‘माझे वजन खूपच वाढले आहे. वजन जरा कमी करायला हवे’ असे म्हणत वजन कमी करण्याचा विडा अनेकजण उचलतात आणि झटपट वजन कमी करण्याचे सगळे उपाय ट्राय करुन पाहतात. हे सगळे करुन अनेक जण इच्छित वजन कमी देखील करतात. पण तुम्हाला खरचं वजन कमी करण्याची गरज आहे का? तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारात काय बदल केलाय? वजन कमी करण्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम तर होत नाही ना? या सगळ्याचा विचार तुम्ही करायला हवा. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याआधी तुम्हाला काय लक्षात घ्यायचे आहे ते सांगणार आहोत.
तुम्ही नाही ना ‘फॅड’चे बळी
सगळ्यात आधी तुम्ही वजन का कमी करत आहात याचे कारण तुम्हाला माहीत हवे. अनेकदा शरीराच्या वाढत्या वजनाचा त्रास होत असेल तर डॉक्टर तुम्हाला वजन नियंत्रणात आणण्याचा सल्ला देतात. पण काहीजण केवळ फॅशनेबल कपड्यात स्वत:ला फिट करण्यासाठी वजन कमी करत असतात. जर त्या कारणासाठी तुम्ही वजन कमी करत असाल तर थांबा. कारण असे वजन कमी करणे तुम्हाला ठरु शकते त्रासदायक
सेक्सी थाईज हवेत तर हा व्यायाम आहे एकदम परफेक्ट
उंचीनुसार वजन
प्रत्येकाच्या उंचीनुसार किती वजन असायला हवे याचा एक अंदाज असतो. त्याचा एक चार्ट देखील असतो. त्या उंचीनुसार तुमचे वजन असणे आवश्यक असते. जर त्या चार्टनुसार तुमचे वजन कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आहारात बदल घडवून आणू शकता. जर तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन योग्य असेल तर तुम्हाला वजन कमी करण्याची काही गरज नाही कारण तसे केल्यास तुम्हाला आरोग्याशी निगडीत इतर त्रास होऊ शकतात.
उंची( cm) | आदर्श वजन (kilo) |
142 | 40-43 kg |
145 | 41-44 kg |
147 | 42-45 kg |
150 | 44-47kg |
152 | 45-48 kg |
155 | 46-50 kg |
157 | 48-51kg |
160 | 49-53kg |
162 | 51-54 kg |
उत्तम आहार,सुदृढ शरीर
आम्ही वारंवार एक गोष्ट तुम्हाला सांगत आलो आहोत ती म्हणजे डाएट म्हणजे उपाशी राहणे नाही. तर उत्तम आहार घेणे आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही खाणे सोडले असेल तर ते तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला योग्य पद्धतीने तुमचा डाएट करायचा असेल तर आम्ही दिलेला हा डाएट फंडा नक्की आजमावून पाहा.
आरोग्यासंदर्भातील तक्रारींचा करा विचार
कोणताही नवा प्रयोग करुन पाहताना तुमचे शरीर तुम्हाला साथ देईल का हे पाहणे देखील गरजेचे असते. जर तुम्हाला कोणता आजार असेल, तुम्ही कोणत्या आजारातून नुकतेच बरे झालेले असाल किंवा तुमची औषधे सुरु असतील तर तुम्हाला वजन कमी जास्त करणे महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वजन कमी करण्यासोबतच बहुगुणी आहे हर्बल टी
व्यायाम करताना
आहारासोबतच वजन आटोक्यात आणण्यासाठी शारिरीक व्यायाम गरजेचा असतो. हा व्यायामही तुम्ही योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. मनाला वाटेल तसा व्यायाम करण्यापेक्षा जाणकार व्यक्तिचा सल्ला घ्या. आवश्यक तितकाच व्यायाम करा. हल्ली वजन नियंत्रण ठेवण्याची औषधे बाजारात मिळतात. पण मेहनतीशिवाय वजन कधीच कमी होऊ शकत नाही हे ही लक्षात असू द्या.
मसल लॉस अत्यंत वाईट
जीम लावून तुम्ही खूप कार्डिओ करुन तुमचे वजन आटोक्यात आणल्याचा तुम्हाला आनंद असेल तर थांबा. कारण असे करत असताना तुमचे मसल लॉस झाले नाही ना ते पाहा. तुम्हाला काही वेळासाठी तुम्ही छान बारीक झाला असे वाटेल. पण तुमच्या शरीरातील ताकद मात्र कमी झालेली असेल. धाप लागणे, वजन उचलण्यास त्रास होणे, थकवा लागणे असा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
(फोटो सौजन्य- Shutterstock)
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल