साधारणतः शेव्हींग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर तुमची त्वचा कोमल आणि मुलायम लागणं अपेक्षित असतं. पण कधी कधी असं होत नाही. सॉफ्ट लागण्याऐवजी त्वचा खरखरीत लागते. मैत्रिणींंनो ही समस्या आहे अर्धवट वाढलेल्या केसांची म्हणजेच ingrown hair ची. असे छोटे छोटे केस जे शेव्हींग केल्यानंतरही पोर्समध्ये राहून जातात. ही समस्या नेहमीच रेजरचा वापर केल्याने महिला आणि पुरूष दोघांनाही जाणवते. आम्हाला नक्कीच असं वाटतंय की, तुम्हीसुद्धा समस्या जाणवली असेल. कदाचित तुम्ही यावरील उपाय इंंटरनेटवर शोधलाही असेल. पण आता चिंतेचं कारण नाही... या समस्येमागची सर्व कारणं, लक्षणं, घरगुती उपाय, काळजी आणि इतर इन्फेक्शन्सबाबत संपूर्ण माहिती या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काही केस सरळ वाढण्याऐवजी त्वचेतच उलटे वळतात (curl) अशा केसांचं बम्प्स बनतात, या फॉलिकल्सच्या आसपासची त्वचा डार्क होते किंवा त्याला रेडनेस येतो.
शेव्हींग, वॅक्सींगनंतर जेव्हा एकसमान (unevenly) केस तुटत नाहीत किंवा डेड स्कीन हेअर फॉलिक्सल बंद करून टाकते त्यामुळे ही समस्या उद्भवते. ही समस्या पाय, काखेतील केस, प्युबिक एरिया असं ज्या ज्या ठिकाणी केसं असतात तिथे उद्भवते. तसं तर ही समस्या कोणालाही होऊ शकते पण जास्तकरून ही समस्या कुरळे आणि कडक (coarse) केस असणाऱ्या व्यक्तींना जास्त त्रासदायक ठरते.
या केसांच्या समस्येसाठी काही ठराविक ट्रीटमेंट तर उपलब्ध नाहीयं. पण हे अर्धवट वाढलेले केस फारच वाईट दिसतात आणि तुमच्या सौंदर्याला मारक ठरतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काही सोपे आणि नेमके उपाय जाणून घेऊया.
'जर तुमच्या त्वचेचा रंग या केसांमुळे वेगवेगळा दिसत असेल तर बाहेर पडताना इन्ग्रोन हेअर असलेल्या भागावर oil-फ्री सनस्क्रीन लावायला विसरू नका.'
अर्धवट वाढलेल्या केसांच्या समस्येवर तुम्ही काही घरगुती उपाय नक्कीच करून पाहू शकता. या घरगुती उपायांसाठी लागणारं साहित्यही अगदी तुमच्या घरात आणि बाजारात सहज उपलब्ध आहे. ज्यामुळे अशा प्रकारच्या केसांची वाढ रोखली जाईल. पाहूया असेच काही घरगुती उपाय.
या तेलाचा वापर हा बरेचदा एक्ने आणि इतर त्वचा समस्यांसाठी केला जातो. या तेलातील ज्वलनशामक आणि लवकर परिणाम करण्याऱ्या घटकांमुळे तुमच्या त्वचेवरी पोर्स सैल होऊन त्यातील अर्धवट वाढलेल्या केसांपासून सहज सुटका होते. तसंच हे या तेलात अँटीमायक्रोबोईल घटकही आढळतात. ज्यामुळे पुढे जाऊन कोणतंही इन्फेक्शन होण्याची भीतीही दूर होते.
या उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
2-3 थेंब टी ट्री ऑईल (tea tree oil) त्यासोबत एक चमचा ऑलिव्ह ऑईल
कसं कराल What You Have To Do
ही दोन्ही तेल मिक्स करा आणि अर्धवट वाढलेल्या केसांच्या जागी लावा. काही मिनिटं मसाज करा. 10-12 मिनिटं तसंच राहू द्या. मग कोमट पाण्याने धुवून टाका.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
हा तुम्ही एका दिवसात दोनदा करू शकता.
नारळाच्या तेलातील काही एसिड घटक अशा केसांवर गुणकारी ठरतात. तसंच खोबरेल तेल लावल्यामुळे अशा ठिकाणी होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी होऊन त्वचा कोमल होते.
या उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
या उपायासाठी तुम्हाला लागेल नारळाचं किंवा खोबरेल तेल (Virgin coconut oil) आणि टिश्यू पेपर.
कसं कराल What You Have To Do
ज्या ठिकाणी अर्धवट केस वाढलेले आहेत तिथे नारळाचं तेल लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या. नंतर टीश्यू पेपरने पुसून टाका.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
तुम्ही हा उपाय दिवसातून तीन वेळा करून पाहू शकता.
एपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल घटकांमुळे मृत त्वचेपासून सुटका होते. तसंच याने बंद झालेले पोर्सही मोकळे होतात. ज्यामुळे केसांची वाढ योग्यरित्या होते.
उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
या उपायासाठी तुम्हाला लागेल एपल सायडर व्हिनेगर आणि कापसाचा बोळा.
कसं कराल हा उपाय What You Have To Do
प्रभावित जागेवर कापसाच्या बोळ्याने एपल सायडर व्हिनेगर लावा आणि तो भाग सुकू द्या.
साधारण 15 ते 20 मिनिटानंतर हा भाग पाण्याने पुसून घ्या.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
तुम्ही हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.
*काळजी घ्या Caution
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर पाण्यामध्ये समान प्रमाणात हे व्हिनेगर मिक्स करून मगच वापरा किंवा लावण्याआधी पॅच टेस्ट करून पाहा.
कोरफडमधील पोषकतत्त्व आणि द्रव्य ही समस्या दूर करून ती त्वचा कोमल करतात. कारण कोरफडात आहेत अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लमेट्री कंपाऊंड्स.
उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
या उपायासाठी तुम्हाला लागेल ताजा कोरफडाचा रस.
कसं कराल हा उपाय What You Have To Do
ताजा कोरफडाचा रस अर्धवट वाढ झालेल्या केसांच्या ठिकाणी लावा.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
साधारणतः अर्धा तास हा गर लावून ठेवा आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका.
हा उपाय तुम्ही दिवसातून तीन वेळा करू शकता.
कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल हे बहुतांश वेळा केसांची जलद वाढ होण्याकरता वापरलं जातं. या तेलातील हाच गुण अर्धवट वाढ झालेल्या केसांचा वाढीसाठी उपयुक्त ठरतो.
उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
या उपायासाठी तुम्हाला लागेल एरंडेल तेल, स्वच्छ धुतलेलं कापड आणि कोमट पाणी.
कसं कराल हा उपाय What You Have To Do
हे तेल घेऊन प्रभावित जागी लावा आणि किमान 15 मिनिटं तसंच राहू द्या.
कोमट पाण्यात स्वच्छ कापड भिजवून लावलेल्या ठिकाणंच तेल पुसा.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
तुम्ही हा उपाय दिवसातून दोनदा करू शकता.
व्हिनेगरमधील एसिडीक घटक त्वचा एक्सफॉलिएट करून पोर्स मोकळे करतात. त्यामुळे अर्धवट केसांची वाढ योग्यरित्या होते. तसंच यातील केमिकल्स हे अँटीइन्फेक्टीव्ह असतात.
उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
या उपायासाठी व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घ्या. तसंच एक नॅपकीनही लागेल.
कसं कराल हा उपाय What You Have To Do
व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून त्यात नॅपकीन बुडवून घ्या. साधारणतः अर्धवट वाढ झालेल्या ठिकाणी पाच ते सात मिनिटं हा नॅपकिन ठेवा. मग धुवून टाका.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता.
आश्चर्य वाटलं ना तुम्हाला हा उपाय वाचून. मीठ हा घटक तर प्रत्येकाच्याच घरात सहज उपलब्ध असतो. मीठामुळे तुमची त्वचा एक्सफॉलिएट होते आणि त्यावरील मृत त्वचा निघून जाते. तसंच मीठात अँटीबॅक्टेरियल गुणही असतात.
उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
हा उपाय करण्याकरता तुम्हाला लागेल 2 चमचे मीठ, एक कप पाणी आणि कापसाचा बोळा.
कसं कराल हा उपाय What You Have To Do
पाण्यात मीठ मिक्स करा. त्यात कापसाचा बोळा बुडवून प्रभावित ठिकाणी चोळा. काही वेळ सुकू द्या आणि मग पाण्याने धुवून टाका.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
हा उपाय तुम्ही दिवसातून दोनवेळा करू शकता.
मीठाप्रमाणेच बेकींग सोडा हा सुद्धा त्वचेच्या एक्सफॉलिएशनसाठी उपयुक्त ठरतो. ज्यामुळे त्वचा मुलायम होते आणि कोणताही त्रास होत नाही.
उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
या उपायाकरता तुम्हाला लागेल 1 चमचा बेकींग सोडा. एक कप पाणी आणि कापसाचा बोळा
कसं कराल हा उपाय What You Have To Do
पाण्यामध्ये बेकींग सोडा मिक्स करा आणि अर्धवट वाढलेल्या केसांच्या ठिकाणी कापसाच्या बोळ्याने लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाका.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.
मधाचा वापर हा अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये केला जातो. कारण आहे यातील अँटी इन्फ्लमेटरी घटक. तसंच यातील अँटीबॅक्टेरियल घटकांमुळे अर्धवट वाढलेल्या केसांच्या ठिकाणी कोणतंही इन्फेक्शनही होत नाही.
उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
या उपायासाठी मधाचा पातळ थर या केसांच्या ठिकाणी लावा.
कसं कराल हा उपाय What You Have To Do
10 ते 12 मिनिटं तसंच ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
तुम्ही हा उपाय दिवसातून दोनदा करू शकता.
साखरेने स्क्रबिंग केल्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होऊन पोर्ससुद्धा मोकळे होतात. ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ नॉर्मल होते.
उपायासाठी तुम्हाला लागेल You Will Need
साधारण एक कप पांढरी किंवा ब्राऊन शुगर घ्या. 1/2 कप ऑलिव्ह ऑईल किंवा जोजोबा ऑईल घ्या. तुम्हाला गरज वाटल्यास काही चमचे टी ट्री ऑईल किंवा लव्हेंडर ऑईलही घेऊ शकता.
कसं कराल हा उपाय What You Have To Do
हे सर्व घटक मिक्स करून घ्या आणि प्रभावित ठिकाणी लावा. काही मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. काही मिनिटं तसंच ठेवा. मग कोमट पाण्याने धुवून टाका. नीट पुसून घ्या आणि मॉईश्चराईज करा.
किती वेळा करावा उपाय How Often You Should Do This
हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
जेव्हा तुम्हाला इन्ग्रोन केसांच्या समस्येपासून सुटकेसाठी तुम्ही बरेचदा तिथे ओरखडतो किंवा स्क्रॅच करतो. पण असं कधीही करू नका. यामुळे सूज येणं किंवा डाग पडणं किंवा इन्फेक्शनसारखी समस्या जाणवू शकते. त्यामुळे अशी नाटकं करणं टाळा ☺ तसंच या इन्ग्रोन केसामुळे तुम्हाला किंवा तुमच्या त्वचेला काही खास नुकसान होतं असंही नाही.
हे तर जाहीर आहे की या समस्येमुळे तुम्ही हेयर रिमूव्ह करणं किंवा वॅक्सींग तर बंद करणार नाही. मग पुढे सांगितलेली काही काळजी तुम्ही घेतली तर तुम्हाला होणारा त्रास नक्कीच कमी होईल.
अशा प्रकारचे केस शरीरावरील कोणत्याही भागावर वाढू शकतात. यामागील मुख्य कारण म्हणजे केसांची मूळं मोकळी नसणं. ज्यामुळे केस अर्धवट वाढल्यासारखे भासतात.
या केसांमुळे कोणतीही गंभीर त्वचा समस्या होत नाही. पण या भागाला काही इन्फेक्शन झाल्यास रॅश येऊ शकते.
अशा प्रकारच्या केसांपासून सुटकेसाठी काही दिवसांचा कालावधी नक्कीच लागतो. मग तो काही आठवडे किंवा काही महिने इतकाही असू शकतो. त्यामुळे काही सोपे घरगुती उपाय केल्यास आणि योग्य ती हायजिनबद्दलची काळजी घेतल्यास अर्धवट केसांपासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल.
प्युबिक एरिया शेव्ह किंवा वॅक्स केल्यावर अर्धवट केस वाढण्याची शक्यता असते. शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत या भागातील केस जास्त कुरळे आणि जाड असतात. त्यामुळे या भागात ingrown hair केसांची वाढ जास्त दिसून येते.
असे केस असलेला भाग लाल किंवा सूजल्यास ते वेदनादायी ठरू शकतं. ज्याचा अर्थ त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं, असाही असू शकतो. त्यामुळे वर सांगितलेले घरगुती उपाय तुम्ही करू शकता किंवा ही समस्या जास्त वाढली आहे असं वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.