ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
त्वचा मॉश्चराईझ करण्यासोबत बॉडीलोशनचे आहेत हे आणखी ‘7’ फायदे (Uses Of Body Lotion)

त्वचा मॉश्चराईझ करण्यासोबत बॉडीलोशनचे आहेत हे आणखी ‘7’ फायदे (Uses Of Body Lotion)

पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सहाजिकच बदललेल्या वातावरणामुळे त्वचेच्या समस्या लगेच निर्माण होतात. त्वचा कोरडी होणं अथवा कोरड्या त्वचेला खाज येणं ही या ऋतूत निर्माण होणारी एक फार मोठी समस्या आहे. जर या समस्येतून सुटका हवी असेल तर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं मॉश्चराईझर असणं फार गरजेचं आहे. निरोगी त्वचेसाठी रोज अंघोळ केल्यावर आणि रात्री झोपताना त्वचेला बॉडी लोशन अथवा चांगलं मॉश्चराईझर लावणं फार गरजेचं आहे. तुम्ही वापरत असलेलं बॉडीलोशन त्वचा मॉश्चराईझ करण्यासोबत आणखी काही गोष्टींसाठी देखील उपयुक्त आहे हे तुम्हाला माहीत आहे का.

जाणून घ्या मॉश्चराईझर अथवा बॉडीलोशनचे इतर फायदे (Uses Of Body Lotion In Marathi)

केस सेट करण्यासाठी (Use To Set Your Hair)

जर तुमचे केस फ्रिझी असतील तर ते सेट करताना तुमच्या अगदी नाकी नऊ येतात. मात्र तुम्हाला घाईच्या वेळी पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल आणि एखाद्या केसांची बट सेट होत नसेल तर तुम्ही त्याला थोडंस बॉडीलोशन लावून सेट करू शकता. आहे की नाही हा बॉडीलोशनचा हटके वापर.

बोटातून अंगठी काढण्यासाठी (To Remove A Stuck Ring)

कधी कधी तुमची अंगठी काही केल्या बोटातून निघत नाही. अशा वेळी खूप प्रयत्न करून देखील तुमच्या बोटांमधील अंगठी निघत नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण बोटांना थोडंस बॉडी लोशन लावून तुम्ही बोटात फसलेली अंगठी सहज बाहेर काढू शकता.

वाचा – कोरड्या त्वचेला मुलायम करण्यासाठी वापरा ‘हे’ ब्रॅंडेड आणि होममेड मॉश्चराईझर

ADVERTISEMENT

Shutterstock

त्वचेवर ग्लो आणण्यासाठी (For Glowing Skin)

जर तुम्हाला त्वचेवर इंस्टंट ग्लो हवा असेल तर मेकअप करताना तुम्ही ब्रॉंझर लावू शकता.  घरीच हे ब्रॉंझिंग लोशन तयार करा. यासाठी तुम्ही बॉडी लोशनचा वापर करू शकता. बॉडीलोशनमध्ये दालचिनी, कोको पावडर आणि कॉर्नस्टार्च मिक्स करून एक मिश्रण तयार करा. ज्याचा तुम्ही ब्रॉंझिंग लोशनप्रमाणे वापर करू शकता. जर तुम्हाला उजळ स्किन टोन हवा असेल तर थोडं जास्त कॉर्नस्टार्च मिसळा आणि डार्क स्किन टोन हवा असेल तर कोको पावडर जास्त मिसळा.

ADVERTISEMENT

Shutterstock

हातात बांगड्या घालण्यासाठी (To Wear & Remove Small Bangles Easily)

तुम्हाला नेहमी बांगडी अथवा हातात एखादं कडं घालण्याची सवय नसेल तर अचानक एखाद्या कार्यक्रमासाठी बांगड्या घालताना तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. शिवाय बांगड्या जर काचेच्या असतील तर त्या घालताना तुटण्याची शक्यता देखील अधिक असते. अशा वेळी हाताला थोडं बॉडीलोशन लावून तुम्ही  हातात सहज बांगड्या घालू शकता.

 

वॅक्सिंगनंतरचा दाह कमी करण्यासाठी (To Reduce Inflammation After Waxing)

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर वॅक्सिंग केल्यावर त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता दाट असते. शिवाय कधी कधी वॅक्सिंग करताना त्वचेला दाह देखील होतो. अशा वेळी जर तुमच्याकडे ऍस्ट्रिंजेंट नसेल तर त्याऐवजी तुम्ही तुमचे नेहमीचे बॉडीलोशन वॅक्स केलेल्या त्वचेवर लावू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेचा दाह कमी होतो आणि पुरळही येत नाही.

ADVERTISEMENT

वाचा – निरोगी त्वचेसाठी शरीर लोशन

स्क्रबर तयार करण्यासाठी (Use To Make Scrub At Home)

जर तुम्हाला घरी स्क्रब करायचे असेल आणि तुमच्याकडे एखादं चांगलं स्क्रबर उपलब्ध नसेल तर मुळीच चिंता करू नका. कारण तुम्ही बॉडीलोशनमध्ये कोको पावडर अथवा  मध किंवा पिठीसाखर मिसळून एक उत्तम स्क्रबर तयार करू शकता. हा स्क्रबर तुम्हाला तुमच्या त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.

शू बाईटचा त्रास कमी करण्यासाठी (To Get Rid Of Shoe Bite)

बऱ्याचदा अनेकींना नवीन शूज घातल्यावर शू बाईटचा त्रास जाणवतो. अशा वेळी नवीन शूज ट्राय करण्याआधी जर तुम्ही तुमच्या तळवे आणि पावलांना बॉडीलोशन लावले तर शू बाईटची समस्या कमी होऊ शकते. कारण यामुळे तुमच्या पावलांची त्वचा मऊ आणि मुलायम होते. तेव्हा शू बाईटला बायबाय करण्यासाठी पावलांना बॉडीलोशन जरूर लावा.

आम्ही सांगितलेले हे हटके पर्याय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये  जरूर कळवा.

ADVERTISEMENT

आणखी वाचा:

लांब केसांना नुकसान पोहचवतात तुमच्या ‘या’ 5 चुका!

पावसाळी पिकनिकला जाताय, मग करू नका या 5 चुका

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

13 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT