तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे जाणून घेण्यासाठी वाचा या टीप्स (How To Know Your Skin Type In Marathi)

तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे जाणून घेण्यासाठी वाचा या टीप्स (How To Know Your Skin Type In Marathi)

माझी त्वचा कोणत्या प्रकारात मोडते हा प्रश्न अनेक जणींना पडतो आणि तो पडणे स्वाभाविक आहे. कारण बाजारात वेगवेगळ्या स्किनटाईपनुसार प्रोडक्ट उपलब्ध असतात. एखाद्याच्या त्वचेला शोभणारे क्रिम तुमच्या चेहऱ्याला शोभेलच असे होत नाही. म्हणूनच तुम्हाला तुमचा चेहरा त्वचेच्या कोणत्या प्रकारात मोडतो हे जाणून घेणे गरजेचे असते. पण अजूनही तुम्हाला तुम्ही कोणत्या स्किनटाईपमध्ये मोडता हे कळत नसेल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमचा त्वचेचा प्रकार कळू शकेल. पण त्याआधी त्वचेचे प्रकार किती ते जाणून घेऊया. 


त्वचेचे प्रकार


अशा पद्धतीने ओळखा तुमचा त्वचेचा प्रकार


त्वचेला होणाऱ्या त्रासावरुन ओळखता येऊ शकते त्वचा


तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार बदलू शकता का


त्वचेचे प्रकार (Different Types Of Skin In Marathi)


%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0 - How To Know Your Skin Type In Marathi


त्वचेचे सर्वसाधारणपणे चार प्रकार आहेत. प्रत्येक त्वचेची एक खासियत आहे. ती त्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण आधी जाणून घेऊया.


1. आदर्श त्वचा (Normal Skin)


अशा प्रकारच्या त्वचेला निसर्गदत्त देणगी म्हणायला हवे. कारण या त्वचेला सहसा कोणताच त्रास होत नाही. सकाळ असो की रात्र अशा प्रकारातील त्वचा दिवसभर छान तजेलदार राहते. शिवाय अशा त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळेच या अशा प्रकारच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तजेला असतो. अशा प्रकारच्या त्वचेवर तुम्हाला पोअर्स, ड्रायनेस अजिबात दिसणार नाही. म्हणूनच या त्वचेला आदर्श त्वचा म्हणत असावे.


2. कोरडी त्वचा (Dry Skin)


दुसरा त्वचेचा प्रकार आहे 'कोरडी त्वचा'. ही त्वचा नेहमीच शुष्क दिसते. थंडीत अशा प्रकारातील चेहरा पटकन फुटू शकतो. अशा प्रकारच्या त्वचेमध्ये मॉश्चरायझर फारच कमी असते. त्यामुळे अशा प्रकारची त्वचा असणाऱ्यांना जरा जरी लागले तरी ते लवकर जात नाही. त्यावर लगेचच रॅशेश यायला सुरुवात होते. ही त्वचा तुम्हाला कधीच टवटवीत आणि छान दिसत नाही. कारण त्वचेला आवश्यक ओलावा या त्वचेच्या प्रकारात नसतो.


3. तेलकट त्वचा (Oily Skin)


सगळ्यात तापदायक असा हा त्वचेचा प्रकार आहे. चेहरा जास्त प्रमाणात चकचकीत दिसतो. कपाळ, नाक, हनुवटी हे भाग चेहऱ्यावर चकचकीत दिसतात. पण या चकाकीमुळे ही त्वचा लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशी त्वचा पटकन ओळखता येते. या त्वचेची काळजी घेणे फारच महत्वाचे असते.


4. मिश्र त्वचा (Mixed Skin)


कोरड्या आणि तेलकट त्वचेचे मिश्रण असलेली त्वचा म्हणजे 'मिश्र त्वचा'. ही त्वचा तेलकट त्वचेप्रमाणे कपाळ, नाक, हनुवटीकडे चमकते. शिवाय ही त्वचा कोरड्या त्वचेप्रमाणे ऋतुमानानानुसार बदल होतात. अशी त्वचा शुष्क पडून फुटण्याची शक्यताही असते. ही त्वचाही फार जपावी लागते.


यातील तुमचा त्वचेचा प्रकार कोणता (How To Know Your Skin Type)


आता वर दिलेल्या त्वचेच्या प्रकारावरुन तुम्हाला त्वचेचे वेगवेगळे प्रकार कळले असतीलच. पण तरीही हा गोंधळ असेल की आपली त्वचा यापैकी कोणती? कारण कित्येकदा प्रकार सांगितला तरी आपल्याला आपला त्वचेचा प्रकार कळत नाही. खालील काही प्रकारातून तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे नेमके ओळखू शकता. म्हणजे या काही टीप्स आहेत ज्या फॉलो करुन तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखू शकता.


%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%9F %E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE - How To Know Your Skin Type In Marathi


1. ब्लॉटिंग पेपर (Blotting Paper)


 • ब्लॉटिंग पेपरच्या आधारे त्वचेचा प्रकार ओळखला जातो हे तुम्ही देखील ऐकले असेल. मेडिकलमध्ये किंवा ब्युटी प्रोडक्टस मिळत असलेल्या ठिकाणी ब्लॉटिंग पेपर सहज मिळतात.

 • रात्री तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. त्यावर काहीही न लावता तुम्हाला झोपायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला चेहऱ्यावर हात देखील फिरवायचा नाही. थेट आरशासमोर उभे राहून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ब्लॉटिंग पेपर लावायचा आहे.

 • तेलकट त्वचा - जर तुमचे कपाळ, नाक आणि हनुवटी या भागातून अधिक प्रमाणात तेल आले असेल. ब्लॉटिंग पेपर पूर्ण पारदर्शक झाला असेल तर तुमची त्वचा तेलकट प्रकारातील समजावी.

 • मिश्र त्वचा - जर ब्लॉटिंग पेपर नाक, हनुवटी आणि कपाळावर थोडेच तेल आले तर अशी त्वचा मिश्र त्वचा समजावी.

 • जर ब्लॉटिंग पेपरने तुमच्या चेहऱ्यावरील साधारण ओलसरपणा टिपला असेल तर ती त्वचा आदर्श त्वचा आहे असे समजावे.


चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय? करा घरगुती उपाय


2. त्वचेचा स्पर्श (Touch Of Skin) 


 • त्वचेच्या स्पर्शावरुनही तुम्हाला तुमची त्वचा कोणत्या प्रकारात मोडते हे देखील कळू शकते. आता तुमचा T zone area म्हणजे तुमचे कपाळ नाक आणि हनुवटी यांच्यावर हात फिरवला असता जर तुमचा हात ओला झाला असे तुम्हाला जाणवले तर तुमची त्वचा तेलकट त्वचा आहे.  

 • जर हात ओला असण्याबरोबर तुम्हाला तुमच्या नाकाजवळची आणि हनवुटीजवळची त्वचा थोडी रफ लागली तर तुमची त्वचा मिश्र त्वचा समजावी.

 • जर तुम्हाला तुमचा चेहरा अगदीच रफ लागला तर तुमची त्वचा कोरडी त्वचा आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा छान नरम आणि मॉश्चराईज वाटत असेल तर तुमची त्वचा आदर्श त्वचा आहे असे समजावे.


3. आरशासमोर राहा उभे (Mirror Test)


 • तुम्ही काहीही न लावता आरशासमोर उभे राहा. नीट निरखून पाहा तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरील T zone अधिक तेलकट, काळवंडलेला वाटत असेल तर तुमची त्वचा तेलकट त्वचेमध्ये मोडणारी आहे.

 • जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ड्रायनेस जाणवत असेल तर तशी त्वचा कोरडी त्वचा समजावी.

 • जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील काही भाग तेलकट आणि काही भाग कोरडा असेल तर तुमची त्वचा मिश्र स्वरुपातील आहे.


%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80 %E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE - How To Know Your Skin Type In Marathi


तैलीय त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपचारही वाचा


4. सकाळी उठल्यावरील त्वचा (Skin In The Morning) 


 • तुम्हाला काहीही करायला कंटाळा आला असेल तर रात्री चेहरा धुवून थेट झोपून जा. सकाळी तुमचा त्वचेचा जो प्रकार असेल त्यानुसार तुमचा चेहरा ओला किंवा शुष्क दिसेल.

 • उठल्याबरोबर आरशात पाहा. जर तुमचे नाक, कपाळ हनुवटी ओले दिसत असतील तर अर्थात तुमची त्वचा तेलकट आहे.

 • जर तुम्हाला तुमचा चेहरा थोडाफार ओला वाटत असेल तर तुमचा चेहरा मिश्र त्वचेचा प्रकार आहे.

 • जर तुम्हाला तुमची त्वचा अगदी डोळ्याखालील भागही अगदीच कोरडा वाटत असेल तर तुमची त्वचा कोरडी त्वचा आहे.

 • आणि तुम्हाला वरीलपैकी काहीच वाटले नाही. उलट सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर चांगला तजेला जाणवला तर तुमचा चेहरा आदर्श त्वचेचा प्रकार आहे.


5. दिवसभरानंतर चेहरा (All Day Long Face)


 • तुम्ही दिवसभर बाहेरुन फिरुन आल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात झालेला फरक लगेच जाणवतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुमची त्वचा बदलत असते. जरी तुम्ही मेकअप केला असेल तरी देखील तो फरक दिसतो.

 • उदा.जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कपाळ, नाक, हनुवटीकडे तेल साचते. त्या भागाकडील तुमचा मेकअप उतरु लागतो.

 • शिवाय वर सांगितल्याप्रमाणे इतर त्वचेत होणारे बदलही तुम्ही यात टिपू शकता.


6. डॉक्टरांकडून तपासणी (Visit Dermatologist)


 • वरील सगळे प्रयोग करुन झाल्यानंतरही तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे कळत नसेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. कारण तुम्हाला त्यानुसार चेहऱ्यासाठी काय वापरायचे ते अधिक स्पष्ट होईल. हल्ली डॉक्टरांकडे अशा मशीन्स असतात ज्यामुळे तुमची त्वचा ओळखणे सोपे जाते.


तेलकट त्वचेसाठी घरगुती फेसपॅक


त्वचेला होणाऱ्या त्रासावरुन ओळखता येऊ शकते त्वचा (Skin Problems For Your Skin Type)


तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घेतल्यानंतरही तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार कळत नसेल तर तुम्हाला होणाऱ्या त्रासावरुन तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखता येऊ शकतो ते कसे हे जाणून घेऊयात.


ब्रेकआऊट आणि पिंपल्स (Breakout And Pimples)


जर तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील. त्यात पू साचत असेल तर तुमची त्वचा ही तेलकट त्वचेच्या प्रकारातील आहे. तेलकट त्वचेला याचा अधिक त्रास होतो. जर तुम्हालाही सतत पिंपल्स येत असतील तर तुमची त्वचा ही तेलकट त्वचा आहे. मासिक पाळीच नाही तर इतरवेळीही अशा त्वचेवर पिंपल्स येतात ते त्यांच्या त्वचेवर साचलेल्या तेलामुळे.


उदा. एखाद्याला खूप पिंपल्स येतात तर त्यांच्या आहारातील दोषासोबतच त्यांच्या त्वचेचाही दोष असतो.


चेहऱ्यावर तेल (Oil On Skin)


बाहेरुन आल्यानंतर घाम येणे स्वाभाविक आहे. पण बाहेरुन आल्यानंतर तुमचा संपूर्ण चेहरा तेलकट आणि काळवंडला असेल तर तेलाच्या प्रमाणानुसार तुमची त्वचा तेलकट किंवा मिश्र अशा स्वरुपाची आहे.


कोरडे पॅचेस (Dry Patches)


तुमच्या चेहऱ्यावर कोरडे पॅचेस आले असतील. तुमची नाकाकडील, कपाळावरील आणि गालावरील त्वचा पील होत असेल तुमची त्वचा कोरडी स्वरुपातील आहे. 


उदा. जर तुम्ही एखादी पावडर लावल्यानंतर तुमचा चेहरा फुटत असेल तर हा तुमची त्वचा कोरडी आहे.


%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87 %E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8 - How To Know Your Skin Type In Marathi


स्किनवर रॅश (Rash On Skin)


कोरड्या त्वचेवर अनेकदा रॅशेश येतात. या त्वचेमध्ये योग्य प्रमाणात मॉयश्चर नसल्यामुळे असे होते. जर तुम्हालाही सतत रॅशेश येत असतील तर तुमची त्वचा ड्राय स्वरुपातील आहे. तर कॉम्बिनेशन प्रकारातील त्वचेला देखील रॅशेश येतात. कारण या त्वचेमध्ये दोन्ही त्वचेच्या प्रकारातील गुणधर्म असतात. 


तुम्हालाही हवाय चेहऱ्यावर ग्लो मग वाचा या आयुर्वेदिक टीप्स


तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार बदलू शकता का (Can You Change Your Skin Type)


आता वरील त्वचेचे प्रकार पाहिल्यानंतर प्रत्येकाला आदर्श त्वचा माझी का नाही असा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला देखील आदर्श त्वचा मिळवता येऊ शकते. त्यासाठी तुमचा आहार योग्य हवा. या शिवाय वयोमान, हॉर्मोन्समधील बदल या नुसारही तुमच्या त्वचेच्या प्रकारात बदल होत असतात. कारण काहीही शाश्वत नाही.


त्वचेच्या प्रकारानुसार प्रोडक्ट (Beauty Product According To Skin Type)


त्वचेचा प्रकार कळल्यानंतर तुम्हाला तुमच्या रोजच्या वापरातील बेसिक ब्युटी रिजिम निवडणे सोपे जाते. त्यामुळेच तुमचा त्वचेचा प्रकार ओळखणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही इतरांनी अमुक एखादे ब्युटी प्रोडक्ट वापरले आणि त्यांचा चेहरा अधिक सुंदर झाला तर ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होईलच असे नाही. 


फेसवॉश (Face Wash)


तुमच्या ब्युटी रिजिममधील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे फेसवॉश. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्हाला फेसवॉश निवडणे गरजेचे असते. आता तुम्हाला तुमचा त्वचेचा प्रकार कळला की, नक्कीच फेसवॉश निवडणे अगदी सोपे जाते. लक्षात ठेवा कोरडी त्वचा असणाऱ्यांनी नेहमीच असा फेसवॉश निवडावा जे तुम्हाला कायम हायड्रेट ठेऊ शकतील. 


सनस्क्रिन (Sunscreen)


सनस्क्रिन म्हणजे केवळ उन्हात जाताना वापरण्याची क्रिम समजू नका. विशेषत: तेलकट त्वचेच्या लोकांनी तर सनस्क्रिन घेताना ते तुमचा चेहरा उन्हात गेल्यानंतर अधिक काळवंडलेला करणार नाही ना याची खात्री घ्या. हल्ली त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रिन देखील मिळतात.


%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8


मॉश्चरायझर्स (Moisturizer)


वरील दोन महत्वाच्या गोष्टी प्रमाणे ही वस्तू देखील महत्वाची आहे. मॉश्चरायझर तुमच्या त्वचेला मुलायम आणि तजेलदार ठेवण्याचे काम करत असते. त्वचेचा प्रकार कोणताही असला तरी तुम्ही त्वचेच्या प्रकारानुसारच त्याची निवड करायला हवी.


उदा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला थोडे ऑईल बेस मॉश्चरायझर चालू शकते. पण तेच मॉश्चरायझर मिश्र आणि तेलकट त्वचेला चालेलच असे नाही.


*आता तुम्हाला आम्ही अशा काही टीप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमची त्वचा नेमकी कोणत्या प्रकारात मोडते ते कळू शकेल. शिवाय तुम्हाला तुमचे प्रोडक्ट निवडण्यासही मदत होईल.


फोटो सौजन्य- shutterstock


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


मुरुमांचे प्रकार, त्यातून मुक्त होण्याचे प्रकार मराठीत