सध्याचं धावपळीचं जीवन बघता बऱ्याच लोकांना वेळेवर जेवण्यासाठी वेळही मिळत नाही. याचाच सर्वात मोठा परिणाम होत असतो तो आपल्या पोटावरील चरबीवर. अर्थातच Belly वर. एकदा का पोटाचा हा घेर वाढू लागला की, तो कमी करणं म्हणजे एक मोठं आव्हानच. फ्लेट बेली आणि टोन्ड बॉडी कोणाला नको असते का? पण त्यासाठी मेहनत करायला वेळ कोणाकडे आहे? तुम्हाला Flat tummy हवं असेल तर त्यासाठी योग्य लाईफस्टाईल, व्यायाम आणि डाएट करणं गरेजेचं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का तुमची बेली कमी करण्यासाठी काही डिटॉक्स ड्रिंक्स आहेत जे फायदेशीर ठरतात. या ड्रिंक्समुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास आणि मेटाबॉलिजम बूस्ट करण्यास मदत होते. तसंच तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी याची मदत होते. जाणून घेऊया नक्की कोणती आहेत ही डिटॉक्स ड्रिंक्स !!
1. यम्मी Lemonade!
Shutterstock
ही पद्धत तर वर्षानुवर्ष चालत आली आहे. आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी याचा खूपच मोठा उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही खूप कमी वेळात घरच्या घरी बनवून रोज पिऊ शकता. यासाठी तुम्हाला साहित्यही जास्त लागत नाही. 1 ग्लास कोमट पाण्यात तुम्ही 1 लिंबाचा रस आणि साधारण 1-1.5 चमचा मध घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी रोज प्यायलात तर तुमच्या पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसंच तुम्हाला रोज तासनतास व्यायाम करायची गरजही भासत नाही.
Also Raed Tips To Reduce Belly Fat In Marathi
2. Flat belly चहा
Shutterstock
ऐकून विश्वास बसत नाही ना? पण होय, चहा तुमचं पोट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. पण हा चहा नेहमीसारखा न बनवता थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवायचा आहे. कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो. या चहासाठी तुम्ही 1 कप पाण्यात अर्धा चमचा बडिशेप घाला. त्यानंतर साधारण 2 मिनिटं हे पाणी उकळू द्या. त्यानंतर या गरम पाण्यात 1 टी बॅग साधारण 1-1.5 मिनिटपर्यंत बुडवून ठेवा. टी बॅग काढल्यावर तयार झालेल्या चहामध्ये 1 चमचा सुंठ (सुक्या आल्याची पावडर), ½ चमचा धने पावडर आणि 2 चमचे गुळ घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करा. यामध्ये गुळ व्यवस्थित विरघळायला हवा. हा तुमचा अप्रतिम चवीचा चहा तयार. याची चवही आणि गुण दोन्ही चांगले असतात. हा चहा तुम्ही रोज प्यायल्यास, लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल.
3. परिणामकारक गाजर ज्युस
Shutterstock
गाजराचा ज्युस तुमची पोटावरील चरबी कमी करण्यासह तुमचं वजन घटवण्यासही फायदेशीर आहे. नियमित स्वरूपात जर तुम्ही गाजराचा ज्युस प्यायलात तर हे तुमच्या त्वचा आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. हे बनवण्यासाठी तुम्हाला 2 गाजर, 1 छोटी काकडी, 1 छोटं बीट, 1 सफरचंद, ½ लिंबू आणि साधारण ½ इंच आल्याचा तुकडा लागेल. हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्या आणि पाणी घालून त्याचा ज्युस बनवा. रोज सकाळी तुम्हा हा ज्युस प्यायल्यास तुमच्या बेली फॅटवर नक्कीच योग्य परिणाम होईल.
वाचा – निरोगी जीवनशैलीसाठी जाणून घ्या गाजर खाण्याचे फायदे
4. Detox ड्रिंक
Shutterstock
हे ड्रिंक तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढून टाकतात आणि त्यामुळे तुम्हाला फिट शरीर आणि फ्लॅट टमी मिळते. हे बनवण्यासाठी तुम्हाला 8-10 पुदीन्याची पानं आणि 1 चमचा वाटलेलं आलं घेऊन 1 कप पाण्यात चांगलं उकळा. त्यानंतर हे साधारण 5 मिनिट्स थंड होऊ द्या. 5 मिनिट्सनंतर हे नीट गाळून घ्या. आता 1 काकडीचा ज्युस आणि 1 लिंबाचा रस यामध्ये मिक्स करा. आता हे तयार झालेलं मिक्स 1.5 लीटर पाण्यात मिक्स करा. हे तुमचं डिटॉक्स ड्रिंक तयार आहे. संपूर्ण दिवस तुम्ही हे ड्रिंक थोड्या थोड्या वेळाने पित राहा. पाणी पिण्याऐवजी तुम्ही हे ड्रिंक पिऊ शकता. पण तीन वेळा योग्यरितीने जेवण जेवायला हवं. त्यानंतरच तुम्ही याचा वापर करा.
5. कूल काकडीचे ड्रिंक
Shutterstock
हे ड्रिंक शरीराला hydrate करण्याबरोबरच शरीराची प्रतिकारशक्ती आणि मेटाबॉलिजम वाढवण्यास मदत करतं. हे बनवणं अगदी सोपं आहे. 1 कप पाण्यात 1 इंच आल्याचा तुकडा घालून साधारण 5 मिनिटं उकला आणि मग ते थंड होऊ द्या. यादरम्यान अर्धी काकडी अथवा काकडीचा लहान तुकडा घेऊन तुम्ही ब्लेंड करा. पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये काकडी आणि चवीप्रमाणे मध घालून मिक्स करा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये बर्फ घाला आणि कूल असं हे काकडीचं ड्रिंक तुम्ही पिऊ शकता.
हेदेखील वाचा
काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे
किवी (Kiwi) तुमच्या फिटनेस आणि त्वचेसाठी आहे वरदान, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या