ADVERTISEMENT
home / Recipes
Bhat Khanyache Fayde

बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे फायदे खूप आहेत (Bhat Khanyache Fayde)

वजन कमी करायचं असेल तर भात खाऊ नका असा नेहमी सल्ला दिला जातो. त्यामुळे होतं काय की ज्यांना भाताशिवाय जेवणही जाणे शक्य नसते अशांना त्यांचे मन मारुन राहावे लागते. पण आता तुम्ही अगदी बिनधास्त भात खाऊ शकता कारण भात खाण्याचे फायदेच फायदे आहे (Bhat Khanyache Fayde). हो हे अगदी खरं आहे. त्यामुळे ताटातून तुमच्या आवडीचा भात दूर करु नका. तर उलट पानात आवर्जून भात वाढून घ्या.

दालचिनी खाण्याचे आहेत भरपूर फायदे

उर्जेचा भंडार आहे भात (Good Energy Supplement)

भात खाण्याचे फायदे

तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि तुम्ही मस्त राईस प्लेस खाल्ला असेल तर तुम्हाला लगेच पोट भरल्यासारखे वाटते. त्याहीपेक्षा अधिक सांगायचे झाले तर एकदम एनर्जेटीक वाटते. तुम्ही लगेच काम करु शकता. कारण भात हा उर्जेचा भंडार आहे. भातामध्ये असलेली कार्बोदके (carbohydrates) शरीराला उर्जा पुरवण्याचे काम करतात. इतर पदार्थांच्या तुलनेत कार्बोदकांचे प्रमाण कमी असते आणि स्टार्चचे प्रमाण अधिक असते. जे तुम्हाला सतत एनर्जी पुरवण्याचे काम करते.

ADVERTISEMENT

उन्हाळ्यातील कंटाळवाण्या जेवणाला आणा ट्विस्ट करा या रेसिपीज

पोषकतत्व अधिक (High Nutritional Value)

भातामध्ये मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन असतात. जे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात. भातामध्ये व्हिटॅमिन D, निआसिन, थायामिन आणि रिबोफ्लेविन असते. जे तुमच्या शरीराला पोषण देत असते. ब्राऊन राईसच्या बाबतीतही अगदी तसेच आहे.

उन्हाळ्यात तुम्हालाही होतो पिरेड्सचा त्रास, मग वाचाच

आजारांना ठेवते दूर (Keeps Diseases Away)

भातामध्ये असे काही घटक आहेत ते आजारांना दूर करण्यास मदत करते. भातामधील अँटीऑक्सिडंट प्रापर्टीज अनेक आजारांसाठी गुणकारी आहे. ह्रदयाशी निगडीत आजारांना भात दूर ठेवू शकतो. याशिवाय एका अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, अल्झायमर नावाच्या आजारावरही भात गुणकारी आहे.भाताच्या सेवनामुळे हा आजार तुम्हाला होत नाही. पांढऱ्या भातासोबत अनेक जण आहारात ब्राऊन राईस खातात. त्याचेही खूप फायदे (brown rice benefits in marathi) आहेत. भातामधील फायबर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कॅन्सरपासून दूर ठेवते.

ADVERTISEMENT

बद्धकोष्ठता ठेवते दूर (Prevents Constipation)

brown rice benefits in marathi

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही भात खायलाच हवा. भातामध्ये असलेले फायबर तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेऊन तुमच्या पचनाचे सगळे त्रास भात दूर करते.

तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ

रक्तातील साखर ठेवते नियंत्रित (Control Blood Sugar Level)

डाएबिटीझ असलेल्यांना भात खाऊ नका असे सांगितले जाते. त्यामुळे अशा व्यक्ती भात खाणे टाळतात. पण एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की.रक्तामध्ये ग्लुकोझचे प्रमाण हळू करण्याचे काम भात करते. जर तुम्हाला पांढऱ्या भाताची भीति असेल तर तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता.

ADVERTISEMENT

*प्रत्येक गोष्टीचे एक प्रमाण आहे. भाताच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. जर तुम्हाला भात खूपच आवडत असेल तरी देखील भात प्रमाणात खावा. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये असे म्हणतात ते भाताच्या बाबतीतही अगदी खरे आहे.

(सौजन्य-Instagram,shutterstock)

17 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT