ADVERTISEMENT
home / Dating
Valentines Day: तुमच्या जोडीदारासाठी काय कराल सरप्राईज प्लॅन (Valentines Day Plan For Your Partner In Marathi)

Valentines Day: तुमच्या जोडीदारासाठी काय कराल सरप्राईज प्लॅन (Valentines Day Plan For Your Partner In Marathi)

फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते Valentines Day चे. अर्थात आपण कितीही म्हटलं की, प्रेमाचा एकच दिवस नसतो. तरीही हा दिवस म्हणजे प्रेमाचा प्रातिनिधिक दिवस आहे हे नक्की. गेल्या दहा वर्षामध्ये हे व्हॅलेंटाईन डे साजरा करणं खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंड असो वा नवरा – बायको नक्की एकमेकांना कोणतं गिफ्ट द्यायचं किंवा काय सरप्राईज देऊन आपल्या जोडीदाराला खूष करायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच. अर्थात आपल्या जोडीदाराला खूप मोठं गिफ्ट किंवा अगदी भारी किमतीचं मोठं सरप्राईज द्यायला हवं असं नाही. तुम्ही लहानसहान गोष्टीतूनही आपल्या जोडीदाराला त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सरप्राईज देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळी आयडीया हवी असते आणि आम्ही तुम्हाला या लेखातून त्याच आयडीया देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जोडीदाराला गुलाब किंवा बुके अथवा टेडी यासारखे गिफ्ट्स न देता त्यांना आवडतील. त्यांना लक्षात राहतील आणि भावतील असे सरप्राईज नक्की प्लॅन करा. जाणून घ्या काय आहेत तुमच्या जोडीदाराला द्यायचे सरप्राईज प्लॅन 

दिवसभर ऑफिसमध्ये असल्यास सरप्राईज गिफ्ट पाठवा

एकत्र हॉट बाथ सरप्राईज द्या

स्वतःच्या हाताने द्या मसाज

ADVERTISEMENT

खेळा ‘लव्ह हंट’चा गेम

1) त्याच्यासाठी वा तिच्यासाठी सकाळीच स्वहस्ताक्षरात पत्र (Signed Letter From Him Or Her)

1. Valentines Day Plan In Marathi

तुम्ही एकत्र असाल वा अगदी नसलात तरीही त्याच्या वा तिच्या हातात व्हॅलेंटाईनच्या दिवशीच सकाळी मिळेल अशी व्यवस्था करून एक प्रेमपत्र लिहा. बऱ्याचदा आपण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रेमाच्या गोष्टी बोलत नाही. व्यक्त होत नाही. ही एक नामी संधी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मोबाईलच्या युगामध्ये पत्र कुठेतही नाहीसं होत चाललं आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या जोडीदारासाठी पत्रामध्ये प्रेमभावना व्यक्त केल्यात तर ते त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असेल. अर्थात हे पत्रदेखील नेहमीच्या कागदावर लिहू नका. तर त्यांना स्पेशल वाटावं म्हणून एखाद्या रंगीत कार्डपेपरवर तुमच्या हस्ताक्षरात प्रेमाच्या भावना नक्की उतरवा. जर तुम्हाला कविता लिहायचा छंद असेल तर तुम्ही त्यांच्यावर एखादी प्रेमकविता लिहून त्यांना सरप्राईज द्या आणि आपलंसं करून घ्या. यासारखे दुसरे अप्रतिम सरप्राईज नाही. कारण प्रेमामध्ये व्यक्त होणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही अशा तऱ्हेने सरप्राईज देऊन प्रेमभावना व्यक्त केल्यात तर संपूर्ण दिवस तुमचा जोडीदार तुमच्यावर नक्कीच खूष राहील. यामध्ये तुम्हाला हवं असल्यास, प्रेमपत्रावर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आवडणारा परफ्युम मारूनदेखील देऊ शकता जेणेकरून तुमचा जोडीदार तुम्ही त्यांच्या आवडी लक्षात ठेवल्याबद्दल अधिक प्रेम करू लागेल.

वाचा – फिरण्यासाठी अप्रतिम रोमँटिक ठिकाणं

ADVERTISEMENT

2) दिवसभर ऑफिसमध्ये असल्यास सरप्राईज गिफ्ट पाठवा (Send A Surprise Gift At Office)

2. Valentines Day Plan In Marathi

तुम्हाला दोघांनाही व्हॅलेंटाईनच्या दिवशी वेळ नसेल तरीही एकमेकांसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन नक्की करा. अर्थात त्यासाठी खूप मोठ्या आणि महाग गिफ्ट्सची गरज आहे असं नाही. तर तुम्ही दोघंही ऑफिसला जाणार असाल तर तुमच्या आवडीची पेस्ट्री त्याला किंवा तिला ऑफिसमध्ये पाठवून द्या किंवा तुमच्या आवडीचं चॉकलेट असो वा आईस्क्रिम असो कोणताही आवडीचा पदार्थ त्याला वा तिला पाठवा आणि त्याबरोबर दोन ते चार ओळी प्रेमपूर्वक लिहिलेल्या असाव्यात हे मात्र विसरू नका. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुमचं त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे हे जाणवतं आणि मुळात अशी सरप्राईज दिल्यानंतर त्यांनाही खूप आनंद होतो. भले एकमेकांना वेळ देता येत नसेल पण निदान चेहऱ्यावर हास्य तर अशा सरप्राईजमुळे येतंच.

3) ऑफिस सुटल्यानंतर अचानक समोर जा (Visit Him/Her While Leaving Office)

3. Valentines Day Plan In Marathi

जर तुम्ही दोघेही ऑफिसला असाल आणि त्याच्या अथवा तिच्या ऑफिस सुटण्याच्या वेळेचा अंदाज सकाळपासून घ्यायला सुरुवात करा आणि ऑफिस सुटताना अचानक त्याच्या वा तिच्यासमोर नक्की जा. त्यांना तुम्हाला पाहून जितका आनंद होईल त्यापेक्षा मोठं नक्कीच काही नसेल. प्रत्येकवेळी गिफ्ट हेच सर्व काही नसतं. तर तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांच्यासमोर जाणं हे सर्वात जास्त त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपली कामं पटापट आटपून त्याच्या वा तिच्यासाठी त्या दिवशी निदान थोडा वेळ काढून संध्याकाळी रिसिव्ह करायला नक्की जा. असे केल्यामुळे अगदी तुमच्यामध्ये कोणत्याही छोट्या वा मोठ्या कारणावरून भांडणं जरी असतील तरी ती मिटायला नक्कीच मदत होईल.

ADVERTISEMENT

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला हॉट लुक

4) स्वतःच्या हाताने आवडता पदार्थ करून खायला द्या (Pack Food From Your Hand)

आपल्या रोजच्या धावपळीत बऱ्याचदा आपण स्वतःच्या हाताने जेवण बनवत नसतो किंवा ज्यांचं लग्न झालं नाहीये अशा व्यक्ती तर कधीच एकमेकांसाठी जेवण बनवत नसतात. पण व्हॅलेंटाईनच्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडच्या आवडीचा पदार्थ अथवा अगदी नवरा बायको असले आणि तुम्ही जर एकत्र वेळ घालवणार असाल तर घरच्या घरी एकमेकांच्या आवडीचा पदार्थ अगदी साधा असला तरीही एकमेकांना नक्की करून खायला द्या. हे एक चांगलं सरप्राईज गिफ्ट असू शकेल. अगदीच नाही तर निदान बायको सकाळी उठायच्या आधी तिच्यासाठी तिला आवडणारी कॉफी वा चहा तिच्यासाठी गरम गरम करून तिला बनवून द्या. अशा साध्या सरप्राईजनेदेखील दिवसाची सुरुवात अतिशय छान होते. जर सकाळी वेळ नसेल तर त्याच्या वा तिच्यासाठी रोमँटिक डिनर तयार करा आणि त्यांच्याबरोबर दिवसभराच्या मस्त गप्पा मारत रोमँटिक डिनरचा आनंद घ्या.

5) एकत्र हॉट बाथ सरप्राईज द्या (Surprise Hot Bath)

5. Valentines Day Plan In Marathi

तुम्ही जर व्हॅलेंंटाईनच्या निमित्ताने बाहेर फिरायला गेला असाल किंवा अगदी घरी जरी असाल आणि घरामध्ये कोणी नसेल तर एकत्र हॉट बाथचं सरप्राईज तुम्ही तुमच्या जोडीदाराला देऊ शकता. अगदी त्यांच्या कपड्यांच्या तयारीपासून त्यांनी कोणते कपडे घालायचे याचाही विचार तुम्ही करून तुमचा बाथ तुम्ही अधिक रोमँटिक करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला दोघांना अधिक वेळ एकत्र घालवायची संधी तर मिळतेच पण तुमच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून स्वतःचे असे कायमचे लक्षात राहणारे क्षणही मिळतात. या रोमँटिक बाथच्या वेळी त्यांना आवडणारी रोमँटिक गाणी अर्थात मग ती बॉलीवूडची असो वा हॉलीवूडची लावायला विसरू नका. अशा सरप्राईजमुळे आपल्या जोडीदाराचा मूड अधिक चांगला करण्याची नामी संधी असते. शिवाय अशा दिवशी आपल्या जोडीदाराला अजून स्पेशल फील करवून देता येते.

ADVERTISEMENT

व्हॅलेंटाईन डे साठी ड्रेस

6) स्वतःच्या हाताने द्या मसाज (Give Massage From Your Hands)

बरेच महिने कुठे बाहेर गेला नसाल किंवा बऱ्याच महिन्यामध्ये खूप कामाने दमला असाल तर तुम्ही नक्की तुमच्या पार्टनरला स्वतःच्या हाताने मसाज करून सरप्राईज द्या. तुमचा स्पर्श हा त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे मसाजमध्ये तुमचा स्पर्श तर होतोच. शिवाय त्यातील प्रेम आणि काळजी हीदेखील पार्टनरला जाणवते. तुम्हाला मसाज करता येत नसेल तरी तुमच्या प्रयत्नाने तुमचा जोडीदार नक्कीच आनंदी होतो आणि अशा सरप्राईजमध्ये तेच जास्त महत्त्वाचं असतं. अगदी जोरजोरात मसाज द्यायची अशावेळी गरज नाही. तुमच्या जवळ असण्यानेच तुमच्या जोडीदाराला बरं वाटतं. शिवाय अशा सरप्राईजमधून तुम्हाला तुमच्या जोडीदाराची किती काळजी आहे हे त्यांना लक्षात येतं आणि त्यामुळे तुम्ही अधिक जवळ येता.

7) सकाळपासूनच अप्रतिम क्षणांचे फोटो आणि टेक्स्ट मेसेज पाठवून करा सरप्राईज (Surprise Messages In The Morning)

आपल्या जोडीदाराला व्हॅलेंटाईनच्या दिवशी जर तुम्हाला आनंदी ठेवायचं असेल तर यापेक्षा चांगलं सरप्राईज असूच शकत नाही. कोणत्याही पार्टनरला त्याच्याबद्दल तुम्ही व्यक्त केलेल्या भावना या जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळे सकाळीच गुड मॉर्निंग असा व्हॉईस मेसेज पाठवत त्याला तुम्ही किती हवे आहात अशा स्वरुपाचा एक मेसेज रेकॉर्ड करून पाठवा आणि त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने तुम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांचे फोटो त्याखाली प्रेमाचे संदेश किंवा तुमच्या असलेल्या भावना लिहून पाठवत राहा. यामुळे नक्कीच तुमचा पार्टनर आनंदी होईल. तुम्हाला भेटण्यासाठी तर नक्कीच आतुर होईल. असं अगदी रात्रीपर्यंत त्याला वा तिला मेसेज आणि फोटो पाठवत राहा.

8) तुमची पहिली डेट रिक्रिएट करून सरप्राईज द्या (Recreate Your First Date)

8. Valentines Day Plan In Marathi

ADVERTISEMENT

तुमच्या लग्नाला अथवा नात्याला खूप वर्ष झाली असतील तर तुम्ही तुमची पहिली डेट रिक्रिएट करून तुमच्या पार्टनरला सरप्राईज करा. ज्या ठिकाणी तुम्ही फिरला असाल, चित्रपट बघितले असतील. तिथेच पुन्हा जाऊन आपल्या आठवणींना उजाळा द्या आणि पुन्हा तेच करा जे तुम्ही इतक्या वर्षांपूर्वी केलं असेल. शिवाय त्या प्रत्येक ठिकाणी जा जिथे तुम्ही त्यावेळी काही खाल्लं असेल आणि तुम्हाला आठवत असेल तर त्या सगळ्या गोष्टी तशा करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्यामध्ये काही कारणाने दुरावा आला असेल तर आपलं एकमेकांवर किती प्रेम होतं हे पुन्हा जाणवेल आणि तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकाल.

9) खेळा ‘लव्ह हंट’चा गेम (Play A Game Of Love Hunt)

तुमच्या जोडीदाराला सरप्राईज आवडत असतील तर रात्री घरी जेव्हा तुमचा जोडीदार येईल त्याआधी घरी जाऊन सगळी तयारी करून ठेवा आणि मग खेळा ‘लव्ह हंट’ गेम. एका ठिकाणी एक चीट लिहून ठेवायची. त्यामध्ये कोडं घालायचं आणि आपल्या पार्टनरच्या आवडती वस्तू वा पदार्थ त्या ठिकाणी ठेवायचा. तो सापडल्यानंतर पुन्हा एकदा दुसरी चीट त्या ठिकाणी ठेवायची. अशा तऱ्हेने बेडपर्यंत चार ते पाच चीट ठेवत त्या त्या ठिकाणी सरप्राईज गिफ्ट द्या आणि मग तुमच्या जोडीदाराबरोबर ती रात्रही अविस्मरणीय बनवा.

10) त्याच्या वा तिच्यासाठी रोड ट्रिप प्लॅन करा (Plan A Road Trip For Your Partner)

10. Valentines Day Plan In Marathi

त्याला किंवा तिला रोड ट्रिप आवडत असतील तर अचानक आपल्या जोडीदाराला ऑफिसमध्ये असताना किंवा घरी असल्यास, काहीतरी वेगळं कारण देऊन फोन करा. त्यांना रोड ट्रिपचा जराही अंदाज येऊ देऊ नका आणि तुम्हाला भेटायला आल्यानंतर त्यांना घेऊन रोड ट्रिपला त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जा. हे जमणार नसेल किंवा तुमच्या जोडीदाराला जर कोस्टल ट्रिप आवडत असतील तर त्यांच्यासाठी कोस्टल ट्रिप ठरवा. समुद्री सफारी त्यांच्याबरोबर करत मस्त रोमँटिक क्षण व्यतित करा.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य- Instagram, Giphy

हेदेखील वाचा – 

तुमचा बेस्टफ्रेंडच होऊ शकतो तुमचा बॉयफ्रेंड…कसं ओळखायचं?

किस घेताय ना…किस घेण्यालाही असतात अर्थ

ADVERTISEMENT

प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स

04 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT