची पचडी

रोज रोज त्याच त्याच कोशिंबीरी खाऊन कंटाळा आला असेल तर आज एखादी पचडी करायला काहीच हरकत नाही. साध्या आमटी-भातासोबतदेखील ही पचडी अगदी मस्त लागते. यासाठी कोबी किसून घ्या, त्यात शेंगदाण्याचा कुट, चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी साखर आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करा. या पचडीला वरुन हिंग,मोहरी, जिरं आणि हळद टाकून फोडणी द्या.

ADVERTISEMENT

मधुरा बाचलच्या खास केक रेसिपी तुम्ही पाहिल्यात का

मधुमेह (Diabetes)नियंत्रणात ठेवण्यासाठी न्यूट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्या ‘5’ सोप्या टीप्स

जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर या ’20’ किचन ट्रीक्स आणि टीप्स नक्कीच उपयोगी पडतील

गदी सोपं आहेफोटोसौजन्य- shutterstock.com

ADVERTISEMENT
29 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT