काही जणांच्या रक्तातच अभिनय असतो तर काहींना आपल्यातील अभिनयाची कला गवसण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. ज्यासाठी त्यांना मदत होते ती अॅक्टींग स्कूल्सची. आपल्या देशात तर बॉलीवूड अभिनेत्यांना अगदी देवासमान वागणूकही दिली जाते. पण याच कारणामुळे मुंबईत रोजच्या रोज अनेकजण अभिनय करण्यासाठी बॉलीवूडच्या दारी येतात. जर तुमचं नशीब चांगलं असेल आणि लगेच ब्रेक मिळाला तर मग तुमचं आयुष्यचं बदलेल. पण यासाठी तुम्हाला लागते ती उत्तम अॅक्टींग, चांगली स्क्रीप्ट आणि लक फॅक्टरसुद्धा. हेही लक्षात ठेवा यासाठी तुम्ही खान किंवा कपूरचं असलं पाहिजे असं काही नाही. तुमच्यात टॅलेंट असेल तर त्याला नक्कीच संधी मिळेल.
खरंतर भारतातील अनेक शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला बॉलीवूड आणि टीव्ही सीरियल्सचं हब मानलं जातं. विश्वास ठेवा या #CITYOFDREAMS कोणीही चमकू शकतं. फक्त टॅलेंट, योग्य संधी आणि नशीबसोबत पाहिजे. मग तुम्हाला दुसरं कोणतंही करिअर आणि 9-5 चा जॉब नको असेल तर पत्करा थोडी जोखीम आणि द्या तुमच्यातील बेस्ट.
तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची मदत करतील मुंबईतली बेस्ट ड्रामा स्कूल्स. मग जाणून घ्या कोणती आहेत मुंबईतली बेस्ट अॅक्टींग स्कूल्स ज्यांनी घडवलं बी-टाऊनच्या दीपिका पदुकोण, हृतिक रोशन आणि इतर सेलेब्सना.
तुम्हाला माहीत आहे का? बॉलीवूडचा कोहीनूर म्हणजेच किंग खान शाहरूखला कोणी घडवलं ते? हेच ते अॅक्टींग स्कूल. ज्यांना बॅरी जॉन माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगत आहोत की, बॅरी जॉन हा ब्रिटनमध्ये जन्मलेला भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि शिक्षक. बॅरीच्या या इन्स्टिट्यूटमध्ये अनेक मॉड्यूल्समधून अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं. जसं चित्रपटातील वेगवेगळ्या सीन्सवर काम करणं, ऑडिशनची तयारी करून घेणे, मेजनर टेक्नीक आणि इतर अॅडव्हान्स अॅक्टींग टेक्नीक्स. हे क्लासेस सोमवार ते शुक्रवार 9-5 या वेळात सुरू असतात.
वेबसाईट Website - www.bjas.in
पत्ता Address - बॅरी जॉन अॅक्टींग स्टुडिओ, नानक चेंबर्स, 301, फन रिपब्लिकसमोर, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम. मुंबई - 4000053.
संपर्क Contact Number - +91 9967977966 / 67, +91 22-26742192
येथे घडलेले सेलिब्रिटीज - शाहरूख खान, वरूण धवन, फ्रिडा पिंटो, सुशांत सिंग राजपूत, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस.
रोशन तनेजा हे नाव अभिनय क्षेत्रात ओळखलं जातं. त्यांनी FTII पुण्यातील अॅक्टींग डिपार्टमेंटचे हेड म्हणून काम केलं आहे. त्याचं अॅक्टींग स्कूल मुंबईतील बेस्ट Acting Schools पैकी एक म्हणून ओळखलं जातं. ते गेल्या 50 वर्षांपासून त्यांना अभिनयाचा आणि या क्षेत्रात शिकवण्याचाही अनुभव आहे. अनेक सेलिब्रिटीजने इथेच अभिनयाचे धडे घेतले आहेत. तसंच त्यांनी आपल्या मुलांनाही अॅक्टींगमध्ये येण्याआधी इथेच शिकवण्यासाठी पाठवण्याचं मत व्यक्त केलं आहे. येथील पॉप्युलर कोर्सेस म्हणजे अलेक्झांडर टेक्नीक, सीन ड्युटी, डबिंग प्रॅक्टीस, बॉलीवूड डान्स, योगा, मूव्हमेंट, मोनोलोग आणि कॉन्सन्ट्रेशन.
वेबसाईट Website - www.roshantaneja.com
पत्ता Address - बंगलो नं 29, वर्सोवा टेलिफोन एक्सचेंजजवळ, एस.व्ही.पी नगर, म्हाडा, अंधेरी पश्चिम, महाराष्ट्र.
संपर्क Contact Number - 088980 12356
येथे घडलेले सेलिब्रिटीज - आमिर खान, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अनिल कपूर, बॉबी देओल, चंकी पांडे.
मुंबईतील अजून एक चांगलं अॅक्टींग इन्स्टिट्यूट म्हणजे किशोर नमित कपूर अॅक्टिंग इन्स्टीट्यूट. हे इन्स्टिट्यूट अंधेरीत असून येथील कोर्सेसचा कालावधी हा जास्तीत जास्त 18 आठवडे आहे. इथे तुम्हाला अभिनयाची बाराखडी, डबिंग, योगा, डान्स, बॉडी लँग्वेज, कॅरेक्टर स्टडी, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि बरंच काही शिकता येईल. लक्षात असू द्या बॉलीवूडमधील अनेक स्टार्स इकडेच शिकले आहेत. काय माहीत तुम्ही पण भविष्यातील फेमस सेलिब्रिटी होऊ शकता.
वेबसाईट Website - www.knkactinginstitute.com
पत्ता Address - वसुंधरा सोसायटी नं 95, युनिट D-4/5/6 म्हाडा, एस.व्ही पटेल नगर, अंधेरी पश्चिम, महाराष्ट्र - 400053
संपर्क Contact Number - 022 2636 1626
येथे घडलेले सेलिब्रिटीज - वरूण धवन, करिना कपूर, रणवीर सिंग, सैफ अली खान, प्रियांका चोप्रा, विकी कौशल, परिणिती चोप्रा, लारा दत्ता, जॉन अब्राहम, अर्जुन रामपाल, हृतिक रोशन, विवेक ऑबेरॉय, उदय चोप्रा, अमृता अरोरा, सोनाली बेेद्रे, इम्रान खान, डिनो मोरिओ, कुणाल कपूर, नील नितीन मुकेश, लिसा रे.
बॉलीवूड आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेता अनुपम खेर. त्यांनी सुरू केलेलं अॅक्टींग स्कूल म्हणजे अॅक्टर प्रीपेर्स. हेही मुंबईतील प्रसिद्ध अभिनय शाळांपैकी एक आहे. येथे अभिनय शिकण्याचा मुख्य फायदा म्हणजे अनुपम खेर यांचं थेट मार्गदर्शन आणि काऊन्सलिंग तुम्हाला मिळतं. तुम्ही इथे फक्त अभिनयच नाहीतर डान्स, स्क्रीप्ट राईटींग आणि प्रोफेशनल मॉडेलिंगही शिकू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांची वेबसाईट पाहू शकता.
वेबसाईट Website - http://www.actorprepares.net
पत्ता Address - मुक्ती बिल्डींग, 5 वा मजला, 141 मॉडेल टाऊन, चार बंगला, अंधेरी पश्चिम, मुंबई - 400053
संपर्क Contact Number - 080808 01761
येथे घडलेले सेलिब्रिटीज - प्राची देसाई, कियारा अडवाणी, प्रिटी झिंटा, वरूण धवन, एशा गुप्ता, दीपिका पदुकोण.
जर तुम्ही अभिनय शिकलात आणि नंतर कळलं की खरा इंटरेस्ट चित्रपट बनवण्यात आहे. नो प्रोब्लेम...तुम्ही अॅडमिशन घेऊ शकता व्हिसलिंग वूड्समध्ये. बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक शो मॅन सुभाष घई यांचं हे स्कूल आहे. इथे तुम्हाला सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांचं मार्गदर्शन मिळेल. येथील विद्यार्थ्यांना फक्त मास्टरक्लासेस आणि वर्कशॉप्सचं नाहीतर ऑन फिल्ड शूटींगचाही अनुभव घेता येतो.
वेबसाईट Website - whistlingwoods.film
पत्ता Address - Reliance Media, Film City Complex, Near, Goregaon, Mumbai, Maharashtra 400065
संपर्क Contact Number - 022 3091 6070
यशस्वी प्रोजेक्ट्स - कपूर अँड सन्स, आशिकी 2, ओके जानू, हायवे, लिपस्टिक अंडर माय बुरखा, डिअर जिंदगी, पीके, पिकू, क्वीन, रामलीला, 2 स्टेट्स, दिल धडकने दो.
या स्कूलची स्थापना झाली 2013 साली. ड्रामा स्कूल मुंबईमधील विद्यार्थ्यांना अभिनय आणि उत्तम दर्जाच्या कामासाठी तयार केले जाते. हे स्कूल रंगभूमीवरील अभिनय शिकण्यासाठी परफेक्ट आहे. या स्कूलचे तीन आधारस्तंभ म्हणजे अभिनय, निर्मिती आणि एंटरप्रिन्युअरशिप, एकदा तुमचा रंगभूमीवरील अभिनय पक्का झाला की, बॉलीवूड किंवा टीव्हीवर अभिनय करायला काहीच हरकत नाही.
वेबसाईट Website - dramaschoolmumbai.in
पत्ता Address - 5th Floor, Mumbai Marathi Sahitya Sangh, Dr Bhalerao Marg, Charni Road, Kele Wadi, Charni Road (E, Girgaon, Mumbai, Maharashtra 400004)
संपर्क Contact Number - 096193 36336
यशस्वी प्रोजेक्ट्स - हिना शर्मा, मिखाईल सेन, अर्चना पटेल.
जुनून थिएटरचं नाव रंगभूमीच्याबाबतीत खूप मानाने घेतलं जातं. या थिएटरची स्थापन समीरा अयंगार आणि संजना कपूर यांनी केली. या थिएटर मागचं ध्येय एकच होतं कला आणि रंगभूमीतील कलाकारांना जोडणारा दुवा बनणं. इथे भरपूर वर्कशॉप्स सुरू असतात. येथे होणाऱ्या कार्यक्रमांची आणि वर्कशॉप्सची माहिती तुम्हाला वेवसाईटवर मिळेल. पण येथील थिएटरमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला ठराविक वयाचं असणं आवश्यक आहे. कारण हे थिएटर खासकरून मुलं आणि युवांकरता आहे.
वेबसाईट Website - http://www.junoontheatre.org
पत्ता Address - Balkrishna Cooperative Housing Society, E6, JP Rd, Gharkul Society, Seven Bungalow, Andheri West, Mumbai, Maharashtra 400058
संपर्क Contact Number - 098192 61204
या स्टुडिओची स्थापना केली जेफ गोल्डबर्ग यांनी. ते फक्त अभिनयच शिकवतात असं नाही तर त्यांची खासियत स्क्रीप्ट रायटींग आणि दिग्दर्शनसुद्धा आहे. त्यांच्याप्रमाणेच इतर अभिनयाबाबत पॅशनेट असलेल्या टीचर्सकडून इथे अभिनय शिकवला जातो. इथे तुम्ही मेथड अॅक्टींग, युथ प्रोग्रॅम्स, म्युझिकल थिएटर, फिल्ममेकींग, प्रायव्हेट कोचिंग आणि कॉर्पोरेट प्रोग्रॅम्सही शिकू शकता.
वेबसाईट Website - www.jgstudio.in
पत्ता Address - लिंक्स बिल्डींग, 4 था मजला, कॉर्नर ऑफ 14th रोड आणि लिकींग रोड, डॉमिनोज पिझ्झाच्या समोर, खार पश्चिम, मुंबई - 400052.
संपर्क Contact Number - 075069 06927
यशस्वी प्रोजेक्ट्स - नोटबुक, गली बॉय, पद्मावत, संजू, हॉटेल मुंबई, राजी, फन्ने खान, हाफ गर्लफ्रेंड.
आता बालाजीचं नाव काही वेगळं सांगायची गरज नाही. इंडस्टीमध्ये सगळ्यांनाच एकता कपूर आणि तिचे वडील जितेंद्र कपूर माहीतच आहेत. टीव्हीवर आपला दबदबा कायम केल्यावर बालाजी बॉलीवूडमध्येही यश मिळवलं. तसंही अभिनय काय फक्त चित्रपट आणि रंगभूमीवरच केला जातो का? तुम्ही सीरियल्समध्येही नक्कीच अभिनय करू शकता. अभिनय, दिग्दर्शन किंवा एडिटींग शिकण्याची तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला इथे बऱ्याच संधी उपलब्ध होतील. तसंच तुम्हाला इथे स्क्रीप्टरायटींग, साऊंड आणि व्हीएफक्ससुद्धा शिकता येतील.
वेबसाईट Website - http://www.theiceinstitute.com/
पत्ता Address - ग्राऊंट फ्लोर, लोडस्टार बिल्डींग, किल्लीक निक्सॉन कंपाऊंज, चांदिवली पेट्रोलपंप जवळ, साकी विहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - 400072
संपर्क Contact Number - 080100 78601
राँकेल मीडिया आणि रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये तुम्हाला करण्यासारखं बरंच काही आहे. इथे येऊन तुमची निवड कदाचित बदलूही शकते. तुम्ही अभिनय तर शिकू शकताच त्यासोबतच इथे तुम्हाला रेडिओ जॉकी, डबिंग, व्हॉईसिंग, एडिटींग आणि स्क्रीप्टराईटींगही करायला मिळू शकतं. जर तुम्हाला यापैकी कशाबाबत माहिती नसेल तर तुम्ही इथे अॅडमिशन घ्या. इथे तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर चित्रपटात आणि टीव्हीसीरियल्समध्ये प्लेसमेंटही मिळू शकतं. ऑल द बेस्ट!
वेबसाईट Website - http://ronkel.org
पत्ता Address - 82, आर्थर व्हिला, गावठाण लेन 1, एस,व्ही रोड, पानेरी शोरूमजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई - 400053
संपर्क Contact Number - 022 2670 1641
मुंबईतील अॅक्टींग स्कूल्स आणि अभिनयाबाबत विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तर
कोर्सचा कालावधी हा तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. तुम्ही शॉर्ट टर्म किंवा सर्टिफिकेट कोर्सही करू शकता. शॉर्ट टर्म कोर्सेसचा कालावधी किमान सहा महिने असतो तर डिप्लोमा कोर्सेसचं कालावधी 1 ते 2 वर्ष असतो. तसंच तुम्ही कला आणि ड्रामामध्ये B.A ही करू शकता ज्याला तीन वर्ष लागतात. जो ग्रॅज्युएशन डीग्री प्रोग्रॅम आहे.
भारतातील पालकांना अभिनय हे करिअर म्हणून कितपत आवडेल ही शंका आहे. पण जर तुम्ही त्यांना तुमच्यातील अभिनयाचा टॅलेंट दाखवलात तर ते तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन देतील. पण खरं पाहता अभिनय क्षेत्राची कोणतीही शाश्वती नाही. कारण रोजच्या रोज मुंबईत अनेकजण अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी दाखल होतात.ृ
ऑडिशन्सबाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त अभिनय येऊन चालणार नाही तर त्यासोबतच तुमचा या इंडस्ट्रीतील संपर्कही वाढवायला हवा. जसं अभिनयातील शिक्षक, बरोबरचे कलाकार आणि मित्रमंडळी. ते तुम्हाला होणाऱ्या ऑडिशन्सची माहिती देऊ शकतात. तसंच कास्टींग कॉल्सचा शोध घेत राहा. सोशल मीडियावर चेक करा. विविध ऑडिशन साईट्सवर तुमचं अकाऊंट क्रिएट करा. तुमच्या भागातील फिल्म ऑफिसेसना संपर्क करा.
आधी प्रशिक्षण घ्या. अभिनयाचे धडे कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये असतानाच घ्या. बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत जाणून घ्या. अभिनयातील प्रसिद्ध व्यक्तीमत्वांची पुस्तकं वाचा. स्वतःला प्रमोट करा. पोर्टफॉलिओ बनवून घ्या. तुम्हाला सूट होणाऱ्या भूमिकासाठी अप्लाय करा. नेटवर्क बनवा आणि योग्य दिशेने कूच करा. कोणत्याही संधीला कमी लेखू नका. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.