ADVERTISEMENT
home / फॅशन
तुमची उंची कमी आहे का मग फॉलो करा या फॅशन टीप्स – Fashion Tips For Short Height Girls in Marathi

तुमची उंची कमी आहे का मग फॉलो करा या फॅशन टीप्स – Fashion Tips For Short Height Girls in Marathi

प्रत्येकालाच गर्दीत उठून दिसावं असं वाटतं आणि त्यासाठी आपण मेहनतही घेत असतो. फॅशन (fashion) आणि सौंदर्याच्याबाबतीत नेहमीच चढाओढ दिसून येते. याकरिता दर महिन्याला काही जणी नियमितपणे ब्युटी पार्लरला जाण्यापासून ते बेस्ट ब्रँड्से आऊटफिट (outfit) ट्राय करण्यात सगळ्याच पुढे असतात. पण तरीही काही जणींची पंचाईत होते ती कमी उंची (height) मुळे. जर तुम्हाला फॅशन फॉलो करायची आहे पण कमी उंची असल्याने प्रॉब्लेम येत असेल तर चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला देणार आहोत काही खास फॅशन टीप्स (Fashion tips), ज्यांच्या मदतीने तुम्हीही होऊ शकता स्टाईल आयकॉन (style icon).

कमी उंची असल्यास फॉलो करा ‘या’ 30 फॅशन टीप्स (Fashion Tips For Short Height Girls)

1. ज्या मुलींची उंची कमी असतो, त्यांनी व्हर्टीकल स्ट्राईप (vertical stripe) असलेले ड्रेसेस, पँट्स, जीन्स, स्लिट्स (slits) आणि स्कर्ट्स घातले पाहिजे. जर थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही यासोबत ओपन स्ट्रेट कार्डीगन किंवा जॅकेट घालू शकता.

2. पाय लांब दिसावे याकरिता तुम्ही हाय वेस्ट बॉट्म्स (high waist bottoms) घाला. या बॉटम्स तुम्ही टेलर्ड क्रॉप टॉप किंवा फॉर्मल शर्ट्ससोबत पेअर करू शकता.

3. जर तुम्हाला फुल स्लीव्ह्सचा ड्रेस किंवा अपर वेअर घालायचं नसल्यास तुम्ही शॉर्ट स्लीव्ह्स किंवा स्लीव्हलेस ड्रेसही घालू शकता.

ADVERTISEMENT

1. Fashion Tips For Short Height Girls In Marathi

4. कमी उंची असणाऱ्या मुलींनी टर्टल किंवा बोट नेक डिझाईनचं अपरवेअर घालण्याऐवजी व्ही नेक डिझाईनला प्राथमिकता दिली पाहिजे. व्ही शेप्ड नेकलाईन (V shaped neckline) मुळे तुमची मानही लांब दिसेल.

5. जर तुम्हाला तुमची उंची जास्त आहे असं दाखवायचं असल्यास केप्री (capri) किंवा ¾ ट्राउजर्स (trousers) घालणं टाळा. काहीही लूज किंवा बल्की घालण्याऐवजी स्लिम स्टाईलचं लोअर वेअर घाला.

6. तुमच्या कपड्यांच्या रंगावरूनही तुमची उंची कळते. ब्लॅक, ब्राउन, रेड, पर्पल, डार्क टॅन आणि डार्क ग्रे यांसारख्या गडद रंगांमध्ये हाईट जास्त वाटते. स्लिम दिसण्यासाठीही गडद रंगांच्या कपड्यांचा वापर केला जातो.

ADVERTISEMENT

फॅशन कोट बद्दल देखील वाचा

2. Fashion Tips For Short Height Girls In Marathi

7. हाईटचं इल्यूजन वाटण्यासाठी मोनोक्रोम पॅटर्नही तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्ही एकाच रंगाचा जंपसूट किंवा गाऊन घातला तर तुमची हाईट जास्त वाटते. तुम्ही वरपासून खालपर्यंत एकाच रंगाचा आऊटफिट घातल्यास त्याला मोनोक्रोम (monochrome) आऊटफिट असं म्हणतात.

8. जर तुम्हाला डार्क कलरच्या आऊटफिटऐवजी हलक्या रंगांचे आऊटफिट घालायचे असल्यास क्रिम किंवा आयव्हरी रंगांची निवड करा.

ADVERTISEMENT

9. शॉर्ट हाईट (short height) च्या मुलींनी व्ही शेप नेकचा शर्ट, टॉप किंवा टी शर्ट ला क्रॉप्ड डार्क कलर जॅकेट आणि फिटींग असलेल्या जीन्ससोबत पेअर करावं. यामुळे त्यांची उंची जास्त वाटेल. जर तुम्हाला मिड- काफ बूट्स (mid – calf boots) घालायचे असल्यास सैलसर फिटींग असलेला शर्ट घालू नये. तुम्ही एखादा असा स्लिट ड्रेसही ट्राय करू शकता.

3. Fashion Tips For Short Height Girls In Marathi

10. जर तुम्हाला जीन्स किंवा ट्राउजर्स घालणं आवडत असेल तर स्किनी, हाय वेस्ट आणि हलक्या फ्लेयरच्या घाला.  तसंच तुमच्यावर स्ट्रेट लेग्सच्या जीन्स आणि ट्राउजर्सही ही छान दिसतील.

उंच मुलींसाठी फॅशन टिप्स देखील वाचा

ADVERTISEMENT

11. स्ट्रेट लेग जीन्स किंवा ट्राउजर घालायची असल्यास ती मीडियम किंवा डार्क कलरच्या अपर वेअरसोबत पेअर करावी म्हणजे तुमची उंची जास्त वाटेल. बल्की पॉकेट, कफ्स आणि प्लीट्स (pleats) च्या ट्राउजर्स किंवा केप्री घालू नका.

12. एक्सपर्ट्स सल्ला देतात की, हाईट जास्त दिसण्यासाठी लो वेस्ट जीन्स, क्रॉप्ड स्टाईल पँट्स आणि बेल बॉटम पँट्स (bell bottom pants) घालणं टाळावं.

13. जर तुम्ही एखाद्या खास फंक्शनसाठी साडी नेसणार असाल तर छोट्या बॉर्डरच्या किंवा बॉर्डर नसलेल्या साड्या नेसा. व्हर्टीकल प्रिंट्स किंवा बारीक प्रिंटच्या साड्या तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरतील. जर तुम्ही बारीक असाल किंवा फिगर स्लिम असल्यास तुम्ही शिफॉन, जॉर्जेट किंवा शिमरच्या साड्या नेसल्यास तुम्ही फारच सुंदर दिसाल.

14. जर तुमची हाईट कमी आहे आणि वजन जास्त असेल तर सिल्क, कांजीवरम, कॉटन आणि टीश्यू अश्या प्रकारच्या साड्या नेसणं टाळा.

ADVERTISEMENT

15. तुमची बॉडी फ्रेम लांब दिसावी म्हणून कमी उंची असलेल्या मुलींनी लांब कुर्ता घालाव. बंद गळा आणि चायनीज कॉलरचे कुर्ते तुमच्यावर खूप चांगले दिसतील. पफ्ड स्लीव्ह्जमुळेही तुमची उंची जास्त असल्यासारखं वाटेल.

4. Fashion Tips For Short Height Girls In Marathi

16. लांब कुर्ता नेहमी चुडीदारसोबत पेअर करा. जर तुम्ही एखाद्या फंक्शनला जाणार असाल तर अनारकली सूट घालायचा असल्यास तो व्ही नेकचा असावा म्हणजे जास्त उठून दिसेल. जर तुमचे खांदे ब्रॉड असतील तर चायनीज कॉलर आणि पफ्ड स्लीव्ह्सचे कुर्ते घालू नका.

17. लग्नाच्या मौसमात फॅशनसोबतच अप टू डेट राहायचं असल्यास आणि गर्दीतही उठून दिसणं हे जमवणं तसं सोप्पं नाही. जर तुम्ही एखाद्या खास लग्नाला किंवा दुसऱ्या एखाद्या फंक्शनला लेहंगा घालण्याचा विचार करत असाल तर मर्मेड स्टाईल किंवा ए लाईनचा लेहंगा घाला. व्हर्टीकल डिझाईनचा असा लेहंगा निवडा की ज्यामध्ये सुंदर अशी एम्बॉयडरी केलेली असेल.

ADVERTISEMENT

18. या लेहंग्यावर तुम्ही यु नेक किंवा स्क्वेअर नेकची छोटी चोली पेअर करू शकता. तुमची ओढणी वन साईड कॅरी करा, म्हणजे त्याच्या डिझाईनने खांद्यापासून गुडघ्यापर्यंत एक व्हर्टीकल लुक दिसेल.

5. Fashion Tips For Short Height Girls In Marathi

19. जर तुम्ही कुर्ता घालणार असाल तर तुमचा लांब कुर्ता अँकल लेंथ बॉटमसोबतही तुम्ही घालू शकता. अशी फॅशन केल्यास तुमची हाईट जास्त दिसेल.

20. तुमचा कुर्ता मॅचिंग कलर्ड बॉटमसोबत पेअर करा. ब्लॅक, नेव्ही ब्लू आणि रेड असे रंग तुमच्यावर जास्त उठून दिसतील.

ADVERTISEMENT

21. तुम्ही नेहमी बघितलं असेल की, मॉडेल आणि अॅक्ट्रेसेस फोटोसाठी पोज देताना नेहमी हात कमरेपासून थोडे वर ठेवतात. खरंतर अशी पोज दिल्याने तुमचे सर्व फीचर्स चांगल्यारीतीने हाईलाईट होतात. आजकाल ड्रेससोबतच  बेल्ट बांधायची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्ही बेल्ट लावणार असाल तर तो कमरेच्या थोडा वर बांधा. ज्यामुळे तुमचे पाय लांब वाटतील.

6. Fashion Tips For Short Height Girls In Marathi

22. कमी उंची असलेल्या मुलींनी ओव्हरसाईज बॅग कॅरी करू नये. मोठ्या बॅगमुळे शरीरावर जास्त वजन पडतं. ज्यामुळे उंची कमी वाटते. मोठ्या बॅगच्या ऐवजी छोटी बॅग, पर्स किंवा क्लच कॅरी करा.

23. जास्तकरून मुलींना लांब केस आवडतात आणि ते चांगले राहावेत म्हणून तुम्ही काळजीही घेता. जर तुमची उंची कमी असेल तर तुमच्यावर शॉर्ट हेअर जास्त चांगले दिसतील. छोट्या केसामुळे कमी उंचीच्या मुलींची नेकलाईन हाईलाईट होण्यास मदत मिळते.  

ADVERTISEMENT

24. लेटेस्ट फॅशन ट्रेंडमध्ये अप टू डेट राहण्याबाबत बोलायचं झाल्यास मॅक्सी ड्रेस मुलींमध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून लोकप्रिय आहे. पण जर तुमची हाईट कमी असेल तर मॅक्सी ड्रेस घालणं टाळा. त्या ऐवजी स्लिट असलेला ड्रेस तुमच्या वॉर्डरोबमध्ये सामील करा. जर तुम्हाला मॅक्सी ड्रेस घालायचा असल्यास लक्षात ठेवा की, खालून तो ड्रेस थोडा आखूड किंवा घट्ट असावा.

7. Fashion Tips For Short Height Girls In Marathi

25. जर तुम्हाला मोठ्या प्रिंटचे आऊटफिट्स आवडत असतील तर ही आवड बदला. जर तुमची हाईट जास्त दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर मोठ्या प्रिंट्स ऐवजी बोल्ड कलर्सला प्राधान्य द्या. यामुळे तुमचा बॉडी शेप उठून दिसेल आणि हाईटही जास्त भासेल.

26. फुटवेअर वापरूनही तुम्ही कधी कधी तुमच्या उंचीबाबत एक्सपेरिमेंट करू शकता. कमी उंची असलेल्या मुली सहसा हील्स वापरताना दिसतात. पण जेव्हा एखाद्या दिवशी तुमचा हील्स घालायचा मूड नसतो तेव्हा तुम्ही शूज, फ्लॅट्स किंवा अशा हील्स घाला ज्यांचं फ्रंट पाँईटेड असेल.

ADVERTISEMENT

27. शर्ट ड्रेस त्यांच्यावरच चांगला दिसतो. ज्यांचे पाय लांब असतात. खरं पाहता शर्ट ड्रेस तुम्हाला चौकोनी लुक देतो, ज्यामुळे तुमची हाईट कमी वाटते.

28. साडीसोबत फुटवेअर म्हणून वेजेस कॅरी करा आणि ब्लाऊजबाबत बोलायचं झाल्यास तुम्ही व्ही नेकचा ब्लाऊज घातल्यास तो जास्त सूट करेल.

29. सलवार किंवा प्लाझोसारख्या सैल लोअर वेअर्समध्ये तुमची हाईट कमी वाटते. त्यामुळे त्याऐवजी चूडीदार किंवा लेगिंग घाला.

8. Fashion Tips For Short Height Girls In Marathi

ADVERTISEMENT

30. जर तुम्हाला धोती पँट्स घालायला आवडत असेल तर लांब कुर्त्याऐवजी क्रॉप टॉप किंवा शॉर्ट कुर्त्यासोबत पेअर करा.

काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो आणि अशा गोष्टींबद्दल आपण स्वतःला त्रासही देऊ नये. त्यामुळे जर तुमच्या कमी उंचीमुळे तुम्हाला काय फॅशन फॉलो करायची हा प्रश्न सोडवायचा असल्यास वरील टीप्स नक्की फॉलो करून पाहा. तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच बूस्ट होईल. कारण या फॅशन टीप्स फॉलो करण्यासोबतच स्वतःची कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्याबाबतही विचार नक्की करा. कारण एकदा तुमचा कॉन्फिडन्स वाढला की तुम्हाला कधीच लो वाटणार नाही.

इनपूट्स : देवेंद्र गुप्ता, फाउंडर, इन्सेप्ट्रा लाईफस्टाइल (Inceptra Lifestyle – Tom Tailor), आशिमा शर्मा, ओनर, आशिमा एस काऊचर (Ashima S Couture), ब्रँड्स : डब्ल्यू & ऑरेलिया (Brands : W & Aurelia).

हेही वाचा – 

ADVERTISEMENT

कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज

ऑफिसमध्ये घालण्यासाठी परफेक्ट आऊटफिट्स

फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस

15 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT