#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय in Marathi | POPxo

#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

आपले केस लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महाग पॅकेज खरेदी करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, हे सर्व न करताही केस लांब करता येऊ शकतात तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. आपल्या घरीच असे काही उपाय आहेत, ज्यामुळे केस महिनाभरात लांबसडक वाढण्यास मदत होते. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य घरगुती उपाय करण्याची गरज आहे. हे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ते तुम्ही घरच्याघरी नक्की करून पाहा.



केस लवकर वाढवण्यासाठी घरगुती उपाय - Home remedies to grow hair faster in Marathi


अशी घ्या केसांची काळजी- Hair care in Marathi


केस वाढवण्यासाठी गरजेचा आहार - Food for hair growth in Marathi


केस वाढवण्यासाठी प्रश्न - उत्तर - FAQ’s



सर्वात पहिल्यांदा केस न वाढण्याचं अथवा केस गळतीचं नक्की काय कारण आहे ते जाणून घ्या…


1. आपल्या रोजच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात ताणतणाव असल्यामुळे केस गळती आणि केस न वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे.


2. औषधांचं अधिक सेवन हेदेखील केस न वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. याचे बरेच दुष्परिणाम आहेत, जे सर्वात पहिल्यांदा आपल्या केसांवर होत असतात आणि त्यामुळेच केसगळती जास्त प्रमाणात सुरु होते.


3. आपलं डाएट बऱ्याच अंशी केसांची वाढ होण्यासाठी मदत करत असतं. पण खाण्यामध्ये फास्ट फूड आणि आरोग्याला अपायकारक असं खाणं जास्त प्रमाणात खात राहिल्यास, केसगळती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोषक आहाराची मात्रा वाढवा.


Baal-Lamba-karne-ke-tareeke


वाचा - पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय


4. केसांमध्ये अधिक केमिकलचा वापर केल्यासदेखील केसगळती जास्त प्रमाणात होते. आपण बऱ्याचदा केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करण्यासाठी त्यावर जेलचा वापर करत असतो. त्यामुळे केसगळतीमध्ये वाढ होते.


केस लवकर लांब वाढवण्यासाठी 10 घरगुती उपाय - Home Remedies to Grow Hair Faster in Marathi
उपाय 1-  एका वाटीमध्ये 1 चमचा नारळ तेल, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 1 चमचा मध आणि एक अंड हे सर्व एकत्र करून चांगलं मिश्रण बनवून घ्या. हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळापासून लावा आणि साधारण एक तासापर्यंत ठेवून द्या. त्यानंतर केस थंड पाण्याने धुवून घ्या. हे मिश्रण लावल्यानंतर कधीही गरम पाण्याने धुऊ नये हे कायम लक्षात ठेवा. गरम पाण्याने धुतल्यास, तुमच्या केसांना अपाय होऊ शकतो. या उपायामुळे तुमचे केस लांबसडक आणि चमकदार होतील. केसांवर याचा चांगला परिणाम होण्यासाठी तुम्ही साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग तुमच्या केसांवर करू शकता. एका महिन्यामध्ये तुमचे केस लांबसडक होण्यास सुरुवात होईल आणि केसांवर सकारात्मक परिणाम दिसेल.


उपाय 2- एक अंडे, दोन ते अडीच चमचे ऑलिव्ह ऑईल, एक व्हिटामिन ई कॅप्सूल, एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर आणि २ थेंब इसेन्शियल ऑईल हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवून घ्या. इसेन्शियल ऑईल हे अंड आणि अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वास कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. ही पेस्ट तुम्ही केसांच्या मुळांपासून लावा आणि एक तासानंतर शॅम्पूने केस धुवा. केस धुतल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही कंडिशनरचादेखील वापर करू शकता. 15 दिवसातून एक वेळा तुम्ही केसांवर ही पेस्ट लावू शकता.


उपाय 3- मध्यम आकाराचा अव्हॅकॅडो आणि एक छोटं केळं मॅश करून घ्या. आता त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि व्हिट जर्म ऑईल मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना लावून केसांना हलक्या हाताने मसाज करा आणि साधारणतः अर्धा तास केस तसेच ठेवा. त्यानंतर केस शॅम्पू लावून थंड पाण्याने धुवा. असं आठवड्यातून तुम्ही दोन वेळा केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.


उपाय 4- एका भांड्यात एक चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकाकाई पावडर, 2 चमचे नारळाचे तेल हे सर्व एकत्र घालून उकळून घ्या. थोडं थंड झाल्यानंतर आपल्या केसांवर लावून मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी हे करा आणि सकाळी तुमचे केस शँपूने धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.


वाचा - सुंदर केसांसाठी या 8 क्लुप्त्या वापरा आणि बदला तुमचं जग


उपाय 5- तुमचे केस जर कोरडे आणि डॅमेज असतील तर एका केळ्यामध्ये 4 चमचे नारळाचे तेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 2 चमचा मध घालून त्यामध्ये मिक्स करून घ्या. आता हे मिक्स्चर केसांना लावा आणि मग शॉवर कॅपच्या सहाय्याने केस कव्हर करून घ्या. काही आठवड्यातच तुमचे केस चमकदार होतील.   


उपाय 6- एका बाऊलमध्ये अर्धा कप मध घ्या आणि त्यामध्ये 4 चमचे ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरून ठेवा. हे कंडिशनर आता केसांना लावा आणि 30 ते 40 मिनट्ससाठी शॉवर कॅप घालून ठेवून द्या. त्यानंतर केस नीट धुवून घ्या.


उपाय 7- एक नाशपाती घेऊन पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये 2 चमचे पाणी, 3 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 2 चमचे मलई घालून थोडं घट्ट मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावून 20 ते 30 मिनिट्स लाऊन ठेवा आणि शॉवर कॅपच्या मदतीने केस झाकून ठेवा. त्यानंतर केसांना साध्या पाण्याने धुवा. नाशपतीमध्ये केसांची चमक वाढवण्याची मात्रा जास्त असते. त्यामुळे केस चमकदार होतात.


Baal-Lamba-karne-ke-tareeke-1


उपाय 8 - कडिलिंबाची काही पानं घेऊन 4 कप पाण्यात घालून उकळून घ्या. त्यानंतर ही पानं थंड झाल्यावर काढून घ्या. आता जे पाणी शिल्लक राहिलं आहे त्याने केस धुवावे. त्यामुळे केस लवकर वाढतील.


उपाय 9- 15 ते 20 कडिपत्ते आणि एका लिंबाची सालं घ्या. यामध्ये सोप नट पावडर, हिरवे चणे आणि मेथीचे दाणे कुटून घ्या. आता हे मिश्रण केसांना लावा आणि काही वेळाने शँपूने धुवून घ्या.


उपाय 10- 3 वाटलेल्या कांद्याच्या बियांमध्ये 3 चमचे वाटलेले मेथीचे दाणे मिसळून घ्या. आता यामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. यानंतर यामध्ये 1 चमचा कोरफड जेल आणि दोन व्हिटामिन ई कॅप्सूल अथवा कॅस्टर ऑईल घालून मिश्रण करावं. तुमच्या केसांमध्ये जर कोंड्याची समस्या असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे नारळाचे तेलदेखील घालू शकता. हे मिश्रण तुम्ही केसांच्या मुळावर लावा. एक तासाने केस शँपूने धुवा.


वाचा - बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे 


Baal-Lamba-karne-ke-tareeke-2


केस वाढवण्यासाठी शँपू (Shampoo for Hair Growth)
अरोमा मॅजिक त्रिफला शँपू (Aroma Magic Triphla Shampoo)


Aroma-Magic
अरोमा मॅजिक त्रिफला शँपूमध्ये तीन वनस्पती असून या पोषक आहेत. या वनस्पतींचा सर्वात जास्त उपयोग घरगुती उपचारांसाठी केला जातो. यामुळे तुमच्या मुळापासून साफ करतात आणि तुमच्या केसांना चांगलं पोषण देऊन मजबूती मिळते. तुमचे केस जर तेलकट असतील आणि दर दोन दिवसांनी जर तुमच्या केसांमध्ये तेल जमा होत असेल तर, तुम्ही हा शँपू नक्की वापरा. तेलकट केसांसाठी हा शँपू खूप चांगलं काम करतो. तुमचे केस जर कोरडे असतील तर, हा शँपू वापरू नका कारण यातील शिकाकाई कोरड्या केसांसाठी अजून वाईट ठरू शकते. त्यामुळे या शँपूमुळे केस अजून कोरडे होण्याची शक्यता असते.


वाचा - केसांची वाढ होऊ न देण्यासाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आणि केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय


व्हीएलसीसी नॅचरल सायन्स सोया प्रोटीन कंडीशनिंग शँपू (VLCC Natural Sciences Soya Protein Conditioning Shampoo)


VLCC
केसांच्या पोषणासाठी तुम्हाला प्रोटीन आणि विटामिनची सर्वात जास्त आवश्यकता असते. प्रोटीन आणि विटामिनच्या भरपूर मात्रेमुळे हा शँपू केसांना लवकर वाढ देण्यास मदत होते. सोया प्रोटीनचा आर्क आणि बदामाच्या तेलाने समृद्ध असल्याने केसांच्या मुळापर्यंत जाऊन हा शँपू काम करतो. यामध्ये हळद असून अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक दोन्ही असते. यामुळे हळूहळू केसांतील घाण साफ होते, कोंडाही होत नाही आणि केसांचे मूळ मजबूत होते. याचं वैशिष्ट्य असं आहे की, हा शँपू तेलकट आणि कोरडे अशा दोन्ही केसांसाठी उपयोगी आहे.


बायोटिक बायो केल्प फ्रेश ग्रोथ प्रोटीन शँपू (Biotique Bio Kelp Fresh Growth Protein Shampoo)


Biotique
तुमचे केस गळण्याची बरीच कारणं असू शकतात. स्कॅल्प इन्फेक्शन, कोरडेपणा, कोंडा इत्यादी कारणं आहेत. तुमचे केसदेखील यापैकी कोणत्याही समस्येचे शिकार असतील तर हा बायोटिकचा प्रोटीन शँपू नक्की वापरून पाहा. यामध्ये लिंबू आणि आवळ्याचे भरपूर गुण आहेत. तुमच्या केसातील घाण साफ हा शँपू करतो आणि तुमचे केस अधिक पोषक बनवण्यसाठी मदत होते. बायोटिकची उत्पादनं ही नैसर्गिक असून केमिकलमुक्त असतात. जी त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे या ब्रँडच्या विश्वासनीयतेबाबत तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. तेलकट आणि कोरड्या दोन्ही केसांसाठी हे उपयुक्त आहेत.


वाचा - काळ्याभोर दाट केसांसाठी वरदान ‘आवळा' (Amla), जाणून घेऊया केसांच्या प्रत्येक समस्येवरील घरगुती उपाय


अशी घ्यावी केसांची काळजी - Hair Care in Marathi


1- तुमच्या केसांना दर  5 ते 6 आठवड्यांनी ट्रीम करत राहायला हवं आणि केसांना वाढण्यासाठी याची मदत होते. वेळोवेळी केस ट्रीम करत राहिल्यास, केसदेखील दाट राहतात.


2- आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा शँपू करा आणि शँपू करण्याच्या आधी तेलाने मालिश करणं विसरू नका. असं केल्यामुळे केसांना फाटे फुटणार नाहीत आणि कोरडेदेखील होणार नाहीत.


3- आठवड्यातून दोन वेळा केसांना अंड्याच्या बलकाने 5 मिनिट्स मसाज नक्की करा. मसाजनंतर केसांना शँपूने धुऊन घ्या. आपल्या केसांना अधिक मऊ आणि चमकदार बनवतात.


4- केस कधीही गरम पाण्याने धुऊ नका कारण तुमचे केस मुळापासून त्यामुळे कोरडे होतात. मुळापासून केस कोरडे झाल्यास, कोंडा आणि खाज होण्याची शक्यता असते.


5- कधी कुरळे तर कधी स्ट्रेट स्टाईल करण्यासाठी बऱ्याचदा स्टायलिंग टूल्सचा वापर करू नका. यामुळे तुमच्या केसांना नुकसान पोहचू शकतं.


6- केस धुतल्यानंतर कधीही टॉवेलने घासू नका. असं केल्यामुळे केस तुटू लागतात. याऐवजी तुम्ही कोणत्या तरी कॉटनच्या कपड्याने केसांना हलकं-हलकं पुसून घेऊ शकता. त्यामुळे केसांचा मुलायमपणा टिकून राहतो.


7- तुम्ही जर बऱ्याच वर्षांपासून एकच शँपू वापरत असाल तर कदाचित तुमच्या केसांना त्या शँपूची सवय झालेली असते. त्यामुळे तुमच्या केसांवर त्या शँपूचा परिणाम होत नसतो आणि तुमच्या केसांतील नैसर्गिक तेलदेखील निघून जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही शँपू बदलत राहायला हवे कारण त्यामुळे तुमच्या डोक्याला शांतता मिळते आणि कोणत्याही एका शँपूची सवयदेखील तुमच्या केसांना होत नाही.


8- शँपू आणि कंडिशनर लावल्यानंतर केसांना अॅप्पल सायडर व्हिनेगर लावा आणि मग धुवा. कोणत्याही घाण वासाशिवाय केस मऊ होतील आणि केसांमध्ये चमकदेखील येईल.


9- फ्रिजी केस कोरडे, गुंतलेले आणि वाईट दिसतात. त्यासाठी कंडिशनिंग केल्यानंतर डोकं खाली करून गार पाण्याने थोडा शॉट मारा. त्यामुळे तुमचे हेअर क्युटिकल्स सील होतात आणि फ्रिजी केसांपासून सुटका मिळते.


Priyanka


केस वाढवण्यासाठी आवश्यक आहार - Food for Hair Growth in Marathi
1- ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे केस आणि त्वचेला पोषण देण्याचं काम करत असतं. यामुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होत असतो. त्यामुळे ओमेगा 3 जास्त असणारे पदार्थ खायला सुरुवात करायला हवी. तुम्हाला हवं तर डाएटमध्ये मच्छी, अक्रोड आणि दुधी यासारख्या पदार्थांचा समावेश करा. या पदार्थांमध्ये ओमेगा 3 चं प्रमाण जास्त असते.


2-  प्रोटीनमुळे केवळ केसांचा विकासच होत नाही तर प्रोटीन केसांना पोषकही असतो. अशामध्ये लांबसडक केस हवे असल्यास, आजपासूनच अंडे, चिकन, मच्छी, डाळी, दूध आणि यापासून बनलेले पदार्थ खायला सुरुवात करा. या सर्व पदार्थांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे केसांची वाढ लवकर होते.


3- केस वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हिटामिन सी चं प्रमाण वाढवा. तुमच्या डाएटमध्ये संत्रे, ब्रोकोली, आवळा आणि अन्य फळांचं प्रमाण वाढवा आणि तुमच्या केसांना लागणाऱ्या आवश्यकता पूर्ण करा.


4- शरीरात आयर्नचं प्रमाण कमी असल्यास, जास्त प्रमाणात केसगळती होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या फळभाज्या खा.


5- रोज गाजराचं ज्युस प्यायल्यास, केस लवकर वाढतात. हे केसांच्या त्वचेवर नैसर्गिक तेल राखून ठेवण्यास मदत करतं आणि त्यामुळे केस मजबूत होतात आणि लवकर वाढतात.


6- अव्हाकॅडो विटामिन ई साठी सर्वात चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये याचा सलाड म्हणून वापर करू शकता.


केस वाढवण्यासाठी प्रश्न - उत्तर / FAQ’s
प्रश्न- केस वाढवण्यासाठी सर्वात आवश्यक विटामिन कोणते आहेत?
उत्तर- केसांना स्वस्थ आणि सुंदर ठेवण्यासाठी विटामिन ए, बी, सी, डी, ई, बी कॉम्प्लेक्स याची गरज असते.


प्रश्न - केस वाढण्यासाठी आयोडिनचा कशा प्रकारे उपयोग होतो?
उत्तर - आयोडिन म्हटलं की, सर्वात पहिले मनात येतं ते मीठ. पण तुम्हाला माहीत आहे का आयोडिन हे केसांसाठीदेखील फायदेशीर असतं. आयोडिनमध्ये झिंक, आयर्न आणि मॅग्नेशियमचं प्रमाण असतं. याचा उपयोग केवळ केसांची वाढ होण्यासाठीच नाही तर केसांच्या मजबूतीसाठीदेखील होतो. आयोडिनमध्ये अँटीबॅक्टेरिया, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुण असतात जे कोणत्याही संक्रमणाशी दोन हात करू शकतात. यामुळे केसगळती थांबते. तुमच्या केसांचा मुळापासून यामुळे पोषण होतं. आयोडिन केसांचा कोरडेपणा, केसगळती आणि वेळेपूर्वी केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका देते. तसंच मुळापासून केसांना यामुळे मजबूती मिळते आणि केस दाट आणि घनघोर बनविण्यासाठी मदत होते.


फोटो सौजन्य - Shutterstock


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय


लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय