मुंबईतील नाईट लाईफ अनुभवायचं आहे, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या -Places To Visit In Mumbai

मुंबईतील नाईट लाईफ अनुभवायचं आहे, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या -Places To Visit In Mumbai

मुंबई शहर नेहमीच सर्वांनाच भुरळ घातल असतं. या मुंबईने अनेकांना आपल्यात सामावून घेतलं आहे. मुंबई शहराबाहेर राहत असलेल्यांना नेहमीच मुंबईत येण्याचे  वेध लागलेले असतात. कोणी नोकरी करण्यासाठी या शहरात येतं तर कोणी बिझनेस करण्यासाठी. कोणाला या शहरात येऊन नावलौकिक कमवायचा असतो तर कोणाला फक्त आणि फक्त पैसा. मुंबईत स्वतःचं घर असावं हे तर अगदी गरीबापासून ते श्रीमंताचंही स्वप्न असू शकतं.  थोडक्यात महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने आजवर अनेकांची विविध स्वप्न पूर्ण केली आहेत. म्हणूनच मुंबईला ‘स्वप्ननगरी’ असंही म्हटलं जातं. हे शहर सतत धावत असतं थांबण्याची सवयच इथे कोणाला नाही. मुंबई हे एक असं शहर आहे जे कधीच झोपत नाही. ज्यामुळे या शहरातील नाईट लाईफदेखील तितकंच प्रसिद्ध आहे. आश्चर्य म्हणजे हे नाईट लाईफ अनुभवण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ काळाची  तुम्हाला गरज नाही. तुम्ही रात्रभर या शहरात कधीही बिनधास्तपणे फिरू शकता. मुंबईत रात्री फिरायचं असेल या ठिकाणांना जरूर भेट द्या.

Table of Contents

  रात्री फिरण्यासाठी मुंबईतील बेस्ट ठिकाणं (Best Places To Visit In Mumbai)

  तसं  तर मुंबईत अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही मनसोक्त फिरू शकता. मात्र या  शहरातील काही ठिकाणं मात्र रात्री फिरण्यासाठी फारच प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरू शकता. 

  1..मरीन ड्राईव्ह (Marine Drive)

  मरीन ड्राईव्ह हा मुंबईतील एक सुंदर रस्ता आहे. नरीमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी असा हा रस्ता समुद्रकिनारी असल्यामुळे या ठिकाणी दिवसा आणि रात्री पर्यटक आणि मुंबईकराची गर्दी असते. रात्रीच्या वेळी या रस्तावरील रोशनाई अशी असते की कोणाचेही डोळे अक्षरशः दीपून जातील. या रस्त्याच्या अर्ध गोलाकार आकारामुळे आणि रात्रीच्या नेत्रदीपक रोशनाईमुळे या ठिकाणाला क्वीन नेकलेस असंही म्हटलं जातं. आजूबाजूच्या टोलेजंग इमारतींमधून हे ठिकाण रात्रभर अतीशय मनमोहक दिसत असतं. मध्य रात्र आणि त्यानंतरही या रस्त्यावरची वर्दळ सुरूच असते. पावसाळ्यात तर हे ठिकाणी प्रेमयुगूलांसाठी एक रोमांचक ठिकाण आहे. रात्री मात्र या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत अगदी बिनधास्त फिरायला येऊ शकता. रात्रभर या ठिकाणी तुम्हाला गरमागरम भुट्टा आणि चहा मिळत असतो. काही लोक तर या ठिकाणी भल्या पहाटे मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करण्यासाठीदेखील जातात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवायचा असेल, एकांतात एखादं गाणं ऐकत स्वतःलाच थोडासा वेळ द्यायचा असेल किंवा मग मित्रमैत्रिणींसोबत नाईट लाईफ एन्जॉय करायचं असेल तर मरिन ड्राईव्हला जरूर जा.

  कधी जाल - मरिन ड्राईव्हवर तुम्ही दिवसभर अथवा रात्री कधीही जाऊ शकता.

  Instagram

  2. जुहू चौपाटी (Juhu Chaupati)

  जर तुम्हाला रात्रभर चांदण्यात फिरण्याची आवड असेल तर जुहू चौपाटी तुमच्यासाठी अगदी बेस्ट ठिकाण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदार, कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत जुहूला रात्रभरात कधीही जाऊ शकता. मात्र इथे फिरायला जाण्यापूर्वी अंगावर जॅकेट, शॉल घेण्यास मुळीच विसरू नका. कारण समुद्रावरून येणाऱ्या थंडगार वाऱ्यावर रात्री तुम्हाला फिरताना अगदी रोमांचक नक्कीच वाटेल. जुहू चौपाटीच्या आजूबाजूला खाण्यासाठी अगदी चहाच्या ठेल्यापासून पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत. मात्र समुद्रकिनाऱ्यावर बसून एखादा भुट्टा अथवा पावभाजी खायला तुम्हाला नक्कीच  आवडेल. 

  कधी जाल - जुहू चौपाटीवर तुम्ही दिवसभर अथवा रात्री कधीही जाऊ शकता.

  Instagram

  3. वरळी सी-लिंक (Worli Sea Link)

  मुंबईतील नाईट लाईफ अनुभवयाची असेल तर लॉंग ड्राईव्ह करत मध्यरात्री वरळी सी-लिंकवरून जरूर जा. वांद्रे वरळी सी -लिंद हा मुंबईतील एक महत्त्वाचा पूल आहे. मुंबईच्या समुद्रावर बांधलेल्या या पूलामुळे वांद्रे आणि वरळीला जोडलेलं आहे. 2009 पासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा पूल बांधण्यासाठी जवळजवळ 1600 कोटींचा खर्च करण्यात आला होता. दिवसभर मुंबईतील सर्वच रस्ते हे गर्दीने गजबजलेले असतात. मात्र रात्रीच्या शांत वेळेत मुंबई थोडी विसावलेली असते. त्यामुळे रात्री या सी लिंकवरून फिरण्याची मौजच काही निराळी असू शकते. समुद्राची गाज ऐकत या पुलावरून लॉंग ड्राईव्ह करताना तुम्हाला मुंबईतील एक रोमांचक प्रवासाची अनुभूती मिळू शकते. 

  कधी जाल - वांद्रे वरळी सी-लिंकवरून तुम्ही वाहनाने दिवसभर अथवा रात्री कधीही जाऊ शकता.

  Instagram

  4. छत्रपती शिवाजी टर्मिनस (Chatrapati Shivaji Terminus)

  मुंबईचं प्रवेशद्वार असलेलं छत्रपती  शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकदेखील रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी अगदी बेस्ट आहे. जवळजवळ 130 वर्षे जुनं हे रेल्वेस्थानक आजही मुंबईची शान आहे. रात्रीच्या वळी या स्थानकाला केलेली रोशनाई अतिशय सुंदर दिसते. इंग्रजांच्या राजवटीत राणी व्हिटोरिया राणीच्या राज्यभिषेकासाठी हे रेल्वे स्थानक बांधण्यात आलेलं आहे.त्यामुळे या रेल्वे स्थानकाला व्हिक्टोरिया टर्मिनस असं म्हटलं जायचं. या रेल्वेस्थानकाच्या बांधणीसाठी जवळजवळ नऊ वर्षे लागली होते. सीएसटी हे मुंबई शहरातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे. हे युनेस्कोचे जागतिक वारसास्थान आणि मध्य रेल्वेचं मुख्यालयदेखील आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही कधीही या स्थानकावर जाऊ शकता. अगदी उशीरापर्यंत तुम्ही या ठिकाणी फिरू शकता. 

  कधी जाल- रात्री मध्य रात्रीपर्यंत तुम्ही सीएसटी स्थानकाच्या आसपास फिरू शकता. 

  वाचा - मुंबईतील उत्कृष्ट 15 कॅफे (Best Cafes In Mumbai In Marathi)

  Instagram

  मुंबईतील प्रसिद्ध पब्स आणि क्लब (Famous Pubs And Clubs In Mumbai)

  मुंबईत रात्रभर अनेक पब्ज आणि हॉटेल्स सुरु असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ताणातून एखादा रिफ्रेशिंग ब्रेक हवा असेल तर मुंबईचे हे पब्ज रात्री बेरात्री तुमच्या स्वागतासाठी सज्ज  असतात. तुम्हाला मुंबईतील नाईट लाईफ अनुभवायचं असेल तर मित्रमंडळींसोबत मुंबईतील या प्रसिद्ध पब्जमध्ये जरूर जा. 

  1. फर्जी कॅफे (Farzi Cafe)

  रात्रीच्या वेळी फिरताना तुम्ही फर्जी कॅफेमध्ये नाही गेला तर काहीच मजा नाही. कारण मुंबईतलं हा फॅफे तरूणाईमध्ये फारच लोकप्रिय आहे. खाण्या-पिण्याची चंगळ आणि डान्स मस्ती करण्यासाठी तुम्ही रात्री तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला मोठा डान्स फ्लोअर असल्याने तुम्हाला डान्स करताना एक वेगळाच आनंद मिळू शकतो.

  खर्च - दोन माणसांचा खर्च 1500 रू

  खाद्यसंस्कृती - कॉन्टिनेंटल ,डेझर्ट

  वेळ - दुपारी 12:00 ते रात्री 1:00 वाजेपर्यंत 

  पत्ता - कमला मिल, रेडिओ मिर्ची हाऊस जवळ, लोअरपरेल ( मुंबईत इतर अनेक ठिकाणी या पबच्या ब्रॅंच आहेत)

  Instagram

  2 .दी आयरीश हाऊस (The Irish House)

  तरूणाईचा सळसळता उत्साह आणि बिनधास्तपणा पाहायचा  असेल तर या क्लबमध्ये नक्की जा. या ठिकाणी तुम्हाला मोठी बैठकव्यवस्था आणि आरामदायक वातावरण अनुभवता येईल. हे ठिकाणी दररोज रात्रभर पार्टीज करणाऱ्या लोकांसाठीच निर्माण झालेलं आहे. मुंबईच्या  नाईटलाईफचा आनंद लुटायचा असेल तर या ठिकाणी जायलाच हवं. मुंबईतील नाईट लाईफ एन्जॉय करताना तुम्ही दी आयरिश हाऊसमध्ये नाही गेलात तर नवल. कारण कमी पैशात जास्त मजा अनुभवयाची असेल तर या ठिकाणी नक्की जा. इथलं म्युजिक ऐकताना तुम्हाला अगदी स्वर्ग सुखाचा अनुभव मिळू शकतो. शिवाय तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही पार्टीसाठीदेखील या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. 

  खर्च - दोन माणसांचा खर्च 1900 रू.

  खाद्य संस्कृती- इटालिअन 

  वेळ - संध्याकाळ ते रात्री 1:00 

  पत्ता- कुलाबा, अंधेरी अशा मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी 

   

  Instagram

  3. ट्रिलोगी (Trilogy)

  हा मुंबईतील एक बेस्ट क्लब आहे. या नाईटक्लबमधील वातावरण अतिशय आलिशान आणि मनमोहक आहे. या ठिकाणी मुंबईतील मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या पार्टीचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी असलेल्या सर्वोत्तम वातावरणामुळे हा क्लब मुंबईतील एक बेस्ट क्लब म्हणून ओळखला जातो. फक्त या ठिकाणी वेळ घालवणं थोडंसं खर्चिक असू शकतं.

  खर्च - दोन माणसांसाठी अंदाजे खर्च 3500 रू

  खाद्यसंस्कृती - फिंगर फूड  आणि चायनिज

  वेळ -   रात्री 10:30 ते रात्री 3:00

  पत्ता - हॉटेल सी प्रिन्सेस, जुहू तारा रोड, जुहू मुंबई

  Instagram

  4. माताहारी (Matahaari)

  रात्रीची मुंबई अनुभवयाची असेल तर हे एक बेस्ट ठिकाण असू शकतं. या क्लबमध्ये प्रवेश करताच तुम्हाला आलिशान आणि भव्य दिव्य वातावरणाची अनुभूती येऊ शकते. इथलं क्लासिक वातावरण तुमच्या पार्टीत अधिकच रंगत आणू शकतं. इथलं खाणं आणि कॉकटेल चाखताना तुम्हाला अगदी स्पेशल वाटू लागतं. त्यामुळे पार्टी करायची असेल तर या ठिकाणी एकदातरी जायलाच हवं.

  खर्च - दोन माणसांचा अंदाजे खर्च 3000 रू

  खाद्यसंस्कृती - एशिअन आणि चायनिज

  वेळ - 10:30 ते 1:30 

  पत्ता - लेवल 4, डॉ. अॅनी बेंझट रोड, लोटस कॉलनी, वरळी

  Instagram

  5. र’आदा (R’adda)

  हे ठिकाण जुहू बीचपासुन अगदी जवळ आहे. शिवाय बिल्डिंगच्या अगदी टॉप फ्लोअरवर असल्याने तुम्हाला एक वेगळाच  अनुभव येऊ शकतो. लाऊंजमधलं लाकडी फर्निचरच्या कामामुळे प्रवेश करताच एक वेगळ्याच वातावरणात आल्यासारखं वाटायला लागतं. डान्ससाठी असलेला प्रशस्त डान्स फ्लोअर पाहूनच क्लबमध्ये शिरताच तुमचे पाय थिरकू लागतात.

  खर्च - दोन माणसांसाठी खर्च अंदाजे 1200 रू

  खाद्यसंस्कृती - फास्ट फूड, मॅक्सिकन, बर्गर, पिझ्झा, भारतीय

  वेळ - संध्याकाळी 8:00 ते रात्री 3:00

  पत्ता - नायर रोड, जुहू

  6. विंक (Wink)

  हा मुंबईतील एक अप्रतिम क्लब आहे. खवैय्या आणि पार्टीची आवड असणाऱ्या लोकांना हे ठिकाण नक्कीच आवडेल. शिवाय खाण्यापिण्यासोबत ज्यांना डान्स  आणि मस्ती करायची असेल त्यांनी या क्लबमध्ये जाण्यास काहीच हरकत नाही. 

  खर्च - दोन माणसांचा अंदाजे खर्च 4500 रू

  खाद्यसंस्कृती - फिंगर फूड, जॅपनिस

  वेळ - संध्याकाळी 6:00 ते रात्री 1:00 

  पत्ता - कफ परेड, मुंबई

  Instagram

  मुंबईतील फिरताना रात्री गोड पदार्थ कुठे खाल (Sweets To Eat In Mumbai)

  मुंबईत रात्री भटकताना तुम्हाला जर गोड पदार्थ, आयस्क्रीम, फालुदा, केक खाण्याची इच्छा झाली. तर मुंबईतील ही ठिकाणं तुमच्यासाठी रात्री उशीरापर्यंत सुरू असतात. 

  1. बॅचलर (Bachelor’s)

  Instagram

  रात्री भटकता भटकता तुम्हाला आयक्रीम खाण्याचा मूड आला तर या ठिकाणी नक्कीच जा. चर्नीरोड (पश्चिम) स्टेशनच्या बाहेर आणि गिरगाव चौपाटीजवळ असलेलं  बॅचलर आईस्क्रीम पार्लर रात्री तुमच्या सेवेसाठी सज्ज असेल. या ठिकाणी तुम्हाला फ्रेश ज्युस आणि निरनिराळ्या आईस्क्रीमचे प्रकार मिळू शकतील. एकदा चव चाखल्यावर या रस्त्यावरून कधीही रात्री जाताना तुमचे पाय आपोआप बॅचलरकडे वळतील. 

  कधी जाल - बॅचलरमध्ये तुम्ही संध्याकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत सुरू असतं. 

  2. दिओब्रोमा (The Obroma)

  रात्री फिरता फिरता तुम्हाला केक अथवा पॅटिस खाण्याची इच्छा झाली तर हे ठिकाण रात्रीदेखील तुमचं नक्कीच स्वागत करेल. कुलाबा आणि वांद्रेमधील ही बेकरी तुमच्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असेल. या ठिकाणची चोको चिप्स ब्राऊनी, रेड वेलवेट पेस्ट्री आणि चिकन सॅंडविज तुम्हाला नक्कीच आवडेल

  कधी जाल - दिओब्रामा बेकरीमध्ये तुम्ही रात्री बारावाजेरपर्यंत जाऊ शकता.

  3. रूस्तुम आयस्क्रीम (Rustom’s Ice Creme)

  जर तुम्हाला रात्री फिरताना घरी तयार केलेलं होममेड आयस्क्रीम खावसं वाटलं तर या ठिकाणी नक्की जा. हे मुंबईतील एक जुनं ठिकाण आहे. चर्चगेटमधील हे आयस्क्रीम पार्लर पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. त्यांच्याकडील सर्वच आयस्क्रीम फ्लेवर्स मस्त असले तरी इथे गेल्यावर त्यांचं सॅंडवीड आयस्क्रीम तुम्हाला नक्कीच आवडेल. 

  कधी जाल - हे आयस्क्रीम पार्लर रात्री 9:30 ते रात्री 11:00 पर्यंत सुरू असतं. रविवारी मात्र ते दुपारी 3:00 ते रात्री 11:00 पर्यंत सुरू असतं.

  4. माहिमचा बाबा फालुदा (Mahim Baba Falooda)

  माहिमची खाऊगल्ली देखील तुमच्या पोटपुजेसाठी नेहमीच सज्ज असते.  मात्र इथे सर्वात लोकप्रिय आहे तो बाबा फालुदा. बाबा फालुद्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे आयस्क्रीम आणि फालुद्याचे प्रकार तुम्हाला मिळू शकतात. 

  कधी जाल - रात्री अकरा नंतर अगदी उशीरा पर्यंत तुम्ही या ठिकाणी फालुदा खाण्यासाठी जाऊ शकता. 

  मुंबईत रात्री फिरण्यासाठी हॉटेल आणि खाऊगल्ली (Hotels And Food At Night In Mumbai)

  मुंबईत खाण्या-पिण्याची नेहमीच चंगळ असते. मुंबईत जशी पंचतारांकित हॉटेल्स आहेत तशीच स्ट्रीट फूडचीदेखील मेजवानी असते. अगदी बटाटावड्यापासून ते अगदी बिर्याणीपर्यत अनेक गोष्टी तुम्हाला रस्त्याच्या कडेला सहज मिळू शकतात. जरी हे पदार्थ रस्त्यावर मिळत असले तरी त्यांची चव मात्र तुम्ही कधीच विसरू शकणार नाही अशी असते. यासाठीच जर तुम्ही मुंबईत रात्री फिरण्याचा विचार करत असाल तर या खाऊगल्ली आणि हॉटेल्सना नक्की भेट द्या.

  1. बडे मिया कुलाबा हॉटेल (Bade Miyan Colaba Hotel)

  जर तुम्ही मांसाहारी असाल तर हे ठिकाण तुम्ही कधीच विसरू शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज खाण्याचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. मात्र नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी कुलाब्याचं बडे मिया हॉटेल अक्षरशः एक प्रकारची अल्लाउद्दीनची गुंफाच असू शकते. कारण तुम्हाला या ठिकाणी हे खाऊ की ते खाऊ असं होऊ शकतं. कारण इथले तंदुरी आणि कबाबचे विविध प्रकार बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटू शकतं. मुंबईतील प्रसिद्ध ताज महल हॉटेलच्या मागे असलेलं हे बडेमियॉं तुमच्यासाठी मध्य रात्रीपर्यंत खुलं असतं. 

  कधी जाल - बडे मियॉंमध्ये तुम्ही मध्य रात्री पर्यंत नक्कीच जाऊ शकता.

  Instagram

  2. कार्टर रोड खाऊ गल्ली (Carter Road Khau Gully)

  कार्टर रोडच्या खाऊगल्लीत तुम्हाला अगदी व्हेज चमचमीत पदार्थांपासून लज्जतदार नॉनव्हेजचे अनेक प्रकार मिळतात. वांद्रात कार्टररोडवर फिरत असाल तर येथील थंडगार लस्सी जरूर चाखा.

  कधी जाल-  रात्री उशीरापर्यंत या खाऊगल्लीत तुम्ही जाऊ शकता.

  Instagram

  3. क्रॉस रोड मैदान खाऊ गल्ली (Cross Road Maidan Khau Gully)

  मुंबईत सीएसटी आणि चर्चगेट स्टेशनजवळ रात्री फिरत असाल तर या खाऊगल्लीला जरूर भेट द्या. फॅशनस्ट्रीटच्या मागे असलेली ही खाऊगल्ली मुंबईकरांमध्ये फारच लोकप्रिय आहे. या ठिकाणी तुम्हाला फ्रॅन्कीचे विविध प्रकार, पावभाजी, चायनीस, विविध प्रकारचे सॅंडविज आणि डोसा खायला मिळू शकतात. 

  कधी जाल- रात्री उशीरापर्यंत या खाऊगल्लीत तुम्ही जाऊ शकता.

  Instagram

  4. घाटकोपर खाऊ गल्ली (Ghatkopar Khau Gully)

  जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घाटकोपरची ही खाऊगल्ली नक्कीच आवडेल. कारण या ठिकाणी तुम्हाला तुम्ही कधीच न चाखलेले डोसा प्रकार खायला मिळतील. इथले चीज बर्स्ट साधा डोसा, थाऊसंड आयलॅंड डोसा, रिमिक्स डोसा , आयस्क्रीम डोसा प्रकार तुमचं मन नक्कीच वेधून घेतील.

  कधी जाल- रात्री उशीरापर्यंत या खाऊगल्लीत तुम्ही जाऊ शकता.

  Instagram

  5. मोहंमद अली रोड खाऊ गल्ली (Mohammad Ali Road Khau Gully)

  ज्यांना नॉनव्हेज फूड खायला आवडतं त्यांच्यासाठी मात्र मोहंमद अली रोडवरची खाऊ गल्ली अगदी बेस्ट पर्याय आहे. या  ठिकाणी तुम्हाला तंगडी कबाब, चिकन हकीमी, टिक्का असे अनेक चटपटीत पदार्थ चाखायला मिळतील. मोहंमद अली रोडवरील तोंडाला पाणी आणणारे मालपोहा पाहून तर तुम्ही अगदी थक्कच व्हाल. रमजानच्या काळात तर सर्वसामान्यांप्रमाणे अगदी सेलिब्रेटीजनां या  ठिकाणी येण्याचा मोह आवरता येत नाही.

  कधी जाल- रमझानच्या काळात ही खाऊगल्ली रात्रभर सुरू असता.

  मुंबईतील नाईट लाईफ बाबत तुमच्या मनात येऊ शकतात हे महत्त्वाचे प्रश्न - FAQs

  1. मुंबईत रात्री फिरणं कितपत सुरक्षित आहे?

  मुंबईतील या सर्व ठिकाणी रात्री एक वाजेपर्यंत थांबणं नक्कीच सुरक्षित आहे. मात्र रात्री एक नंतर जर तुम्ही या ठिकाणी मस्ती करताना दिसला तर पोलिस तुमची चौकशी करू शकतात. रात्री एक नंतर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर मुंबईत फिरू शकता.

  2. मुंबईत रात्री किती वाजेपर्यंत फिरता येतं ?

  रात्री एक वाजेपर्यंत तुम्ही मुंबईत कुठेही सहज फिरू शकता. त्यानंतर मुंबईत फिरण्यासाठी तुम्हाला पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही मद्यपान केलेलं नसेल आणि तुम्ही कोणतेही चुकीचं कृत्य करत नसाल तर तुम्हाला फार त्रास नक्कीच होत नाही.

  3. मुंबईत रात्रीच्या वेळी नेमकं खायला काय चांगलं मिळू शकतं ?

  वर दिलेल्या खाऊ गल्लीला भेट देऊन तुम्ही रात्रीही  मुंबईत मनसोक्त फिरू आणि खाण्याचा आनंद लुटू शकता. लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन नक्कीच चाखायला मिळेल.

  अधिक वाचा

  मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ

  मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

  पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं

  फोटोसौजन्य - फोटोसौजन्य