लांबसडक केस हे सगळ्यांनाच आवडतात. पण केस वाढायलाही वेळ लागतो आणि ते लांब होईपर्यंत कधी कधी आपले पेशन्स संपलेले असतात. हरकत नाही… जोपर्यंत तुमचे केस वाढत नाहीत तोपर्यंत केस लांब दिसावे म्हणून या सोप्या ट्रीक्स नक्की करून पाहा. या ट्रीक्समुळे तुमचे केस लांब दिसायला नक्कीच मदत होईल.
1. स्मूथ आणि स्ट्रेट
केसांना चुटकीसरशी लांब आणि ग्लॅम लुक देण्याची हमखास ट्रीक म्हणजे स्ट्रेट केस. जेव्हा तुमचे केस कुरळे किंवा वेव्ही असतात तेव्हा त्यांचं स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग केल्यावर ते लगेच लांब आणि रेशमी दिसू लागतात. यासोबतच तुमच्या केसांना मिळते स्लीक स्ट्रेट स्टाईल जो एक क्लासिक लुक आहे. ज्यामुळे तुमचे केस दिसतात परफेक्ट आणि लांब.
केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त
2. नियमितपणे करा ट्रीम
हे वाचून थोडं विचित्र वाटेल कारण तुम्ही म्हणाल एकीकडे केस लांब दिसण्याबद्दल सांगत आहात आणि दुसरीकडे केस नियमितपणे ट्रीम करायलाही सांगताय. पण जर तुम्हाला स्प्लीट एंड्स आणि डॅमेज केसांपासून सुटका हवी असल्यास तुम्हाला ते नियमितपणे ट्रीम करणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचे केस आखूड होऊ शकतात. जेव्हा केसांमध्ये स्प्लीट एंड्सला सुरूवात होते तेव्हा त्यांची लांबी वाढत नाही. स्प्लीट एंड्स सुरूवात केसांच्या टोकांपासून सुरू होऊन मुळांपर्यंत पोचते. ज्यामुळे तुमचे केस खराब होतात. त्यामुळे दर महिन्याला किंवा 2-3 महिन्यातून एकदा केस काही इंच तरी नक्की ट्रीम करा. यामुळे केसांची वाढही चांगली होईल आणि डॅमेज केस कमी होतील.
केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात
3. Centre पार्टीशन करा
केसांचा भांग जर मधून पाडला तर ते लांब दिसू लागतात. खरंतर केसांचं साईड पार्टीशन जास्त चांगलं दिसतं पण यामुळे केस लांब वाटत नाहीत. जर तुम्ही सेंटर पार्टीशन म्हणजेच मधून भांग पाडला तर केस पातळ आणि लांब असल्याचा भास होतो.
#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय
4. उंच आणि Fuller पोनीटेल
या ट्रीकने तुम्ही तुमच्या पोनीटेलमध्ये काही इंचाची भर टाकू शकता. यासाठी केसांचे दोन भाग करून घ्या. ज्यामध्ये वरच्या भागातील केस जास्त ठेवा. आता वरच्या भागातील केसांचा पोनीटेल बांधा आणि बरोबर त्याच्या खाली दुसरा भागाचा पोनीटेल बांधा. तुम्ही जरी दोन पोनीटेल बांधले तरी दिसताना तो एकच दिसेल. मग पाहा तुमचे केस कसे लांब वाटतील.
Learn About कुरळे केस उत्पादने
5. Layers ला द्या पसंती
तुमच्या हेअरस्टाईलिस्टकडे गेल्यावर हेअरकट करताना जास्तीत जास्त लेअर्स ठेवायची मागणी करा. पण चॉप लेअर्स नाहीतर रेझर्ड लेअर्स ज्यामुळे तुमचे केस दिसतील फ्लोई. अशा लेअर्समुळे तुमचे केस लांब असल्याचा भास निर्माण होतो.
सोप्या केसांच्या शैलीबद्दल देखील वाचा
6. व्हॉल्यूमची कमाल
केसांच्या मुळांना उठाव दिल्याने आणि त्यांच्या मिड-लेंथला लांब आणि घनदाट दाखवल्याने तुमचे केस काही इंच तरी लांब नक्कीच वाटतात. मान पुढच्या बाजूला वाकवून केसांना ब्लो ड्राय करा आणि उलट्या बाजूने केस विंचरा. यामुळे तुमच्या केसांचा व्हॉल्यूम वाढल्यासारखा भासेल आणि तुम्हाला मिळेल लांबसडक आणि घनदाट केसांचा हवाहवासा लुक.
केसांबाबतच्या अशाच काही खास टीप्स आणि ट्रीक्ससाठी वाचत राहा #popxomarathi.
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
Hair Care Tips & Food For Hair Growth In Marathi
How To Get Rid Of White Hair & Side Effects Of Hair Dye In Marathi