ADVERTISEMENT
home / मेकअप
तुम्हालाही हवेत *जाड* आयब्रोज?,मग हे नक्की वाचा

तुम्हालाही हवेत *जाड* आयब्रोज?,मग हे नक्की वाचा

‘’दिदी गेल्यावेळी आयब्रोज खूप बारीक केल्या होत्या. आता प्लीज नीट करा. मला जाड आयब्रोजच हव्या आहेत. एक महिन्यापासून आयब्रोज वाढवत आहे. आता काही चूक करु नका.’’ दिदी प्लीज एक्स्ट्राच केस काढा, असे संवाद पार्लरमध्ये नक्कीच ऐकायला मिळतात. काहीही झालं तरी आयब्रोज हे एकदम परफेक्ट हवे असतात. तुमचे आयब्रोज तुमच्या चेहऱ्यावरील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ते परफेक्टच हवे असण्याचा तुमचा हट्टही अगदी योग्यच आहे. तुमचेही आयब्रोज असल्याच कोणत्या पार्लर दिदीने खराब केले असतील किंवा तुम्हाला नव्या ट्रेंडप्रमाणे आयब्रोज जाड वाढवायचे असतील  तर या सोप्या टीप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील.

डबलचीन कमी करण्यासाठी करा हे व्यायाम 

व्हॅसलीन जेली

सगळ्यांच्या घरी व्हॅसलीन जेली असते. एका बोटावर व्हॅसलीन जेली घ्यावी. दोन बोटांवर चोळून थोडी गरम करावी आणि मग आयब्रोजच्या मागच्या बाजूने ती लावून घ्यावी. जेली चोळताना थोडा मसाज करावा ( रिलॅक्स वाटत).  काही दिवसांमध्येच तुम्हाला तुमचे आयब्रोजचे केस जाड झालेले दिसतील. रोज रात्री व्हॅसलीन जेली तुमच्या आयब्रोजना लावा. व्हॅसलीन जेलीचा त्रास तुमच्या त्वचेला अजिबात होत नाही.उलट या जेलमुळे तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात. तुमची त्वचा अधिक मुलायम होते.

ADVERTISEMENT

vaselin jelly 

 खोबरेल तेल

केसांसाठी खोबरेल तेल चांगले असते हे सांगायलाच नको. खोबरेल तेल कोमट करुन मग ते तुमच्या आयब्रोजला लावा. आयब्रोज चुकून बारीक झाले असतील तर  खोबरेल तेल केस वाढवण्यास मदत करु शकेल. एक दिवस आड तुम्हाला तुमच्या आयब्रोजना खोबरेल तेल लावायचे आहे.

coconut oil

ADVERTISEMENT

टीप- जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही खोबरेल तेल लावू नका. कारण त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मुळातच खोबरेल तेल लावल्याने अनेकांना मुरुमदेखील येऊ शकतात. त्यामुळे आयब्रोज वाढवण्याचा हट्ट तुम्हाला महागात पडू शकतो. 

आलियासारखी नितळ त्वचा तुम्हालाही हवी का?

कॅस्टर ऑईल

केसांच्या वाढीसठी कॅस्टर ऑईल हे महत्वाचे असते. एक इयर बड घेऊन तुम्हाला कॅस्टर ऑईल आयब्रोजच्या उलट बाजूने लावायचे आहे.  कॅस्टर ऑईल लावायला थोडे जड असते. कारण ते खोबरेल तेलासारखे पातळ नसते. दररोज रात्री हे तेल लावायचे असेल उलट दिशेने तेल लावून तसेच ठेवा. हे तेल रात्री लावल्यास उत्तम. आता सकाळी उठून  हे तेल चेहऱ्यावरुन काढून टाकणे ही तितकेच महत्वाचे आहे. कारण जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर या तेलामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात. त्यामुळे हे तेल काढण्यासाठी मेकअप क्लिंझरचा वापर करा. त्यामुळे तेलही निघून जाईल.

ADVERTISEMENT

caster oil

कांद्याचा रस

आता तुम्हाला हा काय विचित्र पर्याय असे वाटेल. कारण अनेकांना कांद्याचा वासही सहन होत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? केसांसाठी सल्फर आवश्यक असते.  कांद्यामध्ये सल्फर असते. सल्फर केसांची वाढ करण्यासाठी आवश्यक असते. एक कांदा घेऊन त्याची पेस्ट करुन घ्या.वाटलेल्या कांद्यातील रस काढून घ्या. तो रस तुम्ही तुमच्या आयब्रोजना लावा. काही दिवसांनी तुम्हाला तुमचे आयब्रोज जाड झालेले दिसतील. साधारण एक महिनाभर तुम्हाला हा रस आयब्रोजना लावायचा आहे.

झटपट केस वाढवण्यासाठीचे हे आहेत झटपट उपाय

ADVERTISEMENT

onion juice

 अशी घ्या आयब्रोजची काळजी

खूप जणांना कुठेही आयब्रोज करायची सवय असते. पण असे करु नका. कारण एखाद्या व्यक्तिला तुमचे आयब्रोज करायची सवय झाल्यानंतर तुमच्या आयब्रोजचा आकार त्यांना नीट माहीत असतो. त्यांना कोणत्याही एक्स्ट्रा टीप्स द्याव्या लागत नाहीत. 

eyebrows 1

ADVERTISEMENT

आयब्रोजजवळची त्वचाही वेगळी असते. काहींची त्वचा सैल असते. त्यामुळे आयब्रोज करताना कधी कधी ती त्वचा ओढली देखील जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला दुखापतही होऊ शकते. त्यामुळे इतर कोणाकडूनहीआयब्रोज करु नका. हे या मागचे कारण असते. 

 आयब्रोजची वाढ ही प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून असते. त्यामुळे कदाचित आयब्रोज वाढायलादेखील लागणारी वेळही वेगवेगळी असू शकते. काहींचे केस पटकन वाढतात. त्यामुळे अगदी केसांच्या वाढीसारखीच आयब्रोजची वाढ अवलंबून असते. काही जणांचे आयब्रोज आठवड्यातच वाढतात. तर काहींना महिना देखील लागू शकतो. पण थोडी श्रद्धा आणि सबुरी ठेवलीत तर तुम्हालाही चांगले आयब्रोज नक्कीच मिळू शकतील.

आयब्रोजवर सतत प्रयोग करणे टाळा. खूप जणांना फॅशनप्रमाणे आयब्रोजचे आकार बदलण्याची सवय असते. पण तसे करु नका. तुमच्या चेहऱ्याला साजेशे आयब्रोजच तुमच्या चेहऱ्यावर असतात. काहींचे आयब्रोज अगदीच लाईट असतात.काहींच्या आयब्रोजचे केस दाट असतात. तुमच्या चेहऱ्याला शोभेल असेच आयब्रोज तुम्ही करा. कारण एखाद्याला जाड आयब्रोज चांगले दिसतात म्हणून तुम्ही ते करायला जाल तर तुम्हाला ते चांगले दिसतीलच असे नाही.

असे करा झटपट आयब्रोज जाड

ADVERTISEMENT

हल्ली सगळ्या गोष्टींचे इन्स्टंट इलाज असतात. आयब्रो फिलर नावाचा प्रकार हल्ली सहज मिळतो. त्या आयब्रो फिलरचा वापर करुन तुम्ही तुमचे आयब्रोज इन्सस्टंट थीक करु शकता. पण ते करता करता तुम्हाला नॅचरली आयब्रोज वाढवायचे असतील तर हे सगळे प्रयत्नही सुरु करा. थोडा वेळ लागेल पण तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल.

जाड आयब्रोजचा ट्रेंड

सध्या सगळीकडे पाहाल तर तुम्हाला मुली जाड आयब्रोजमधील त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात. फोटोमध्ये ते अधिक खुलून दिसतात. त्यामुळे मला पण जाड आयब्रोज हवे असा अनेकांचा हट्ट असतो.  

पूर्वी बारीक आयब्रोजचा ट्रेंड होता. पण आता मेसी, जाड, न कोरलेल्या आयब्रोजच अधिक चांगल्या दिसतात. त्यामुळे आता आयब्रोजमध्ये कधी काय फॅशन येईल सांगता येत नाही.

ADVERTISEMENT

आयब्रोजचे वेगवेगळे आकार

आयब्रोजचे वेगवेगळे आकार असतात हे माहीत आहे का? तुम्ही तुमचा चेहरा आरशात नीट बघा आणि तुमच्या आयब्रोजचा आकार ओळखा. कारण तुमच्या आकारानुसार तुम्हाला जाड आयब्रोज शोभून दिसतील की नाही हे देखील अवलंबून आहे. कारण सगळ्याच आकारामध्ये जाड आयब्रोज चांगले दिसतीलच असे नाही त्यामुळे तुमच्या आयब्रोजचा आकार ओळखून मगच आयब्रो जाड करायचे ठरवा.

धनुष्याकृती आयब्रोज

  या प्रकारच्या आयब्रोजना धनुष्याकृती आयब्रोज म्हणतात. याय आयब्रोजमध्येही विविधता असते. धनुष्याचा बाक हा प्रत्येकाच्या चेहऱ्यानुसार असतो. असे आयब्रोज जाड चांगले दिसतात. त्यामुळे तुमच्या आयब्रोजचा आकार तसा असेल तर तुम्हाला थोडे जाड आयब्रोज करायला काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

गोल आयब्रोज

काही जणांच्या आयब्रोजचा आकार गोल असतो. गोल आकाराच्या आयब्रोजबाबत सांगायचे झाले तर जुन्या काही चित्रपटातील अभिनेत्रींचे आयब्रोज गोल असायचे. त्यावर पूर्वी काजळ पेन्सिल फिरवली जायची. पण आता असे आयब्रोज फारच कमी लोकांचे असतात किंवा आता नाहीच असे म्हणायला हरकत नाही. गोल चेहऱ्याच्या व्यक्तिंनी तर गोल गरगरीत आयब्रोज शोभतही नाही. त्यांचा चेहरा त्यामुळे अधिक मोठा दिसू लागतो. 

 स्ट्रेट आयब्रोज

तर काहींचे आयब्रोज अगदी सरळ असतात. त्याला कुठेही बाक नसतो. अनेकदा असे आयब्रोज गडज असतात. त्यामुळे ते चांगले दिसतात.अशा प्रकारचे  तुमचे आयब्रोज असतील. पण ते पातळ आणि बारीक असतील तर ते वाढवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करायला हवा.

ADVERTISEMENT

stright eyebrows

 (फोटो सौजन्य- Instagram)

 

 

ADVERTISEMENT

 

 

 

14 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT