आपल्याला थकून भागून आल्यावर सर्वात जास्त शांतता आणि आराम कुठे मिळत असेल तर तो म्हणजे बेडरूममध्ये. त्यातही आपल्या बेडरूमचं डेकोरेशन आपणच केलं असेल तर अजूनच चांगलं वाटतं. पण आपल्या बेडरूमची सजावट करण्यासाठी आपल्या डोक्यात खूप आयडियाज असतात त्यामुळे बऱ्याचदा नक्की काय करायचं आणि काय चांगलं दिसेल आणि वाईट दिसेल याची कल्पना आपल्याला करता येत नाही. तसंच तुम्हाला बेडरूम सजवण्यासाठी बजेटही बघावं लागतं. पण आता तुम्ही घरातल्या वस्तू वापरून किंवा अगदी कमी बजेटमध्येही तुमचं बेडरूम अधिक सुंदर करू शकता. आश्चर्य वाटलं ना? पण हो असं नक्कीच होऊ शकतं. आम्ही तुम्हाला काही आयडियाज देत आहोत. त्याचा वापर करून तुम्ही तुमचं बेडरूम सजवून तर पाहा. तुमच्या बेडरूमचा लुक एकदमच बदलून जाईल. तुमच्या बेडरूमला सजवण्यासाठी या आयडियाज नक्की काम करतील.
1. रॅक सांभाळेल प्रत्येक गोष्ट
Shutterstock
आपल्या बेडरूमच्या डेकोरेशनसाठी (Bedroom Decoration) तुम्ही एक रॅक लावून घ्या. ज्यावर तुम्ही तुमची पुस्तकं, कॉस्मेटिक्स, अक्सेसरीज ठेऊ शकता आणि हे तुम्हाला सहज आजूबाजूला मिळून जातं. त्यासाठी तुम्हाला सतत ड्रॉव्हर्स उघडायचीदेखील गरज भासणार नाही. शिवाय या रॅक्सना तुमच्या आवडची रंगही तुम्ही देऊ शकता आणि विविध रॅकवर वेगवेगळं सामान व्यवस्थित ठेवल्यास, ते दिसायलाही सुंदर दिसतं.
2. बुलेटिन बोर्डावर लावा तुमचे फोटो
Shutterstock
आपल्या बेडच्या मागच्या बाजूला भिंतीवर अथवा टेबलच्या वर तुम्ही एका बुलेटिन बोर्डवर आपल्या जवळच्या आणि तुमच्या आवडत्या आठवणींचे फोटो लावू शकता. तसंच या फोटोंच्या वर तुम्ही एक लहान लाईटिंग माळ त्यावर लावून ते अधिक आकर्षक बनवू शकता. हा पबोर्ड बनवणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्ही कार्डबोर्ड अथवा थर्माकोलचा वापर करू शकता. तसंच वेगवेगळ्या आकाराचे फोटो बनवून तुम्ही तुम्हाला हवी तशी त्याची अरेंजमेंट करून ते लावू शकता. यामुळे तुमच्या बेडरूमची शोभा नक्कीच वाढते.
3. कंदीलाने येईल शोभा
Shutterstock
आजकाल बाजारामध्ये लहान आणि रंगबेरंगी कंदील आले आहेत. तसेच हे पारदर्शक असल्यामुळे बेडरूमची सजावट करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात. यामुळे अगदी एलिगंट लुक मिळतो शिवाय रात्री अंधार झाल्यानंतर याचा टिमटिमता प्रकाश तुमच्या मनाला हवाहवासा वाटतो. हा मंद प्रकाश तुमचा थकवाही क्षणात घालवतो.
4. भिंतीवर लिहा कोट्स
Shutterstock
आपल्या बेडरूमला एक नवा लुक देण्यासाठी तुम्ही त्यावर तुम्हाला आवडतील असे तुमच्या अक्षरात कलात्मकरित्या प्रेरणादायी कोट्सही लिहू शकता. त्यामुळे तुमच्या बेडरूमचं डेकोरेशन आणि तुमचा मूड या दोन्ही गोष्टी चांगल्या राहतात. काही जणांना नुसत्या भिंंती आवडत नाहीत. त्यामुळे ज्यांना अशी आवड असेल त्यांनी कलात्मकरित्या काहीतरी लिहा अथवा तुम्ही त्यावर तुम्हाला आवडेल असं पेंटिंगही करू शकता. बेडरूम वास्तु टिप्स यासाठी तुम्हाला उपयोगी पडतील.
वाचा – Vastu Shastra Tips For Pooja Ghar In Marathi
5. जुन्या बाटल्यांचा करा वापर
Shutterstock
तुमच्याकडे जर काचेच्या जुन्या बाटल्या तशाच पडून असतील तर तुम्ही त्या भंगारवाल्याला देण्याची गरज नाही. तुमची बेडरूम सजवण्यासाठी या बाटल्यांचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही या बाटल्यांमध्ये रंगीत पारदर्शक पेपरचा वापर करूनही त्याची सजावट करू शकता. त्यासाठी तुम्हाला बाटलीच्या आतमध्ये लायटिंगची एक छोटी माळ अथवा एक लहानसा लाईट सोडायचा आहे आणि ही बाटली तुम्हाला तुमच्या बेडरूमच्या सीलिंक अर्थात छताला लावा. अतिशय स्वस्त आणि मस्त असं डेकोरेशन तयार. तसंच हे दिसायला हे खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतं.
6. जुन्या किचन सेटने सजवा
Shutterstock
लहानपणी आपण सगळेच घर घर हा खेळ खेळतो. त्यामधील जर काही खेळणी तुमच्याकडे असतील अथवा तुमच्या घरातील काही फुटलेली मातीची भांडी अथवा काचेची भांडी असतील तर तुमच्या बेडरूमच्या जवळ मिनी गार्डन बनवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. हे जास्त जागाही घेत नाही आणि दिसायलाही सुंदर दिसतं. शिवाय हे डेकोरेशन तुम्हाला फ्रेश फिलिंग देतं.
7. भिंतीवर लावा स्टोरेज बॉक्स
Shutterstock
तुम्ही तुम्हाला मिळालेले गिफ्ट बॉक्स आणि शू बॉक्सना रंग देऊन जर तुमच्या भिंतीवर चिकटवले आणि त्याचा वापर आपल्या लहान सहान गो्ष्टी अर्थात स्टेशनरी, चाव्या अथवा इतर काही गोष्टी ठेवण्यासाठी केल्यास, खूपच सुंदर सजावट दिसते. शिवाय असं केल्याने तुमचं सामानही हरवणार नाही आणि तुमच्या बेडरूमला नवा लुक मिळेल.
8. फेअरीलाईट्सने बनवा सुंदर बेडरूम
Shutterstock
फेअरीलाईट्स तुम्ही अनेक तऱ्हेने वापरू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या बेडच्या मागे हे लावा अथवा तुम्ही तुमच्या खिडकीच्या पडद्यांवर लावून त्याचा वापर करून घेऊ शकता. हे दिसायला खूपच आकर्षक दिसतं आणि याचं डेकोरेशन मनालाही खूप भावतं.
9. सफेद भिंतीही दिसतील सुंदर
Shutterstock
तुम्हाला तुमची बेडरूम कोणत्याही रंगाशिवाय सजवायची असेल तर तुमच्या पांढऱ्या भिंतीसाठी एक चांगला पर्याय आहे. तो म्हणजे तुम्ही रंगीत कागद वेगवेगळ्या आकारामध्ये कापून त्या भिंतीवर लावा आणि बघा ती सफेद रंगाची भिंतही कशी उठून दिसेल.
10. जुन्या टायरचा नवा अवतार
Shutterstock
बऱ्याचदा गाडीचे जुने टायर आपण भंगारवाल्याला देतो. पण या टायरचा सजावटीसाठीदेखील उपयोग होतो. हे टायर रंगवून तुम्ही त्यामध्ये उशा टाकल्यास, त्याचा वापर तुम्ही बसण्यासाठी खुर्चीप्रमाणे करू शकता. हे दिसायला तर सुंदर दिसतंच. शिवाय नेहमीच्या खुर्चीपेक्षा हे जास्त कम्फर्टेबल आहे. लहान मुलांना तर यामध्ये बसायला अधिक मजा येते.
हेदेखील वाचा
Vaastu Tips : तुमचं घर सांगतं तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरंच काही
उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’