पिरेड्समध्ये पोट दुखणे, थकल्यासारखे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. या काळात काहीच खावेसे वाटत नाही. कुठेही बाहेर पडावेसे वाटत नाही.सतत mood swings होत राहतात. पण तुम्हाला या दिवसात होणारा त्रास टाळायचा असेल तर तुम्ही काही सोप्या गोष्टी तुम्हाला या काळात लक्षात ठेवायच्या आहेत. त्या तुम्ही अगदी नीट पाळल्यात तर तुम्हाला पिरेड्समध्ये होणारा त्रास टाळता येईल. मग करायची का सुरुवात या simple tipsने ज्या ठेवतील तुमच्या पिरेड्सच्या तक्रारी दूर
उन्हाळ्यात तुम्हालाही होतो पिरेडसचा त्रास मग नक्की वाचा
थंड टाळा
पिरेड्समध्ये तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजे तुम्हाला थंड खाणे टाळायचे आहे. आईस्क्रिम किंवा कोल्डड्रिंक असे काहीही पिण्याची तुम्हाला इच्छा झाली तरी तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की, तुम्हाला काहीही करुन या गोष्टी खायच्या नाहीत. त्यामुळे तुमचे पोट थंड पडते आणि त्याचा परिणाम तुमच्या फ्लोवर होतो. शिवाय तुम्हाला त्यामुळे सतत पिरेड्स cramps देखील येऊ शकतात. त्यामुळे या दिवसात थंड नाही तर गरम काहीतरी खाणे गरजेचे असते. त्यामुळे जितके गरम जेवता येईल तितके या दिवसात जेवा.
महिलांनी आवर्जून वापरायला हवे पँटी लायनर
चहा नाही पण ग्रीन टी किंवा कॉफी प्या
आता आम्ही तुम्हाला थंड खाण्यास मनाई करत गरम खाण्याचा सल्ला दिल्ला आहे. म्हटल्यावर तुम्ही चहा पिऊ शकता. जर तुम्हाला चहा, कॉफी आवडत नसेल तर तुम्ही ग्रीन टी देखील पिऊ शकता. किमान दिवसातून दोनवेळा तुम्ही याचे सेवन करा तुम्हाला फ्रेशही वाटेल आणि पोट दुखीही कमी होईल. शिवाय तुम्ही चहात आलं घातल तर फारच उत्तम
चॉकलेट असू द्या सोबत
चॉकलेट प्रत्येकालाच आवडत असं नाही. पण विश्वास ठेवा पिरेड्समध्ये तुम्ही आवर्जून चॉकलेट खायला हवे. चॉकलेटमध्ये ओमेगा 3 (Omega 3) आणि ओमेगा 6 (Omege 6) आहे. जो तुमचा पिरेड्समधील मूड चांगला करण्याचे काम करते. त्यामुळे या दिवसात तुमच्याकडे चॉकलेट हे हवेच.
म्हणून काळवंडते तुमची येथील त्वचा, वाचा सोपे उपाय
ओवा चघळा
घरी जरा पोटदुखी झाली तरी तुम्हाला ओवा खाण्याचा सल्ला दिलेला तुम्ही देखील ऐकला असेल किंवा तुम्ही देखील ओवा पोटदुखी दरम्यान खाल्ला असेल. तर तुम्ही या दिवसात ओवा देखील खायला हवा. जर तुम्हाला पोटात जास्त दुखत असेल तर दाताखाली ओवा ठेऊन त्याचा रस घेत राहा. तुम्हाला बरे वाटेल. किंवा तुम्हाला असा ओवा खायला आवडत नसेल तर तुम्ही तो हातावर थोडासा मळून गरम पाण्यात टाकावा आणि ते गरम पाणी प्यावे. तुम्हाला आराम वाटेल.
भरपूर पालेभाज्या खा
पालेभाज्या या इतरवेळीही खायला हव्यात. पण पिरेड्समध्ये पालेभाज्यांचे सेवन जास्त व्हायला हवे कारण त्यातील आवश्यक पोषक घटक तुम्हाला त्या दिवसांमध्ये ताकद देण्याचे काम करत असतात.त्यामुळे तुम्ही भरपूर पालेभाज्यांचे सेवन करा. त्याचा आणखी एक फायदा असा की, तुमचे पोट देखील त्यामुळे साफ होईल.
गरम पाण्याची आंघोळ
जर तुम्हाला दिवसभर पोटाजवळ गरम पाण्याचा शेक घेणे शक्य नसेल तर तुम्ही घरी आल्यानंतर आवर्जून गरम पाण्याची आंघोळ करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरे बाटेल. शक्य असेल तर टबमध्ये छान गरम पाणी घेऊन त्यात थोड्यावेळ छान डुंबून राहा खूप बरं वाटेल.
विक्स चोळा
विक्स चोळण्यामागे कारण इतकंच की. यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढते. तुमचे पोट फारच दुखत असेल तर तुम्ही चक्क विक्स तुमच्या ओटीपोटाला चोळू शकता त्यामुळे तुम्हाला खरेच बरे वाटेल.
या काही गोष्टी तुम्ही तुमच्या पिरेड्समध्ये करु शकता. आणि पोटदुखी आणि इतर त्रास दूर ठेवू शकता.
(फोटो सौजन्य- Shutterstock)
तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल: