आरोग्य आणि चवीचा खजिना आहे जायफळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान (Benefits Of Jaiphal In Marathi)

आरोग्य आणि चवीचा खजिना आहे जायफळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान (Benefits Of Jaiphal In Marathi)

तुम्ही तुमचं आयुष्य अधिक सुंदर करू इच्छित असाल तर तुमच्या स्वयंपाकघरातील असणाऱ्या जायफळाचं तुमच्या आयुष्यातील महत्त्व आधी जाणून घ्या. जायफळ हे फक्त स्वादासाठी नाही तर त्याच्या औषधीय गुणांसाठीदेखील तितकंच प्रसिद्ध आहे. त्वचेसंंबंधी समस्या असो वा आरोग्यासंबंधी, जायफळामध्ये तो प्रत्येक गुण आहे, जो या सर्व समस्यांचं समाधान आहे. नक्की जायफळाचे असे कोणते अद्भूत फायदे आहेत आणि काय नुकसान होतं आपल्या आयुष्यात याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तुम्हाला कदाचित जायफळाचे इतके फायदे नक्कीच माहीत नसतील. त्यामुळे जायफळ हे फक्त स्वादासाठी नाही तर तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचं औषध म्हणूनही किती कमाल करतं ते या लेखातून नक्कीच कळेल.


जायफळ काय आहे


जायफळाचे फायदे


जायफळाचे घरगुती उपाय


जायफळामुळे होणारं नुकसान


जायफळ काय आहे (What Is Nutmeg)


nutmeg-fruits-on-top
मिरिस्टिका वृक्षच्या बी ला जायफळ असं म्हणतात. दिसायला अतिशय लहान आणि साधारण 1 ते दीड इंच इतकं मोठं जायफळं असतं. याचं फळ झाडावर येतं आणि ते साधारण लाल आणि पिवळ्या अशा मिक्स रंगाचं असतं. पिकल्यानंतर हे फळ दोन भागामध्ये फाटतं आणि यातून जायफळ येतं. त्याला जावित्री असंही म्हणतात. जावित्रीच्या आतामध्ये असणारी गुठळी तोडल्यावर जायफळ येतं. जायफळ हे वनस्पतीजन्य नाव असून याला Myristica fragrans आणि संस्कृतमध्ये जातीफळ असं म्हटलं जातं. हे चीन, तैवान, मलेशिया, केरळ, श्रीलंका आणि दक्षिण अमेरिकामध्ये जास्त प्रमाणात पिकतं.


वाचा - पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का? 


जायफळाचे फायदे (Benefits Of Nutmeg In Marathi)


प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये जायफळ असतंच. जायफळ हे अधिक गोड असतं, तर जावित्री हे स्वादिष्ट असतं. खाण्याच्या पदार्थांमध्ये स्वाद आणण्यासाठी आणि चांगला सुवास आणण्यासाठी याचा मसाला म्हणून साधारणतः उपयोग केला जातो. इतकंच नाही तर पूर्वपरंपरागत चालत आल्यानुसार, जायफळ आणि जायफळाच्या तेलाचा उपयोग हा पचनक्रियेसंबंधित आजारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. आपल्यापैकी बरेच लोक हे जायफळाचा आणि जावित्रीचा उपयोग मसाला म्हणून करतात. पण तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे का की, जायफळामध्ये असे अनेक गुण असतात जे प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जायफळात बरीच पोषक तत्व असतात तसंच त्यामध्ये अँटीऑक्सीडंट, विटामिन्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुण, फायबर आणि मिनरल्सदेखील असतात. जे आपल्या शरीरा स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. लहान असो वा मोठा सर्वांसाठी  जायफळ हे एक वरदानच आहे. त्यामुळे जायफळ कोणकोणत्या रोगांपासून आपली सुरक्षा करतं आणि याचे अन्य फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.


त्वचेसाठी जायफळ (Nutmeg Benefits For Skin In Marathi)


खाण्यामध्ये स्वाद आणण्याव्यतिरिक्त जायफळामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे तुमच्या त्वचेशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लेमेट्री गुणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांना थांबवण्यासाठी मदत होते. जायफळ वापरल्यामुळे सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग, डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळं या सर्वांपासून सुटका होते. हेच नाही तर, बऱ्याच काळापासून असणारा चेहऱ्यावरील एखादा काळा डाग तुमची सुंदरता कमी करत असेल तर जायफळाच्या वापरामुळे ही समस्यादेखील दूर होते.


क्विनोआच्या दुष्परिणामांबद्दल देखील वाचा


सेक्समध्ये तुमची आवड वाढवण्यासाठी होतो जायफळाचा उपयोग (Nutmeg Forf Sex Drive)


Jaiphal-Ke-Fayde-in-hindi


वाचा - केसांसाठी दही कसं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या फायदे


जायफळ हे थकवा आणि तणाव दूर करण्याबरोबरच तुमची सेक्स करण्याची शक्ती वाढवण्यासाठीही मदत करते. ज्या पुरुषांचं वीर्य (Semen) पातळ असतं अथवा शुक्राणू (Sperm) कमी प्रमाणात तयार होत असतात त्यांच्यासाठी जायफळ औषध म्हणून काम करतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जायफळ हे सेक्शुअल अॅक्टिव्हिटी सकारात्मक तऱ्हेने वाढवतं. जुन्या काळी सेक्सशी निगडीत समस्यांचं समाधान हे जायफळच होतं आणि आजही याचा उपयोग पोराज सारखं औषध बनवण्यासाठी केला जातो. जे सेक्ससंबंधित आवड निर्माण करतं. जायफळ शारीरिक उत्तेजना जलदरित्या वाढवतं.


पचनतंत्रासाठी जायफळ (Nutmeg Benefits For Digestive System)


खाण्याच्या पदार्थामध्ये तुम्ही जायफळाचा वापर करत असाल तर हे खाण्यामध्ये स्वाद आणि सुगंध वाढवण्यासह तुमच्या पचनतंत्राची काळजी घेतं. जायफळ खाल्ल्याने भूक वाढते आणि पोटासंबंधी रोग अर्थात बद्धकोष्ठ, गॅस, पोटामध्ये मुरड येणं आणि डायरियासारख्या आजारापासून सुटका मिळवून देतं.


डोकेदुखीसाठी जायफळ (Nutmeg Benefits For Headache)


कितीही जास्त प्रमाणात डोकं दुखत असल्यास, जायफळाचा वापर केल्यास, मिनिटांमध्ये हे दुःख दूर होईल. हो हे खरं आहे. डोकं खूप दुखत असल्यास, पाण्यामध्ये अथवा कच्च्या दुधामध्ये जायफळ मिक्स करून त्याचा लेप डोक्याला लावल्यास, त्वरीत आराम मिळतो.


डोळ्यांसाठी जायफळ (Nutmeg Benefits For Eyes)


nutmeg-eye-care
जायफळात बरेच अँटी ऑक्सीडंट्स असतात जे डोळ्यांशी संबंधित आजारांपासून आपली सुरक्षा करतात. तसंच याचा वापर केल्यामुळे डोळ्यांना चांगलं दिसू शकतं. पण या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की, जायफळाचा वापर करत असताना अजिबात डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नये. याचा लेप तुम्ही लावत असाल तर डोळ्यांच्या बाहेरील त्वचेलाचा केवळ लावावा.


वाचा - Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का


अनिद्रामध्ये जायफळाचा उपयोग (Nutmeg Benefits For Insomnia)


अनिद्रा अर्थात रात्री झोप न येणं हे आपल्या सध्याच्या जीवनशैलीमुळे घडणारा एक प्रकार आहे. तुमची झोप पूर्ण होत नसेल तर दिवसभर डोकं जण होतं, शरीरामध्ये थकवा येतो आणि चिडचिडेपणा येत राहतो. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, एक चिमूटभर जायफळ खाल्ल्याने व्यवस्थित झोप येते. जायफळात ट्रायमाइरिसटिन नावाचं केमिकल असतं. त्यामुळे आपल्या मांसपेशींना आराम मिळून चांगली झोप येते. त्यामुळेच जायफळ खाल्ल्यानंतर नेहमी झोप येते.


गरोदरपणात जायफळ (Nutmeg Benefits For Pregnancy)


गरोदरपणादरम्यान जर जायफळ योग्य प्रमाणात वापरलं गेलं तर ते अतिशय फायदेशीर ठरतं. तुम्ही जर गर्भधारणा करण्याच्या विचारात असाल तर जायफळाचा खूपच चांगला उपयोग होऊ शकतो. पण जर तुम्ही गरोदर राहिल्यानंतर जायफळ खायचा विचार करत असाल तर त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


बाळांसाठी जायफळ (Nutmeg Benefits For Children)


nutmeg-for-child
लहान मुलांसाठी जायफळ हे घरामध्ये एका डॉक्टराचं काम करतं. लहान बाळाच्या शरीरामध्ये सतत काही ना काहीतरी चालू असतं. लहान बाळांना जंत अथवा सर्दी खोकला हे आजार सतत होत असतात. त्यामुळे अशा वेळी जायफळ अतिशय फायदेशीर ठरतं. 9 महिन्याच्या लहान बाळाला अगदी आईच्या दुधातही मिसळून चूर्ण बनवून दिल्यास, जंत आणि खोकला - सर्दीसारखे आजार निघून जातात.


क्विनोआ विषयी देखील वाचा आणि त्याचे केसांसाठी मराठी मध्ये फायदे


जायफळाचे घरगुती उपाय (Home Remedies Of Nutmeg In Marathi)


 • तुम्हाला तुमचा चेहरा डागमुक्त हवा असल्या, तुम्ही 1 चमचा जायफळ पावडर, 1 चमचा दही आणि 1 चमचा मध घ्या. एका वाटीमध्ये जायफळ पावडर घ्या आणि त्यात दही आणि मध एकत्र करा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लाऊन 15-20 मिनिटं ठेवा आणि 20 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा साफ धुवा.

 • एक ग्लास दूधामध्ये एक चिमूटभर जायफळ पावडर घालून प्यायल्यामुळे सर्दीचा परिणाम राहत नाही. ज्या लोकांना जास्त थंडी वाजते त्यांनी हे नक्की करून पाहा.

 • जायफळाचं तेल हे मांसपेशींचं दुखणं, सांधेदुखी आणि आर्थरायटिस या आजारांपासून सुटका देण्यासाठी उपयुक्त ठरतं.

 • तुम्हाला जर सतत तोंड येत असेल आणि ठीक होत नसेल तर जायफळ पाण्यामध्ये उकळवून त्या पाण्याने खळाखळा चूळ भरावी. हे केल्यामुळे तोंडाला आलेले फोड निघून जातील.

 • डिलिव्हरी झाल्यानंतर कोणत्या महिलेला सतत कंबरदुखी जाणवत असेल तर जायफळ किसून पाण्यामध्ये मिसळून कंबरेवर सकाळ - संध्याकाळ लावल्यास, नक्की आराम मिळेल.

 • साधारण 9 महिन्याच्या मुलाला जंत झाल्यास, जायफळ हा रामबाण उपाय आहे. जायफळ तुम्ही छोट्या वाट्यावर पाण्याचा थोडा थोडा थेंब घेत घासून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट दुधामध्ये मिसळून एक चमचा पाण्यामध्ये मिसळून लहान बाळाला पाजा. त्याला लगेच आराम मिळेल.

 • मुलांना नेहमीच सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असतो. त्यासाठी जायफळाची पावडर आणि सुंठ योग्य प्रमाणात घेऊन गायीच्या तूपमध्ये मिक्स करून सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा ते चाटण खायला द्या. लगेच आराम मिळेल.

 • दाताला कीड लागली असेल आणि जर दुःख सहन होत नसेल तर जायफळाचं तेल कापसाला लाऊन घ्या आणि त्याजागी लावा आणि साधारण त्या दाताखाली हा कापूस 2 ते 3 तास ठेऊन घ्या. त्यामुळे तुमचं दुःख निघून जाईल, कीड मरून जाईल.

 • तुम्ही जर पायाच्या भेगांमुळे त्रस्त असाल तर जायफळाची पावडर भेगांमध्ये भरा. काही दिवसातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल.

 • तुम्ही जर गर्भधारणेचा विचार करत असाल तर, जायफळ आणि खडीसाखर दोन्ही 50- 50 ग्रॅम योग्य प्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण तयार करा. मासिक पाळी आल्यावर 6 ग्रॅम इतकं हे चूर्ण खा. त्यानंतर सेक्स करा त्यामुळे गर्भधारणेची संभावना वाढते.

 • रात्री तुम्हाला जर झोप येत नसेल तर चिमूटभर जायफळाची पावडर घेऊन त्यामध्ये थोडंसं मध घालून झोपण्यापूर्वी 20 मिनिटं आधी हे खा त्यामुळे चांगली आणि भरपूर झोप येईल.

 • गॅस अथवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास, जायफळ आणि लिंबाच्या रसाची पेस्ट बनवून घ्या. सकाळी आणि संध्याकाळी ही पेस्ट दोन चमचे खा. यामुळे तुमची समस्या निघून जाईल.

 • तुम्हाला एखाद्या ठिकाणी लागल्यानंतर जर मोठी जखम झाली असेल तर, ती भरण्यासाठी वेळ लागतो. अशावेळी जायफळाचं तेल तुम्ही जखमेवर लावा आणि त्यामुळे घाव लवकर भरतो.


जायफळामुळे होणारं नुकसान (Side Effects Of Nutmeg In Marathi)


कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं वाईटच असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एका मर्यादेत वापर करायला हवा. जायफळाचंदेखील असंच आहे. तुम्ही जर जायफळ जास्त प्रमाणात घेत असाल तर तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतील आणि तुम्हाला त्यामुळे उलटी, कमजोरपणा, चक्कर येणं, मळमळणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जायफळाचा अधिक प्रमाणात वापर केल्यास, शरीरावर त्याचा तसाच परिणाम होतो, जसा एखाद्या मादक पदार्थ खाल्ल्यानंतर होतो. विशेषतः जेव्हा गर्मीच्या प्रदेशातमध्ये लोक राहतात, तेव्हा त्यांनी जायफळाचा जास्त वापर करणं योग्य नाहीये.


You Might Like This:


Health Benefits Of Giloy & How To Make Giloy Kadha In Marathi


Benefits Of Olive Oil For Skin, Hair & Health In Marathi


Also Read: Health Benefits Of Pistachios In Marathi


Beauty And Health of Avocado In Marathi