‘कुमकुम’ उर्फ जूही परमारने केला मुलीसोबत 'चोगाडा तारा' हा डान्स

‘कुमकुम’ उर्फ जूही परमारने केला मुलीसोबत 'चोगाडा तारा' हा डान्स

स्टार प्लसच्या प्रसिद्ध सीरियल ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ मधली आदर्श सून कुमकुमची भूमिका करून घराघरात लोकप्रिय झालेली जूही परमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे सतत चर्चैत असते. सध्या ती एका हिंदी वाहिनीवरील सुपर नॅचरल विषयावरील तंत्र या सीरियलमध्ये दिसत आहे.

आपला नवरा आणि अभिनेता सचिन श्रॉफपासून वेगळं झाल्यानंतर सिंगल मदरची जवाबदारी जूही चांगल्यारीतीने पार पाडत आहे. जूहीची मुलगी समायरा 6 वर्षांची आहे. आपल्या मुलीला जूही जास्तीत जास्त वेळ देते. नुकतंच जूहीने आपल्या मुलीसोबत एका टॅलेंट हंटमध्येही भाग घेतला.   


‘चोगाडा तारा’ वर ठेका धरला मायलेकीने


खरं म्हणजे जूही परमारची मुलगी समायरा स्कूलमध्ये एक टॅलेंट शो झाला. ज्यामध्ये आपल्या मुलीसोबत जूहीनेही भाग घेतला. या टॅलेंट हंट शोमध्ये जूही आणि समायराने ‘चोगाडा तारा..’ या गाण्यावर मस्तपैकी ठेका धरला. मायलेकीचा परफॉर्मन्स पाहून ऑडियन्सनेही भरपूर कौतुक केलं आणि वन्स मोअरची मागणी केली. जूहीने हा डान्स व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तुम्हीही पाहा हा सुंदर मायलेकींच्या डान्सचा व्हिडिओ...

हा व्हिडिओ शेअर करत जूहीने लिहीलं आहे की, फॅमिली जी एकत्र डान्स करते, एकत्र राहते. समायरा शाळेतील टॅलेंट हंट शोमध्ये मी पहिल्यांदा माझ्या मुलीसोबत डान्स केला. आमच्या परफॉर्मन्स नंतर ऑडियन्सने भरपूर टाळ्या वाजवल्या आणि वन्स मोअरची मागणीही केली. मला आठवतंय की, आजपर्यंत कोणत्याही डायरेक्टरने माझ्या परफॉर्मन्सला वन्स मोअर म्हटलं नाही. सगळ्यांनी मला सांगितलं की, त्यांचे डोळे समायरावरून हटन नव्हते. समायरा बेटा तू माझी स्टार आहेस आणि तुझी आई म्हणून घेण्यापेक्षा जास्त गर्व मला कोणत्याही बाबतीत वाटत नाही.


Juhi Parmar Dance with Daughter Samaira1टॅरो कार्ड रीडर ही आहे जूही परमार


तुमची आवडती कुमकुम आणि अभिनेत्री जूहू परमार ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक सर्टीफाईड टॅरो कार्ड रीडरही आहे. काही दिवसांपूर्वीचं जूही परमारने ही माहिती दिली होती की, ती एक सेलिब्रिटी टॅरो कार्ड रीडर मुनीषा खटवानीकडून ती टॅरो कार्ड रीडिंगचं ट्रेनिंग घेत आहे. तसंच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या सर्टीफिकेटही पोस्ट केलं होतं आणि म्हटलं होतं की, आता मी एक सर्टीफाईड टॅरो कार्ड रीडर झाले आहे आणि या संबंधित अॅडव्हान्स कोर्सही केला आहे.


Juhi parmar Tarot card reader 1
जूही परमार फेमस शो 'बिग बॉस'च्या 5 व्या सिझनची विनर ठरली होती. याशिवाय जूही आत्तापर्यंत 20 पेक्षा जास्त टीव्ही सीरियल्स आणि रिएलिटी शोजमध्ये झळकली आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेही वाचा - 


'उतरन' सीरियलमधील इच्छा आणि तपस्या पुन्हा एकत्र


‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडण


पलक तिवारी करणार टीव्हीवर पदार्पण