ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Jackfruit Benefits In Marathi

आरोग्यासाठी फणसाचे फायदे | Jackfruit Benefits In Marathi

फणस म्हटला की काटेरी आणि मोठं फळ मात्र रसाळ गरे आपल्या डोळ्यासमोर आपसूकच चित्र उभं राहतं. फणसाची भाजी असो, कापा अथवा बरका फणस असो कोकणातील माणसाला फणस म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरजच नाही. भारतामध्ये अनेक ठिकाणी फणसाची भाजी, फणसाचे लोणचे आणि अन्य पदार्थांसाठी वापर करण्यात येतो. पण हे फळ केवळ पोट भरण्यापुरतेच सीमित नाही. तर अनेक आजारांवरही फणसाचा उपयोग करून घेता येतो. हे तुम्हाला माहीत आहे का? कॅन्सरसारख्या घातक आजाराचा बचाव करण्यासाठीही फणसाचा उपयोग होतो. अन्य भाज्यांच्या तुलनेत फणसामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक आढळते. विशेषतः फणसांच्या गऱ्यामध्ये. शाकाहारी खाणाऱ्या व्यक्तींना प्रोटीनसाठी आहारात फणसाचा समावेश करून घेणे नेहमीच फायद्याचे ठरते. फणसाचे फायदे (Fansache Fayde) आणि त्याचे औषधीय गुण कशा प्रकारे शरीराला लाभदायक ठरतात हे आपण या लेखातून पाहणार आहोत. फणसामध्ये अनेक पोषक तत्व (Nutritional Value Of Jackfruit) असून यामध्ये प्रोटीनसह उर्जा, फायबर आणि मिनरल्सचा खजिना सापडतो. इतकंच नाही तर कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंकदेखील यामध्ये भरभरून असते. 

फणस म्हणजे नेमकं काय (What Is Jackfruit?) असा प्रश्न जर माहीत नसणाऱ्यांना असेल तर उष्णकटिबंधीय प्रदेश विशेषतः दक्षिण – पश्चिम भारतातील हे एक रसाळ फळ आहे. लहान आणि मोठ्या आकाराचे फणस आपल्याला दिसतात. कच्चा आणि पिकलेल्या अशा दोन्हीचा खाण्यासाठी उपयोग करण्यात येतो. मात्र आपल्या आरोग्यासाठीही फणसाचे फायदे (Jackfruit Benefits In Marathi) होतात. 

फणसाचे फायदे (Jackfruit Benefits In Marathi)

फणसाचे फायदे
फणसाचे फायदे

केवळ खाण्यासाठीच नाही तर शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीनेही फणसाचे फायदे (fansache fayde) अनेक होतात. नक्की फणसाचे फायदे काय आहेत आपण जाणून घेऊया. 

हृदय स्वास्थ्यासाठी (Heart Benefit)

for heart

हृदय चांगले राखण्यासाठी तुम्ही फणसाचे सेवन करू शकता. वैज्ञानिक शोधानुसार फणसामध्ये असणाऱ्या विटामिन सी मुळे सूज कमी करण्यासदेखील मदत होते. जे हृदयाशी संबंधित रोगासाठी अत्यंत घातक ठरते. याशिवाय फणसामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियमचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही उपयोग होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका टाळला जातो. फणसामध्ये विटामिन बी होमोसिस्टीनचा स्तर कमी करणारे गुणधर्म आहेत. होमिसिस्टीनमुळे हृदयरोग वाढतो. तसंच फणसामध्ये लोहाचे प्रमाण हृदय मजूबत राखण्यास मदत करते. 

ADVERTISEMENT

पचनशक्ती चांगली राखण्यास मदत (Digestive System)

फणस हा फायबरचा खूपच चांगला स्रोत आहे. ज्यामुळे पचनसंस्था चांगली होण्यास मदत मिळते. फायबर आतड्यांमधील नलिका चांगली राखण्यास मदत करते. फायबर डायजेस्टिक ट्रॅक सुधारून पचनक्रिया वाढविण्यास मदत करते. फायबरयुक्त पदार्थ हे पोटासंबंधी समस्या अर्थात बद्धकोष्ठ, डायरिया आणि गॅस व्यवस्थित करण्यास मदत करतात. त्यामुळे फणसाच्या हंगामात फणस खाणे अत्यंत चांगले ठरते. 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त (Weight Loss)

weight loss

आजकाल वजनवाढ ही खूपच मोठी समस्या झाली आहे. वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमध्ये तर हा त्रास अधिक जणांना वाढताना दिसून येत आहे. तसंच बदलती लाईफस्टाईलदेखील याला कारणीभूत ठरते आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. मधुमेह, कॅन्सर, हृदयसंबंधित आजार यासाठीदेखील वजनवाढ कारणीभूत ठरते. फणस हा विटामिन सी ने समृद्ध आहे. फणसाचे सेवन हे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. यावर अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मात्र फणस खाल्ल्याने पोट अधिक भरते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तसंच फणसामध्ये आढळणारे अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे वजन रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फणसाचे फायदे (Fansache Fayde) म्हणजे यामध्ये रेसवेरेट्रॉल नावाचे अँटिऑक्सिडंट असून वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

हाडांसाठी चांगले (For Bones)

हाडांच्या मजबूतीसाठी फणस हा एक उत्तम आधार आहे. फणसामध्ये कॅल्शियम आढळते, जे हाडांच्या मजबूतीसाठी आणि हाडांच्या विकासासाठी अत्यंत उत्तम तत्व आहे. शरीरामध्ये कॅल्शियमची आवश्यकता अधिक असते. चांगल्या हाडांसाठी तुम्ही आपल्या आहारात फणसाचा समावेश करून घ्यायला हवा. फणस हे हंगामी फळ असले तरीही तुम्ही संबंधित हंगामात फणसाचा फायदा करून घ्यायला हवा. 

कॅन्सर (Cancer)

कॅन्सरसारख्या घातक आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही फणसाचे सेवन करणे चांगले आहे. फणस हा लिग्नांस, आयसोफ्लेवोन्स आणि सॅपानिन जसा फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असतो. जो कॅन्सरशी लढण्याचे काम करतो. तसंच फणसामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुण फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि कॅन्सर रोखण्यास मदत करतात. तसंच विटामिन सी चा चांगला स्रोत असल्यामुळे कॅन्सर थांबविण्यास याची मदत मिळते. एका शोधानुसार, कॅन्सरशी लढा देण्यासाठी फणसाचे फायदे (Fansache Fayde) अधिक आहेत. याशिवाय फणसामध्ये असणारे डाएटरी फायबर पोटाचा आणि इसोफेजियल कॅन्सर थांबविण्यास मदत करतात. 

ADVERTISEMENT

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (Immunity System)

शरीरातील प्रतिकारशक्ती कायम टिकून राहायला हवी असे प्रत्येकाला वाटते. फणसाचे फायदे (Fansache Fayde) म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याची मदत मिळते. तसंच विटामिन सी हे अँटिऑक्सिडंट स्वरूपात काम करते आणि शरीराला अन्य रोगांपासून वाचविण्यास मदत करते. प्रतिकारशक्ती व्यवस्थित राखण्याचे काम फणसामुळे अधिक चांगल्या प्रमाणात होते. सर्दी, खोकला अशा रोगांपासून दूर राखण्यास मदत करतात. 

डोळ्यांसाठी (For Eyes)

cause of water in eye

फणसामध्ये विटामिन ए आणि सी दोन्ही तत्वे भरपूर प्रमाणात असातात आणि डोळ्यांसाठी ही दोन्ही पोषक तत्वे फायदेशीर ठरतात. एका शोधात दिल्यानुसार विटामिन सी चे योग्य प्रमाण मिळत राहिले तर डोळ्यांसंबंधित आजार दूर पळतात. तसंच डोळ्यांच्या आजाराची जोखीम तुम्हाला नक्कीच स्वीकारावी लागत नाही. फणसाचे फायदे जेव्हा तुम्ही विचारात घेता तेव्हा डोळ्यांसाठीही याचा फायदा होताना दिसतो. 

अनिमिया (Anemia)

अनिमिया सारखा आजारदेखील फणसाच्या खाण्यामुळे जाऊ शकता. अनिमिया एक चिकित्सकीय अशी परिस्थिती आहे जी रक्तातील लाल पेशींच्या कमतरतेमुळे उद्भवते. अनिमिया रोखण्यासाठी तुम्ही फणसाचे सेवन करू शकता. कारण यामध्ये जास्त प्रमाणात लोह असते जे लाल पेशी वाढण्यास आणि विकास करण्यास मदत करते. अनिमिया होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रक्तात लोहाचे प्रमाण कमी असणे. याशिवाय फणसामध्ये विटामिन बी6 चे प्रमाणही अधिक असते. हे पोषक तत्व लाल पेशींचा विकास करण्यास अधिक फायदेशीर ठरते. 

रक्तदाबावर नियंत्रण (Blood Pressure)

फणसाचे फायदे शरीरातील रक्ताचा प्रवाह चांगला राखण्यासाठीही पाहिले गेले आहेत. फणसामध्ये असणारे पोटॅशियम आणि सोडियम हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी आणि योग्य रक्तदाब ठेवण्यासाठी मदत करते. एका शोधानुसार, पोटॅशियम हे उच्च रक्तदाब थांबविण्यासाठी आणि उपचारासाठी औषधात समाविष्ट करण्यात येते. विशेषतः त्या व्यक्तींनी फणसाचे सेवन करावे, ज्यांना सोडियम कमी सेवन करण्याची सवय आहे. तसंच फणसामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही अधिक असते जे उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत करते. 

ADVERTISEMENT

मधुमेहावर उपयोगी (Diabetes)

blood suger

मधुमेह हा आजारा हल्ली अत्यंत सामान्य झाला आहे. मात्र ते योग्य नाही. तुम्हाला फणसाचे फायदे यासाठी होऊ शकतात. फणसामध्ये असणारे विटामिन बी हे मधुमेह रोग्यांचे इन्शुलिन सुधारण्यास मदत करते. एका शोधानुसार, कच्चा फणस हा प्रिडायबिटीसची लक्षणे घालविण्यास मदत करतो. मधुमेहासाठी फणसाचे औषधीय गुण असल्याचा उल्लेख भारतीय वैद्यकीय पद्धतीतही करण्यात आला आहे.

थायरॉईड (Thyroid)

ज्या व्यक्तीला थायरॉईड आहे त्यांनी फणसाचे सेवन नक्की करावे. फणसामध्ये कॉपरचे प्रमाण असते, जे थायरॉईड मेटाबॉलिज्म राखण्यास मदत करते. त्याशिवाय कॉपर थायरॉईडच्या आजारावरही फायदेशीर ठरते. एका शोधानुसार, हायपोथायरॉईज्मच्या रोग्यांसाठी विटामिन सी अत्यंत महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे. त्यामुळे थायरॉईड असल्यास फणस खाण्याचा उपयोग होतो. थायरॉईड ग्रंथी यामुळे थायरॉईड हार्मोनचे उत्पादन करत नाहीत.

त्वचेसाठी उपयोग (For Skin Benefits)

त्वचेसाठी फणस अत्यंत उपयोगी ठरतो. फणसामध्ये विटामिन सी आहे, जे त्वचेला नुकसान पोहचवणाऱ्या मुक्त कणांशी लढण्यास अधिक फायदेशीर ठरते. तसंच फणसातील विटामिन बी हे त्वचेमधील पेशींचे पुनर्निर्माण करण्यास मदत करतात. विटामिन सी हे अँटीऑक्सिडंट गुण आणि कोलेजनची क्षमता असल्यामुळे त्वचेसाठी अधिक खास ठरते. तसंच सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्यासही याची मदत मिळते. याशिवाय फणस त्वचेला हायड्रेट करून कोरडेपणा कमी करण्याचे कामही करतो. यामध्ये फायबरचा चांगला स्रोत असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास याची मदत होते. त्यामुळे त्वचा चांगली राहाते. 

फणसाचा वापर कसा करावा (How To Use Jackfruit)

फणसाचा खाण्यासाठी आणि भाजीसाठी वापर होतो, हे सर्वांनाच माहीत असलं तरी याची पद्धत बऱ्याच जणांना माहीत नसते. याचा नक्की कसा वापर करावा हे घ्या जाणून. 

ADVERTISEMENT
  • कच्च्या फणसाची भाजी केली जाते. कच्चा फणस कापण्यापूर्वी आपल्या दोन्ही हातांना तेल लावा. अन्यथा त्यातून येणाऱ्या चीकमुळे हात खराब होण्याची शक्यता असते. हा चीक हाताला लागल्यास, लवकर निघत नाही. तसंच कच्चा फणस कापण्यासाठी तुम्ही हँडग्लोव्हजचा वापर करू शकता. अगदी सावधनता बाळगून तुम्ही फणस कापा. मग नीट सोलून त्याची भाजी करावी.
  • आपल्या रव्याच्या केकप्रमाणे फणसाचा सांदण हा प्रकार देखील कोकणात लोकप्रिय आहे. हा प्रकार केकसारखा मऊ आणि लुसलुशीत असतो.
  • तुम्ही फणसाचे लोणचेदेखील बनवू शकता. गाजर, आंबा, मुळ्याचे लोणचे बनवता त्याचप्रमाणे फणसाचे लोणचेदेखील बनवता येते.
  • याशिवाय फणसाचे वेफर्स अर्थात गरेदेखील बनवता येतात. कोकणात आणि दक्षिण भारतामध्ये अधिक प्रमाणात हे गरे बनविण्यात येतात. स्नॅक्ससाठी हे उत्तम ठरतात. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. फणसाचे काही नुकसान आहे का?
फणस गुणकारी आहे आणि फणसाचे फायदे अनेक होतात, यात काही दुमत नाही. मात्र फणसाच्या अतिसेवनामुळे मधुमेह होण्याचीही शक्यता असते. तसंच अलर्जीही होऊ शकते. त्यामुळे फणस प्रमाणात खावा. 

2. त्वचेला काही नुकसान होत नाही ना?
कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर त्वचेला काहीही नुकसान होत नाही. उलट फणसामधील पोषक तत्वामुळे त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत होते. 

3. फणसामध्ये कोलेस्ट्रॉल असते का?
फणसामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असते. जे तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. त्यामुळे फणस तुम्ही खाऊ शकता.

15 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT