वेस्टर्न कपड्यांमध्ये आपले flaws लपवणे आणि आपले फिचर्स हाईलाईट करणं सोपं असतं. तसंच fabulous दिसणंही सहज शक्य होतं. कारण आपल्या मदतीसाठी अनेक गोष्टी उपलब्ध असतात जसं peplums, shapewear आणि भरपूर attitude. पण इंडीयन वेअरच्या बाबतीत हे थोडं कठीण जातं. कारण आजकाल इंडीयन वेअर हे जास्तकरून फक्त सणावाराला आणि लग्नसमारंभातच घातलं जातं. त्यामुळे साडी कॅरी करणे किंवा पंजाबी ड्रेसची ओढणी सांभाळणेसुद्धा कटकट वाटू लागते. कधी कधी साडीत जरी तुम्ही बारीक दिसत असलात तरी कधीतरी तुम्ही एखाद्या साडीत वयापेक्षा मोठ्याही दिसू शकता. पण हे सर्व तुम्ही टाळू शकता. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत काही नियम जे फॉलो केल्यावर तुम्हालाही इंडियन वेअर हवंहवंस वाटेल. तुम्हाला माहीत आहे का आपलं इंडियन वेअर म्हणजेच पारंपारिक कपड्यांची चांगली गोष्ट काय आहे? जर तुम्ही योग्य शेप, कापड आणि कट निवडलात तर तुमचे प्रोब्लेम एरियाज लपू शकतात आणि बेस्ट फिचर्स हाईलाईट होऊ शकतात.
1. सर्वात आधी कोणतंही कपडे निवडण्याआधी तुमच्या बॉडी शेपला जाणून घ्या. भरपूर लेअर्स, प्लीट्स, हेवी वर्क किंवा एम्ब्रॉयडरीचे कपडे घातल्याने कोणीही जाड दिसू शकतं. त्यामुळे आपला बॉडी शेप जाणून त्याप्रमाणे कपड्यांची निवड करा.
2. अंगाला घट्ट चिकटलेले कपडे दिसायला बरे वाटत नाहीत. व्यवस्थित फिटींगचे कपडे हे नेहमीच टाईट आणि तंग कपड्यांपेक्षा चांगले वाटतात. त्यामुळे अगदी बॉडी हगिंग ड्रेस घालणं टाळा. स्पँडेक्स, लायक्रासारख्या फॅब्रिकचे कपडे टाळा ज्यामध्ये तुमचे curves चांगले दिसत नाहीत.
3. जर तुम्ही थोड्या हेल्दी असाल तर कधीही गोंडे लावलेले किंवा मोठ्या बॉर्डरचे कपडे निवडू नका. नेहमी लक्षात ठेवा आणि बारीक बॉर्डर असलेले कपडे निवडा. जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात उठून दिसायचं असेल तर ब्राईट रंगांचा वापर करा.
4. कॉलर्ड ब्लाउज किंवा जास्त अंग झाकणारे कपडे कॅरी करणं जरा कठीण असतं. त्यामुळे तुम्ही असे ब्लाऊज निवडा ज्यामध्ये तुमचं अंग अगदीच झाकलेलं नसेल. म्हणजेच अगदी बंद गळा किंवा कॉलर्ड ब्लाऊज टाळा. ब्लाऊजचा बॅक नेक छानसा शिवा. ज्याला छान लटकन असेल आणि छोटे स्लीव्ह्स असतील. जे तुमचे खांदे हाईलाईट करतील आणि लुकही एलिगंट वाटेल.
5. पटियाला सलवारच्या ऐवजी चूडीदार घाला. जर तुमची उंची चांगली असेल तर पटियाला घाला. आपल्या सगळ्यांनाच हवेशीर आणि सुटसुटीत पटियाला पॅटर्न आवडतो. पण चुडीदारमुळे तुम्ही बारीक आणि लांब दिसता. तुमचे पाय हायलाईट करण्यासाठी चुडीदार ही आयडियल चॉईस आहे.
6. जर तुम्हाला बारीक दिसायचं असल्यास ब्रेस्ट एरियावर फ्रिल्स आणि हेवी वर्क केलेले कपडे टाळा. त्यामुळे तुम्ही अजून जाड दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो प्लेन किंवा बारीक एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाऊज किंवा टॉप/कुर्ते घाला.
7. A-लाईन आणि अनारकली कुर्ती खूपच प्रसिद्ध आहे पण अशी कुर्ती निवडा जिचा कट स्लिमर किंवा पातळ असेल ज्यामुळे तुम्ही दिसाल लांब आणि बारीक.
8. जर तुम्हाला एखादी वेगळी स्टाईल ट्राय करायची असल्यास तुम्ही ड्रेप्स किंवा पेप्लम स्टाईल निवडू शकता. या स्टाईलमध्ये तुमचा टमी एरिया आरामात झाकला जाईल.
9. मोनोक्रोम नेहमीच उपयोगी पडतं – मग ते इंडियन वेअर असो वा वेस्टर्न वेअर. तुम्ही यात बारीकच दिसता. मोनोक्रोम आऊटफिटवर एखादी सुंदर ओढणी किंवा स्कार्फ घ्या म्हणजे त्याला आपोआपच इंडीयन लुक येईल.
10. भारतीयांना प्रिंट्सबद्दल विशेष प्रेम आहे. जसं ब्लॉक प्रिंट, हँड प्रिंट किंवा क्रेझी प्रिंट्स. पण जर तुम्हाला हेल्दी दिसणं टाळायचं असल्यास बारीक प्रिंट्सची निवड करा. ज्यामुळे तुमचा लुक आणि पर्सनॅलिटी दोन्ही वेगळी वाटेल.
11. साडी निवडताना नेहमी हलक्या मटेरियल म्हणजेच जॉर्जेट, क्रेप किंवा शिफॉनची निवड करा. हेवी हँडलूम्समुळे स्टेटमेंट मिळतं पण कधी कधी त्यात तुम्ही बल्की दिसता. एम्ब्रॉयडरीमध्ये नेहमी डेलिकेट वर्क निवडा जसं क्रिस्टल किंवा बारीक बॉर्डर्स. तसंच साडी चापून चोपून नेसणंही आवश्यक आहे. साडी व्यवस्थित नेसायला वेळ लागत नाही आणि ती व्यवस्थित नेसल्यावर नक्कीच छान वाटते.
12. इंडियन आऊटफिटसोबत नेहमी आठवणीने हील्स घाला खासकरून साडी नेसल्यावर. ज्यामुळे तुम्हाला मिळतं योग्य पोस्चर आणि चालण्यात-वावरण्यात एक एलिगन्स येतो. साड़ी नेसताना केलेल्या एखाद्या चुकीमुळे तुमचा पूर्ण लुक बिघडू शकतो.
13. असा ब्लाऊज निवडा जो तुमच्या बॉडीनुसार असेल. जर तुम्ही बारीक असाल तर एखादा ओल्ड-स्कूल चायनीज कॉलर्ड ब्लाऊज निवडा आणि जर तुमची पाठ टोन्ड असेल तर तुमच्यावर बॅकलेस चोलीही चांगली दिसेल.
14. जर तुमचा प्रोब्लेम एरिया बस्ट असेल तर वर सांगितल्याप्रमाणे कोणतंही असं आऊटफिट निवडू नका ज्यावर त्या ठिकाणी हेवी एम्ब्रॉयडरी किंवा मिरर वर्क असेल.
15. लक्षात ठेवा कुर्ती नेहमी एक इंच सैलसर घाला. मग कोणताही बॉडी टाईप का असेना. यामुळे तुमचा शेप चांगला दिसतो. जर तुम्ही हिप साईडने हेवी असाल तर नेहमी अशी कुर्ती निवडा जी तुमच्या हिप्सना कव्हर करेल.
16. जर तुमचे खांदे ब्रॉड असतील तर पफी किंवा फुल स्लीव्हज् अजिबात घालू नका. कारण यामुळे सगळं लक्ष तुमच्या हाताकडे जाईल. पण म्हणून स्लीव्हलेस घालावा असंही नाही. तुम्ही हाफ किंवा थ्री फोर्थ स्लीव्ह्स घालू शकता.
17. लांब घेरदार अनारकली उंच असलेल्या मुलींवर छान दिसतो पण जर तुमची उंची नसेल आणि तरीही तुम्हाला घालायचा असल्यास कमी घेर असलेला अनारकली तुम्ही निवडू शकता. हा तुमच्यावर छान दिसेल.
18. नेहमी अशा अक्सेसरीज घाला ज्या तुमच्या आऊटफिटला चारचांद लावतील जसं एखादी छानशी बांगडी, सुंदरसा मोत्याचा हार इ. जास्त किंवा हेवी ज्वेलरी घातल्यानेही तुमचा लुक खराब होऊ शकतो.
19. हीच गोष्ट मेकअपलाही लागू होते. मेकअप करतानाही जरा कंट्रोल ठेवा. जर तुम्ही एखादी नाजूक किनार असलेली साडी किंवा सिंपल ज्वेलरी घातली असल्यास एखादाचं फिचर हाईलाईट करा. जसं स्मोकी आईज किंवा रेड लिप्स. पण जर तुम्ही बोल्ड आऊटफिट घातलं असेल तर मात्र मेकअप नॅचरलच राहू द्या. ग्लॉस आणि मस्कारा तुमच्या सिंपल लुकला चारचांद लावू शकतात. खरंतर इंडियन वेअर घातल्यावर एक वेगळाच लुक येतो त्यामुले जास्त मेकअप करण्याची काहीच गरज नाही.
20. जर तुम्ही कुर्ती घातली असेल तर लक्षात ठेवा की, ती नेहमी लांब असावी. शॉर्ट कुर्ती आणि अंगाला चिकटलेले लेगिंग्स खूप विचित्र वाटतात. आपल्या बॉडीच्या शेपनुसार नेहमी कुर्तीची निवड करा.
21. जर तुम्हाला एकदम चिक लुक हवा असल्यास आणि हिप्स एरिया कव्हर करायचा असल्यास तुम्ही स्लिट्स असलेली कुर्ती घालू शकता. यामुळे तुमची बॉडी बॅलेन्स दिसेल आणि तुमचा हिप्सचा एरियाही कव्हर होईल.
22. योग्य इनरवेअर किंवा lingerie तुमच्या इंडियन आऊटफिटच्या लुकला चांगल किंवा वाईट ठरवू शकतात. टी-शर्ट ब्रा आणि योग्य कप साइजची ब्रा तुम्हाला मिलियन डॉलर लुक मिळवून देते. नेहमी लक्षात ठेवा की, तुमची lingerie ही तुमच्या इंडियन आऊटफिटप्रमाणे असायला हवी. टाईट आऊटफिट=टी-शर्ट ब्रा, बॅकलेस चोली= बॅकलेस ब्रा आणि डीप नेक= स्ट्रॅप्लेस ब्रा. नेहमी तुमच्या ड्रेसच्या पॅटर्नप्रमाणे ब्रा ची निवड करा.
23. एक गोष्ट विसरू नका की, जर तुमचा thighs चा भाग जास्त असल्यास कधीही शरारा घालू नका. हीच गोष्ट तुमच्या ब्रालेट्स आणि स्ट्रॅप ब्लाऊजलाही लागू होते. जर तुमचे हात टोन्ड नसतील तर असे ब्लाऊज घालू नका. जर तुमचा पोटाचा भाग म्हणजेच tummy एरिया लपवायचा असल्यास साडीच्या प्लीट्स नेहमी थोड्या वर खोचा.
24. जेव्हा भारतीय किंवा पारंपारिक कपड्यांची गोष्ट येते तेव्हा गोष्ट येते ती कंफर्टची. म्हणजेच जेवढे जास्त तंग किंवा सैल कपडे असतील तेवढं तुमचं आऊटफीट वाईट दिसतं. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कोणतेही कपडे घालाल तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की, त्याचं फिटींग योग्य असावं. परफेक्ट फिटींगमुळेच परफेक्ट स्टाईल बनते.
मग पुढच्या वेळी कोणत्याही फंक्शन किंवा सणावाराला इंडियन किंवा पारंपारिक कपडे घालताना वरील गोष्टींकडे नक्की लक्ष द्या आणि परफेक्ट लुक मिळवा.
फोटो सौजन्य – इंस्टाग्राम
हेही वाचा –
जुन्या साड्यांपासून शिवा ड्रेसचे असे हटके पॅटर्न्स
महाराष्ट्राची शान नऊवारी नेसण्याचे प्रकार