ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
पावसाळ्यातही नाचायला (Rain Dance) आवडत असेल तर करून पाहा हे 5 ट्रेंडिंग डान्स प्रकार

पावसाळ्यातही नाचायला (Rain Dance) आवडत असेल तर करून पाहा हे 5 ट्रेंडिंग डान्स प्रकार

डान्स करायला कोणाला आवडत नाही. काही जणांना नाचता येत नाही पण तरीही आपल्याला जसं येईल तसं नाचून आपला आनंद व्यक्त करणारेही बरेच जण असतात. आजकाल डान्सचे इतके रियालिटी शो आहेत आणि त्याशिवाय नाच करायला आवडणाऱ्या व्यक्तीही आपल्याला बऱ्याच भेटतात. कुठेही पिकनिकला गेल्यानंतर रेन डान्स (Rain Dance) हा प्रकारही आपल्याला बघायला मिळतो. पाण्यात भिजत नाचाचा आनंद लुटणे हे खूपच मजेशीर आहे. आपल्याला हवा तसा डान्स तर आपण करतोच. पण आम्ही खास याबाबत कोरिओग्राफर शामक दावर यांच्याकडून पावसाळ्याच्या दिवसामध्ये ट्रेंडिंग असणाऱ्या 5 डान्सचे प्रकार आम्ही जाणून घेतले आहेत. त्याची माहिती तुम्हाला या लेखाद्वारे आम्ही देणार आहोत. 

1. Technical with Contemporary –

Shaimak Davar’s Institute of Performing Arts

कंटेम्प्ररी हा डान्स प्रकार हल्ली खूपच ऐकिवात आहे. या डान्समुळे तुमचा रोजचा व्यायामही होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर पावसाळ्याच्या दिवसात व्यायामाची टंगळमंगळ करत असाल तर तुम्ही हा डान्स प्रकार नक्कीच करू शकता. हा डान्स करण्यासाठी तुमच्या शरीरात व्यवस्थित लवचिकपणा असावा लागतो. तसंच तुमच्यामध्ये चांगला स्टॅमिना आणि शरीराची बळकटी असावी लागते. यामध्ये तुम्ही भारतीय आणि मॉडर्न अशा दोन्ही मुव्ह्ज एकत्रित करून तुम्ही डान्स करू शकता. 

ADVERTISEMENT

2. Best of Bollywood –

बॉलीवूडच्या गाण्यांवर डान्स करणं म्हणजे आयुष्यातला खरं तर आनंद. बॉलीवूडची गाणी ही जगभरात प्रसिद्ध आहेत. याच्या बीट्स आपले पाय नक्कीच थिरकायला लावतात. हा डान्स खरं तर कोणत्याही सीझनला तुम्हाला करता येतो. पण रेन डान्स असेल तर यासारखी ट्यून नाही. तुम्हाला आजही ‘चक धूम धूम’ या शामक दावरच्या बॉलीवूड गाण्याची नक्कीच पावसाळ्यामध्ये आठवण येत असणार? पावसात मजा मस्ती करण्यासाठी हे गाणं खूपच छान आहे. इतकंच नाही तर इतर पावसाळी गाण्यांवरही तुम्ही नाचू शकता. 

3. Hip Hop happening –

Shaimak Davar’s Institute of Performing Arts

हिप हॉप ही सध्याची सर्वात ट्रेंडिंग डान्स स्टाईल आहे. तुम्ही जर रेमो डिसुझाचा ‘ABCD’ सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच ही स्टाईल माहीत असणार. अनेक रियालिटी शो मध्येही बरीच मुलं ही स्टाईल करताना दिसतात. हिप हॉप करणं अजिबात सोपं नाही. पण हादेखील पावसाळ्यात करण्यासाठी आणि एक चांगला डान्सचा प्रकार आहे. हिप हॉपमध्ये डान्स करताना खूप फोर्स लागतो. त्यामुळे तुमच्या शरीराचा व्यायामही चांगला होतो. सहसा पावसाळ्यात बाहेर पडण्याचा आपल्याला कंटाळा येतो. तेव्हा ही स्टाईल करून तुम्ही तुमच्या शरीराचा योग्य व्यायामही करू शकता आणि पावसाचा आनंदही डान्स करून लुटू शकता. 

ADVERTISEMENT

4. Bhangra Swag –

भांगडा हा पंजाबी लोकांच्या डान्सचा प्रकार जरी असला तरीही आता प्रत्येक शहरामध्ये भांगडा हा डान्स प्रकार सर्वांनाच आवडतो. यातील एनर्जी आणि बीट्स हे हमखास तुम्हाला थिरकायला भाग पडतात. भांगडा हादेखील सध्याचा ट्रेंडिंग डान्स प्रकार आहे. यामध्ये विविध प्रकार असून तुम्हाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. आपल्या मित्रमैत्रिणींसह असे डान्स करण्यास अजून मजा येते. मुख्यत्वे जेव्हा तुम्ही पावसाळ्यात सहलीला जाता आणि नाईट कँपमध्ये असे भांगडा डान्स करता तेव्हा खूपच मजा येते. 

5. Sassy Hip Hop –

हिपहॉपचा हा वेगळा प्रकार असून हा डान्स महिलांमध्ये जास्त प्रिय आहे. बऱ्याच महिलांना हा डान्स प्रकार करायला आवडतो. तुम्हालाही हे रेन डान्स करायला आवडतात का पाहा. 

हेदेखील वाचा

जान्हवी कपूरचा बेली डान्स सोशल मीडियावर व्हायरल

ADVERTISEMENT

अनिकेत विश्वासरावच्या ‘सासूचा डान्स’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

‘कुमकुम’ उर्फ जूही परमारने केला मुलीसोबत ‘चोगाडा तारा’ हा डान्स

 

25 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT