उन्हाळा दिवसेंदिवस त्रासदायक होऊ लागला आहे. दुपारी घराबाहेर पडण्याची इच्छाही होत नाही. पण कामानिमित्त अनेकदा आपल्याला मनाविरुद्ध घराबाहेर पडावे लागते. पण तुम्हाला उन्हाळ्याचा प्रंचड त्रास होत असेल तर तुम्ही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला घराबाहेर पडताना कोणत्या गोष्टी तुम्ही घेऊन बाहेर पडायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करणार आहोत. मग करायची सुरुवात
गॉगल /स्कार्फ/ सनकोट
उन्हाळ्यातील अगदी पहिली essential गोष्ट आहे ती म्हणजे गॉगल, स्कार्फ किंवा सनकोट. आता तुम्हाला तिन्ही गोष्टी तुमच्यासोबत घेणे शक्य असेल तर फारच बरे. पण तुम्हाला स्कार्फ कॅरी करणे कठीण जात असेल तर तुम्ही सनकोट घ्या. कारण स्कार्फ अनेकदा इकडे तिकडे पडण्याची शक्यता असते. तर सनकोट तुम्ही घालून ठेवला तरी चालतो. मुळात कॉटनचा असल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. शिवाय कोट घातल्यामुळे तुमचे हात काळवंडण्याची शक्यताही नसते. त्यामुळे जर तुम्हाला यातील दोन गोष्टी कॅरी करता आल्या तर तुम्ही गॉगल आणि सनकोट कॅरी करा.
बाहेर जाताना तुमच्या बॅगमध्ये या गोष्टी असायला हव्या
पाण्याची बाटली
पाण्याची बाटली तर तुमच्या बॅगमध्ये उन्हाळ्यात अगदी मस्ट आहे. किमान 500 लीटरची बाटली घेतल्याशिवाय तुम्ही घराबाहेर अजिबात पडू नका. अनेकांना बाहेर पाणी मिळेल अशी अपेक्षा असते. इतर ऋतूमधील गोष्ट वेगळी आहे. पण उन्हाळ्यात तुम्हाला पाणी योग्य वेळी मिळेलच असे नाही. शिवाय तुम्ही तुमची बॉटल घेऊन गेलात तर बाहेरचे पाणी कसे आहे याचाही फार विचार कारावा लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमची पाण्याची बाटली घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
एनर्जी पावडर
जर तुम्हाला उन्हाळ्यात बाहेर पडल्यानंतर शरीरातील त्राण निघून गेल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बॅगमध्ये एनर्जी पावडर ठेवायला हवी. हल्ली फ्लेवर्ड एनर्जी पावडरही मिळतात.त्यामुळे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये एनर्जी पावडरचे पाकिट घेऊनच ठेवा. याचा आणखी एक फायदा असा की, तुम्हाला उन्हाळ्यात जर काही बाहेरचे प्यावेसे वाटले. तरी तुम्ही हे एनर्जी ड्रिंक काढून पिऊ शकता.
उन्हाळ्यात आवर्जून खा ‘सब्जा’ जाणून घ्या फायदे
चॉकलेट
मुलींना चॉकलेट खायला आवडते. उन्हाळ्यात जर तुम्हाला काहीच खायची इच्छा नसेल तर तुम्ही चॉकलेटचा एखादा तुकडा देखील चघळू शकता. त्यामुळे तुमच्या तोंडाला चवही येईल. शिवाय जर तुम्हाला एनर्जी बार आवडत असतील तर तुम्ही एनर्जीबार देखील स्वत:सोबत ठेऊ शकता. जर तुम्हाला चॉकलेटचे बार ठेवणे शक्य नसतील. तर तुम्ही छोटे छोटे चॉकलेट ठेवू शकता.
उन्हाळ्यात ही 5 थंडपेय तुम्हाला ठेवतील थंड
रुमाल / नॅपकिन
आता तुम्ही बाहेर फिरणारे म्हणजे तुम्हाला घाम येणारच. त्यामुळे हा घाम टिपण्यासाठी तुम्हाला रुमाल हवा. अगदीच टर्किश रुमाल नको. पण कॉटनचा रुमाल तुम्ही स्वत:जवळ बाळगायला हवा. तुम्ही ऑफिसमधून बाहेर पडताना छान तोंड धुवू शकता त्यावेळी तुम्हाला हा रुमाल कामी येईल. त्यामुळे तुम्ही कितीही कंटाळा करत असलात तरी रुमाल किंवा नॅपकिन नक्कीच कॅरी करा.
आता या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या बॅगमध्ये नक्कीच उन्हाळ्याच्या दिवसात ठेवायला हव्यात.