मध (Sweet Honey) आरोग्यासाठी जितकं फायदेशीर आहे तितकंच तुमच्या सौंदर्यासाठीही परिणामकारक आहे. मधाचे अनेक फायदे आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे तुमच्या डोळ्यांखाली तणावामुळे अथवा कोणत्याही कारणाने काळी वर्तुळं (Dark Circles) जमा होतात ते काढून टाकण्याचं काम मध खूप चांगल्या प्रकारे करतं. त्यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय करावे लागतात आणि नक्की ते घरगुती उपाय काय आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे तुमची काळी वर्तुळं घालवू शकता हे पाहूया.
काळी वर्तुळं घालवण्यासाठी घरगुती उपाय – Home Remedy for Dark Circles in Marathi
मध – Honey
मध हे मॉईस्चराईजर, स्किन टोनर आणि क्लिंझरप्रमाणे तुमच्या त्वचेवर काम करतं. मध घ्या आणि अर्ध्या तासासाठी तुमच्या डोळ्याखाली लाऊन ठेवा आणि मग चेहरा धुवा. काही दिवस सतत असं केल्यामुळे तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या काळ्या वर्तुळांची नक्की काय स्थिती आहे त्यानुसार याचा परिणाम कसा होतो ते पाहावं लागतं. जर जास्तच प्रमाणात तुम्हाला डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तर त्याचा परिणाम होण्यासाठी काही जास्त दिवस लागतात. पण याचा परिणाम होतो हे मात्र नक्की. त्यासाठी तुम्हाला संयम बाळगणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
संपूर्ण फेस पॅक – Complete Face Pack
एक चमचा मध, एक चमचा बेसन आणि काही थेंब तिळाचं तेल आणि अर्ध चमचा दूध एकत्र करा. ही तयार झालेली पेस्ट तुमच्या डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर लावा. केवळ डोळ्यांवर न लावता पूर्ण चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवा. तुमचे डार्क सर्कल्स अर्थात काळी वर्तुळं तर जातीलच पण त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरही एक चमक येईल.
मध आणि काकडीचा रस
एक चमचा मधामध्ये काकडीचा थोडा रस मिसळावा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर लावा. दररोज 21 दिवस सलग हा उपाय केल्यास, तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं गायब होतील. काकडी आणि मध हे चेहऱ्यासाठी अत्यंत गुणकारी असल्यामुळे याचा परिणाम खूप चांगला होतो.
मध आणि कोरफड
एक चमचा मधामध्ये कोरफड मॅश करून त्यातील पांढरा भाग अथवा कोरफड ज्युस अर्धा चमचा त्यात मिसळावं. डोळ्यांजवळील त्वचा, तुमचा चेहरा आणि मानेपर्यंत संपूर्ण जागेवर हे लावावं. काही वेळानंतर काढून टाकल्यावर कोरफडीमुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल आणि तुम्हाला काही दिवसातच काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळेल. असे कोरफडीचे फायदे अनेक आहेत.
मध, बटाटा आणि गुलाब पाणी
एक चमचा मध घेऊन त्यात किसलेला बटाटा मिक्स करा आणि त्यानंतर त्यात काही थेंब गुलाबपाणी टाका. हे तयार झालेलं मिश्रण तुम्ही पूर्ण चेहऱ्यावर लाऊ शकता. तुमच्या डोळ्यांंखालील काळी वर्तुळं यामुळे कमी होतील आणि शिवाय चेहऱ्यावरील चमकदेखील वाढेल.
मध आणि लिंबू
एक चमचा मधामध्ये लिंबाचे काही थेंब घालावेत. लिंबू तुमच्या त्वचेला ब्लीच करतं आणि मधामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईज होते. त्यामुळे हे मिश्रण लाऊन तुम्ही 20 मिनिट्स ठेवा आणि मग चेहरा धुवा. तुम्हाला खूपच चांगला परिणाम दिसून येईल.
मध केळ्याबरोबर
एक चमचा मध आणि केळं एकत्र वाटून घ्या आणि ही पेस्ट तुमच्या काळ्या वर्तुळांवर लावा. या पेस्टमुळे तुमचा डार्क सर्कल्सचा त्रास तर जाईलच शिवाय तुम्हाला डोळ्यांखाली सूज येण्याचा त्रास असेल तर तोदेखील दूर होईल. चेहऱ्यावरल लावल्यानंतर तुम्ही हे पूर्ण सुकेपर्यंत तसंच ठेऊन द्या आणि मग चेहरा धुवा. तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून चांगला परिणाम जाणवेल.
मध आणि बदाम तेल
एक चमचा मधामध्ये बदामाचं तेल काही थेंब घाला आणि डोळ्यांच्या खाली तसंच पूर्ण चेहऱ्यावर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवा. याचा झालेला परिणाम तुम्हाला स्वतःला जाणवेल.
फोटो सौजन्य : Instagram
हेदेखील वाचा –
सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच तयार करा हे फेसपॅक
लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो*
कोरड्या त्वचेला मऊ आणि मुलायम करण्यासाठी वापरा ‘हे’ ब्रॅंडेड आणि होममेड मॉश्चराईझर