यंदाचा रक्षाबंधन करा खास.. पाठवा शुभेच्छासंदेश (Raksha Bandhan Messages In Marathi)

यंदाचा रक्षाबंधन करा खास.. पाठवा शुभेच्छासंदेश (Raksha Bandhan Messages In Marathi)

बहीण-भावाचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. श्रावणात रक्षाबंधन हा सण येतो. श्रावण आता अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय. बहिणीसाठी नक्कीच तुम्ही काहीतरी खास प्लॅन केलं असेल असे गृहीत धरतोच. पण यंदा बहिणीला गिफ्टपेक्षाही काही खास द्यायचयं का? किंवा बहिणींना भावाला काही खास द्यायचे आहे का? मग यंदा तुमच्या मनातील भावना त्यांना बोलून दाखवा शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून. आम्ही खास तुमच्यासाठी काही शुभेच्छासंदेश काढून ठेवले आहेत ते तुम्ही एकमेकांना पाठवू शकता आणि आपल्या भावना व्यक्त करु शकता.

Table of Contents

  कधी झाली रक्षाबंधन साजरी करण्याची सुरुवात (History Of Raksha Bandhan)

  Instagram

  प्रत्येक हिंदू सणामागे काहीना काही कारण किंवा कथा असते. रक्षाबंधन कधीपासून साजरी केली जाते.याचा एक निश्चित कालावधी आपण कदाचित सांगू शकत नाही. पण रक्षाबंधनाला पुरातन काळापासून महत्व आहे. रक्षाबंधनासंदर्भात अनेक पुराणकथा सांगितल्या जातात त्यापैकी काही कथा आधी जाणून घेऊया.

  • हुमायू- कर्णावतीची कथा 
   मध्यकाळातील ही घटना आहे. चित्तौडची राणी कर्णावतीने दिल्लीतील मुघल बादशाह हुमायू याला आपला भाऊ मानत त्याच्याकडे रक्षेचे वचन मागताना तिने सोबत दोरा (राखी) पाठवली होती.ती हुमायूने स्वीकारली आणि ज्यावेळी कर्णावतीला रक्षणाची गरज होती. त्यावेळी कर्णावतीला त्रास देऊ पाहणार्या गुजरातच्या राजासोबत हुमायूने युद्ध केले. कर्णावतीने बहीण मानून पाठवलेल्या त्या दोऱ्याचा सन्मान हुमायूने केला होता.
  • कृष्ण-द्रौपदीची कथा
   एकदा श्रीकृष्ण यांच्या हाताला जखम झाली.जखमेतून खूप रक्त वाहत होते. द्रौपदीला ते पाहावले गेले नाही. तिने तिच्या साडीचा तुकडा फाडून भगवान श्रीकृष्णाच्या मनगटाला बांधला. तो कपडा बांधल्यानंतर रक्त येणे बंद झाले. त्यांनतर काहीच काळानंतर दु:शासन याने द्रौपदीचे चीरहरण केले. तेव्हा साक्षात श्रीकृष्ण यांनी द्रौपदीची अब्रू राखली. हा प्रसंगही रक्षाबंधानचा दाखला देणारा आहे असे म्हटले जाते.

  लग्नवर्धापनदिनाला पाठवा खास शुभेच्छा संदेश

  रक्षाबंधनासाठी शुभेच्छा संदेश (Rasha Bandhan Messages In Marathi)

  1. आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते. नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
  2. ज्याला बहीण असते त्याला कशाचीच भिण्याची कधीच गरज नसते
  3. ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
  4. बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय, हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.
  5. तुला त्रास द्यायला येतोय गं… तुझा लाडका भाऊ
  6. कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो. पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.
  7. ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.
  8. ताई.. कधीही न थकता माझं किती ऐकून घेतेस. का इतकं प्रेम करतेस.
  9. आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी.. काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
  10. बहीण हे असं रसायन आहे जे कोणाला कळत नाही. पण तिच्याशिवाय राहवतही नाही
  11. कितीही मोठी झाली तरी प्रत्येक भावाला बहीण असते लहान तिला दरडावताना कितीही त्रास झाला तरी दादा केवढा आणतो तो आव
  12. आयुष्यात कायम हवी फक्त एकाचीच साथ तो आहे माझा भाऊराया खास
  13. दादा आहेस तू माझा,मी तुझी ताई… आला रक्षाबंधनाचा सण आता तरी दे ना काही
  14. येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस. तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.
  15. ताई आणि आईमध्ये फरक काहीच नाही, दोघी तितक्याच नि:स्वार्थपणे प्रेम करतात.
  16. दादा तुला कधीच सोडणार नाही. पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही.
  17. आई-वडिलांचा मार नको असेल तर घरात एकतरी बहीण हवीच.
  18. लहान बहिणीसारखी चांगली गोष्ट आयुष्यात असू शकत नाही.
  19. दादा म्हणून बोलावणाऱ्या बहिणीशिवाय गोड कोणीच नाही.
  20. राखी बांधीन तेव्हाच जेव्हा देशील मला काही खास
  21. दादा तू कधीच सुधारणार नाहीस.. यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस
  22. काय हवं काय हवं असं नेहमी विचारतोस, पण नेहमीच रे दादा तू गिफ्ट कसं विसरतोस

  बहिणीच्या वाढदिवसासाठी शायरी

  रक्षाबंधनाच्या शुभेच्छा (Raksha Bandhan Wishes In Marathi)

  1. नाते तुझे माझे, अलुवारपणे जपलेले, ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!
  2. आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
  3. तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व.. देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
  4. माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.
  5. किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला.. तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
  6. दादा, आयुष्यात कधीच सोडणार नाही तुझा हात... कारण तूच तर आहे माझा दोस्त खास
  7. रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ... रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
  8. हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
  9. रक्षाबंधनाचा सण यावा रोज.. गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

  लग्नात वधू-वराला द्या अशा शुभेच्छा

  बहीण- भावाचे नाते बळकट करणारे झक्कास शुभेच्छा संदेश (Brother-Sister Quotes)

  1. माझ्याशी रोज भांडते, पण काहीही न सांगता मला समजून घेते ती फक्त माझी बहीण, रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

  2.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल तुझी साथ, माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण असेल तुझ्या रक्षणासाठी हाच देतो विश्वास, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

  3. बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती, रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

  4. काही नाती खूपच अनमोल असतात, त्यापैकी तुझं-माझ नात, हातातील राखी प्रत्येक वेळी तुझी आठवण करुन देईल, तुझ्यावर कोणतेही संकट आले तर त्याला मी सामोरे जाईन.

  5. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला श्रावण बहीण-भावाचा प्रेमळ सण रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

  6. कोणत्याच नात्यात ओढ नाही, पण भाऊ-बहिणीचे नाते आहे गोड, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

  7. आईपेक्षाही जास्त प्रेम करणारी फक्त ताई असते, कारण तीच सगळे समजून घेऊन लाड पुरवत असते, आयुष्यात कधीही लागली ताई तुला माझी गरज.. समोर नेहमीच मी असेन हजर

  8.जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.

  9. दूर असलास म्हणून काय झाले हातावर खरीखुरी राखी नसली तरी मनाने मी कायम तुझ्या मनगटावर कायमची राखी बांधली आहे.

  10. यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

  11. आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

  12. नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

  13. लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप

  14. लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे

  15. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

  16. तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.

  17. लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर

  18. ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

  19. लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो. पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

  20. नातं तुझं माझं आहे एकदम झक्कास तू माझी लहान बहीण मी तुझा दादा खास, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

  21. रक्षाबंधनाचा खरा अर्थ दादा तू मला समजावलास.. ये ना लवकर मला आता आहे फक्त तुझीच वाट

  22. मला त्रास द्यायला तुला भारीच आवडते. पण मला जरा काही झाले की, तुझे मन लगेच कावरेबावरे होते.

  23. आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी.. आता मोठी झाले म्हणून काय झाले.. आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी

  24. कितीही चिडलास तरी तूझं आहे माझ्यावर प्रेम.. मी तुझी मोठी ताई आणि तू माझं पहिलं प्रेम, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

  25. दादा दादा करुन तुला आयुष्यभर मी त्रास देणार.. आताच सांगते राखीची ही गाठ कधीच नाही सुटणार

  वाढदिवसाला द्या या सुंदर शुभेच्छा

  राखीसंदर्भातील उत्तम शुभेच्छा संदेश (Happy Raksha Bandhan Quotes In Marathi)

  1. राखी हा धागा नाही नुसता, हा विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा
  2. राखी प्रेमाचं प्रतीक,राखी प्रेमाचा विश्वास, तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेन हा विश्वास
  3. राखी म्हणजे नुसता दोरा नाही. तर आहे एक अतुट विश्वास.. कधी येतोयस भाऊराया आता मला फक्त तुझीच आस
  4. लहानपणी चांगली राखी आणली नाही म्हणून पटकन चिडायचास.. आता मात्र राखी पाहिल्यावर(मला) डोळ्यात पाणी येतं
  5. कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस.
  6. आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
   राखी नाही एक दोरा आहे ते आपले अतुट बंधन.. येतोयस ना दादा…आज आहे रक्षाबंधन
  7. तुझ्या जन्माच्यावेळीच आईने माझ्याकडून घेतले वचन.. आता राखी बांधून करतोय तुझे सगळ्या संकटातून रक्षण
   कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची राखी आणायला तू कधीच विसरत नाही, वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही, तर खूप प्रेम करतेस ताई, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
  8. लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
  9. तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा
  10. ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.
  11. आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
   हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा!
  12. आजचा दिवस खूप खास आहे.. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे.
  13. राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंध हे दृढ आहेत.
  14. यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.
  15. तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.
  16. गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
  17. हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे
  18. नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं… कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं
  19. इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.
  20. राखी बांधल्यानंतर प्रत्येक भावाची छाती 56 इंचाची होते. कारण जगातली ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते.
  21. लहानपणी राखी बांधायला आवडायची नाही. आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही.
  22. राखी देते विश्वास, भावा- बहिणींच्या नाते करते खास

  देखील वाचा - 

  तारीख आणि उपवासांसह श्रावण महिन्यातील सणांची यादी