तुमच्या मांडयावर तुम्हाला खड्डे पडलेले दिसतात. गालावर खळी शोभून दिसत असली तरी मांड्यावर celluliteमुळे पडलेल्या खळ्या अजिबात चांगल्या दिसत नाही. जास्त मांडीचे व्यायाम आपल्या त्वचेला उग्र बनवतात. जर तुम्हाला तुमच्या इतर शरीराच्या तुलनेत तेथील त्वचा खडबडी जाणवत असेल तर तुम्हालाही शरीरावर cellulite आहे असे समजावे. या celluliteमुळे अनेकदा खूप जणींना शॉर्ट कपडे घालण्याचा खूपच कंटाळा येतो. आज आपण cellulite कशामुळे येतात आणि त्यावर झटपट काय उपाय करता येईल याविषयीच अधिक जाणून घेणार आहोत मग करायची का सुरुवात
Celluliteचा त्रास कोणाला होतो?
पुरुष आणि महिला दोघांनाही cellulite चा त्रास होऊ शकतो. परंतु महिलांमध्ये हे प्रमाण अधिक असते कारण महिलांच्या शरीरावरील फॅट, मसल यांच्यामध्ये सतत बदल होत असतो. जगभरातील आकडेवारीचा विचार करता साधारण ८० ते ९० टक्के महिलांना हा त्रास होतो. cellulite ला अनेक नावे देखील आहेत. Ornage peel skin, cottage skin, hail damage असे देखील म्हटले जाते.
तुम्हालाही हवेत का सेक्सी थाईज? मग घरच्या घरी करा हे व्यायाम
Cellulite होण्यामागील कारणे
cellulite तुमच्या त्वचेवर का येतात या मागे कोणतेही ठोस कारण सांगण्यात येत नाही. पण हे तुमच्या शरीरातील रचनेच्या बदलामुळे तुमच्या शरीरावर दिसू लागते असे म्हटले जाते. शिवाय महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त असण्याचे कारण असे की, महिलांची रचना ही पुरुषांच्या रचनेपेक्षा वेगळी असते. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे महिलांच्या रचनेत अनेक बदल होत असतात. मासिक पाळी,हॉर्मोन्स बदल,गर्भारपण या सगळ्याचा परीणाम महिलांच्या आरोग्यावर होत असतो.
- हार्मोन्स असंतुलित होणे
हार्मोन्स बदलाचा परीणाम तुमच्या शरीरावर अधिक होत असतो.महिलांच्या आयुष्यात अनेक बदल येत असतात. पाळी येण्यापासून ते जाईपर्यंतच्या मोनोपॉसपर्यंत त्यांच्या हॉर्मोन्समध्ये कित्येक बदल होत असतात. रक्तप्रवाहामध्ये अनेक बदल होत असतात. वयोमानानुसारही त्वचा सैल पडत जाते. मसलची रचना बदलत जाते त्यामुळेही cellulite येऊ शकतात.
आरोग्यदायी जायफळाचे फायदे वाचाल तर चकीत व्हाल
- वाढतं वजन
हॉर्मोन्स बदलाचा परिणाम तुमच्या वजनावरही होत असतो. तुमचे वाढते वजन तुमच्या मांड्यांवरील मांस वाढल्यानंतर तुम्हाला cellulite अधिक प्रकर्षाने दिसू लागतात. तुमचे वजन जर अधिक वाढत राहिले तर तुम्हाला तुमचे दंडही असेच काहीसे दिसतील.
- तुम्ही काय खाता ?
तुमच्या आहारावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही फॅट, कारबोहायड्रेट आणि मीठ असलेले पदार्थ खात असाल तर थोडे सावध राहा. कारण मांड्यावर cellulite वाढण्याचे हे महत्वाचे कारण आहे. तुमचे शरीर काटक राहण्यासाठी तुम्हाला अधिक फायबर खाण्याची गरज असते. जर शरीरातील फायबरचे प्रमाण कमी झाले तर तुमच्या मांडयावरील cellulite जास्त दिसू लागते.
यामुळेही cellulite होऊ शकतो
प्रत्येकाच्या कामाचे स्वरुप वेगळे असते. काहींचे काम हे सतत बसून असते. तर काहींना दिवसभर उभे राहायचे असते.म्हणजे शरीराला आवश्यक असणारी हालचाल ही दोन्ही परिस्थितींमध्ये होत नाही. त्यामुळेही cellulite होऊ शकतात.
चुकीच्या अंडरगार्मेंटसची निवडही यासाठी कारणीभूत ठरु शकते. तंग कपड्यांऐवजी हवा खेळती राहिल असे कपडे निवडण्याचा सल्ला तुम्हाला नेहमी दिला जातो. या मागे तुमचा रक्त प्रवाह सुरळीत राहावा हे कारण असते. पण जर तुम्ही तंग अंडरपँटस घालत असाल. तर त्याच्या इलास्टिकमुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होत नाही.त्यामुळेही तुम्हालाcellulite होऊ शकतात.
कोणत्या वयात होऊ शकते cellulite ?
साधारण २५ वर्षानंतर तुमच्या शरीरातील बदलामुळे cellulite होतात. पण आताच्या जंकफूडमुळे अनेक लहानमुलांमध्ये स्थुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता १३ ते १४ वर्षांपासूनच मुलांच्या शरीरावर असे cellulite दिसू लागतात..
आता या cellulite वर घरच्या घरी कसे उपाय करता येतील ते बघुयात
मसाज
cellulite वर जर कोणता चांगला उपाय असेल तर तो म्हणजे मसाज….. फुल बॉडी मसाजचे इतर अनेक फायदे आहेतच. पण तुमचा रक्तप्रवाह सुधारणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जर cellulite कमी करायचे असतील तर तुम्हाला तुमचा रक्तप्रवाह सुधारावा लागेल. त्यासाठी तुम्ही मसाज करुन घ्या. हा मसाज तुम्ही प्रशिक्षित व्यायाम करणाऱ्यांकडून करुन घ्या. कारण त्यांना तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या करण्याची योग्य पद्धत माहीत असते.
आता मसाज करण्याचा सल्ला दिला आहे म्हणजे केवळ एकदा किंवा दोनदा मसाज करुन cellulite कमी होणार नाहीत. तर तुम्हाला या मसाजमध्ये सातत्य ठेवायचे आहे. महिन्यातून किमान एकदा आणि शक्य असल्यास दोनदा मसाज करवून घेतल्यास उत्तम!
प्रेग्नंसीनंतर सुडौल दिसण्यासाठी हे करा उपाय
कॉफी मास्क
cellulite वर कॉफी हा घरगुती उपाय आहे. यासाठी तुम्हाला जाड दळलेली कॉफी लागेल. एका भांड्यात तीन ते चार मोठे चमचे कॉफी घेऊन कॉफी भिजेल इतके गरम पाणी घ्या. कॉफीमध्ये पाणी घालून पाणी संपूर्ण शोषून घेईपर्यंत थांबा. त्यानंतर त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल त्यात घाला आणि ही पेस्ट तुमच्या मांड्याना चांगली चोळा. हे करत असताना तुम्ही थोडा मसाज करा. आठवड्यातून साधारण तीन वेळा हा प्रयोग करुन पाहा. यातही तुम्हाला थोडे सातत्य ठेवायचे आहे. कॉफी मास्कमुळे cellulite कमी होईलच शिवाय तुमची त्वचाही मुलायम होईल.
पायांचे व्यायाम
cellulite पासून लवकर सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला पायांचे व्यायाम करण्यावाचून काही पर्याय नाही. स्क्वॉटसचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आवर्जून करायला हवेत. जर तुम्ही जीममध्ये जात असाल तर तुम्हाला पायांचे वेगवेगळे व्यायामप्रकार तुम्हाला नक्कीच माहीत असतील. उदा. जंपिग स्क्वॉटस,लंजेस,साईड लंजेस, फ्रंट लंजेस, स्ट्रेजिंग असे काही साधे काही व्यायाम प्रकार तुमच्या पायांवरील फॅट कमी करतात. तुमच्या पायांच्या नसा मोकळ्या करतात. अतिरिक्त फॅट कमी करतात. या शिवाय तुम्हाला शक्य असल्यास २० ते २५ मिनिटे सायकलिंग केलीत तर उत्तमच शक्य असल्यास रोजच्या रोज व्यायाम करा.
अॅपल सायडर व्हिनेगर
जर तुम्हाला वेट लॉससाठी अॅपल सायडर व्हिनेगर घ्यायला सांगितले असेल. तुम्हाला ते कसे घ्यायचे याची योग्य माहिती असेल तर अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन तुम्ही करु शकता. पण तुम्हाला ते घ्यायची माहिती नसेल तर तुम्हाला एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर आणि तितक्याच प्रमाणात पाणी घेऊन हे मिश्रण तुम्हाला तुमच्या cellulite असलेल्या ठिकाणी लावायचे आहे.
आहारात बदल
योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा त्रास होणार नाही. आहारात अधिक फळ असू द्या. शिवाय भरपूर पाणी प्या. तुमचा रक्तप्रवाह तर चांगला राहिल. शिवाय शरीरातील टॉक्झिकही शरीराबाहेर लघवीवाटे बाहेर पडेल.
या शिवाय बाजारात cellulite खास क्रिमही मिळतात त्यादेखील तुम्ही ट्राय करु शकता.
POPXO तुम्हाला St.Botanica 4D Coffee Slimming Gel – Anti Cellulite & Skin Toning (६४९ रुपये/ १०० मिली)
Biotique Bio Coco Butter Tissue Firming Body Balm (१४४ रुपये/५० ग्रॅम)
VLCC Shape Up Hips, Thighs & Arms Shaping Gel (३१६ रुपये / १०० ग्रॅम) हे काही ब्युटी प्रोडक्ट वापरण्याचा सल्ला देऊ
त्यामुळे या काही सोप्या टीप्स तुम्ही नक्की करुन पाहा आणि मग बिनधास्त घाला तुम्हाला हवे असलेले शॉर्ट अॅण्ड हॉट ड्रेसेस
(फोटो सौजन्य- Instagram)