ADVERTISEMENT
home / Fitness
पावसाळ्यातील त्वचेच्या समस्या, अलर्जी आणि त्याची काळजी

पावसाळ्यातील त्वचेच्या समस्या, अलर्जी आणि त्याची काळजी

पावसाळा म्हटलं की, हवामान दमट आणि त्याचबरोबर घामटही असतं. पावसाळा हा उन्हाळ्यापासून सुटका करणारा असल्याने हवाहवासा वाटतो आणि आपल्याला सगळ्यांनाच थंड वाऱ्यात बसून पावसाच्या थेंबांची टिपटिप ऐकायला आवडते. अर्थात, पावसाळ्यात त्वचेला अलर्जीज येऊ नयेत, संसर्ग होऊ नयेत यासाठी आपल्याला त्वचेची खास काळजी घेणेही गरजेचे असते.  पण आपण ज्या शहरांमध्ये राहतो तिथे पडणारे पावसाचे थेंब पूर्वीसारखे शुद्ध उरलेले नाहीत. हवेतील प्रदूषके पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि हा पाऊस अनेक प्रादुर्भाव व अलर्जीज घेऊन येतो. याला बळी पडण्याचा धोका प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना अधिक असतो. बुलस इंपेटिगो, त्वचा व केसांत होणारा बुरशीयुक्त प्रादुर्भाव (फंगल इन्फेक्शन), फॉलिक्युलिटिस आणि अलर्जीज या त्वचेच्या  पावसाळ्यात सर्वाधिक आढळणाऱ्या समस्या आहेत. नक्की या पावसाळ्यात काय समस्या असतात आणि त्यावर काय उपाय असतात त्याबद्दल आम्ही डॉ. रिंकी कपूर, कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट अँड डर्माटो सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स यांच्याकडून जाणून घेतलं. तुम्हालादेखील या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला करून द्यायला हवी. 

अलर्जी –

Shutterstock

त्वचेच्या समस्यांमुळे पुरळ येते, लाली येते व त्वचेला खाज सुटते. जाणून घेऊन नक्की काय अलर्जी असतात. पावसाळ्यात त्वचेच्या अलर्जीजचे प्रमाण वाढत आहे याला पर्यावरणविषयक तसेच मानवनिर्मिती असे दोन्ही घटक जबाबदार आहेत.

ADVERTISEMENT

● वातावरणातील अलर्जीकारक घटकांमध्ये बुरशी, परागकण, डँडर (प्राण्यांच्या त्वचेवरील सूक्ष्म घटक), फुले व कीटक यांचा समावेश होतो.

● मानवनिर्मिती अलर्जीकारक घटकांमध्ये धूळ, सुक्ष्म जंतू, पाळीव प्राण्यांच्या त्वचेवरील घटक, हवेतील प्रदूषक आदींचा समावेश होतो. 

थोडे अलर्जीप्रवण असलेल्या व्यक्तींना तसेच दमा, एग्झिमासारखे विकार असलेल्या रुग्णांना पावसाळ्यात पटकन अलर्जी होते. त्वचेची अलर्जी आणखी वाढवणारा घटक म्हणजे एकदा का खाज सुटायला लागली की त्या व्यक्तीला खाजवल्याशिवाय राहवत नाही. या खाजवण्यामुळे एपीडर्मिस अर्थात त्वचेच्या बाहेरच्या स्तराचे नुकसान होते आणि त्वचेचा आतला भाग उघडा पडतो. असा उघडा पडलेला भाग म्हणजे बुरशी आणि जीवाणूंना प्रजननासाठी मोकळे रान ठरतो. 

कपडे, बूट आणि पावसाळ्यातील अलर्जी

ADVERTISEMENT

Shutturstock

पावसाळ्यासारख्या चिकचिक असलेल्या ऋतूमध्ये कपडे आणि पादत्राणे नेहमीच ओली होतात. ओले कपडे आणि ओले बूट म्हणजे अलर्जी होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असते. विशेषत: एखादी व्यक्ती कामासाठी बाहेर गेली असताना पावसात अडकली आणि बराच वेळ तशीच ओल्या कपड्यांत आणि पादत्राणांत राहिली तर अलर्जी होतेच. कृत्रिम धाग्यांच्या (सिंथेटिक) कपड्यांमध्ये रसायने असतात आणि ओले कपडे शरीराला घासले जाऊन त्वचेला अलर्जी होते. ओल्या कपड्यामुळे अंगाला खाज सुटत असल्याची तक्रार पावसाळ्यात खूप जण करतात. रेनकोट्स व जॅकेट्स, ग्लोव्ह्ज हे कृत्रिम साहित्यापासून तयार केले जातात. त्यांचा त्वचेशी थेट संपर्क आल्यास वाईट पद्धतीच्या अलर्जीज होऊ शकतात. या अलर्जींमधून बुरशीयुक्त प्रादुर्भाव होऊ शकतात. विशेषत: शरीराच्या दुमडल्या जाणाऱ्या अवयवांना, म्हणजे हाताचे कोपर, गुडघ्याची मागील बाजू, याचा धोका जास्त असतो. 

पावसाळ्यातील दमट हवामानामुळे पावलांना घाम येतो आणि बूट ओले, चिकट होतात. रस्ते घाणेरड्या पाण्याने व चिखलाने भरलेले असतात. हे पाणी व चिखल पादत्राणांत सहज शिरतात. अशी ओली पादत्राणे काही जण तासनतास घालून ठेवतात आणि परिणामी त्यांची पावले अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त होतात. अॅलर्जीज होण्यासाठी आणखी कशाचीही गरज नसते. रबर किंवा प्लास्टिकच्या पादत्राणांमध्ये बांधून ठेवण्यासाठी वापरले जाणारे घटक, डिंक, अॅडहेजिव्ह्ज, प्रक्रियेसाठी आवश्यक घटक असतात आणि त्यांची पाण्यासोबत क्रिया होऊन डर्माटिटिस होतो. हा अलर्जीचा एक वेदनादायी आणि अवघडून टाकणारा प्रकार आहे. 

मोल्ड्स आणि अलर्जी

मोल्ड्स हा बुरशीचाच एक प्रकार असून अन्न व पाण्याचा स्रोत मिळाल्यास जोमाने वाढतो. ओल्या भिंतींवर, घरातील अनावश्यक पसाऱ्यावर, जड टेपेस्ट्रीवर ही बुरशी उगवू शकते. पावसाळ्यात मोल्ड्समुळे अनेक प्रकारच्या अलर्जी होऊ शकतात. यामध्ये अलर्जिक ऱ्हिनिटिस आणि अलर्जिक अस्थमा या विकारांचा समावेश आहे. घरातील तसेच बाहेरील दोन्ही प्रकारचे मोल्ड्स पावसाळ्यात त्वचेच्या अलर्जी वाढवतात. 

ADVERTISEMENT

बुरशीचा प्रादुर्भाव

Shutterstock

पावसाळ्यातील हवामान उष्ण व दमट असते आणि असे हवामान बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. हाताच्या तसेच पावलाच्या बोटांमध्ये होणारे गजकर्ण किंवा व्हिटिशी फ्युरीसारखे (अॅथलिट्स फूट) त्वचाविकार ही पावसाळ्यात अॅलर्जीजमुळे होणाऱ्या बुरशीच्या प्रादुर्भावाचीच उदाहरणे आहेत. अॅथलिट्स फूट: हा सामान्यपणे आढळणारा बुरशीचा प्रादुर्भाव आहे. यामध्ये खाज सुटणारे, ढलप्यांसारखे दिसणारे पांढरे फोड पायाच्या बोटांमध्ये व तळपायावर दिसू लागतात. हा विकार संपर्काने पसरतो. अॅथलिट्स फूटमध्ये खूप खाज सुटते आणि वेदना होतात. 

पावसाळ्यात बुरशीयुक्त प्रादुर्भावांमध्ये वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे या काळात खूप घाम येतो. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण खूप जास्त असल्याने घाम पटकन वाळत नाही. त्वचेवर क्षार जमल्याने तिला खाज सुटू लागते आणि अशा भागांमध्ये बुरशी झपाट्याने पसरते. मग यामुळे खास सुटणे वाढते व लाली येते. तुम्ही तुमच्या त्वचेची नीट काळजी गेतली नाही, तर बुरशीमुळे होणारा प्रादुर्भाव संसर्गजन्य ठरू शकतो. 

ADVERTISEMENT

फॉलिक्युलिटिस

हा एक जीवाणूजन्य प्रादुर्भाव आहे. याचा परिणाम केसांच्या ग्रंथींवर होतो. त्वचेला संरक्षण मिळावे म्हणून आपल्या संपूर्ण शरीरावर केसांचे आच्छादन आहे. जेव्हा घाम आणि प्रदूषक त्वचेच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्यामुळे केसांच्या ग्रंथी मुरमासारख्या दिसणाऱ्या लालसर फोडाच्या स्वरूपात फुटतात. यामुळे खूप वेदना होतात. फॉलिक्युलिटिस पाठीच्या वरील भागावर हात, मांड्या व कपाळावर होऊ शकतो. 

आर्द्र वातावरणात जीवाणूंची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे इंपेटिगोसारखे जीवाणूजन्य प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. 

पावसाळ्यात घेण्याची त्वचेची काळजी

Shutterstock

ADVERTISEMENT

खालील मुद्दे लक्षात ठेवा: 

● मधुमेहाच्या रुग्णांना पावसाळ्यात त्वचेच्या अलर्जी व प्रादुर्भावांना बळी पडण्याचा धोका अधिक असतो. विशेषत: नखांना होणारा प्रादुर्भाव. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घ्यावी.

● तुम्हाला त्वचेवर एखाद्या अलर्जीची सुरुवात दिसली, तर सलूनमध्ये जाण्याऐवजी तत्काळ त्वचारोगतज्ज्ञांकडे जा. 

● सैलसर, आरामदायी कपडे वापरा.

ADVERTISEMENT

● उत्तम वैयक्तिक स्वच्छता राखा. स्वत:ला तसेच स्वत:च्या कपड्यांना स्वच्छ ठेवा. 

● फार वेळ ओले राहू नका. तुम्ही पावसात भिजला असाल, तर घरी येता क्षणी कपडे बदला. 

● पावसाळ्यामध्ये कोठेही जाताना कायम छत्री व रेनकोट सोबत बाळगा. 

● तुमचे ओले बूट व मोजे काढून ठेवा व ते नीट धुतल्याशिवाय परत घालू नका. पावसाळ्यात साधी, हवेशीर पादत्राणे वापरा. यामुळे पावले कोरडी राहतील. 

ADVERTISEMENT

● काही वेळा त्वचेला होणारे प्रादुर्भाव संसर्गजन्य असतात. तुमचे टॉवेल्स व अन्य वैयक्तिक वस्तू इतरांहून वेगळे ठेवा. 

● तुम्ही पोहायला जात असाल, तर पोहून झाल्यावर डिसइन्फेक्टंट वापरून आंघोळ करा. तसेच काखांमध्ये, जांघेत व हाता-पायाच्या बोटांमधील जागेत फंगल पावडर लावा.

● त्वचेवर खाजवू नका.

● कापल्याच्या जखमा झाकून ठेवा व ड्रेसिंग नियमितपणे बदलत राहा. 

ADVERTISEMENT

● घराभोवती कोठे पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करून घ्या, म्हणजे मोल्ड्स उगवणार नाहीत.

● आपल्या सभोवतालची जागा कोरडी ठेवा व हवा खेळती राखा. 

● एग्झिमा टाळण्यासाठी पाळीव प्राण्यांना झोपण्याच्या खोलीत प्रवेश देऊ नका. 

● धूळ तसेच सुक्ष्मजीव यांचे अवरोधन करणारी आच्छादने गाद्या व उशांवर घाला.

ADVERTISEMENT

● जमीन कोरडी राहावी म्हणून पावसाळ्यात कार्पेटिंग काढून टाका. 

● चादरी व ब्लँकेट्स नियमितपणे धुवा.

● भरपूर हंगामी फळे-भाज्या तसेच दही, बदाम, लसूण, ब्राऊन राइस, ओट्स, दलिया, खजूर यांचा समावेश असलेला उत्तम आहार घ्या.

● स्वत:ला कायम हायड्रेटेड ठेवा. ठराविक वेळानंतर शुद्ध पाणी पित राहा. 

ADVERTISEMENT

● पावसाळ्याच्या ऋतूमध्ये औषधी साबण, अँटिफंगल व अँटीबॅक्टेरिअल क्रीम्स वापरा. तुमच्या त्वचेला कोणते क्रीम किंवा साबण अनुकूल ठरेल हे जाणून घेण्यासाठी डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घ्या. 

● आठवड्यातून दोनदा फेस स्क्रब वापरून चेहरा घासून स्वच्छ करा. 

● पावलाची त्वचा घासून स्वच्छ करण्यासाठी पुमिस या सच्छिद्र दगडाचा वापर करा आणि शुष्क तसेच सुरकुतलेली त्वचा काढून टाका.

● पावसाळ्यात न विसरता मॉईस्चराईझर वापरा. हेवी क्रीम्स वापरणे टाळा. 

ADVERTISEMENT

● चेहरा धुताना प्रत्येक वेळी टोनर वापरा. यामुळे त्वचेची pH पातळी राखणे शक्य होईल.

● घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. पावसाळ्यात स्प्रेच्या स्वरूपातील सनस्क्रीन लावा व वारंवार लावत राहा. 

● केमिकल पील्स वापरण्यासाठी पावसाळ्याचे हवामान सर्वांत उत्तम आहे. तुमच्या निस्तेज त्वचेला जिवंत करण्यासाठी पील हा सर्वोत्तम मार्ग आहे. पावसाळ्यात त्वचेचा सूर्यप्रकाशाशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्वचा हुळहुळी होण्याचा धोका सर्वांत कमी असतो. तुमच्या त्वचेसाठी कोणता पील योग्य ठरेल हे जाणून घेण्याकरता डर्माटोलॉजिस्ट्सचा सल्ला घ्या. 

वरील सूचनांचे पालन करा आणि निरोगी व आनंदी त्वचेसह पावसाळ्याचा आनंद घ्या.

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा 

शस्त्रक्रियेद्वारे (बेरिअॅट्रिक सर्जरी) वजन कमी झाल्यानंतर अशी घ्या काळजी

आरोग्यासंबंधित ‘हे’ 10 फॅक्ट्स माहीत आहेत का – Facts About Health

म्हणून महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते…

ADVERTISEMENT

 

29 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT